डॉ. मोहना कुलकर्णी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
‘अफेअरप्रूफ’ वैवाहिक आयुष्य शक्य आहे का? असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. तत्त्वत: उत्तर द्यायचे तर हो, शक्य आहे. ध्यानीमनी नसताना दैनंदिन आयुष्यात आपल्या जोडीदारापेक्षाही जवळचे वाटणारे असे कोणीतरी भेटू शकते. ती व्यक्ती आवडू शकते. पण हे वाटणे आपण कसे हाताळतो यावरच हे ‘प्रेम प्रकरण’ होणार की नाही हे ठरत असतं. नात्यात अपराधी भावना, सतत सोबतीची ओढ आणि गोपनीयता आली की त्या नात्याचे ‘प्रेमप्रकरण’ होते. आपल्या समाजात एकूण विवाहित जोडप्यांच्या एकतृतीयांश लग्नांमध्ये ‘विवाहबाह्य संबंध’ दिसून येतात. सांभाळता येतात का अशी झालेली वा होऊ घातलेली प्रेमप्रकरणं?
आपल्या विवाहसंस्थेमध्ये आपला जोडीदार हा जन्मभरासाठी असणार असे गृहीत धरलेले आहे. मात्र आयुष्यभर एकाच जोडीदाराबरोबर राहणे काहींना अवघड, कंटाळवाणे किंवा अपुरे वाटू शकते किंवा तसं काहीही नसतानासुद्धा व्यावसायिक, वैचारिक, कलाविषयक किंवा छंदविषयक कामांमध्ये विरुद्ध लिंगी व्यक्ती, एक छान मित्र अथवा मैत्रीण म्हणून मिळणे यासारखी आनंददायी गोष्ट नाही. अशा समविचारी मित्र-मैत्रिणीसह खूप गोष्टींचे शेअिरग होते, आवडीनिवडी जुळतात, नव्या गोष्टी शिकायला मिळतात, स्वत:ची नव्याने ओळख होऊ लागते आणि नवा जीवनानुभव मिळतो. तर काही वेळा लग्नाआधीचे असफल प्रेम प्रकरण किंवा समजून-उमजून केलेल्या ब्रेकअपनंतर ती व्यक्ती पुन्हा आयुष्यात अवतीर्ण होऊ शकते. खरं तर स्त्री-पुरुषांमधील विशुद्ध मैत्री ही खूप सुंदर गोष्ट आहे. त्यामध्ये जोडीदाराचा मर्यादित सहभाग असेल, योग्य तो अवकाश (स्पेस) दिला जात असेल तर या निखळ मैत्रीचा त्रिकोण किंवा तिचा नवरा आणि त्याची बायको असा सुंदर मैत्रीचा स्नेहबंध तयार होऊ शकतो. (आणि प्रेम प्रकरणाची शक्यताही कमी होऊन जाते) पण प्रत्येक नात्यामध्ये ‘जर-तर’ कधी ना कधी डोकावतातच. या मैत्रीच्या स्नेहबंधामध्ये एकाचे जरी मनाने गुंतणे सुरू झाले किंवा शारीरिक जवळिकीची एखादी जरी घटना अपघाताने घडली, तरी ते नाते मैत्रीचे न राहता प्रेम प्रकरणाकडे झुकते. आजकाल अशा प्रकरणांची वाढती संख्या पाहाता ‘अफेअरप्रूफ’ वैवाहिक आयुष्याविषयी प्रश्न पडायला लागतात.
मुंबईच्या ‘अथर्व सहनिवास’मध्ये एकाच मजल्यावर समोरासमोरच्या फ्लॅटमध्ये वसुधा आणि प्रदीप राहत होते. दोन्ही कुटुंबांमध्ये खूप घरोबा होता. जसजसे दोघे मोठे होत गेले तसतसे तारुण्यसुलभ भावना निर्माण झाल्या यात काहीच आश्चर्य वाटण्यासारखे नव्हते. त्यांच्या प्रेमाला दोन्ही घरांतून मान्यता होती आणि त्याचे पर्यावसन उभयतांच्या लग्नात होणार हे सर्वानी गृहीतच धरले होते. प्रदीपला वैद्यकीय शाखेत प्रवेश मिळाला आणि मग त्याला पुढील नवीन क्षितिजे खुणावू लागली. आधी एम.डी. करण्यास मणीपाल, डी.एम. करण्यास चंडीगड, मग पुढील शिक्षणासाठी अमेरिका, असे करता करता ‘वसुधाशी लग्न’ हा विषय त्याच्यासाठी खूपच मागे पडला. प्रदीपच्या परत येण्याकडे ती काही काळ डोळे लावून बसली होती, पण शेवटी तिचेही सी.ए. पूर्ण झाल्यावर त्याच्या परत येण्याची आशा तिने सोडून दिली. आई-बाबांनी सुचवलेल्या श्रीकांतशी तिचा विवाह झाला आणि चारचौघां- सारखा सुखी संसार सुरू झाला. प्रदीपने अमेरिकेत सुझनशी लग्न केले. मात्र दहा-बारा वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला आणि दोन मुलांना तिच्याकडे अमेरिकेत सोडून तो भारतामध्ये चंडीगडला काम करू लागला.
