पोट आणि मेंदू ही दोन महत्त्वाची ‘ऊर्जानिर्मिती केंद्रे’ आहेत. पोट हे आहारतून ‘चतन्य ऊर्जा’ निर्माण करते तर याच ऊर्जेतूनच योग्य ती वासना तयार होऊन पुढे मेंदू त्यातून ‘विचार’ उर्जा निर्माण करतो. तेव्हा पोटाचे आरोग्य महत्त्वाचे! पोट स्वच्छ राहाणे म्हणजेच अन्नाचे व्यवस्थित पचन होणे खूप महत्त्वाचे आहे! शाकाहारी भोजन हे अतिउत्तम, कारण त्यायोगे शरीरातील आम्ल-अल्कली ह्यांचे संतुलन नीट राखले जाते. कारण असंतुलन ही आजाराची पहिली पायरी आहे.
मला आठवतंय की लहान असताना आमच्या घरी एक शिस्त/ पद्धत होती- की जेवायला पान (ताट) घ्यायच्या आधी आम्ही तिघीं बहिणींनी आपापल्या जागेवर बसायचं (एका हाकेमध्ये!). आईने केलेले सर्व चविष्ट पदार्थ वाढून झाल्यावर, पपा नवेद्य दाखवणार- सण असो वा नसो. नवेद्य दाखवल्याशिवाय खायला सुरुवात करायची नाही आणि जेवताना भाजीमध्ये मीठ/ तिखट कमी-जास्त काहीही झालं असेल तरी तोंडातून तक्रारीचा सूर काढायचा नाही आणि पानामध्ये काहीही टाकायचं नाही. ‘अन्नदाता सुखी भव’ म्हणूनच पानावरून उठायचं! बऱ्याच शिस्तींपकी ही एक शिस्त! आज एक आहारतज्ज्ञ म्हणून आणि ते ही एका आध्यात्मिक हॉस्पिटलच्या आहार विभागाची मुख्य म्हणून ज्या वेळी मी ‘अन्न पूर्णब्रह्म’ ह्या तत्त्वाचा विचार करते त्या वेळी लहानपणी झालेल्या ह्या ‘अन्न-संस्काराचा’ थोडा थोडा अधिक गंभीरपणे आणि आत्मीयतेने विचार करते. आज ज्या वेळी मी माझ्या रुग्णासाठी प्रेम आणि आध्यात्मिक भावनेने युक्त असा ‘प्रसाद’ (आमच्या हॉस्पिटलमधील डाएट- जे अर्थातच वेगवेगळ्या क्लिनिकल कंडिशनप्रमाणेच असते ) देते त्या वेळी रुग्णांसाठी होणारा फायदा पूर्वी मला आश्चर्यचकित करायचा पण आता मला त्याची सवय झाली आहे. कारण आपण काय खातो, त्याचबरोबर ते कोणी बनवलं आहे आणि कोणत्या भावनेने बनवलं आहे- हे सुद्धा खूप परिणामकारक असतं, हे मला पूर्णपणे पटलं आहे.
आपल्या शरीरामध्ये ७५ ट्रिलियन पेशी असतात आणि प्रत्येक पेशी एक स्वतंत्र युनिट आहे. प्रत्येक पेशीमध्ये ऊर्जा निर्माण होते आणि प्रक्रियेमध्ये तयार होणारे विषारी पदार्थ पेशीच्या बाहेर टाकले जातात. पेशींचं काम जरी स्वतंत्र होत असलं तरी त्या एकमेकांमध्ये गुंतलेल्या असतात. परिपूर्ण आहार म्हणजेच ज्यामध्ये कबरेदके, प्रथिने, चरबी, जीवनसत्त्वे आणि पाण्याचे योग्य प्रमाण आहे असा आहार. आहार जर परिपूर्ण नसेल तर आजाराला आमंत्रण, कारण त्यामुळे पेशींचं काम नीट होत नाही ना! हे झालं शास्त्र! तुम्ही म्हणाल आजच्या आधुनिक जगात आजारांची कारणं आणि उपाय माहिती आहेत आणि डॉक्टर/ आहारतज्ज्ञांचं योग्य मार्गदर्शन असेल तर आपण आजार टाळू शकतो किंवा आजारावरती मात करू शकतो. मग इथे अध्यात्म/ भावना वगरे गोष्टींचा विचार का करायचा?
