कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीत आपण मदतीची अपेक्षा करतो. सगळ्यात आधी आपल्याला पोलिसांची आठवण होते. पोलिसांच्या हेल्पलाइन्सचे क्रमांक आपण याआधीच माहीत करून घेतले आहेत. आज इतरांच्या हेल्पलाइन्सची माहिती करून घेऊ या.
महाराष्ट्र रा ज्याच्या मुंबईतील मंत्रालयाचे आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक आहेत- ०२२ २३०१८४७२, ०२२ २२८५४१५६.
बृहन्मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील नागरी सोयीसुविधांसंदर्भात कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीबाबत तक्रार करायची असल्यास त्यांच्या नियंत्रण कक्षाच्या हेल्पलाइन्सचे क्रमांक – ०२२ २२६९४७२५, ०२२ २२६९४७२७, ०२२ २२७०४४०३, ०२२ २४११४०००.
पावसाळा सुरू झाला की अतिवृष्टीमुळे पाणी तुंबणे, इमारती कोसळणे, झाडे पडणे, साठलेल्या पाण्यात कोणी तरी अडकून पडणे, अशा घटना घडणारच. या आपत्कालीन परिस्थितीविषयी तक्रार करायची असल्यास मुंबई महापालिकेच्या हेल्पलाइनचा क्रमांक आहे- १९१६.
एस.एम.एस. करूनही मुंबई महापालिकेला तक्रार कळवता येते. त्यासाठीच्या हेल्पलाइनचा क्रमांक आहे- ९८७०७९१९१६. इतर काही महापालिका आणि पालिकांच्या हेल्पलाइन्सचे क्रमांक आहेत-
ठाणे महापालिका- ०२२ २५३९२३२३, ०२२ २५३३१५९०, ०२२ २५३३१७४७, ९१ ९७६९००७५२०.
नवी मुंबई महापालिका- ०२२ २७५६७०६०, ०२२ २७५६७०६१.
कल्याण-डोंबिवली महापालिका- ०२५१ २२०६२०७, ०२५१ २२०६२०५.
मीरा-भाईंदर पालिका- ०२२ २८१९२८२८, ०२२ २८१९७६३५.
वसई-विरार पालिका- ०२५० २५२५१०६, ०२५० २५२५१०५.
उल्हासनगर पालिका- ०२५१ २७२०११६, ०२५१ २७२०१३६.
कुळगाव-बदलापूर पालिका- ०२५१२६९१५५६.
अंबरनाथ पालिका- ०२५१२६८२३५३,२६८२६८५.
भिवंडी-निजामपूर नगरपालिका- २५२२ २५३९५१, २५२२ २५५३१४.

शुभांगी पुणतांबेकर
puntambekar.shubhangi@gmail.com

Story img Loader