मानसिक आरोग्य चांगले राहावे म्हणून मदत करणाऱ्या हेल्पलाइन्सची माहिती आपण गेल्या आठवडय़ापासून (२ एप्रिल)घेत आहोत. या आणखी काही हेल्पलाइन्स.
इन्स्टिट्यूट फॉर सायकॅलॉजिकल हेल्थ, ठाणे. मैत्र हेल्पलाइन- दूरध्वनी क्रमांक ०२२-२५४३३२७०, ०२२-२५३६६५७७, ०२२-२५४२८१८३
इंस्टिट्यूट ऑफ कम्युनल सायकियाट्री अँड मेंटल हेल्थ – दूरध्वनी क्रमांक ०२२-२३७३५५५५
दिशा काउंसेिलग सेंटर, मुंबई. दूरध्वनी क्रमांक-०२२-२४३८४५७५, ९८१९४७८५३८
इंडियन काउंसिल फॉर मेंटल हेल्थ, मुंबई. दूरध्वनी क्रमांक-०२२-२३८५५२०५
क्षितिज मेंटल हेल्थ सेंटर, मुंबई. दूरध्वनी क्रमांक ०२२-२६२८९९३८, ०२२-२३०१५८८९
मैत्र मुंबई. दूरध्वनी क्रमांक-०२२-२८४०३०३७
मेंटल हेल्थ क्लिनिक, मुंबई. दूरध्वनी क्रमांक ०२२-२३७४७७६७

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मानसिक स्वास्थ्यासंबंधी असलेल्या हेल्पलाइन्स बरोबर आणखी एका महत्त्वाच्या हेल्पलाइनची माहिती, ती म्हणजे एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आल्यास कोणत्या हेल्पलाइनशी संपर्क साधल्यास मदत मिळू शकेल. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर एक तासाच्या आत त्या रुग्णाला मदत मिळणे आवश्यक असते. अशी तातडीने मदत मिळाली, तर रुग्ण वाचण्याची शक्यता असते. म्हणूनच हेल्पलाइनवर संपर्क साधून तातडीची मदत मिळवता येते. त्या हेल्पलाइन्स आहेत-

‘एशियन हार्ट इंस्टिट्यूट, मुंबई’ – या हेल्पलाइनचा दूरध्वनी क्रमांक आहे -१२६ १२६ ही हेल्पलाइन विनामूल्य २४ तास सुरू असते. या क्रमांकावर संपर्क साधल्यावर रुग्णाला जवळच्या रुग्णालयात नेण्यासाठी ३० मिनिटांच्या आत रुग्णवाहिका पाठवली जाते. शिवाय तोपर्यंत रुग्णाची काळजी कशी घ्यायची त्याच्या सूचना रुग्णांच्या घरातल्यांना दिल्या जातात. रुग्ण दुर्गम भागात राहात असल्यास हवाई रुग्णवाहिकेची सशुल्क व्यवस्था केली जाते. एवढेच नव्हे, तर गरज असल्यास रुग्णाला रुग्णालयात भरती करायच्यावेळी तातडीने ५० हजार रुपयांचे कर्जही दिले जाते.
बॉम्बे हार्ट ब्रिगेड या संघटनेच्या हेल्पलाइनचा दूरध्वनी क्रमांक आहे-१०५ ही हेल्पलाइन २४ तास विनामूल्य सुरू असते. संपर्क साधल्यावर रुग्णवाहिकेची तातडीने व्यवस्था करण्यात येते आणि रुग्णाला जवळच्या रुग्णालयात भरती केले जाते.

– शुभांगी पुणतांबेकर