-डॉ नंदू मुलमुले

आदर्श पालकत्व कोणतं इथपासून पालकत्वाच्या मर्यादा कोणत्या, याचा विचार करता त्यात, वय वाढलं म्हणजे ‘आम्हाला सारं काही कळतं’ याचा बडेजाव नको असतो, त्याचबरोबरीनं ‘माझ्या संसारात यांची लुडबुड कशाला,’ अशी अरेरावीही नको असते, हवी असते ती नव्याजुन्यांच्या समंजस अनुभवांची एकत्रित शिदोरी.

What is ossification test How did the trial reveal the age theft of the suspect in the Baba Siddique murder case
‘ऑसिफिकेशन चाचणी’ म्हणजे काय? बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील संशयिताची वयचोरी या चाचणीने कशी उघडकीस आली?
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Are monk fruit sweeteners safe for you
Monk Fruit : साखरेपेक्षाही गोड असतं ‘हे’ फळ! अतिसेवनानं वाढतील हृदयाच्या समस्या; वाचा तज्ज्ञ काय म्हणतात…
Pune Municipal Corporation, death certificate pune,
मरणानेही सुटका नाही!
Future medical directives
रुग्णशय्येवरील उपचारांबाबत इच्छापत्रानुसार निर्णय
environment protection from debris
फेनम स्टोरी: भंगारातून पर्यावरण रक्षण
Loksatta Chatura Can biological mother name be added instead of step mothes on the record
सावत्र आईऐवजी जैविक आईचे नाव लावणे हा मुलीचा अधिकारच!
Loksatta Chatura Article on health of working women
तू तुझं आरोग्य सांभाळून राहा…

पालकत्व सुरू होतं मूल जन्मल्यापासून, पण संपतं केव्हा? काहींच्या बाबतीत ते संपतच नाही ही वस्तुस्थिती, शोकांतिका! आदर्श पालकत्व कोणतं? जे आईवडील वेळेवर आवरतं घेतात ते! मात्र काही जण पालकत्वाच्या भूमिकेत एकदा शिरले की, त्यातून बाहेरच पडत नाहीत. नाटक संपलेलं असतं, मुले जगाच्या रंगभूमीवर पदार्पण करायला उत्सुक असतात, यांच्यातला दिग्दर्शक मात्र थांबायला तयार नसतो. त्यामागे काही इतरही हेतू नकळत सुप्तपणे वावरत असतात. एकतर भोवतालच्या लोकांवर ताबा मिळवण्याची धडपड. दुसरं म्हणजे माझ्याशिवाय जग चालू शकतं यावर अविश्वास, नंतर त्या सत्याचा अस्वीकार.

सहा वर्षांचा राहुल शाळेतून घरी आला तेव्हा तो थकून गेला होता. आल्याआल्या सुधाआजीनं त्याचं स्वागत केलं. ‘‘काय मस्त डिश केली आहे आजीनं सांज्याची, सोबत लिंबाच्या लोणच्याची फोड!’’ तोवर नेहानं, त्याच्या आईनं आधी त्याला शाळेचा गणवेश व्यवस्थित उतरवून घडी करून कपाटात ठेवायला सांगितलं होतं. आजीनं मात्र राहुलसमोर ताटली धरली. ‘‘सक्काळी सातचा घरून निघालेला, त्याला आधी खायला द्यावं, गणवेश काय आजी बदलून देईल.’’ राहुलनं पडत्या फळाची आज्ञा मानत सांजा तोंडी लावल्यासारखा केला आणि कपडे न बदलता कोपऱ्यात पडलेल्या व्हीडिओ गेमचा ताबा घेतला. ‘‘अहो तो डबा नेतो शाळेत, शिवाय येतायेता मोटारीत त्याने अख्खा सफरचंद खाल्लाय. त्याला आधी कपडे बदलण्याची शिस्त लागू देत,’’ नेहानं सासूला समजावण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा…गर्दीच्या गारुडात गारद विवेक

‘‘खूप शिस्ती लावल्यात आम्ही मुलांना, काही काळजी नको. मुलाचं पोट भरलं ना, की ते बरोबर ऐकतात आपलं.’’ आजीनं नातवाचा ताबा घेतला. नेहा सासऱ्याकडे असाहाय्यपणे पाहू लागली. तेही त्याच हतबलतेनं आपलं आवडतं नाट्यगीत गुणगुणू लागले, ‘कशी तुज समजावू सांग…’ शेवटी तिनं दोघांचाही नाद सोडला आणि आपल्या कामाला लागली, पण तो विषय तिच्या डोक्यात धुमसत राहिला.

