हा फॉन्ट सुरू करण्याकरता सर्वप्रथम Control Panel मध्ये जा. यात तुम्हाला फीॠ्रल्लRegion and Language >> Location हा पर्याय निवडत, India असा स्वत:च्या देशाचा पर्याय निवडावा लागेल. आता Keyboards and Language हा पर्याय निवडा. आता Change Keyboards च्या पर्यायामध्ये जाऊन General चा पर्याय निवडा. यात Add क्लिक करूनAdd Input Language बटन दाबा. आता Marathi (India) Keyboard या पर्यायावर जाऊन हा पर्याय निवडून ओके करा. आता तुम्ही देवनागरी लिपीमध्ये इनक्रिप्ट पद्धतीतला कीबोर्ड वापरून मराठी टाइप करू शकता.
(इनक्रिप्ट हा कीबोर्डचा एक प्रकार आहे. उदा. यात एच हे इंग्रजी अक्षर सुरू केल्यावर प हे मराठी अक्षर टाइप होते. मराठी टायिपगकरता टाइपरायटर, फोनेटिक असेही कीबोर्डचे पर्याय उपलब्ध आहेत.)
संगणकाशी मैत्री :‘युनिकोड’चा वापर
मायक्रोसॉफ्ट कंपनी त्यांच्या ऑपरेटिंग सिस्टमसोबत कोणत्याही प्रादेशिक भाषेत टाइप करता येऊ शकणारा युनिकोड हा फॉन्ट इन्स्टॉल करून देते. या फॉन्टचा वापर करून तुम्ही जगातली कोणतीही लिपी टाइप करू शकता.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 22-11-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to use unicode on computer