ग्रामीण भागातील गरीब लोकांना आणि समाजातील वंचित घटकातील लोकांना मदत करणाऱ्या काही स्वयंसेवी संस्थांची माहिती आपण आतापर्यंत घेतली. आता आपण जरा वेगळे काम करणाऱ्या संस्थांची ओळख करून घेऊ या. कर्करोगाशी सामना करताना रुग्णांना खूप शारीरिक, मानसिक यातनांना सामोरे जावे लागते. उपचारांदरम्यान इतर परिणामांबरोबरच एक परिणाम म्हणजे केस गळणे. काही रुग्ण तशा स्थितीतही डोक्याला रुमाल बांधून फिरतात. पण काही रुग्ण खोटय़ा केसांचा टोप घालतात. असले टोप महाग असतात. सामान्य आर्थिक स्थिती असलेल्यांना ते परवडत नाहीत. अशा गरजू रुग्णांना केसांचे टोप मोफत देणाऱ्या संस्थांना चांगल्या आणि लांब केसांची आवश्यकता असते. लांब केस कापून आखूड करणाऱ्या स्त्रियांनी आपले कापून टाकलेले केस या संस्थांना दान केल्यास गरजूंना मदत होऊ शकेल. मात्र केस नैसर्गिक स्थितीतील हवेत. ब्लीच किंवा ट्रीट केलेले केस चालत नाहीत. अधिक माहितीसाठी पुढे दिलेल्या संस्थांशी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा