या वर्षी भरपूर पाऊस झालाय. या पावसामुळे साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणावर झाला आहे. डेंग्यू, मलेरिया, स्वाइन प्लू, कावीळ इत्यादी आजारांच्या साथींनी मुंबई आणि परिसराला हैराण करून सोडले आहे. या साथींमध्ये गरज आहे योग्य आणि वेळेवर निदान आणि उपचार होण्याची. त्यासाठी राज्य सरकार, मुंबई आणि ठाणे महापालिका जनतेला या बाबतीत सर्व प्रकारची मदत करायला तत्पर आहेत. माहिती करून घेऊ या त्यासाठीच्या हेल्पलाइन्सची.
राष्ट्रीय पातळीवर सुरू असलेली एक
हेल्पलाइन आहे – १८०० १८० ११०४
नॅशनल हेल्थ पोर्टलतर्फे या हेल्पलाइनवरून साथीच्या आजारांविषयी तसेच आरोग्याविषयी माहिती आणि सल्ला दिला जातो. ही व्हॉइस
वेब सेवा हिंदी, इंग्लिश, तामीळ, बंगाली आणि गुजराती या पाच भाषांमधून पुरवली जाते.
आपण फोन लावायचा आणि पलीकडून
विचारणा झाली, की आपल्याला हवी ती माहिती विचारायची. उदाहरणार्थ साथीचे आजार. मग आपल्याला त्या संबंधात माहिती दिली जाते. दुर्गम भागातल्या अशिक्षित माणसांना या सेवेचा खूप फायदा होतो.
राज्य सरकारच्या हेल्पलाइन्स आहेत – ०२२ २२०२७९९०, ०२२ २२७९३५५३.
राज्य सरकारच्या ‘जीवन अमृत सेवा’ नावाच्या योजनेच्या हेल्पलाइनचा क्रमांक आहे – 104. या क्रमांकावर रक्तासाठीची मागणी नोंदवली जाते. आवश्यक ती माहिती दिल्यानंतर रुग्णाच्या जवळच्या ब्लड बँकेकडे ती माहिती दिली जाते आणि एक तासाच्या आत रक्ताचा पुरवठा सशुल्क केला जातो.
बृहन्मुंबई महानगरपालिकेचा चौकशीसाठीचा हेल्पलाइन क्रमांक आहे – १०८ या विनामूल्य क्रमांकावरून आवश्यक ती माहिती दिली जाते.
स्वाइन फ्लू, डेग्यू, कावीळ, मलेरिया आदी संसर्गजन्य आणि साथीच्या आजारांसंबंधात माहिती हवी असल्यास मुंबई महापालिकेच्या नियंत्रण कक्षाच्या हेल्पलाइनचे क्रमांक आहेत – ०२२ २२६९४७२५, ०२२ २२६९४७२७.
ठाणे महानगरपालिका हेल्पलाइन क्रमांक – ०२२ २५३३२६८५, विस्तारित – ४४४, ९९६९२०१६५४.
स्वाइन फ्लूसंबंधात माहितीसाठी कस्तुरबा रुग्णालयाच्या हेल्पलाइनचे क्रमांक – ०२२ २३०८३९०१, २३०९२४५८, ०२२ २३०००८८९.
भाभा रुग्णालय, वांद्रे, हेल्पलाइन क्रमांक – ०२२ २६४२२७७५, २६४२९८२८, २६४२६७८७.
शुभांगी पुणतांबेकर
puntambekar.shubhangi@gmail.com