‘तक्रार करणं’ हा मनुष्याचा मूलभूत स्वभाव. असं म्हणतात की, एक सर्वसामान्य माणूस दिवसातून अंदाजे ३० वेळा कशाची ना कशाची तक्रार करत असतो. मनातली खदखद बाहेर काढल्यानं बरं वाटत असलं, तरी तक्रार करायची सवय लागली, तर त्याचे शरीरावर नकारात्मक परिणाम होतात. तक्रारीचं हे दुष्टचक्र भेदून त्यातून बाहेर पडण्याचा प्रभावी मार्ग आहे, तक्रारीचा उपवास! कसा करायचा तो?

डिसेंबर महिन्यातली ती एक कुंद सकाळ. खूप काळापासून न भेटलेला एक मित्र एका कॉफी शॉपमध्ये भेटायला येणार होता. नेहमीप्रमाणे मी वेळेच्या थोडा आधीच पोहोचलो होतो. माझी नेहमीची ‘अमेरिकानो’ मागवली. ती येतेय, तेवढ्यात त्याचा फोन आला की, प्रचंड गर्दीत अडकून पडल्याने त्याला पोहोचायला अर्धा तास उशीर होईल. कॉफी घेत निवांत बसण्याशिवाय पर्याय नव्हता.

tharala tar mag audience upset about new track of the serial
खूप बोअर करताय, ठरवून ताणलेली मालिका अन्…; ‘ठरलं तर मग’चा नवीन ट्रॅक पाहून प्रेक्षक नाराज! पुढे काय घडणार?
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Victims of bulldozer action in UP welcome SC verdict
‘बुलडोझर’ निकालाचे उत्तर प्रदेशातील पीडितांकडून स्वागत; नुकसानभरपाईच्या मागणीसाठी न्यायालयात जाण्याचे संकेत
ajit pawar
पिंपरी: अजित पवारांच्या पक्षाच्या देहू शहराध्यक्षाच्या मोटारीतून रोकड जप्त
Congress, votes, Nayab Singh Saini, Nayab Singh Saini pune,
खोटी आश्वासने देऊन मतविभागणीचा काँग्रेसचा उद्योग, हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांचा आरोप
nitin gadkari
Nitin Gadkari: ‘भाजपाचं पिक वाढलंय, त्यावरही फवारणी करण्याची गरज’, नितीन गडकरींचा इशारा कुणाकडे?
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा
Fear, man behaviour, courage,
‘भय’भूती : …तर भयमुक्ती होईल

हेही वाचा : पंचतारांकित पर्यटनाचा ‘प्रलय’

थोड्याच वेळात तिथे माणसांची वर्दळ वाढू लागली. चहुबाजूंनी कानावर पडणारे निरनिराळे वाद-संवाद ऐकणं सुरू झालं. माझ्या उजव्या बाजूला बसलेलं एक जोडपं काहीसं अस्वस्थ दिसत होतं. त्यातली ‘ती’ अगदीच नाराज दिसत होती. नाराजीनेच ती नवऱ्याला म्हणाली, ‘‘तू म्हणाला होतास की, या शनिवार-रविवारच्या सुट्टीसाठी तू एक कॉटेज बुक करशील!’’ यावर ‘तो’ म्हणाला, ‘‘माझा बॉस कसा आहे ते माहीतेय ना तुला? त्यानं मला पुढच्या आठवड्यापर्यंत प्रोजेक्ट पूर्ण करायला सांगितलाय. त्यामुळे मी जागचा हलूच शकत नाही. नेहमीच त्याच्यामुळे आपल्या प्लॅनवर विरजण पडतं.’’

माझ्या समोरच्या टेबलावर दोन मध्यमवयीन मित्र आपापल्या बायकांच्या कुरबुरी उगाळत बसले होते. त्यातला एकजण म्हणाला, ‘‘मी अतिशय निष्णात वकील आहे. लोकांना त्यांचे खटले जिंकवून देतो, पण बायकोपुढे मात्र माझं काऽऽही चालत नाही.’’ प्रत्युत्तरादाखल त्याचा मित्र म्हणाला, ‘‘खरंय तुझं. माझी बायको तर इतकी हटवादी आहे की, तिच्यापुढे माझं सोड, देवाचंही काही चालू शकणार नाही. आजच सकाळी आमचं कडाक्याचं भांडण झालं आणि मी काहीही न खाता तसाच घराबाहेर पडलोय. आता रात्रीचं जेवण तरी मिळतंय की नाही कुणास ठाऊक.’’

