आयुष्यात ठरवलेल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मेहनत घेणं, आव्हानांना सामोरं जाणं आवश्यक असतं, पण त्यात यश आलं नाही तर आडव्या येणाऱ्या पळवाटा आणि बाह्य परिस्थितीला आपण दोष देत बसतो. अशा वेळी त्या अपयशाने निराश न होता, त्याच ‘अपयशाचा मी कसा वापर करू?’ हा प्रश्न स्वत:ला विचारत त्यात संधी शोधली तर?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आपल्यापैकी प्रत्येकाच्याच आयुष्यात हा टप्पा येऊन गेलाय… आपण काही ध्येयं ठरवतो, त्यात यशस्वी झाल्याचं स्वप्न बघतो, आणि त्या आनंदाच्या, समाधानाच्या कल्पनेत हरवून जातो. मग वेळेचा अभाव, आवश्यक गोष्टींचा, उत्साहाचा अभाव असे खऱ्या आयुष्यातले अडथळे यायला सुरुवात होते. आपल्याला कळायच्या आत आपलं मन हजार पळवाटा शोधतं. आणि स्वप्नपूर्ती होत नाही. त्याचे कारण शोधताना ‘जबाबदारी घ्यायची इच्छाच नसणं’ या मूळ समस्येवर काम करण्यापेक्षा ‘मी फार व्यग्र आहे.’ किंवा ‘ही योग्य वेळ नाही.’ अशी कारणे देणं फार सोपं ठरतं अशावेळी.
पण त्यामुळे नुकसान कुणाचं होतं? त्याअर्थी स्वत:चंच नुकसान करून घेण्यात आपण तरबेज आहोत, असं म्हणायला हरकत नाही. पळवाटा शोधल्यानं आपल्याला मानसिकदृष्ट्या सुरक्षित वाटू शकतं, कारण यामुळे अस्वस्थता, अनिश्चितता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अपयशापासून आपलं रक्षण होतं. जेव्हा आपण टाळाटाळ करण्याचे बहाणे शोधत असतो तेव्हा खरं तर येणाऱ्या आव्हानांना सामोरं जाताना आपल्या अहंकाराला थोडाही धक्का लागू नये, याचीच आपण खबरदारी घेत असतो. ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणंच आपण टाळतोय ही वस्तुस्थिती स्वीकारण्यापेक्षा बाह्य परिस्थितीवर किंवा चुकीची वेळ यावर खापर फोडणं फार सोपं.
हेही वाचा : ऐकावे मनाचे… करावे मनाचेच…
तेव्हा आपण हे विसरतो की, या सततच्या टाळाटाळीचं मूळ आपल्या मनातच आहे. अपयशाची भीती, अज्ञाताची भीती यांसारखे अनेक अडथळे हे आपल्या मनातच असतात आणि तेच आपलं पाऊल पुढं पडण्यापासून रोखत असतात. ज्या क्षणी ‘मी हे करू शकत नाही, कारण…’, असं आपण म्हणतो त्या क्षणी आपण कोणत्या तरी कारणांचा आधार घेत स्वत:ला जिथे आहोत तिथेच थांबवतो.
ती अवस्था सुखावह असते कारण त्यामुळे आपल्या खांद्यावरचं ओझं उतरतं. जेव्हा आपण ‘‘माझ्याकडे पुरेसा वेळ नसतो.’’ असं म्हणतो, त्यावेळी खरं तर आपण जबाबदारी झटकून टाकत असतो. वास्तविक, ‘वेळ नसणं’ ही खरी समस्या नसून आपली ‘मनोवृत्ती’ ही खरी समस्या आहे. ‘अडथळे’ आणि ‘आव्हानां’च्या जगात आपण जगतोय आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांना अडचणींचा सामना करण्यापेक्षा त्यापासून पळ काढण्याचीच अधिक इच्छा असते. खरं म्हणजे एखाद्या गोष्टीला पूर्णपणे वाहून घेण्यापेक्षा ती न करण्यासाठी कारणं शोधणं जास्त सोपं आहे. उदाहरणार्थ, व्यायाम न करण्याचा दोष आपण व्यग्र वेळापत्रकाला देतो किंवा पुरेसे पैसेच नसल्याचं कारण सांगतो पण ते मिळवण्यासाठी उत्पन्नाचा आणखी एखादा मार्ग शोधायची आपली तयारी नसते. पण खरं तर यामुळे आपण या कारणं देण्याच्या मानसिकतेचे बळी ठरत असतो. आपलं परिस्थितीवर नियंत्रण असण्यापेक्षा परिस्थितीचंच आपल्यावर नियंत्रण आहे, याच धारणेनं आपण विचार करत असतो.
