डॉ. शशांक सामक हे पुण्यातील त्वचारोगतज्ज्ञ व सुप्रसिद्ध क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट असून त्यांनी स्वतची ‘डॉ. सामक सेक्शुअल फिटनेस थेरपी’ प्रसिद्ध केली आहे. ती एकमेव भारतीय सेक्स थेरेपी असून अमेरिकन व इतर आंतरराष्ट्रीय वैद्यकीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झाली आहे. स्त्रीच्या लैंगिकतेतील ‘पी स्पॉट’ या सिद्धांताचे ते संकल्पकही आहेत. १९८१ सालापासून लैंगिकशास्त्र क्षेत्रात कार्यरत असून ‘क्रिस’ या संस्थेचे अध्यक्ष व ‘डॉ. सामक अॅकॅडमी ऑफ सायंटिफिक सेक्शुआलिटी’ या संस्थेचे अध्यक्षीय संचालक आहेत. ‘वैद्यकीय कामशास्त्र’ व ‘नवविवाहितांचे कामजीवन’, या पुस्तकांचे ते लेखक आहेत.
नवरा-बायको, दोघांनीही मनमोकळा शृंगार करणे ही उत्क्रांतीची उमज आणि काळाची गरज आहे हे समजून घ्यायला हवे. काही हुशार स्त्रिया आपल्या नवऱ्याला मधुचंद्र काळातील शृंगाराची पुन्हा जाणीव करून देण्यासाठी अक्कलहुशारीने म्हणतात, ‘‘खरं म्हणजे तू जरा तसा रोमँटिक वागला असतास तर बरं झालं असतं. पण जाऊ दे तुला वयाप्रमाणं आता तसं जमणं जरा कठीणच वाटतंय!’’ नवरा झक्कत शृंगाराकडे लक्ष द्यायला लागतो !
एक रशियन म्हण आहे जिचा अर्थ आहे, ‘अस्वल नाच करत असेल तर आश्चर्य हे नाही की, ते किती सुंदर नाचतंय, तर हे असतं की, ते मुळात नाचतंय.’ तसेच ‘सेक्स’ विषयाचं आहे. आश्चर्य हे नाही की, तुम्ही त्या विषयी काय काय चर्चा करताय, पण आश्चर्य हे आहे की, तुम्ही मुळात या विषयी चर्चा करायला लागलात. आणि कुठल्याही विषयातील ‘उत्सुकता’ ही केवळ त्या विषयीची आपली ओढच दाखवत नसते, तर त्या विषयातील आपल्या अज्ञानाचे ते मापही असते. ‘सेक्स’ या विषयाबद्दल हेच म्हणता येईल.
सेक्सची उत्क्रांतीच मुळी काही विशिष्ट हेतू निसर्गाने मनात ठेवून केलेली आहे. शास्त्रज्ञ असे म्हणतात की, जवळजवळ १६ अब्ज वर्षांपूर्वी तो ‘महास्फोट (बिग बँग)’ झाला आणि हे विश्व निर्माण झाले. काळ जन्मला, आकाश जन्मले, भौतिक जग जन्मले आणि चतन्य पसरले. आपला सूर्य ५ अब्ज वर्षांपूर्वी, तर ४.५ अब्ज वर्षांपूर्वी आपली सूर्यमाला निर्माण झाली. पृथ्वी थंड होऊन ३.५ अब्ज वर्षांपूर्वी पहिले जीवन, पहिला एकपेशीय जीव ‘अमिबा’ महासागरामध्ये जन्माला आला आणि ‘अमिबा’पासूनच लंगिकता जन्माला आली! म्हणजे सेक्सची प्रक्रिया सुमारे ३.५ अब्ज वर्षांपूर्वीपासूनच या पृथ्वीवर प्राणीजगतात सुरूझाली असे म्हटले पाहिजे.