‘‘मी तक्रार नाही करत, लहानसहान गोष्टी काय उगाळायच्या’’, असं म्हणत रात्री तिनं नवऱ्याजवळ तक्रार केली. ‘‘पण तुम्हीच विचार करा. आपण दोघेही घराबाहेर असतो, सासूबाई लहान्या छकुलीला सांभाळतात, राहुलचं करतात, त्याला आजीचं प्रेम मिळतं. सगळं खरं आहे, पण मी आई म्हणून त्याला शिस्त लावायचा प्रयत्न करते त्या प्रत्येक वेळी त्यांनी मध्ये पडायला नको ना. पोराची काय समजूत होत जाईल की, आईचं ऐकायची काही गरज नाही. तो एक पाऊल पुढे आहे, ना आईचं ऐकत ना आजीचं. नुसते लाड करून घेतो.’’
‘‘लहान आहे तो, लागेल हळूहळू शिस्त त्याला,’’ नवऱ्यानं मोबाइलमध्ये डोकं खुपसून विषय तिथंच डिलिट करून टाकला.

सकाळी उठल्याउठल्या आजी छकुलीला घेऊन बाहेर गॅलरीत आल्या. तिला कानटोपी घातली होती, पण बाहेर गार वारं वाहत होतं. ‘‘अहो, आई तिला सर्दी झालीय, रात्री थोडी खोकतही होती. इतक्या गार हवेत कशाला नेता?’’ नेहानं ऑफिसची तयारी करताकरता सूचना केली. ‘‘उगाच सर्दी वाढली तर डॉक्टरकडे न्यावं लागेल, तुम्हाला माहीतच आहे ती औषध घ्यायला किती त्रास देते ते.’’
‘‘काही सर्दी होत नाही, आठ वाजायला आलेत. सकाळच्या कोवळ्या उन्हात ‘ड’ जीवनसत्त्व असतं. मुलांना ताजी हवाही मिळाली पाहिजे. ती आरोग्यदायी असते. एवढ्यातेवढ्या सर्दीला कशाला डॉक्टर लागतो? अशानं मुलांमध्ये प्रतिकारशक्ती कशी तयार होणार? आमच्या मुलांना वर्षात एखाद वेळी डॉक्टर लागायचा,’’ सासूनं सुनेला उपदेशाचे सणसणीत डोस पाजून गार केले. ऑफिसच्या घाईत नेहानं सासूचा नाद सोडला.

दररोज रात्री काय तोचतोच विषय काढायचा नवऱ्याजवळ? हे कळत असूनही तिला राहवेना. प्रश्न छकुलीच्या तब्येतीचा होता. ‘‘उद्या छकुलीला डॉक्टरकडे न्यावं म्हणते, घसा खरखरतोय तिचा.’’
‘‘घरी कफ सिरप आहे ना मागल्यावेळचं, ते पाजून टाक चमचाभर, कशाला एवढ्यातेवढ्याला डॉक्टर?’’ जशी आई तसं पोर, नेहानं मनातला विचार मनात ठेवून नवऱ्याला आठवण करून दिली, ‘‘माहितीय ना तिला एलर्जी आहे, साधी सर्दी वाढत जाते, घशातून छातीत उतरते. मग ताप, अशक्तपणा. आपण टाळतो ती सारी औषधं द्यावीच लागतात शेवटी. मग आपली धावपळ, तिची हेळसांड.’’
नवऱ्याला हे पटलं. त्याला मागल्यावेळी दोन दिवस सुट्टी घ्यावी लागली होती ते आठवलं. ‘‘आई तिला सकाळी गार हवेत फिरवतात, त्यानं सर्दी वाढली तिची.’’ नेहा पुटपुटल्यासारखं बोललीच. नवऱ्याच्या कानावर जायला हवं. नवऱ्यानं ऐकून न ऐकल्यासारखं केलं. बायकोचं खरं आहे, पण दरवेळी आईला काय सूचना करणार? तिला राग यायचा. छकुलीला सांभाळायला हवी आहे. तिकडे सासरे आपले कुणाच्या अध्यात ना मध्यात, कोपऱ्यात गुणगुणत होते, ‘सुकतातची जगी या…’

हेही वाचा…वैद्यकीय शिक्षणात लिंगभाव!