एकदा वसुधा लेक्चरच्या निमित्ताने चंडीगडला निघाली होती. विमानात शेजारी येऊन बसलेल्या व्यक्तीकडे तिने पाहिले. प्रदीप? होय प्रदीपच! क्षणभर त्याला ओळख तरी द्यावी की नाही, असा विचार मनात आला पण, ‘‘हाय वसु, तू?’’ या त्याच्या शब्दांनी ती पुरती विरघळली. गप्पांमध्ये प्रवास कसा संपला कळलेच नाही. सगळा बॅकलॉग भरून काढणे शक्यच नव्हते. त्यामुळे डिनरला भेटायचे ठरले. तिचा मुक्काम अजून दोन दिवसांनी वाढला. तरी बोलायचे विषय संपत नव्हते. या भेटीला एक वर्ष उलटून गेले. आता त्यांच्या दिवसाची सुरुवात ‘सुप्रभात’ आणि शेवट ‘शुभरात्री’च्या एखाद्या शेरशायरीने होऊ लागलाय. एके काळी वाढणारी ओढ आता दिवसभरातल्या मेसेजेस मधून व्यक्त होऊ लागली. दरम्यान, वसुधा दोनदा लेक्चरसाठी चंडीगडला जाऊन आली, तर वयोवृद्ध आई-वडिलांना भेटण्यासाठी प्रदीपच्या मुंबईत इकडे फेऱ्या होऊ लागल्या.
अशाच एका मुंबईभेटीत वसुधाने त्याला घरी बोलावले. तिच्या मुलाची, निखिलची दहावीची परीक्षा संपल्याने श्रीकांत त्याला घेऊन ट्रेकला गेला होता. संध्याकाळी प्रदीप घरी आल्यावर छान जेवण, गप्पा झाल्या. वाचन हा दोघांचा आवडीचा विषय असल्याने एका नव्या पुस्तकावर चर्चा चालू असताना दरवाजाची बेल वाजली. श्रीकांतच्या मोठय़ा भगिनी, नंदाताई दारात उभ्या होत्या. रात्रीचे साडेनऊ वाजलेले, घरात आपला भाऊ नाही, भाचा नाही आणि ही आपली वहिनी एका अनोळखी पुरुषासोबत हास्यविनोद करीत बसलेली पाहून त्या अस्वस्थ झाल्या; पण काही बोलल्या नाहीत. प्रदीपनेही प्रसंग पाहून लगेच निरोप घेतला. श्रीकांत परत आल्याबरोबर या घटनेचा पाढा वाचला गेला. ‘‘कोण हा परका नाव- गाव माहीत नसलेला माणूस? कुठे भेटला? कधी? किती दिवस झाले?’’ असे श्रीकांतचे प्रश्न येऊ लागले. आमचे ‘तस्से’ काही नाहीये. असे वसुधा परत परत सांगत होती. मात्र तिच्या मोबाइलमधले रोजचे मेसेज, त्यात व्यक्त झालेल्या भावना आणि ‘गेले वर्ष भर हे चालू आहे याबद्दल मला काहीच का बोलली नाहीस?’ याचे स्पष्टीकरण देताना, ‘त्यात सांगण्यासारखे विशेष काही वाटले नाही.’ याला ‘‘मग लपवावेसे तरी का वाटले?’’ हा प्रतिप्रश्न आलाच!
साहिल एम.बी.ए .झाला आणि बंगळूरुला एका मोठय़ा मल्टिनॅशनल कंपनीत नोकरीला लागला. आय.टी.तील तरुणांप्रमाणे त्याचे दैनंदिन जीवन सुरू झाले. सहा महिन्यांनी नबोनिता ही आकर्षक तरुणी जॉइन झाली आणि ठिणगी पडली! प्रचंड कामवासनेचा लोळ उठला, ‘आग दोनो तरफ लगी!’ दोघांचेही एकमेकांच्या अपार्टमेंटवर जाणे-येणे सुरू झाले. एकमेकांचा सहवास, आकंठ लैंगिक सुख आणि कोणी विचारणारे नाही. फारच मजेत दिवस जात होते. लग्नाच्या बांधिलकीचा विचार दुरूनही मनात नव्हता, पण काही महिन्यांनी नबोनिताला एका मोठय़ा कॉर्पोरेट कंपनीच्या मालकानेच मागणी घातल्याचे तिच्या आई-वडिलांनी कळविले. एका सेमिनारमध्ये देवाशीषने तिला पाहिले होते आणि रीतसर तिची संमती आहे का, असे विचारले होते. इतक्या बडय़ा कुटुंबाचे नाव ऐकून भविष्यातील वैभवशाली, आरामदायी जीवनाची सुखसोय होते आहे हे पाहून ती हरखूनच गेली.
देवाशीषशी चॅट करून, दोन-चार भेटित तिने निर्णय घेतला व कसलीही कटुता ब्रेकअपमध्ये न आणता साहिलला सोडून ती भुरकन उडून गेली. साहिलचेही यथावकाश लग्न झाले. बायको शीतल त्याच्यासारखीच आय.टी.मधली! मूलबाळ नकोच, असे प्लॅनिंग चालू होते. तेव्हा साहिलही बऱ्याच वरच्या हुद्दय़ावर गेला होता. त्याच्या कंपनीचा दुसऱ्या एका कंपनीशी टायअप करण्यासंदर्भात तो मुंबईत आला होता. त्यांच्या कंपनीचा सी.ई.ओ. व टीम ‘रॅडिसन ब्लू’मध्ये भेटली. प्राथमिक बोलणी झाली, पण साहिलचे लक्षच नव्हते. कारण सी.ई.ओ. देवाशीषशेजारी त्याची बायको म्हणजे प्रत्यक्ष नबोनिताच बसली होती. लंच घेता घेता आपला रूम नंबर त्याने खुबीने तिला सांगितला. नबोनिता आता एका तीन वर्षांच्या गोंडस मुलाची आई होती, पण तिने स्वत:ला इतके छान मेंटेन ठेवले होते की परत एक ठिणगी पडलीच. मग कधी ‘ताज’, कधी ‘मेरिडियन’मध्ये रूम बुक करून वरचेवर ‘बिझनेस ट्रिप’ होऊ लागल्या. एकदा शीतलला साहिलच्या सूटकेसमध्ये कंडोमची पाकिटे सापडली. ‘‘ही कोणासाठी?’’ असा तिचा सवाल होता. अखेर साहिलच्या ऑफिसमधील मित्राकडून शीतलने माहिती काढून घेतलीच!
मीनल एक निम्न मध्यमवर्गातील अभ्यासू, प्रामाणिक आणि हुशार मुलगी. इंग्रजी भाषा व कवितांची तिला विशेष आवड. शिकून खूप मोठे व्हावे अशी मनोमन इच्छा. मात्र वडिलांचे अकाली निधन झाले आणि घरची परिस्थिती बिकट झाली. पदवीधर होऊन नोकरी करावी अशा प्रयत्नात ती होती, पण घरच्यांनी ओळखीतल्या एका मुलाशी, उमेशशी तिचे लग्न लावून दिले. खरे तर मीनल आणि तिचा लांबचा भाऊ समीर बरोबरीने मोठे झाले होते. एकाच गावात असल्याने वरचेवर गाठीभेटी होत होत्या. वयात आल्यावर तर दोघांनाही भावी नवरा-बायको म्हणून सगळे आडून-आडून चिडवायलाही लागले होते. भविष्याचे स्वप्नरंजन आणि कधीमधी मिळणाऱ्या एकांतातील स्पर्शसुखाची जवळीक दोघांनाही गुदगुल्या करणारी होती. लग्नानंतर मीनल एका लहान तालुक्याच्या गावी गेली. घरची भरपूर शेती, घरी सासू-सासरे, दीर, येणारे-जाणारे, एक मुलगा या भल्या मोठय़ा गोतावळय़ात तिला डोकं वर काढायलाही दहा वर्षांत फुरसत मिळाली नाही. उमेश अतिशय सामान्य बुद्धीचा माणूस! एका जवळच्या नातेवाईकाच्या लग्नामध्ये मीनलला समीर जवळ जवळ दहा वर्षांनी भेटला. तो नाशिकमध्ये स्थायिक झाला होता. व्यवसायात बऱ्यापैकी जम बसला होता. त्याला मूलबाळ नव्हते आणि त्याची पत्नी रंजना अर्धेअधिक दिवस माहेरी पुण्यालाच राहत असे. ती घरी आल्यावर वादावादी, भांडणे ठरलेलीच असत. समीरच्या मनात अलीकडे घटस्फोट घेण्याचा विचार येऊ लागला होता. त्या लग्नात मीनलची भेट झाली आणि त्याच्या मनात आशा पल्लवित झाली.
मीनललाही खूप आनंद झाला. नंतर एकमेकांना मेसेज पाठवणे, पण लगेच डिलीट करणे असे सुरू झाले. नाशिकहून जळगावला टॅक्सी ट्रिपच्या निमित्ताने वाटेत समीर मीनलला चोरून भेटू लागला. महत्त्वाचे म्हणजे समीरने मीनलला बी.ए.ची परीक्षा देण्यास तयार केले. वाचत जा, अभ्यास कर, असे सांगत तिचा आत्मविश्वास वाढविला. दोन वर्षांत मीनलचे बी.ए. झाले. घरी सर्वानी कौतुक केले, पण आता इंग्रजी घेऊन एम.ए. करण्याची इच्छा तिने मोठय़ा हिमतीने व्यक्त केली. इकडे समीरनेही घरच्यांशी बोलून घटस्फोटासाठी कोर्टात केस टाकली. त्यातून मोकळे होण्यात दोन वर्षे गेलीच. समीरचा सहवास, त्याच्याशी मारलेल्या विविध विषयांवरच्या गप्पा, जीवनाबद्दलचे विचार आणि एकमेकांसाठी छोटय़ा छोटय़ा गोष्टी करण्यातून मिळणारा आनंद या सगळय़ाने ती अगदी भारावून गेली. जोडीदाराबद्दलच्या आशा, अपेक्षा, इच्छा आणि गरजाही समीर पूर्ण करत होता. एक दिवस धाडस करून त्याने लग्नाचा प्रस्ताव तिच्यासमोर ठेवला. मात्र तिचे संस्कार, आजूबाजूचे वातावरण, कौटुंबिक जबाबदाऱ्यांची जाणीव या सगळय़ाच्या दडपणामुळे तिला हे स्वीकारणे अवघड वाटले, पण समीरने तिला वेळ दिला. तिची एम. ए. इंग्रजीची परीक्षाही उत्तम पार पडली. या दरम्यानच्या वर्षभरात तिनेही आपल्या निरस संसाराचा गाडा ओढत नेण्याबाबत विचार केला आणि एक दिवस शांतपणे या लग्नातून बाहेर पडण्याची इच्छा असल्याचे तिने उमेशला सांगितले. काही काळ वादळी प्रसंगांना तोंड द्यावे लागणार आहे, याची तयारी तिने मनात केली होतीच.
