० ऊन, धूळ आणि दमटपणा असेल अशा ठिकाणी संगणक ठेवू नये. उन्हामुळे संगणकाचे तापमान वाढते, धूळ आणि दमटपणामुळे संगणक ब्लॉक होऊ शकतो.
० सावली, थंडावा आणि कोरडेपणा असलेल्या जागी संगणक ठेवावा.
० डिस्क ड्राइव्हचा वापर काळजीपूर्वक करावा. घाईघाईत किंवा जोर लावून खेचल्यास आतील पार्ट खराब होण्याची शक्यता असते.
० इअरफोन, डाटाकेबल आणि चार्जिग केबलसारखी डिवायसेस योग्य
स्लॉटमध्ये प्लग करावी. चुकून चुकीच्या स्लॉटमध्ये लावल्यास तो स्लॉट कायमचा खराब होऊ शकतो.
० संगणक असा ठेवावा की त्याची स्क्रीन आपल्याला व्यवस्थितपणे पाहता
येईल, स्क्रीनवर प्रकाश पडणार नाही याची दक्षता घ्यावी.
० संगणकावर काम करताना ज्या खुर्चीवर
बसून काम करणार ती बैठकीसाठी आरामदायी असावी.
० खुर्चीची उंची अशी असावी की बसल्यावर पायाचे तळवे जमिनीला टेकतील आणि गुडघे ९० अंशांत असतील. खुर्ची उंच असल्यास फूट रेस्टचा वापर करता येईल.
० काम करताना मॉनिटरचा प्रकाश कमी असावा त्यामुळे टाइप करताना डोळ्यांना त्रास होणार नाही.
० मॉनिटरचा प्रकाश आणि परावर्तन रोखण्यासाठी अँटिग्लॅमर कोटिंग ग्लासचाही वापर करता येईल.
० डेस्कटॉपवर काम करताना हाताचे कोपर
९० अंशात ठेवा आणि मनगट सरळ ठेवा. मनगट वाकवून माऊस पकडल्यास हातावरील शिरांवर ताण पडून मनगटाचे दुखणे वाढते.
० मॉनिटर, माऊस आणि आपण टाइप करणार असलेली कागदपत्रे आपल्याला सहजपणे हाताळता येतील अशा योग्य पद्धतीने ठेवावीत. तसे नसल्यास खांदे,
मान, पाठ यांच्यात जखडलेपणा येईल.
० संगणकावर काम करताना मोबाइल किंवा फोन खांदा आणि मान यांच्यामध्ये ठेवून
बोलू नका. थोडा वेळ काम बाजूला ठेवून फोन अटेंड करा किंवा फोनवर बोलता बोलता काम करायचे असेल तर हेडफोनचा वापर करा.
० संगणकावर काम करताना डोळ्यांची
उघड-झाप करीत राहा. त्यामुळे डोळे कोरडे होणे, खाज येणे, धुरकट दिसणे या समस्या येणार नाहीत.
० दर अर्धा-एक तासाने संगणकावरची नजर बाजूला करून डोळ्यांना आराम द्या. स्क्रीनवरून नजर हटवून १५-२० फूट लांबवर नजर फिरवून बघा. हाताला आणि शरीराला थोडा ताण देऊन रिलॅक्स व्हा म्हणजे डोळ्यांवरचा व शरीरावरचा ताण कमी होईल.
० कॉन्टॅक्ट लेन्स लावत असल्यास आठवडय़ातून एकदा चष्म्याचा वापर करा.
संकलन- उषा वसंत unangare@gmail.com
करून बघावे असे : संगणकावर काम करताना..
ऊन, धूळ आणि दमटपणा असेल अशा ठिकाणी संगणक ठेवू नये.
Written by झियाऊद्दीन सय्यदझियाउद्दीन सय्यद
आणखी वाचा
First published on: 12-09-2015 at 01:01 IST
मराठीतील सर्व करून बघावे असे काही बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Important tip while operating computer