मला सांगा सत्यनारायणाचा प्रसाद ‘वेगळाच’ का लागतो- नेहमीच्या गोडाच्या शिऱ्यापेक्षा? किंवा आपण कितीही मोठे झालो तरी आईच्या हातचा गरम-गरम वरणभात (वरून तूप आणि िलबू घातलेला) का चविष्ट लागतो? कधीतरी हॉटेलमध्ये खायला छान वाटतं पण ज्या लोकांवर रोज हॉटेलमध्ये खायची वेळ येते त्यांना विचारा ‘ते’ जेवण कसं लागतं ते! अन्न बनवताना दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात- आपल्या मनातील भाव आणि अन्नाचा थेट देवाशी असलेला संबंध! एक गोष्ट तुम्ही बघितली का- ज्यावेळी आपण बाहेरचं ‘अन्न’ खातो त्या वेळी रात्री खूप विचित्र स्वप्नं पडतात- शांत झोप लागत नाही. म्हणून अन्न बनवताना आणि खाताना आपल्या मनामध्ये आपण अन्नदात्याविषयी कृतज्ञता बाळगली तर त्याच अन्नाचं अमृत होऊन आपण पेशींसाठी पोषक आहार देऊ शकतो. आपल्या सतर्क आणि कृतज्ञ भावाशिवाय आपण निरोगी राहू शकत नाही.
सात्त्विक आहाराचे महत्त्व :
‘पोट आणि मेंदू ही दोन महत्त्वाची ऊर्जानिर्मिती केंद्रे’ आहेत. पोट हे आहारातून ‘चतन्य ऊर्जा’ निर्माण करते तर याच ऊर्जेतूनच योग्य ती वासना तयार होऊन पुढे मेंदू त्यातून ‘विचार’ ऊर्जा निर्माण करतो. तेव्हा पोटाचे आरोग्य महत्त्वाचे! पोट स्वछ राहाणे म्हणजेच अन्नाचे व्यवस्थित पचन होणे खूप महत्त्वाचे आहे! रोज सकाळी उठल्यावर शौचाद्वारे पोट साफ होणे हे निरोगी शरीराचे लक्षण आहे. त्यासाठी आहार हा हलका-सात्त्विक असायला हवा. शाकाहारी भोजन हे अतिउत्तम, कारण त्यायोगे शरीरातील आम्ल-अल्कली ह्यांचे संतुलन नीट राखले जाते, कारण असंतुलन ही आजाराची पहिली पायरी आहे.
आहारात ऋतुनुसार पालेभाज्या, फळभाज्या, फळे, भात, पोळी, साजूक तूप, कडधान्ये, कोिशबिरी यांचा समावेश असावा. शक्यतो लोणची, तळलेले पदार्थ, अतिथंड, अतिगोड, चमचमीत-मसालेदार पदार्थ, यांचा जेवणात वापर अतिशय मोजकाच असावा (नसल्यास जास्त बरे, परंतु सध्याच्या राहणीमानात ते कठीणच असते तरी जिभेवर ताबा ठेवावा हे उत्तम).
अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रित क
प्राणापानसमायुक्त पचाम्यन्नं चतुर्विधम् कक
Meaning : Having become the digestive fire (Vaisvaanara), I abide in the body of living beings and associated with the Prana (upward force) and Apana (downward force), digest the fourfold food.
जसं अन्न तसं मन आणि जसं मन तशी आपली वागणूक आणि जशी आपली वागणूक (कर्म) ते आपल्या आयुष्याचं फलित. एकदम सोप्पं समीकरण आहे. म्हणूनच जर आयुष्यात ‘खऱ्या अर्थाने’ यशस्वी व्हायचं असेल तर आपल्या अन्नाचा विचार नको का करायला? घटस्फोटांचं वाढतं प्रमाण, सतत तणावाखाली असलेलं मन, दिवसेंदिवस वाढणारी ‘रॅट रेस’ या सर्वाच्या जोडीला कुपोषण असेल तर मग ‘जीवन जगण्याची कला’ आपण आत्मसात केली नाही असंच म्हणायला हवं.
‘पोटाकडून मनाकडे’ – हृदय जिंकायचं असेल तर पोटातून मार्ग काढायला हवा असं म्हणतात. (रुचकर भोजन द्यायला हवं) मग त्यासाठी हा आहार-विचार :
* अन्न शिजवताना मन शांत असावं. शक्य असल्यास शुचिर्भूत होऊन स्वयंपाक सुरू करावा.