ही काही भूतकाळातली प्रेम प्रकरणे नंतर पुन्हा आयुष्यात आलेली, पण आताच्या काळात पुरुष-स्त्रिया वेगवेगळय़ा कारणाने एकत्र येत असतात. बराच काळ एकमेकांच्या सहवासात असतात, त्यामुळे त्यांच्यात वेगळं नातं निर्माण होऊ शकतंच, प्रेमभावना विविध प्रकारे व्यक्त होऊ शकतेच. ‘प्लॅटॉनिक लव्ह’ हाही त्याचाच एक प्रकार. दोन स्त्री-पुरुषांमधील असे संबंध ज्यात शारीरिक जवळीक अजिबातच अभिप्रेत नाही, पण खूप सारी भावनिक जवळीक असते. म्हणजे त्या व्यक्तीबद्दल आस्था वाटते, तिची सोबत आवडते, काही प्रमाणात अवलंबित्व असते आणि जवळ नसल्यास बेचैन वाटते. मात्र अशा तिला किंवा त्याला हृदयातील ‘ती’ जागा दिलेली नसते. दुसरा प्रकार ‘ऑफिस स्पाऊस’चा. निखिल आणि सोनम एका रिसर्च इन्स्टिटय़ूटमध्ये काम करतात. दिवसाचे दहा-बारा तास एकत्र घालवतात. कधी कधी रात्री उशिरापर्यंत थांबावे लागते. अशा वेळी एकमेकांची सवय होते, सहवासाची ओढ वाटते. एकमेकांवरचं अवलंबित्व वाढतं आणि नातं काही वेळा मैत्रीच्या पलीकडेही जातं. प्रिया सहा आठवडय़ांच्या प्रशिक्षणासाठी हैदराबादला गेली होती. तिला तिथे रमण भेटला त्या स्थलकालाच्या परिस्थितीमध्ये त्यांचे भावबंध जुळले, त्याचे नाव ‘सिच्युएशनशिप’. तर पंचावन्न वर्षांचे प्रमोद राव सत्तावीस वर्षांच्या निकिता या त्यांच्या रिसेप्शनिस्टच्या चक्क प्रेमात पडले. ‘अभी तो मैं जवान हूं.’’ हेच बहुधा त्यांना या ‘मेल मॅनॅपॉझ’च्या वयात सिद्ध करायचे होते.
दिया तिच्या अत्यंत बेचव आणि निर्जीव लग्नाला भयंकर कंटाळली होती. मूल नसल्याने त्यांच्यात बांधून ठेवणारा पाशही नव्हता. नवरा संतोष अरसिक, पण साधा, सरळ, आज्ञाधारक माणूस होता. तिला लग्नातून बाहेर पडावे कसे हेच समजत नव्हते. तिने एक कल्पना लढवली. तिच्या दूरच्या आतेभावाशी संधान बांधले. त्यांचे प्रणयचाळ संतोष समोरच होऊ लागले. शेवटी कंटाळून संतोषने घटस्फोट दिला. असे झाले दियाचे ‘सुटका प्रकरण’. असंही घडू शकतं यावर तुमचा विश्वास बसणार नाही, पण निकिताने चक्क एका अॅपवरती एक ‘मजनू’ शोधला. त्यासोबत दोन रात्री हॉटेलमध्ये राहून राहुलला फोटो पाठवून त्याने जशी भानगड केली होती तश्शीच स्वत: करून बदला घेतला. हे झाले ‘रिव्हेंज अफेअर’. याशिवाय ‘समिलगी संबंधाचे प्रकरण’असतेच. इतके सगळे वाचून तुमच्या लक्षात आलेच असेल, की विवाहबाह्य संबंध हे मैत्री आणि प्रेमप्रकरण याच्या काठावरती ‘तळय़ात मळय़ात’ झुलत असते. कधी गंमत, उत्सुकता, थोडा बदल-चेंज हवा म्हणून, तर कधी जोडीदाराकडून शरीरसुख मिळत नाही म्हणून अशा जोडय़ा जमतात. कधी मित्र-मैत्रिणींच्या दबावामुळे (पीयर प्रेशर) जोडय़ा जुळतात.
सर्वसाधारणपणे एक मोठा गैरसमज असतो, की फक्त विसंवाद, कटुता आणि पती-पत्नीत दुरावा असणाऱ्या जोडप्यातीलच कोणीतरी अशी ‘भानगड’ करते. तसे बिलकूलच नाही अतिशय स्थिर, आनंददायी व आश्वासक नाते असणाऱ्या जोडप्याच्या संसारातही असा न बोलावता आलेला ‘पाहुणा’ असू शकतो. पहिल्या उदाहरणातील प्रदीप व वसुधाने शारीरिक जवळीक खरोखरच कटाक्षाने दूर ठेवली होती. पण दोघांमध्ये निर्माण झालेले हे विशेष भावनिक नाते इतके अनोखे, हवेहवेसे व जवळकीचे होते की ते फक्त आपल्या दोघांचेच आहे असे तिला तीव्रतेने वाटत होते. विवाहबाह्य संबंध केवळ शारीरिक पातळीवरचाच असतो, ही तिची पक्की धारणा होती. त्यामुळे श्रीकांतला सांगण्याची गरज नाही किंबहुना ते लपवावेच असे वसुधाला वाटत होते. परिणामी त्यांची ही मैत्री साधीसुधी न राहता त्याचे ‘अफेअर’ झाले.