माझ्या विरुद्ध बाजूला दुसऱ्या कोपऱ्यात एका तरुण जोडप्याची अतिशय ‘ज्वलंत’ विषयावर चर्चा चालली होती. त्यातली ‘ती’ फारच वैतागली होती. म्हणत होती, ‘‘जेव्हा जेव्हा आपण तुझ्या आई-वडिलांना भेटायला जातो, तेव्हा तेव्हा एकच गोष्ट घडते. मी जे काही करेन, त्या प्रत्येक गोष्टीत तुझी आई काही ना काही खुसपट काढतेच. मागच्याच रविवारी मी केलेल्या भाजीला त्यांनी किती नावं ठेवली. बाकीच्यांनी मात्र ती किती आवडीनं खाल्ली. स्वत:ला असं सतत सिद्ध करत राहण्याचा कंटाळा आलाय मला.’’ एक दीर्घ उसासा टाकत ‘तो’ म्हणाला, ‘‘अगदीच खरंय तुझं, पण तेच तिच्या अंगवळणी पडलंय. हे एखाद्याच्या मनाला किती लागू शकतं हे तिच्या गावीच नाहीये.’’

हेही वाचा : शिक्षणाचे ‘निपुण’ उद्दिष्ट!

प्रवेशद्वाराजवळच्या टेबलावर कॉलेजचे काही विद्यार्थी एकत्र जमले होते. त्यांची पुस्तकं उघडी होती, पण त्यात कुणाचंच लक्ष नव्हतं. त्यातला उलटी कॅप घातलेला एक मुलगा म्हणाला, ‘‘या सेमिस्टरमध्ये तर मी जेरीला आलोय पुरता. या टर्मचे तीन पेपर, दोन प्रेझेंटेशन्स आणि वार्षिक परीक्षा, या सगळ्याला फक्त दोन आठवडे उरलेत. हे प्रोफेसर लोक एकमेकांशी काहीच बोलत नाहीत की काय. जरा आमची क्षमता किती याचा तरी विचार करावा त्यांनी. प्रत्येक जण आमच्या डोक्यावर सबमिशनचे, जर्नल्सचे ढीगच्या ढीग आदळत नुसता आमचा अंत बघत असतो.’’

सगळीकडे अशी तुकड्या-तुकड्यांत विखुरलेली नाराजी, कुरकुर, तक्रार पाहिली, तेव्हा माझ्या लक्षात आलं की हीच नाराजी, कुठल्या ना कुठल्या गोष्टीबद्दलची तक्रार हा दुर्दैवानं लोकांना एकमेकांशी जोडणारा दुवा बनलाय हल्ली. इतकं लहानसं कॉफी शॉप, पण तिथे असलेल्या प्रत्येकाच्या काही ना काही तक्रारी होत्याच. मग त्या वैयक्तिक असोत, व्यावसायिक असोत किंवा दोन्ही प्रकारच्या असोत.

एकदाचा माझा तो मित्र पोहोचला. समोरच्या खुर्चीवर बसत तोही करवादला, ‘‘काय प्रचंड ट्रॅफिक आहे. लोकांना गाडी कशी चालवायची आणि नियम कसे पाळायचे हेच कळत नाही. मी इतका वैतागलो की, आजूबाजूच्या लोकांवर मी अक्षरश: ओरडायला लागलो.’’

‘तक्रार करणं’ हा मनुष्याचा मूलभूत स्वभाव आहे. आपल्या आत दडलेला उद्वेग, नाराजी, संताप बाहेर काढण्यासाठी आणि सहानुभूती मिळवण्यासाठी आपण नेहमीच त्याचा वापर करत असतो. एका विद्यापीठाच्या संशोधनानुसार, एक सर्वसामान्य माणूस दिवसातून अंदाजे ३० वेळा कशाची ना कशाची तक्रार करत असतो. मनातली खदखद बाहेर काढल्यानं जरी बरं वाटत असलं, तरी तक्रार करायची जर सवयच लागली, तर मात्र त्याचे अनेक नकारात्मक परिणाम होतात. काही संशोधनांनुसार, असंही सिद्ध झालं आहे की ‘तक्रारखोर स्वभावा’मुळे तुमची प्रतिकारक्षमता कमजोर होते, ताण वाढतो आणि रक्तदाबही वाढतो. याची परिणती अधिकाधिक नकारात्मक विचार करण्यातच होते. यामुळे आपलं आरोग्य बिघडतं आणि हाय कोलेस्टेरॉल, हृदयरोग यांसारख्या आजारांना बळी पडण्याची शक्यता कैक पटींनी वाढते. समाजातसुद्धा तक्रारखोर माणसाच्या सान्निध्यात राहायला कोणालाही आवडत नाही. सतत तक्रार करत राहण्याच्या स्वभावामुळे माणसं दुरावतात आणि आजूबाजूचं वातावरणही गढुळतं.