सकाळी न्याहारीला नेहा छकुलीला उकडलेलं अंड भरवायला लागली. तेवढ्यात आजीची नजर तिथं गेली. ‘‘तिला आवडत नाही अंड. तुला सांगते, छान तूपमीठ भाताने वाढेल वजन तिचं. आण इकडे, तिला माझ्या हाताने भरवते. कसं खाते माझ्या हातून बघ,’’ आजीनं नातीला तिच्या आईच्या हातून जवळजवळ हिसकावून घेतलं. नेहा पाहतच राहिली.

‘‘आई हेडमास्तर होती माझी, ठाऊक आहे नं?’’ रात्री नवऱ्यानं नेहाला आठवण करून दिली. ‘‘आमच्यावरही हक्क गाजवायची, आपलंच म्हणणं खरं करायची. बाबाही तिच्यापुढे बोलायचे नाहीत. एखादं नाट्यगीत गुणगुणत संघर्ष टाळायचे, तर आमचं काय!’’
‘‘तुमचं ठीक आहे हो, पण राहुल आणि छकुली माझी मुलं आहेत, त्यांच्यावर कोणते संस्कार करायचे, कोणते नाहीत हे मला ठरवू द्या ना, त्यांचं आरोग्य हा तर माझा विषय असूच शकतो ना,’’ नेहा मनात विचार करू लागली. नातवालाच नाही तर एवढ्या वाढलेल्या पोरालाही काय करावं? काय नाही? याचे धडे देताना सासूला काहीच वाटत नाही?

कधीकधी नातवंडे त्यांच्याशिवाय खेळतात, हसतात याची त्यांना असूया वाटते की काय असा नेहाला संशय यायचा. ती मुलांबरोबर गाणी म्हणत असली, एखादा खेळ खेळत असली की त्या हमखास आवाज द्यायच्या. ‘राहुल, हे बघ मी तुझ्यासाठी मस्त बर्फी केलीय खजुराची. ये इकडे.’ राहुल बघतही नाही असं दिसलं, की स्वत: बशी घेऊन यायच्या, ‘‘घ्या रे पोरांनो, नेहा तूही खाऊन पाहा.’’ आता दीड वर्षाची छकुली काय बर्फी खाणार? पण घराचा केंद्रबिंदू आपणच आहोत हे सतत पटवण्याचा त्यांचा अट्टहास असायचा.

हेही वाचा…सांदीत सापडलेले : एक नॉर्मल मुलगा!

या सगळ्याचे अप्रत्यक्ष समर्थनही चालायचे. शेजारच्या निर्मलाताईंबरोबर चाललेले त्यांचे संवाद नेहाच्या कानी पडायचे. ‘‘काय चाललंय निर्मलाबाई?’’ सासू मंदिरात निघालेल्या मैत्रिणीला हटकायची. ‘‘काही नाही, पोरगा कामावरनं आलाय, त्याला आपल्या बायकोपोरात मिसळायचं असतं. त्यांना एकांत मिळावा हा हेतू, सोबत देवदर्शनही घडतं!’’ नेहाला निर्मलाताईंचा समजूतदारपणा खूप प्रभावित करून जायचा. आपल्या सासूनं काहीतरी त्यांच्यापासून शिकावं असं वाटायचं.

‘‘कशाचा एकांत? आपलीच पोरं आहेत, अहो तुमचा मुलगा आहे, जावई थोडाच आहे?’’
‘‘लग्न झालेला मुलगा जावईच मानावा. सुनेला मुलगी समजावं. त्याला त्याचा संसार, तिला तिचा नवरा!’’ निर्मलाताईंचे विचार स्वच्छ होते.
‘‘आणि नातू? ते तर आजीच्याच अंगावर ना?’’ सासू हेका सोडायची नाही.