पण ‘अमिबा’मध्ये सेक्स वेगळय़ा कारणासाठी सुरू झाले. पुनरुत्पादन हा त्याचा उद्देशच नव्हता मुळी. ‘अमिबा’मध्ये पुनरुत्पादन हे अलंगिकतेने घडत होते. स्वविभाजनाने. त्यात नष्ट होणाऱ्या शक्तीला पुन्हा पूर्वपातळीवर आणण्यासाठी, नवचतन्य, नवा जोम, पुनरुज्जीवन, त्या एकपेशीय जीवात प्रस्थापित करण्यासाठी निसर्गाने ‘अमिबा’मधे ‘समागम’ क्रिया निर्माण केली. दोन ‘अमिबा’ एकत्र येऊन, एकजीव होऊन त्यातून नवा, सळसळत्या चतन्याचा, ‘अमिबा’ निर्माण होणे सुरू झाले आणि पुन्हा त्याचे उत्पादन अलंगिक पद्धतीने. पण ‘सेक्स (डिझायर टू कॉप्युलेट)’ ही समागमाची तीव्र इच्छा, अमिबातही एका आकर्षण क्रियेतूनच निर्माण झाली हे निश्चित. त्यातूनच अमिबामध्येही ‘समागम’ घडू लागला. म्हणजे ‘सेक्स’ हे प्रजा वाढवण्यासाठी ‘अमिबा’मध्ये निर्माण झाले नाही. पण कालांतराने प्राणीजगताच्या उत्क्रांतीमधे ‘सेक्स’ ही क्रियाही उत्क्रांत होत गेली.
उत्क्रांतीच्या काळात प्राणीजगतामधे १ अब्ज वर्षांपूर्वी बहुपेशीय जीव तर ६० कोटी वर्षांपूर्वी साधे प्राणी (सिंपल एॅनिमल्स) उत्क्रांत झाले तर ५० कोटी वर्षांपूर्वी पृष्ठवंशीय मत्स्यजीव (फिश), ४७ कोटी वर्षांपूर्वी वनस्पती, ३६ कोटी वर्षांपूर्वी बेडकांसारखे (एॅम्फिबियन्स), ३० कोटी वर्षांपूर्वी सरपटणारे (रेप्टाइल्स) मग २० कोटी वर्षांपूर्वी सस्तन प्राणी (मॅमल्स), १५ कोटी वर्षांपूर्वी पक्षीजगत, ३० लाख वर्षांपूर्वी एप, २५ लाख वर्षांपूर्वी निअँडरथाल मनुष्यप्राणी, ५ लाख वर्षांपूर्वी सुधारित मनुष्यप्राणी आणि सर्वात शेवटी 2 लाख वर्षांपूर्वी आधुनिक मानवजात!
या सर्व उत्क्रांतीमध्ये क्रमाक्रमाने ‘सेक्स’ही उत्क्रांत झाले. अमिबासाठी दोनाचे एक करणारे सेक्स हळू हळू एकाचे अनेक करण्यासाठी निसर्गाने बदलत नेले. (एकोहं बहुस्याम्). ‘व्हर्टेब्रेट’ म्हणजे पाठीचा कणा असणाऱ्या पृष्ठवंशीय माशापासून मानवापर्यंतच्या प्राण्यांमध्ये काय काय बदल सेक्समध्ये, सेक्सच्या उद्देशामध्ये, होऊ लागले हे समजून घेणे मजेशीर ठरेल.
‘व्हर्टेब्रेट’ म्हणजे पाठीचा कणा असणाऱ्या पहिल्या मत्स्यजीवांमध्ये सेक्सचे आकर्षण निर्माण करून समागम जे घडू लागले ते एकाच वर्गातील (स्पेशीज) पण भिन्निलगी प्राणी निर्माण होऊन. नर व मादी हे िलगत्वही त्यावेळी निसर्गात निर्माण झाले व त्यांची बीजेसुद्धा (गॅमीट्स). त्यांच्यात एकमेकांविषयीची ओढ निर्माण होऊन ‘प्रजोत्पादन’ निर्माण झाले. म्हणजेच सेक्स हे अमिबातील एकजीवित्व निर्मितीकडून, पृष्ठवंशीय (पाठीचा कणा असलेल्या) पहिल्या मत्स्यजगतात बहुजीवित्व निर्मितीकडे वळले असे म्हणू शकतो.
माशांमध्ये समागमावेळी दोन भिन्निलगी जीव आकर्षणातून एकमेकांजवळ येऊन आपापली बीजे एकावेळी पाण्यात विसर्जति करतात. नर व मादी बीजांचा संयोग होऊन प्रजोत्पादन सुरू होते. यालाच बाह्य़बीजांड फलित, एक्स्टर्नल फर्टलिायझेशन म्हणतात. पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये सेक्समधील पुढील उत्क्रांतीमधे बेडकांसारख्या एॅम्फिबियन प्राण्यांमधे नर-मादी संपर्कावेळी ‘नराचे मादीवर स्वार होणे (माउन्टिंग)’ सुरू झाले. परंतु नर-मादी बीजे मात्र माशांप्रमाणेच पाण्यात सोडली जाणे, बाह्य़ बीजांड फलित, एक्स्टर्नल फर्टलिायझेशन तसेच चालूच राहिले.