हेही वाचा : सांधा बदलताना : हा खेळ आभासांचा

तक्रार करण्याची सवय ही हळूहळू खोलवर रुजत जाते. आपल्या तक्रारखोर स्वभावाला जेव्हा इतरांकडून सहानुभूती आणि उत्तेजन मिळतं, तेव्हा मेंदूला तसंच वारंवार वागत राहण्यासाठी चालना मिळते. यातून साहजिकच हाच तक्रारखोर स्वभाव आणखी मूळ धरतो. सतत तक्रार करण्याची सवयच लागल्यामुळे नात्यांमध्ये दुरावा येतो. आपल्या घरात आणि कामाच्या ठिकाणीसुद्धा यामुळे नकोसं आणि गढूळ वातावरण निर्माण होतं. यामुळे परस्पर संवाद, तर चांगला साधला जात नाहीच, शिवाय एकमेकांमधला आदर आणि विश्वासही कमी होऊ लागतो.

तक्रारखोर स्वभावाचे परिणाम इतके गंभीर होतात याची आपल्याला जाणीव असते, तरी आपण तक्रार का करत राहतो? याचं खरं आणि स्पष्ट उत्तर हे आहे की, तक्रार करणं फारच सोपं आहे. जबाबदारी टाळण्यासाठी स्वत:च्या चुकांकडे, दोषांकडे माणसं डोळेझाक करतात आणि समोरच्या गोष्टीतले, व्यक्तीतले दोष दाखवत, मात्र तक्रारीचे सूर आळवतात. कोणतंही काम करण्यात चालढकल करणाऱ्या लोकांना सारखं काहीतरी कारण शोधायचं आणि आपल्या निवांतपणाच्या कोशातून बाहेरच यायचं नाही याची सवय लागलेली असते. आणि म्हणून गोष्टी टाळण्यासाठी सतत तक्रारी करत राहणं हा त्यांच्यासाठी रामबाण उपाय असतो. तक्रारीचा सूर आळवल्यामुळे अल्प काळासाठी का होईना पण आपल्या मनासारखं घडतं, आपल्या तक्रारीची दखल घेतली जाते याचं समाधान वाटतं. लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठीचा आणि लक्ष वेधून घेण्यासाठीचा हा एक मार्ग आहे. जी माणसं स्वत:ला सतत बळीचे बकरे समजत असतात त्यांच्यासाठी स्वत:च्या प्रश्नांवर तोडगा शोधण्यापेक्षा तक्रार करणंच सोपं असतं.

आपण जे वागतो, त्याची जबाबदारी आपलीच असते. जर आपल्याला सजगतेने जगायला शिकायचं असेल तर आपण ती घ्यायलाच हवी. तक्रारीच्या स्वभावामुळे स्वत:वर आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांवर किती गंभीर परिणाम होतात याचा आपण जाणीवपूर्वक आणि प्रामाणिकपणे विचार करायला हवा. तक्रारीचं हे दुष्टचक्र भेदून त्यातून बाहेर पडण्याचा आपण हरप्रकारे प्रयत्न करायला हवा. हे करायचं कसं, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. याचा एक प्रभावी मार्ग म्हणजे ‘तक्रारीचा उपवास!’ म्हणजे काही विशिष्ट काळाकरिता स्वत:ला तक्रार करण्यापासून रोखण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणं. अन्नाच्या बाबतीत आपण उपवास करतो तेव्हा शरीराचं शुद्धीकरण होत असताना विशिष्ट प्रकारचे पदार्थ आपण जाणीवपूर्वक खायचे टाळतो. तसंच तक्रारीचा उपवास करताना नकारात्मक शब्दांचा वापर करणं टाळायला हवं. याने आपल्या मनाचं शुद्धीकरण होईल आणि आपलं एकूणच आरोग्य सुधारेल.

