साधनेत आनंद तर साध्यात परमानंद. अष्टांग योगात आठ पायऱ्या दिल्या असल्या तरी प्रत्येक पायरीमध्ये ‘योग’ या अंतिम उद्दिष्टापर्यंत नेण्याची ताकद क्षमता आहे. या सदराच्या सुरुवातीस सुचलेला विचार व त्या दिवशी करावयाचे आसन यातून आपल्याला वृत्तीत बदल घडवून आणायचा आहे. एखाद्या चांगल्या विचारावर आपण एकाग्र झालो, तर प्रत्याहार साधायला मदत होते. प्रत्याहारातून ‘धारणा’ घडू शकते. धारणेतून लागते ते ध्यान. ध्यान करता येत नाही लागावे लागते. ध्यान शिकविता येत नाही. ध्यानातून खऱ्या आनंदाची प्राप्ती होते. हा आनंद आपल्यातच आहे. तो फक्त साधनेतून अनुभवायचा आहे. फक्त विचारसाधना व देहसाधना या दोन्हींतून आपण तिथपर्यंत पोचायचा प्रयत्न मनापासून करायचा आहे. विचाराचा आसनाशी संबंध जोडायचा आहे तो आसनाच्या अंतिम स्थितीत स्थिरता, सुखमयता, एकाग्रता, प्रयत्न शिथिलता व अंतत: अनंत आनंद अनुभवण्यासाठीच!
सुलभ ताडासन
आज आपण सुलभ ताडासनाचा सराव पाहू या. दंडस्थितीत दोन्ही पायांत व्यवस्थित अंतर घेऊनच उभे राहा. नाही तर तोल जाईल. आता सावकाश दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर उचला. आता जमल्यास टाचाही वर उचला व शरीराचा भार पायाच्या पुढच्या बोटांवर तोलून धरा. काही क्षण या स्थितीत स्थिर राहा. सावकाश हात व टाचा खाली आणा, पूर्वस्थितीत घ्या. ५ ते ६ आवर्तने करा.
ताडासनामुळे शारीरिक, मानसिक संतुलन विकसित होते. पाठकणा ताणला गेल्यामुळे पाय, घोटा व पाठकण्याच्या स्नायूंचेही आरोग्य सुधारते.
ulka.natu@gmail.com 

कायदेकानू : विशेष कायदा
प्रीतेश सी. देशपांडे
ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या विविध कायद्यांमधील तरतुदींची आपण आजपर्यंत माहिती घेतली; परंतु या सर्वच कायद्यांची व त्यांमधील तरतुदींची परिणामकारक अंमलबजावणी होत नसल्याचे कायदेकर्त्यांच्या लक्षात आले. त्याचप्रमाणे अनेकदा हालअपेष्टा सहन कराव्या लागणाऱ्या वृद्ध नागरिकांसाठी कोणताही विशेष कायदा २००७ पर्यंत अस्तित्वातच नव्हता; परंतु बदलणाऱ्या सामाजिक परिस्थितीचा आणि त्याचा ज्येष्ठ नागरिकांवर होणाऱ्या परिणामांचा तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी होत असणाऱ्या स्वतंत्र व विशेष कायद्याच्या मागणीची दखल घेऊन केंद्र सरकारने २००७ मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष कायदा अस्तित्वात आणला. पालक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कल्याण कायद्यावर २९ डिसेंबर २००७ रोजी भारताच्या तत्कालीन राष्ट्रपतींनी स्वाक्षरी करून कायद्यास संमती दिली व त्यानुसार सदर कायदा अस्तित्वात आला.
कोणत्याही कायद्याची सुरुवात ही त्या कायद्याची उद्दिष्टे, हेतू स्पष्ट करून तो कायदा आणण्यामागे कायदे करणाऱ्यांचा असणारा हेतू यांनी केली जाते. कायद्याचे वाचन करताना व त्यातील तरतुदींचा अर्थ लावताना या उद्दिष्टांच्या व हेतूच्या अनुषंगानेच अर्थ लावावा लागतो. ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कल्याण कायदा २००७ मध्येसुद्धा सदर कायदा करण्यामागे कायदेकर्त्यांचा असणारा हेतू स्पष्ट केला आहे, जो की आपणास मार्गदर्शक ठरतो.
सदर कायद्याचे हेतू व उद्दिष्ट हे, पालक व वृद्ध नागरिक यांच्या कल्याणासाठी आणि पोटगीसाठी योग्य कायद्याची निर्मिती करून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे, त्याचप्रमाणे पालकांना व ज्येष्ठ नागरिकांना भारतीय संविधानात दिलेल्या हक्कांचे व अधिकारांच्या अनुषंगाने विशेष कायद्यातून त्या हक्कांचे व अधिकारांचे हित जोपासणे असे आहे. सदर कायद्यामध्ये एकूण सात निरनिराळे भाग असून प्रत्येक भागाबाबतची सविस्तर माहिती यापुढील प्रत्येक लेखात अनुक्रमे देण्यात येईल.

Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
Vivah muhurat 2025 Marriage Dates in 2025 Hindu Panchang
Vivah Muhurat 2025 : नवीन वर्ष २०२५ मध्ये विवाहासाठी किती शुभ मुहूर्त, पाहा जानेवारी ते डिसेंबरपर्यंतच्या तारखांची यादी
Numerology number 8
Numerology : ‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते शनीची कृपादृष्टी, मान-सन्मानासह कमावतात प्रचंड संपत्ती; भाग्यापेक्षा असतो कर्मावर विश्वास
Dharavi Redevelopment Dharavi Adani Small and Micro Enterprises
धारावीच्या पुनर्विकासाचे मृगजळ
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा
sharad pawar reaction on bjp batenge to katenge slogan
नाव घेतले तर न्यायाल्यात खेचीन ‘ कोणी ‘ पाठविली शरद पवार यांना नोटीस !

खा आनंदाने : भूक नसताना..
वैदेही अमोघ नवाथे, आहारतज्ज्ञ
सकाळी हॉस्पिटलमध्ये राउंड घेताना बेड क्रमांक ६च्या आजोबांपाशी थांबले. त्यांचा मुलगा परोपरी विनंती करत होता, ‘‘बाबा, थोडं खा नं प्लीज. तुम्हाला ताकद कशी येणार?’’ माझी आहार-साहाय्यक धमकीवजा प्रेमळ शब्दांत सांगत होती, ‘‘आजोबा, नाही खाल्लं तर आम्ही घरी कसं पाठवू?’’ पण आजोबा आपल्या मतावर ठाम होते. भूक लागतच नाही तर काय करू? बाजूच्या रुग्णाला वाटलं आजोबा खूप हट्टी आहेत. पण एक आहारतज्ज्ञ म्हणून मला कळत होतं की ताप, हॉस्पिटलमध्ये भरती, विविध औषधं, हवेतील गर्मी आणि आजोबांचं ७२ वय ही कारणं पुष्कळ आहेत न खाण्यासाठी! पण न खाल्ल्याने अशक्तपणा, शांत झोप न लागणं, औषध गरम पडणं हे कुपोषणाचे दुष्परिणाम तर आहेतच. मग काय करायचं? म्हणून आज थोडय़ाशा आहार टिप्स. कोणत्याही कारणाने कमी झालेली भूक कुपोषण न करता कशी ताब्यात ठेवता येईल, जेणेकरून आरोग्य जपलं जाईल.
१. थोडं थोडं खा, पण दिवसभरात विभागून खा. २. कोणतीही एक चव अधिक नको म्हणजे अति तिखट, अति तेलकट, अति आंबट वगरे. षडरसयुक्त आहार असावा. अर्थात प्रत्येक रसातील सगळेच पदार्थ तुमच्या तब्येतीला चालतील असं नाही, पण कोणताही रस पूर्ण वगळणे चांगले नाही.
तिखट – मसाले, मिरची, मिरी
आंबट – आंबट फळे, दही, ताक, आंबलेले पदार्थ, कोकम, िलबू
तुरट – उसळी, कोबी, डािळब वगरे
कडू – कढीपत्ता, कडूिनब, कारलं, मेथी
खारट – पालेभाज्या, खनिज मीठ
गोड – फळे, धान्ये, नसíगक साखर- गुळ, मध, गायीचे दूध
३. तोंडातील लाळेचे प्रमाण वयानुसार कमी झालेले असते. म्हणून प्रत्येक जेवणाबरोबर किंवा दोन जेवणांच्या मध्ये प्रवाही / पातळ पदार्थ घ्यावेत, जसे भाज्यांचे सुप्स, फळांचा रस, नारळ पाणी, पातळ ताक, डाळीचे पाणी, भाताची पेज वगरे जे भूक वाढवायला आणि ताकद द्यायला चांगले असतात.
४. निराश होऊन चालत नाही किंवा मला भूकच लागत नाही असं सतत म्हणून चालणार नाही. ‘पहिल्यापेक्षा’ भूक कमी होणं हे स्वाभाविक आहे, पण त्याला दुसरा मार्ग आहे हे नक्की.
५. ज्या प्रमाणात भूक आहे तेवढंच खा, पण ते पौष्टिकच असावं. शेव / फरसाण / बिस्कीट खाऊन पोट भरण्यापेक्षा इतर आरोग्यदायी पर्यायांचा विचार करावा.