सेक्समधील सर्वात मोठा उत्क्रांती-बदल झाला तो सरपटणाऱ्या सापांसारख्या रेप्टाइल प्राण्यांपासून. या वेळी महत्त्वाचा बदल झाला तो बीजांड-फलिताच्या पद्धतीत. बाह्य़बीजांड फलिताकडून, एक्स्टर्नल फर्टलिायझेशनकडून, मादीमधील अंतर्गत-बीजांड फलित, इंटर्नल फर्टलिायझेशन प्रक्रिया सुरू झाली. याच वेळी नराला मादीच्या शरीरात नरबीजे सोडण्यासाठी एक विशिष्ट अवयव निर्माण झाला, तो म्हणजे िलग, पेनीस. आणि ते िलग स्वतच्या शरीरात स्वीकारण्यासाठी मादीच्या शरीरात एक मार्ग निर्माण झाला, योनी, व्हजायना. अंतर्गत फलितासाठी मादीमधे गर्भाशय-निर्मिती झाली व नरबीजांना शुक्राणूंचे रूप आले. समागमाच्या वेळी म्हणूनच िलग-योनी संबंध, इंटरकोर्स सुरू झाले. हे िलग-योनी संबंध दोघांनाही हवेहवेसे वाटावेत म्हणून निसर्गाने नर आणि मादी दोघांमधेही त्यावेळी विशिष्ट आनंद निर्माण केला. हाच कामानंद.
म्हणजे िलग-योनी संबंध, इंटरकोर्सची उत्क्रांती ३० कोटी वर्षांपूर्वीपासून झाली. त्यातील कामानंदाची गोडी दोघांनाही असल्याने सेक्स केवळ प्रजोत्पादनासाठीच नव्हे तर त्यातील कामानंदासाठीही निसर्गात उत्क्रांत झाले. केवळ ठरावीक बीजांड-निर्मितीच्या काळातच (मेटिंग पिरीयड), मादीला समागमाची भावना होताच ती नराला जवळ येऊ देण्याची कृती ही निम्नस्तरीय सस्तन प्राण्यांच्या (लोअर मॅमल्स) काळापर्यंत निसर्गाने चालू ठेवली, परंतु उत्क्रांतीच्या ओघात एप आणि मानव अशा उच्चस्तरीय सस्तन प्राण्यांमध्ये (हायर मॅमल्स), ३० लाख वर्षांपूर्वीच, निसर्गाने बीजांड-निर्मिती व मादीची कामेच्छा हे नाते तोडले. तिला सदासर्वदा ही कामभावना होईल अशी उत्क्रांती झाली व मानवात स्त्रीमध्ये प्रजनन व कामरंजन या भिन्न प्रक्रिया झाल्या आहेत हे लक्षात ठेवले पाहिजे. उत्क्रांतीमध्ये त्या एकमेकांमध्ये गुंफल्या गेल्या असल्या तरी उच्चस्तरीय सस्तन प्राण्यांमध्ये (हायर मॅमल्स), विशेषत मानवामध्येसुद्धा, केवळ ‘प्रजोत्पादनासाठीच सेक्स’ही संकल्पना अशास्त्रीय असल्याचे लक्षात येईल.
म्हणूनच मानवात मुख्यत: कामरंजनासाठी सेक्स असून प्रजोत्पादनाच्या नंतरही ते सुरू ठेवण्याची इच्छा पुरुष व स्त्री दोघांमधेही निर्माण होत असते हे ध्यानात घेतले पाहिजे. नाहीतर मुले झाल्यानंतर स्त्री-पुरुष संबंध कधीच बंद झाले असते नाही का?