तक्रारीचा उपवास सुरू करताना सुरुवातीला पूर्ण करता येईल असं उद्दिष्ट ठेवा. एक तास, अर्धा दिवस किंवा एक संपूर्ण दिवस तक्रारीशिवाय घालवायचा. शब्दांनी होणाऱ्या तक्रारी टाळणं एवढ्यापुरतंच हे मर्यादित नाहीये. कोणते विचार आणि कोणत्या परिस्थितीमुळे आपल्याला तक्रारीची सवय लागते, याबद्दलदेखील आपण अधिक जागरूक होणं हाही त्या ध्येयाचाच भाग आहे. तक्रारीच्या उपवासाची सवय लागली की, आपल्या वागण्यातल्या निरनिराळ्या छटा आणि तक्रार करण्याच्या स्वभावाला प्रोत्साहन देणाऱ्या गोष्टी कोणत्या हे तुमच्या लक्षात येऊ लागेल.

हेही वाचा : स्त्री ‘विशद : क्रीडा क्षेत्रातील ‘स्त्री’त्व

तक्रारीच्या उपवासाच्या सुरुवातीला करायची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या लहानसहान तक्रारींची नोंद घेणं. या दैनंदिन जीवनातल्या कुरबुरी असतात. ज्या महत्त्वाच्या न वाटल्यानं आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. उदाहरणार्थ, ‘काल रात्री मला नीट झोप लागली नाही. सतत कोण आवाज करत असतं कोण जाणे’ किंवा ‘आज किती उकडतंय, कधी एसी रिपेअर होईल कुणास ठाऊक,’ या तक्रारी अगदीच किरकोळ दिसतात पण या छोट्या तक्रारींना खतपाणी मिळालं की, आपल्या याच स्वभावामुळे अनेक मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. आपल्याकडून केल्या जाणाऱ्या अशा किरकोळ तक्रारींकडे जर बारकाईने पाहिलं, तर त्यांच्यामुळे आपल्या आयुष्यातल्या नकारात्मकतेला कशी चालना मिळते, हे तुमच्या लक्षात येईल.

जर या किरकोळ तक्रारींचं मोठ्या समस्यांमध्ये रूपांतर होऊ द्यायचं नसेल, तर त्यांना सकारात्मक स्वरूप द्यायचा प्रयत्न करा. जर थोडी गैरसोय झाली असेल, तर त्याबद्दल तक्रार करण्याऐवजी परिस्थितीत सुधारणा होण्यासाठी आपण काय करू शकतो याचा विचार करा. जर तुम्ही पित असाल ती कॉफी फारच कडू असेल, तर पुढच्या वेळी वेगळ्या चवीची कॉफी घेऊन बघा. काय चुकतंय यापेक्षा काय बरोबर आहे यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. जरी बाहेर उकाडा असेल, तरी अधूनमधून मिळणाऱ्या सावलीचा किंवा पंख्याच्या वाऱ्याचा आनंद माना. नकारात्मक भावनेची जोड न देता त्या गैरसोयीकडे पाहण्याचा प्रयत्न करा. जर काल रात्री तुमची झोप नीट झाली नसेल, तर आजच्या दिवसभरात ती पूर्ण करण्यासाठी वेळ काढा आणि विश्रांती घ्या.

हेही वाचा : स्वभाव – विभाग : अलिप्त मी!

भावना दडपून टाकणं किंवा आपल्या खऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष करणं म्हणजे तक्रारीचा उपवास नव्हे. तर जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने प्रतिक्रिया देणं आणि अर्थपूर्ण संवाद साधणं याचा त्यात समावेश आहे. तक्रार करण्याच्या सवयीवर नियंत्रण ठेवणं आणि आपल्या विचारांना आणि शब्दांना योग्य सकारात्मक वळण लावणं गरजेचं आहे. यामुळे या दुष्टचक्रातून आपली सुटका होऊ शकते आणि आपण अधिक समाधानाचं आयुष्य जगू शकतो. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही तक्रारीचे सूर आळवू पाहाल, तेव्हा थोडं थांबा आणि स्वत:ला विचारा, ‘‘तक्रार करून मी काय साध्य करणार आहे? या तक्रारीला मी सकारात्मक वळण लावू शकतो का?’’
sanket@sanketpai.com