नैसर्गिक आपत्ती निसर्गातील उलथा-पालथींमुळे मानवावर कोसळत असतात. पण काही आपत्ती मानवनिर्मित असतात. मानवी चुका, माणसांचे दुर्लक्ष, निष्काळजीपणा किंवा या सगळ्याचा अन्य माणसांनीच गैरफायदा घेणे यामुळे काही आपत्ती ओढावत असतात. उदाहरणच द्यायचे झाले, तर आग लागणे, गॅसगळती, माणसे किंवा वस्तू हरवणे, अपघात इत्यादी अशा आपत्कालातही मदत करणाऱ्या हेल्पलाइन्स आहेत. आज अशाच काही हेल्पलाइन्सची माहिती घेऊ या.
कोठेही, कोणत्याही स्वरूपाची आग लागली की, ताबडतोब अग्निशमन दलाच्या हेल्पलाइन क्रमांक १०१ वर संपर्क साधायचा. मुंबई, ठाणे व नवी मुंबई या शहरांमधून या क्रमांकावर संपर्क साधता येतो. या क्रमांकावर केव्हाही, कोठूनही संपर्क साधून तातडीने मदत मिळवता येते. या हेल्पलाइन क्रमांकाशिवाय अग्निशमन नियंत्रण कक्षाचे दिवसाच्या २४ तासांत केव्हाही संपर्क साधता येईल, असे आणखी काही हेल्पलाइन्स क्रमांक आहेत-
मुंबईसाठी- २२६२६९११, २३०७६१११, २३०८६१८१, २३०७४९२३, २३०७६११२, २३०७६११३. आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष- २२६९४७१९, २२६९४७२५, २२६९४७२७.
ठाणे शहरासाठी- २५३९१६००, २५३३१६००.
नवी मुंबईसाठी- २७६६०१०१, बेलापूर- २७५७२१११, नवीन पनवेल- २७४५२३३७, कळंबोली- २७४२०१३८.
मुंब्रासाठी- २५४६२४२४, २५४६२४४४, २५४६२००१.
डोंबिवलीसाठी- ०२५१ २४७०३५७.
कल्याणसाठी- ०२५१ २३२९८००, ०२५१ २३१५०१.
अंबरनाथसाठी- ०२५१२६८२४००, ०२५१ २६८२४०९.
उल्हासनगरसाठी- ०२५१ २५५३१७१, ०२५१ २५५७७६१.
गॅस सिलिंडरमधून होणारी गळती
घरगुती गॅस सिलिंडरमधून होणारी गॅसगळती आणि त्यामुळे निर्माण होणारी आणीबाणीची परिस्थिती हीसुद्धा एक आपत्कालीन परिस्थिती असू शकते. अशा वेळी तातडीने संपर्क साधून मदत मिळवण्यासाठी केंद्र सरकारने देशपातळीवर एक हेल्पलाइन क्रमांक सुरू केला आहे. तो आहे- १९०६. भारताच्या कोणत्याही भागातून कोणत्याही वेळी या हेल्पलाइनवर संपर्क साधता येतो व तातडीने मदत मिळवता येते.

शुभांगी पुणतांबेकर
puntambekar.shubhangi@gmail.com

Story img Loader