नर व मादी यांच्या संबंधांच्या गुणधर्मातही सस्तन प्राण्यांपासून मोठी उत्क्रांती झाल्याचे लक्षात येते. निम्नस्तरीय सस्तन प्राण्यांपासून (लोअर मॅमल्स), पक्षीजगत व उच्चस्तरीय सस्तन प्राण्यांमध्ये (हायर मॅमल्स) आणि अखेर मानव यांच्यात मादीला ‘पटवण्याची’ चढाओढ नरांमध्ये निर्माण झाली. याचे उत्क्रांतीय कारण कदाचित निसर्गाने मादीचे अंडे हे नरबीजांपेक्षा जास्त किमती (हायर प्रीमियमचे)निर्माण केले आहे. या ‘पटवण्याच्या’ क्रियेला मूर्तरूप आले ते प्रणयाराधनाचे, कॅजोिलगचे. म्हणून मादीला आकर्षति करण्याची काही कला व रूप नरामध्ये निर्माण करून प्रजनन काळात तो त्याचा वापर करेल अशी प्रेरणा, इिन्स्टक्ट, त्याच्यामध्ये उद्दीपित होण्याची नसíगक व्यवस्थाही झालेली आढळते. मोराचे लांडोरीभोवती नाचणे, पिसारा फुलवणे, कोकिळेला नराने गोड साद घालणे, कुत्रा व कुत्रीचा शृंगार, सिंहाचे सिंहिणीसाठी खर्जातील प्रेमळ डरकाळी फोडणे इत्यादी उदाहरणे नमुनेदाखल सांगता येतील.
म्हणजेच आकर्षणासाठी कला, शक्ती व रूप यांचा संगम मादीला पटवण्यासाठी सर्व नरप्राण्यांमध्ये झालेला दिसतो. मानवात मात्र स्त्रीलाच कला व रूप निसर्गाने बहाल केलेले दिसते. (मानवातील पुरुषांनी काय घोडं मारलेय काही कळत नाही!) ही ‘पटवण्याची’ क्रिया मानवामधे जास्त जोमाने आलेली व फारच आपल्या मनावर घेतलेली कॉलेजमधील मुलांकडे बघून आपल्याला निश्चितच जाणवते नाही का? (आणि काही विवाहित पुरुषांना हे प्रणयाराधन, पटवणे वगरे म्हणजे बायकोची तासभर विनवणी करत राहाणे असे अनुभवाने वाटत असते.)
हे उत्क्रांतीचेच लक्षण आहे म्हणून दोघांनीही मनमोकळा शृंगार करणे ही उत्क्रांतीची उमज आणि काळाची गरज आहे हे समजून घ्या. काही हुशार स्त्रिया आपल्या नवऱ्याला मधुचंद्र काळातील शृंगाराची पुन्हा जाणीव करून देण्यासाठी अक्कलहुशारीने म्हणतात, ‘‘खरं म्हणजे तू जरा तसा रोमँटिक वागला असतास तर बरं झालं असतं. पण जाऊ दे तुला वयाप्रमाणं आता तसं जमणं जरा कठीणच वाटतंय!’’ नवरा झक्कत शृंगाराकडे लक्ष द्यायला लागतो!!
एकमात्र खरे, सेक्स आणि प्रणयाराधन या गोष्टी भिन्न होऊच शकत नाहीत. म्हणून शृंगाराचा जन्म झाला आणि त्याची सांगड सेक्सशी घालण्यात आली. अशा रीतीने सेक्स हा एक शृंगारिक नातेसंबंध झाला आणि मानवात ‘लग्नसंस्था’ रूपाने त्याचा कळस झाला. म्हणून समाजाचा घटक कुटुंब, कुटुंबाचा घटक पती-पत्नी दांपत्यच बनले आहे हे लक्षात घेतले पाहिजे. म्हणजे ‘सेक्स’च्या पायावर समाज बांधला जात असतो याची जाणीव समाजधुरिणांना होणे गरजेचे आहे.
सेक्सचे उत्क्रांतीय गुणधर्म
नवरा-बायको, दोघांनीही मनमोकळा शृंगार करणे ही उत्क्रांतीची उमज आणि काळाची गरज आहे हे समजून घ्यायला हवे. काही हुशार स्त्रिया आपल्या नवऱ्याला मधुचंद्र काळातील शृंगाराची पुन्हा जाणीव करून देण्यासाठी अक्कलहुशारीने म्हणतात, ‘‘खरं म्हणजे तू जरा तसा रोमँटिक वागला असतास तर बरं झालं असतं. पण जाऊ दे तुला वयाप्रमाणं आता तसं जमणं जरा कठीणच वाटतंय!’’ नवरा झक्कत शृंगाराकडे लक्ष द्यायला लागतो !
आणखी वाचा
First published on: 19-01-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व कामस्वास्थ्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Husband and wife should enjoying sex is a necessity