साहिल व नबोनीताचे नाते केवळ शारीरिक सुखासाठीचे, स्वसंमतीने निवडलेले आणि अल्पजीवी होते. यामध्ये मानसिक गुंतवणूक फारशी नव्हतीच. त्यामुळे शीतलची प्रतिक्रिया फक्त ‘या बयेनेच माझ्या नवऱ्याला नादी लावले!’ या शिव्याशापापुरते मर्यादित राहिली. शिवाय आपल्या पुरुषप्रधान समाज व्यवस्थेमध्ये ‘संसारात अशा आणि एकदाच झालेल्या गोष्टी सोडून द्यायच्या असतात.’ या तडजोडीच्या विचाराने ते प्रकरण थंड झाले. मीनल आपला निरस संसार जसा आहे तसा स्वीकारून प्रामाणिकपणे करत होती. पण समीरच्या भेटीनंतर विवाहित जोडीदारासोबतचे सहजीवन किती सुंदर, आनंददायी असू शकते याचा जणू साक्षात्कारच तिला झाला. तिच्यासमोर दोन पर्याय होते. त्यातला समीरला स्वीकारण्याचा पर्याय तिने निवडला आणि ते सुखाने नांदू लागले! ‘अफेअर’ मधे कधी कधी ‘खरे प्रेम’ सापडते ते असे!
नात्यात असताना मीनल, वसुधा व साहिल तिघांनाही आपल्या या विवाहबाह्य संबंधाची टोचणी कधी तरी लागत असणार. अपराधीपणाची भावनाही त्यांना सतावत असणार, पण तरी त्यावर मात करून समीर, प्रदीप व नबोनीता यांच्याशी ते सतत संपर्कात होते व शिवाय तिघांनीही आपापल्या जोडीदारापासून हे नाते लपवायचा प्रयत्न केला होता. अशी अपराधी भावना, सतत सोबतीची गरज आणि गोपनीयता आली की या नात्याला ‘प्रेमप्रकरण’ असेच म्हणतात. या तिघांनाही प्रकरण घरी समजल्यावर स्वत:ला व त्यांच्या दुखावलेल्या जोडीदारालाही भावनिक वादळी अनुभवातून जावे लागले. प्रथमत: मोठा मानसिक धक्का, मग दु:ख, राग, अपुरेपणाचे शल्य, मत्सर, कटुता, अपमान, असुरक्षितता आणि काळजी अशा अनेक भावनांना सामोरे जावे लागले असणार. मीनल, वसुधा व साहिललाही काहीसे शरिमदे, अपराधी वाटले असणार. स्वत:चाच राग, तिरस्कारही वाटणे आणि पुढे काय, या विचाराने ते धास्तावलेले व खिन्नही झाले असणार. अर्थात ज्यांना आपल्या वैवाहिक आयुष्याला पुन्हा एक संधी द्यायची असेल. ते नातं मनापासून पूर्ववत किंवा अधिक अर्थपूर्ण करायचे असेल तर भावनेच्या भरात अविवेकी कृत्य न करणे उत्तम. त्यासाठी गरज पडल्यास योग्य व्यक्तीचा सल्ला घ्यायला हवा. एकमेकांची बलस्थाने ओळखत एकमेकांना आश्वस्त करून आपली निष्ठा परत एकदा नव्याने व्यक्त करायला हवी.
समानिलगी व्यक्ती सोबतची मैत्री आणि विरुद्ध लिंगी व्यक्ती सोबतची मैत्री यात गुणात्मक फरक असतो. जेव्हा काही खासगी तपशिलांबद्दल चर्चा होते तेव्हा कळत न कळत काहीसा नकोसा वाटणारा लैंगिक तणाव आपोआप येतोच. हा तणाव योग्य पद्धतीने सांभाळला गेला तर ठीक! अशी सावधगिरी बाळगली नाही, तर ती मैत्री वैवाहिक नात्याआड येऊ शकते. त्याउलट मैत्रीच्या नात्याच्या मर्यादा निश्चित करून त्या मर्यादेतच ठेवल्या तर एक सुंदर, अर्थपूर्ण व उत्पादक असे मैत्रीचे नाते वाढू शकते. यामुळे तुमचे व्यक्तिगत आणि वैवाहिक जीवनही समृद्ध होईल आणि लग्नही ‘अफेअरप्रूफ’ ठेवता येईल!