‘‘नातू नंतर, आधी ती त्यांची मुलं. आपला हातभार मदतीचा,’’ काही क्षण थांबून निर्मलाताई म्हणाल्या, ‘‘मागितला तर.’’
इतक्या समंजस बाईबद्दल सासू म्हणते, ‘निर्मलानं तिची केरसुणी करून घेतली आहे. झाडझूड करायची आणि कोपऱ्यात जाऊन बसायचं. नवरा किंमत देत नसेल,तर सून काय देणार? आपण आपला आब सांभाळला पाहिजे. आपला वट ठेवला पाहिजे.’

वरचेवर सासूचा हस्तक्षेप वाढत चालला होता. त्या स्वत:चा, पोराचा, नातवाचाही संसार करायला लागल्या. पार्टीला जाताना राहुलनं काय घालावं हे ठरवू लागल्या. नेहाने राहुलला जीन्स पँट, त्यावर पिवळा टीशर्ट घालायला घेतला. तेवढ्यात सासू टपकली. ‘‘अगं उकाडा केवढा होतोय, त्याला जीन्स कसली घालतेस? चांगली सुती चड्डी घाल मोकळी. तीनतीन तास चालते तुमची पार्टी. शिवाय पोरं उधम करतात खेळून. पँट काचेल त्याला.’’

हेही वाचा…माझी मैत्रीण : गुलबकावलीचं फूल!

इथे राहुलनं, बापानं करायचं ते काम केलं. ‘‘आजी, तुला अजिबात समजत नाही. चड्डीत हसतील मला फ्रेंड्स सारे. मी जीन्स घालणार. सगळे मित्र जीन्स घालून येतात. आणि तिथल्या हॉटेलमध्ये एसी हॉल आहे, तिथे सारं कूल असतं.’’ आजी गार पडली नातवाच्या स्पष्ट बोलण्यानं. नेहानं पटकन त्याला जीन्स चढवली आणि आजीला काही पलटवार सुचेपर्यंत राहुल मोटारीत जाऊन बसला. आजीनं शस्त्र टाकलं.
रात्री छकुलीनं तिच्या परीनं आजीला तिच्या सपोर्टिंग रोलची जाणीव करून दिली. सर्दीनं तिचं नाक चोंदलं होतं. रात्रीचे दहा वाजले तरी ती झोपत नव्हती. आजी थापडून झोपवायचा प्रयत्न करीत होती. नेहाने स्प्रे देण्यासाठी तिला जवळ घेतलं, तोवर आजी निलगिरीची बाटली घेऊन पोचली. ‘‘तिला निलगिरी तेलाची वाफ दे, आत्ता नाक मोकळं होईल. स्प्रेची गरज नाही.’’ नेहाच्या हातून तिनं छकुलीला जवळजवळ हिसकावलं. नातीनं भोकाड पसरलं. हातपाय आपटून निषेध नोंदवला. ‘मम्मा, मम्मा’ म्हणत ती नेहाकडे झेपावली. आजीनं तिच्या नाकात खुपसायला घेतलेली बाटली तिनं लाथेनंच उडवली. सगळ्या घरादाराचं नाक निलगिरीच्या वासानं मोकळं झालं.

हेही वाचा…जिंकावे नि जगावेही : आयुष्याचा ताल आणि तोल!

आवाज ऐकून सासरेही धावत आले. ‘‘अगं, आजारी मुलांना आईच हवी असते. नको तिला धरून ठेवण्याचा अट्टाहास धरूस. फार करतेस नातवाचं. आता स्वत:कडे लक्ष दे.’ शेवटचं मलमपट्टीचं वाक्य बोलताना त्यांनी मिश्कीलपणे सुनेकडे पाहिलं. नेहानंही हसून दुजोरा दिला. शेवटी एका पालकानेच पालकाला पालकत्वाची मर्यादा दाखवून दिली.

बेडरूममधून सासऱ्याची गुणगुण ऐकू येत होती, ‘अहितांची न करी जोड, मित्र करिती बोध गोड, हा नाद सोड सोड…’

nmmulmule@gmail.com