पण त्या विचारातून बाहेर काढत सजगतेनं जगण्याच्या प्रवासात याच परिस्थितीचा वापर कसा करता येईल हे पाहायला हवं. त्यासाठी तुम्हाला ‘‘मी याचा कसा वापर करू?’’ या विचारसरणीचा अंगीकार करायला शिकणं या संकल्पनेची ओळख करून द्यायचीय. ‘येस, यू कॅन चेंज’ या माझ्या पुस्तकात मी योग्य प्रश्न विचारण्याचं महत्त्व यावर भर दिलाय. योग्य म्हणजे असे प्रश्न की जे आपल्या मार्गात अडथळे निर्माण करण्याऐवजी आपल्याला सक्षम बनवतील. ‘काय चुकलंय?’ किंवा ‘काय कमी आहे?’ याचा विचार करण्यापेक्षा ‘‘मी या स्थितीचा कसा वापर करू?’’ असा प्रश्न विचारायला आपण सुरुवात करायला हवी. आपल्या मनोवृत्तीत घडवलेल्या या छोट्याशा बदलामुळे ‘प्रगती’ची आणि ‘स्थित्यंतरा’ची अनेक दारे आपल्यासाठी उघडतील.
‘‘मी या स्थितीचा वापर कसा करू?’’ हा आपल्यातली लवचीकता वाढवणारा प्रश्न आहे. या प्रश्नामुळे मार्गातल्या अडथळ्यांची दखल घेतली जातेच पण त्याचबरोबर आपलं लक्ष त्यावर उपाय शोधण्यावर केंद्रित केलं जातं. ‘आव्हानांना न टाळता त्यातून काही शिकण्याचा प्रयत्न करणं’ यात खरी युक्ती दडलेली आहे. आलेल्या परिस्थितीला पाठ दाखवून पळण्यापेक्षा हिमतीने मार्ग काढण्याचा पर्याय निवडल्यामुळे परिस्थितीचं आपल्यावर नव्हे, तर आपलं परिस्थितीवर नियंत्रण येतं.
हेही वाचा : हात धुता धुता…
‘‘मी या स्थितीचा वापर कसा करू?’’ या प्रश्नाच्या उत्तर शोधण्यातून हजारो लोकांना असंख्य अडचणींमधून मार्ग मिळाला आहे. उदाहरणादाखल दोन गोष्टी सांगतो. चीनमधल्या हंग्झू गावातल्या एका पारंपरिक कुटुंबातल्या मुलाची ही गोष्ट आहे. तो अभ्यासात अजिबात हुशार नव्हता. प्राथमिक शाळेच्या परीक्षेत दोनदा, तर माध्यमिक शाळेच्या परीक्षेत त्याला तीनदा अपयश आलं. हार्वर्ड विद्यापीठासह त्याने अनेक विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी अर्ज केले पण अनेक ठिकाणांहून त्याचे अर्ज नाकारले गेले. तीस वेगवेगळ्या नोकऱ्यांसाठी त्याने अर्ज केले पण तिथेही निराशाच झाली. त्याच्या जागी दुसरी कोणी व्यक्ती असती तर आपण अपयशी व्यक्ती आहोत, अशीच त्याची भावना झाली असती. पण हा मनुष्य त्याला अपवाद ठरला. आयुष्यात आलेल्या अपयशांचं कारण देऊन त्याने त्याची जबाबदारी झटकली नाही. उलट प्रत्येक अनुभवातून जाताना हा माणूस स्वत:ला हाच प्रश्न विचारत राहिला की ‘‘मी या स्थितीचा कसा वापर करू?’’