* भगवंतामुळे आपल्याला हा दिवस दिसला. त्याच्यामुळेच शेतामध्ये पिकं येतात आणि फळं मिळतात ही कृतज्ञतेची भावना मनामध्ये असावी.
*अन्नाविषयी वाईट शब्द काढू नये. अन्नाचा आदर करावा.
*अन्नामध्ये मधुर, तिक्त, कडू, तुरट, खारट, आंबट अशा सर्व रसांचा समावेश असावा.
तक्ता-
मधुर स्वाद – शेंगदाणे, बदाम, हातसडीचा तांदूळ वगरे
आंबट स्वाद – िलबू, कोकम, ताक वगरे
तुरट स्वाद – ओवा, काकडी, आवळा वगरे
तिक्त स्वाद – आलं, मिरची
खारट स्वाद – संधव
कडू स्वाद- मेथी, कारलं, मेथीचे दाणे, पालेभाज्या वगरे
काही ‘सात्त्विक आहार-सूचना’ :
१. भोजनाची जागा व जेवणासाठी वापरावयाची भांडी स्वच्छ ठेवा.
२. जेवायला सुरुवात करण्यापूर्वी हात, पाय व तोंड स्वच्छ धुऊन जेवायला बसा.
३. टेबल-खुर्चीवर किंवा नुसत्या जमिनीवर न बसता आसन घेऊन किंवा पाटावर बसा.
४. अन्नग्रहण करण्यापूर्वी करावयाची प्रार्थना- ‘हे देवा, हे अन्न तुझ्या चरणी अर्पण करून तुझा प्रसाद या भावाने मी ग्रहण करत आहे. या प्रसादातून मला शक्ती व चतन्य मिळू दे.’
५. अन्न देवाला अर्पण करा व नंतर देवाचा प्रसाद म्हणून ग्रहण करा.
६. अन्न पायदळी तुडवले जाऊ नये, यासाठी जेवणानंतर ताटाभोवती सांडलेले अन्नकण उचला.
७. मन प्रसन्न आणि शांतचित्त अन्नपचनासाठी खूप जरुरी आहे. शक्य झाल्यास एखादी उदबत्ती लावली तरी चालेल.
८. टी.व्ही. समोर बसून किंवा फोनवर बोलत न खाल्लेलच बरं! ज्या अन्नासाठी आपण मेहनत घेतो त्याचं सेवन करायला वेळ नाही हे पटत नाही!
जेवायला सुरुवात करण्यापूर्वी पुढील श्लोक म्हणा.
वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे।
सहज हवन होते नाम घेता फुकाचे।
जीवन करि जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म।
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म?
जनीं भोजनी नाम वाचे वदावे।
अती आदरे गद्यघोषे म्हणावे।
हरीचिंतने अन्न सेवित जावे।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे?
तामसी जेवण रागीट बनवते, राजसी जेवण आळशी बनवते आणि सात्विक जेवण प्रेम वाढवते.
खूप कठीण वाटतंय? इच्छा तिथे मार्ग! थोडेसे प्रयत्न केले आणि नीट नियोजन असेल तर काहीच कठीण नाही. बघा तुमच्या मनाला पटतंय का?
‘चतुरंग’च्या सर्व वाचकांना नव-वर्षांच्या आणि आरोग्यमय आयुष्यासाठी हार्दकि शुभेच्छा! (समाप्त)
अन्नसंस्कार
पोट आणि मेंदू ही दोन महत्त्वाची ‘ऊर्जानिर्मिती केंद्रे’ आहेत. पोट हे आहारतून ‘चतन्य ऊर्जा’ निर्माण करते तर याच ऊर्जेतूनच योग्य ती वासना तयार होऊन पुढे मेंदू त्यातून ‘विचार’ उर्जा निर्माण करतो. तेव्हा पोटाचे आरोग्य महत्त्वाचे! पोट स्वच्छ राहाणे म्हणजेच अन्नाचे व्यवस्थित पचन होणे खूप महत्त्वाचे आहे! शाकाहारी भोजन हे अतिउत्तम, कारण त्यायोगे शरीरातील आम्ल-अल्कली ह्यांचे संतुलन नीट राखले जाते.
आणखी वाचा
First published on: 15-12-2012 at 03:41 IST
मराठीतील सर्व आनंदाचं खाणं बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Happy meal food processing