पावसाळ्यात नेहमी येणारा अनुभव म्हणजे आपण राहात असलेल्या इमारतीच्या परिसरात साप आढळणे. सापांच्या बिळांमध्ये पाणी गेले की साप बाहेर येतात. पण सामान्य माणसे साप म्हटला की घाबरतात. त्यांना मारायलाच धावतात. परंतु सापांचा जीवही मोलाचा असतो. पर्यावरणातील अविभाज्य भाग असलेल्या सापांना मारायचे नाही. तर काय करायचे? साप दिसला की न घाबरता सर्पमित्रांना बोलावायचे. सर्पमित्रांच्या काही संघटना सापांना वाचवण्यासाठी, त्यांना पुन्हा त्यांच्या अधिवासात सोडण्यासाठी, तसेच त्यांच्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी कार्यरत आहेत. त्यांच्याशी संपर्क साधून आपण त्यांना आपल्या पत्त्यावर बोलावायचे. सर्पमित्र येतात आणि सापांना पकडून नेतात. त्या सापांना त्यांच्या अधिवासात सोडतात. हे काम सर्पमित्र विनामूल्य करत असतात. स्प्रेडिंग अवेअरनेस ऑन रेप्टाइल्स अ‍ॅण्ड रिहॅबिलिटेशन प्रोग्रॅम या संघटनेचे कार्यकर्ते हे मोलाचे कार्य करतात. त्यांची नावे अणि संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत- संतोष शिंदे (दहिसर ते कांदिवली)- ९७६९३३५५३१, ९८२११३४०५६. जयंत दुखंडे- ९८२१२२००८७. अमर पाटील (वाशी ते दहिसर)- ९८२१८१४९५९. ओमकार देहेरकर (गोरेगाव)- ९८३३१७७२३२. राजू कोळी (मुंबई शहर)- ९८९२३७९२२४. पवन शर्मा (मुलुंड ते विक्रोळी)- ९८६९७८०२०२. नितीन वाल्मीकी (दक्षिण मुंबई)- ९८६९९३३७७८.
सापांप्रमाणेच इतर प्राण्यांसाठी आणि पक्ष्यांसाठीही काम करणाऱ्या प्राणी-पक्षीमित्रांच्या संघटना आहेत. संकटात सापडलेल्या, असहाय स्थितीतील निराधार आणि पाळीव नसलेल्या प्राण्यांना व पक्ष्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी या संघटनांचे कार्यकर्ते कार्यरत असतात. पावसाळ्यात तर तशी गरज भासतेच. अशा प्राण्यांना व पक्ष्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर उपचार करणे, त्यांची काळजी घेणे, त्यांचे पुनर्वसन करणे आदी कामे हे प्राणी-पक्षिमित्र करतात. काही प्राणी-पक्षिमित्र संघटनांच्या हेल्पलाइन्स आणि त्यांचे दूरध्वनी क्रमांक-प्लांटस् अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल वेलफेअर सोसायटी, मुंबई-पॉज-९८३३४८०३८८. पॉज- ठाणे, कल्याण, डोंबिवली- ९८२०१६१११४.
वेलफेअर ऑफ स्ट्रीट डॉग्ज- ०२२ २३०६०२७५.
वाइल्ड लाइफ वेलफेअर असोसिएशन – ९७५७३२२९०१.
आणखी काही प्राणी-पक्षिमित्र संघटनांच्या हेल्पलाइन्सची माहिती पुढच्या वेळी.

– शुभांगी पुणतांबेकर
puntambekar.shubhangi@gmail.com

Story img Loader