कालांतरानं इंग्रजी भाषेच्या कौशल्यामुळं त्याला शिक्षकाची नोकरी मिळाली. १९९५मध्ये अनुवादक म्हणून जेव्हा त्याची अमेरिकावारी घडली त्यादरम्यान त्याची इंटरनेटशी ओळख झाली. त्यावेळी त्याला एक आश्चर्यजनक गोष्ट आढळली. ती म्हणजे चीनमधल्या बिअर तयार करणाऱ्या कारखान्यांची इंटरनेटवर नोंदच नव्हती. या गोष्टीचा संधी म्हणून उपयोग करत त्याने काही मित्रांसोबत चीनमधल्या उद्याोगांची एकत्रित यादी असलेली एक ‘वेबसाईट’ अर्थात संकेतस्थळ बनवण्याचा प्रयत्न केला, परंतु ती त्याला पैशाअभावी बंद करावी लागली. ‘सिलिकॉन व्हॅली’मधल्या गुंतवणूकदारांकडून भांडवल म्हणून काही पैसे मिळवण्याचा त्याने प्रयत्न केला. पण तिथून त्याला नकार मिळाला. त्यावेळी त्याने बनवलेलं ‘बिझनेस मॉडेल’ फायदेशीर आणि टिकाऊ नसल्याची त्याच्यावर टीका झाली. पण तो थांबला नाही. प्रत्येक ‘अपयश’ हे काही ना काही शिकवणारं होतं आणि त्या प्रत्येक वेळी तो एकच प्रश्न स्वत:ला विचारायचा, ‘‘मी या स्थितीचा कसा वापर करू?’’ हीच विचारसरणी घेऊन तो नेटाने प्रयत्न करत राहिला आणि एके दिवशी ‘अलिबाबा’ नावाची त्याची स्वत:ची कंपनी निर्माण झाली, जी जगातल्या ५० महत्त्वाच्या कंपन्यांपैकी एक आहे.
मी कुणाबद्दल बोलतोय हे आतापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल. ही जॅक मा यांची प्रेरणादायी कहाणी आहे. ‘परिस्थितीला दोष देणं’ किंवा ‘पळवाटा शोधणं’ यापेक्षा मिळणारा प्रत्येक नकार हा त्यांना यशाच्या अधिकाधिक जवळ नेत आहे, यावर त्यांचा पक्का विश्वास होता. याच विश्वासावर त्यांनी ‘अलिबाबा’ उभी केली. वारंवार अपयश येऊनही चिकाटीनं यश कसं मिळवावं हे सांगणारी ही जॅक माची कथा आहे.
दुसरी कथा आहे ती कल्पना सरोज या ‘पद्माश्री’ने सन्मानित उद्याोजिकेची. त्यांचा जन्म महाराष्ट्रातल्या एका दलित कुटुंबात झाल्याकारणानं त्यांना तीव्र जातिभेदाचा सामना करावा लागला. १२ वर्षांच्या असताना त्यांचं बळजबरीनं लग्न लावून देण्यात आलं. मात्र सासरच्या सततच्या अपमान आणि शारीरिक शोषणाने त्या गांजून गेल्या. अखेर त्यांच्या वडिलांनीच त्यांची या छळातून सुटका केली आणि त्या आपल्या कुटुंबात परतल्या, पण संघर्ष संपला नव्हता. गावी परतल्यानंतर शेजाऱ्यांनी आणि नातेवाइकांनी त्यांचं स्वागत केलं नाहीच, उलट त्यांना नवऱ्याशी संसार नीट करता आला नाही म्हणून टोमणे मारायला सुरुवात केली. प्रचंड मानसिक आणि भावनिक यातनांच्या कडेलोटानंतर एका असह्य क्षणी त्यांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला, पण सुदैवानं त्यांच्या मावशीने त्यांना यातून वाचवलं. त्याच वेळी त्यांच्या मनात लख्ख उजेड पडला आणि ‘‘या स्थितीचा मी कसा वापर करू?’’ असा प्रश्न त्यांनी स्वत:ला विचारला. तेव्हा त्यांना उमगलं की, जरी त्यांना भूतकाळातल्या घटना बदलता येणार नव्हत्या, तरी त्या घटनांना काय प्रतिसाद द्यायचा हे मात्र तिला ठरवता आलं असतं.
हेही वाचा : सांधा बदलताना : या भवनातील गीत पुराणे?
