शरीराने उपभोगलेला आनंद हा सात मिनिटांहून अधिक टिकत नाही असे वाचल्याचे आठवते. मनाने अनुभवलेला आनंद हा काही तास टिकू शकतो. एखाद्या बौद्धिक संशोधनाच्या कामातून मिळालेला आनंद काही दिवस टिकू शकेल. निष्काम कर्मयोगातून मिळत असलेला आनंद काही महिने अनुभवता येईल. पण शाश्वत आनंदाची प्राप्ती? ‘अहं ब्रह्मासि’ या वृत्तीतूनच शंभर टक्केआत्मानंद मिळेल. हा आनंद आपल्या आतच आहे. नको असलेली वरची आवरणे फक्त काढून टाकायची आहेत ही जाणीव म्हणजेच ‘ज्ञान’प्राप्ती म्हणजेच खरे जागे होणे. अशा ब्रह्मानंद प्राप्तीकडे घेऊन जाणारी एक कृती म्हणजे ब्रह्ममुद्रा.
ब्रह्ममुद्रा
बठक स्थितीतील सुखावह पूर्वस्थिती घ्या. आपल्याला वर, खाली, उजव्या बाजूला, डाव्या बाजूला अशी मान फिरवून घ्यायची आहे. उच्च रक्तदाब, सव्र्हायकल स्पॉन्डिीलायटिस, व्हर्टिगो इत्यादी त्रास असल्यास कृती जरा सांभाळूनच करा. हे करीत असताना हात ज्ञानमुद्रा अथवा द्रोणमुद्रेत ठेवा. मान पुढे अथवा मागे अथवा बाजूला नेताना डोळे मिटू नका. मात्र अंतिम स्थितीत डोळे मिटा. मानेचे स्नायू, गळ्याचे स्नायू यांच्यावर दाब ताणस्थिती आल्याने गळ्यातील सप्तपथांचे आरोग्य राखण्यास मदत होते.
कृती करीत असताना श्वास घ्या व कृती सोडताना श्वास सोडा. अवाजवी ताण देऊ नका. खांदे सल, शिथिल सोडा. कपाळावर आठय़ा नको, सजगता हवी.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा