आरोग्य हा आपल्या सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय आहे. आरोग्य चांगले राहिले तरच आपण आनंदाने जगू शकू म्हणूनच ते चांगले राहण्यासाठी सारेच प्रयत्नशील असतात. पण तरीही कधी कधी आरोग्याच्या तक्रारी उद्भवतातच. आरोग्यासंबंधी काही प्रश्न, शंका निर्माण होतात. अशा वेळी मदत करतात आरोग्यविषयक हेल्पलाइन्स. आजपासून आपण आरोग्यविषयक हेल्पलाइन्सची माहिती करून घेणार आहोत. मुळातच आरोग्य चांगले राहावे म्हणून काय करावे, एखादा आजार झाल्यास काय करावे, आरोग्यविषयक सेवा-सुविधा कुठे मिळू शकतील, विविध आजारांनी त्रस्त असणाऱ्यांसाठी असणाऱ्या आधारगटांची माहिती, आरोग्याशी संबंधित आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाच्या काळजीसंबंधीची माहिती, अशा वेगवेगळ्या बाबतीत मदत करणाऱ्या हेल्पलाइन्सची ओळख आपण करून घेणार आहोत.
केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाचा ‘नॅशनल हेल्थ पोर्टल’ म्हणजेच ‘राष्ट्रीय स्वास्थ्य प्रवेशद्वार’ हा विभाग कार्यरत आहे. त्यांच्यातर्फे राष्ट्रीय पातळीवर आरोग्यविषयक हेल्पलाइन चालवली जाते. २४ तास विनामूल्य चालवल्या जाणाऱ्या या ‘व्हॉइस वेब हेल्पलाइन’चा दूरध्वनी क्रमांक आहे- १८००-१८०-११०४. दूरध्वनी सुविधा देशाच्या बहुतांश भागात उपलब्ध असल्याने ही हेल्पलाइन उपयुक्त ठरत आहे. या हेल्पलाइनचे वैशिष्टय़ म्हणजे पलीकडून ध्वनिमुद्रित बोलणे ऐकू येत असले तरी आपण त्यांच्याशी संवाद साधू शकतो. हिंदी, इंग्लिश, बंगाली, तमिळ आणि गुजराती यांपैकी एका भाषेत संवाद साधता येतो. पलीकडून पर्याय विचारले जातात आणि आपण त्यापैकी एक पर्याय निवडून, पाचपैकी एका भाषेत सांगायचा आणि माहिती मिळवत जायचे. रोग, आरोग्य सुविधा, जीवनशैलीविषयक प्रश्न, आपत्कालीन तातडीची कृती, रस्ते सुरक्षा वगैरे बाबतींतील सल्ला दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीला तातडीने दिला जातो. अगदी आध्यात्मिक स्वास्थ्याविषयीचीही माहिती या हेल्पलाइनवर मिळू शकते.
मानसिक आरोग्यासाठी मुंबई महापालिकेतर्फे एक हेल्पलाइन २४ तास चालवली जाते. तिचा दूरध्वनी क्रमांक आहे- ०२२-२४१३१२१२. ‘के.ई.एम.’ रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर्स या हेल्पलाइनवर मार्गदर्शन करतात. मानसिक ताण, मानसिक समस्या, मानसिक अस्वास्थ्य, या संबंधात समाजात जागृती निर्माण करण्याचाही या हेल्पलाइनचा प्रयत्न आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शुभांगी पुणतांबेकर
puntambekar.shubhangi@gmail.com 

शुभांगी पुणतांबेकर
puntambekar.shubhangi@gmail.com