स्वत:चं आयुष्य पुन्हा नव्यानं उभं करण्यासाठी त्यांनी उचललेलं पहिलं पाऊल म्हणजे त्या मुंबईला आल्या आणि एका कपड्याच्या कारखान्यात शिवणकाम करू लागल्या. सुरुवातीच्या काळात कामाच्या ठिकाणीसुद्धा त्यांना अपमान सहन करावा लागला. इतर शिंप्यांच्या शिवणकामाचे खाली पडलेले दोरे, कपडा वगैरे कचरा साफ करावा लागला. पण तरीही त्यांचा आत्मविश्वास ढळला नाही. त्यांनी अशा प्रसंगांकडे अडथळे म्हणून पाहण्यापेक्षा प्रगतीची शिडी म्हणून पाहिलं. ‘‘या स्थितीचा मी स्वत:त सुधारणा घडवून आणण्यासाठी कसा उपयोग करू?’’ या प्रश्नानं त्यांना दिशा दाखवण्याचं काम केलं.
कल्पना यांनी छोटा फर्निचरचा व्यवसाय सुरू केला. हळूहळू त्यांच्या चिकाटीचं सार्थक झालं. या यशामुळे त्यांच्या औद्याोगिक जीवनाला मोठीच कलाटणी मिळाली. जसजसा व्यवसाय मोठा होत गेला तसतशा त्याच्या विस्तारासाठी आवश्यक गोष्टी उपलब्ध झाल्या आणि ‘कामानी ट्यूब्ज’ ही एक डबघाईला आलेली कंपनी त्यांनी ताब्यात घेतली. ती कंपनी बुडणार असंच कित्येकांचं मत असताना कल्पना यांना मात्र यातही संधीच दिसली, आणि ‘‘मी याचा कसा वापर करू?’’ हाच प्रश्न त्याही वेळी त्यांनी स्वत:ला विचारला.
दृढनिश्चयानं मेहनत करून ‘कामानी ट्यूब्ज’ या छोट्या कंपनीचे त्यांनी अब्जावधी डॉलर्सचा व्यवसाय करणाऱ्या कंपनीत रूपांतर केलं आणि त्यांच्या टीकाकारांना चपराक बसली. आज कल्पना सरोज यांचं नाव भारताच्या यशस्वी उद्याोजकांच्या यादीत सन्मानानं घेतलं जातं. कितीही आव्हानात्मक परिस्थिती आली तरी तिचं रूपांतर उदात्त कार्यासाठी मिळालेल्या संधीत करता येऊ शकतं, याचं त्या उत्कृष्ट उदाहरण आहेत.
आपण आपल्या वास्तवाला कसा आकार देतोय, हे आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांवर अवलंबून असतं. पळवाटा शोधल्यानं तात्पुरतं हायसं वाटू शकतं, पण याच पळवाटा आपल्या खऱ्या सामर्थ्याची ओळख होऊ देत नाहीत हेही तेवढंच खरं. ‘मीच का?’, ‘हे असंच का घडतंय?’ अशा खच्ची करणाऱ्या प्रश्नांपेक्षा ‘‘मी याचा कसा वापर करू?’’ या प्रश्नामुळे संकटाचं सुधारण्याच्या आणि प्रगतीच्या संधीत रूपांतर होऊ शकतं.
हेही वाचा : स्वभाव, विभाव : एकाकीपणातली असुरक्षितता
‘‘मी या परिस्थतीचा कसा वापर करू?’’ ही विचारसरणी आपल्याला सक्षमतेनं आणि सजगतेनं जगण्याचा मार्ग दाखवते. ही विचारसरणी काही प्रसिद्ध व्यक्तींपुरती मर्यादित नाही. ‘व्यक्तिगत’ किंवा ‘व्यावसायिक’ जीवनात जेव्हा काही आव्हानं समोर येतात तेव्हा योग्य प्रश्न विचारल्यानं आपल्याला योग्य मार्ग सापडतो. कारणं सांगायचं थांबवून जेव्हा अपयशाचा उपयोग ‘यशाकडे जाण्याची शिडी’ म्हणून आपण करतो तेव्हा आपण आपल्या आयुष्यावर नियंत्रण मिळवतो. ‘आपल्यापुढे अडचणी येतील का?’ हा प्रश्न नसून ‘अधिक भक्कमपणं उभं राहण्यासाठी आपण त्यांचा उपयोग करून घेतो का?’ हा खरा प्रश्न आहे.
sanket@sanketpai.com
caption कल्पना सरोज आणि जॅक मा