ओसामण :
(एका आजीकडून शिकलेली ही एक गुजराथी पदार्थाची रेसिपी)
साहित्य
अर्धा कप तूरडाळ
दोन टीस्पून तूप
दोन पाकळ्या लवंग
दोन तुकडे दालचिनी
अर्धा टीस्पून मोहरी
अर्धा टीस्पून जिरे
अर्धा टीस्पून आले-हिरव्या मिरच्या पेस्ट
पाव टीस्पून हळद पावडर
अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर
चार कोकम पाणी
दोन टेस्पून गूळ
मीठ आणि मिरपूड पावडर चवीनुसार
अर्धा टीस्पून िहग
६ ते ८ कढीपत्ता पाने
२ टेस्पून बारीक चिरलेली कोिथबीर
पद्धत :
डाळ धुऊन, ४ कप पाणी घालून कुकरमध्ये शिजवून घ्यावी. फक्त वरचे पाणी घ्या. डाळ एकदम कमी. एक खोलगट पॅनमध्ये तूप गरम करून लवंगा, दालचिनी, मोहरी आणि जिरे घालावे. मग िहग आणि कढीपत्ता पाने घालावीत आणि परतल्यावर हिरव्या मिरच्या-आले पेस्ट, हळद, मिरची पावडर, कोकम, गूळ आणि मीठ आणि मिरपूड घालून चांगले ढवळावे आणि उकळणे.
कोिथबीर घालून गरम सूपसारखे प्या. भूक एकदम छान लागेल!
vaidehiamogh@gmail.com 

आनंदाची निवृत्ती : फुलबाग फुलते आहे..
अनुराधा हरचेकर
येणार येणार म्हणत शेवटी निवृत्ती आली. वर्षसुद्धा झालं. कधी एकदाचे नोकरीचे ओझे डोक्यावरून उतरते आहे, असे झाले होते. तसे म्हटले तर निवृत्तीनंतर काय करायचं याविषयी मी काही खास ठरविले नव्हते. कधी एकदा घरात बसून आरामच आराम करते असे झाले होते. कारण खरी विश्रांती ही निवृत्तीनंतर मिळते. कारण ऑफीस आणि घर यांच्या कसरतीतला इतक्या वर्षांचा ताण नसतो, पण एक विचार अधून मधून डोकवायचाच, तो बागेचा.
तसं पूर्वीपासूनच मला झाडे लावण्याची खूप आवड होती. घरातसुद्धा कधी तुळस लाव, कधी गुलाब असे काही ना काही करत बसायची. आणि मला वाटते प्रत्येकाच्या घरात अशा चार-दोन कुंडय़ा असतातच. पण सोसायटीत काही करावयाचे झाले की मग हात आखडले जातात. त्यात आमच्या अगदी जवळची जी सोसायटी आहे ती फुलांनी बहरलेली आहे. जातायेता सतत त्या सोसायटीकडे माझे लक्ष जायचे. अक्षरश: असंख्य तऱ्हेतऱ्हेची फुले. लाल, पिवळी, जांभळी, पांढरी, नारंगी यांनी ती सोसायटी अक्षरश: बहरलेली आहे. किती व्यवस्थित आणि निगुतीने त्यांनी झाडे जतन केली आहेत. मला नेहमी वाटायचे, ते लोक जर करू शकतात तर आपण का नाही? हा विचार माझा मीच उचलून धरला.
मी तेव्हाच ठरविले निवृत्तीनंतर बागकाम करायचे. पण सोसायटीचे हे काम म्हणजे सोपे नव्हते. नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने, त्याप्रमाणे विघ्ने येत गेली. मुख्य म्हणजे पंचवीस वर्षांपूर्वी अशोकाची झाडे हीच काय ती सोसायटीची वृक्षसंपदा होती. त्यात पंचवीस वर्षांत काहीही बदल नव्हता. त्यामुळे सर्वच बाबतींत श्री गणेशा करावा लागणार होता. पहिले म्हणजे सोसायटीची परवानगी घ्यावी लागली. शेवटी हो-नाही करता तो ठराव पास झाला. मग माळी व वेतन ठरवावे लागले. सोसायटीमध्ये अशी चोहोबाजूने रोपे लावण्यास जागा भरपूर होती. बांधही घातलेला होता. फक्त रोपे लावण्याची गरज होती. मग नर्सरीत जाऊन वेगवेगळय़ा प्रकारची रोपे, माती, खत वगैरे सर्व सामग्री आणली. हे काम काही वेळा स्वत:, तर काही वेळा माळय़ाकडून करवून घ्यावे लागले. रोपांना पुरेसा उजेड, वारा, पाऊस, ऊन लागेल अशी व्यवस्था करावी लागली. कितीतरी रोपे. काही कडुनिंब, तुळस, कोरफड अशी औषधी; तर काही जास्वंद, गुलाब, तगर, पांढरा चाफा अशी उपयोगी; तर काही फक्त शोभेची. अशी वीस-पंचवीस रोपे लावली. झाडांच्या मशागतीबद्दल काही पुस्तके वाचून त्याप्रमाणे माळय़ाकडून अनेक गोष्टी करून घेतल्या. हे सर्व करताना खूप आनंद वाटला. आता जवळजवळ सहा-सात महिने झाले. रोपे, झाडे फुलतात, मोठी होतात.
शेजारच्या सोसायटीत काश्मीर फुलले आहे. तर आमचेही कोकण हळूहळू फुलते आहे. माझी निवृत्तीची संध्याकाळ सार्थकी लागते आहे.