‘अफेअरप्रूफ’ वैवाहिक आयुष्य शक्य आहे का? असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. तत्त्वत: उत्तर द्यायचे तर हो, शक्य आहे. मात्र वाहनातून प्रवास करणाऱ्यांसाठी अपघात होण्याची जशी संभाव्य किंवा उपजत शक्यता असते, तसेच लग्नाच्या नात्यांमध्ये ‘अफेअर’ होण्याची शक्यता असते. अर्थात कोणीच असे प्रेमप्रकरण करायचे म्हणून घराबाहेर पडत नाही. बहुतांश वेळा अगदी ध्यानीमनी नसताना दैनंदिन आयुष्यात एखाद्या विशिष्ट क्षणी आपल्या जोडीदारापेक्षाही आकर्षक वाटणारे असे कोणीतरी भेटू शकते. मुळात हे गंभीरपणे समजून घेऊन मान्य करायला हवे. ‘फिनालइथलामाईन’ आणि ‘ऑक्सिटोसिन’ (Phenylethylamine, Oxytocin) इत्यादीचा केमिकल लोचा त्या व्यक्तींच्या मेंदूत होतो. प्रेमात पडलेल्या माणसाच्या मेंदूत तयार होणारी ही हॅपी हार्मोन्स- प्रेमसंयुगे आहेत. त्यामुळे याचे प्रमाण वाढले की एक सुखद, तरल , उत्तेजक भावना जाणवू लागते. अनावर रोमँटिक भावना निर्माण होऊ लागतात. हे आकर्षण आपण कसे हाताळतो यावरच हे ‘प्रेम प्रकरण’ होणार की नाही हे ठरते. हे फक्त तत्कालिक आकर्षण आहे ही वस्तुस्थिती लक्षात आली आणि ती स्वीकारली तर भावी प्रेमपात्रापासून दूर जाण्याची व पुढील धोका टाळण्याची उपाययोजना आपण करू शकतो.
एखाद्या व्यक्तीवर ‘प्रेम करणे’ आणि दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या ‘प्रेमात पडणे’ या दोन वेगळय़ा भावना आहेत. असे आकर्षण वाटत असताना स्वत:भोवती एक तटबंदी उभारणे गरजेचे असते. अनेक जण हे नाते आपल्याला पुढे कोठे घेऊन जाणार आहे? त्याचे भवितव्य काय? या भविष्यातील गोष्टींचा विचार न करता हव्याहव्याशा वाटणाऱ्या त्या अतिसुखदायक भावनेत वाहवत जातात. त्या व्यक्तीमध्ये मनाने गुंतल्यामुळे या नात्याचे समर्थनही मनोमन करायला सुरुवात होते. हेच धोक्याचे लाल निशाण आहे. या टप्प्यावर हे नातेपुढे न्यायचे अथवा नाही ही निवड (चॉईस) सर्वस्वी त्या त्या व्यक्तीची असते. एकूण विवाहित जोडप्यांच्या एकतृतीयांश लग्नांमध्ये (अलीकडे ही टक्केवारी काहीशी वाढली आहे)‘विवाहबाह्य संबंध’ ही समस्या उद्भवते आहे. त्यातील ९० टक्के प्रकरणं कधी ना कधी उघडकीस येतातच. ज्यांनी आजवर कधीच प्रेम प्रकरण केले नाही, ज्यांचे आपल्या भावनांवर व इच्छाशक्तीवर प्रबळ नियंत्रण आहे किंवा जे नैतिकतेच्या चष्म्यातून या भानगडींकडे पहात गप्पा मारतात, अशा व्यक्तींपैकी कोणीही यात सहजपणे अडकू शकते. त्यामुळे लक्षात घ्या.. ‘अफेअरप्रूफ’ लग्न असे काही नसते..!!
(लेखातील व्यक्तींची, स्थळांची नावे बदलली आहेत.)
(लेखिका वैद्यकीय व्यावसायिक असून २००५ पासून पूर्णवेळ समुपदेशक आहेत. डॉ. विजय नागास्वामी यांनी लिहिलेल्या ‘थ्री इज अ क्राऊड’ या पुस्तकाचा अनुवाद डॉ. मोहना कुलकर्णी यांनी ‘अफेअर – विवाहबाह्य संबंध आणि नंतर’ या नावाने केला असून ‘मीडिया वॉच पब्लिकेशन अमरावती‘ यांनी ते प्रकाशित केले आहे.)