वडिलांनी घाबरलेल्या अवस्थेचा निचरा झाल्यानंतरची पहिली प्रतिक्रिया म्हणून प्रेमाने मिठी मारायच्या ऐवजी जर सर्वांच्या समोर थप्पड मारलेली असेल तर आडनिड्या वयात सहन केलेल्या या थपडेचे पडसाद, त्या मुलाच्या आयुष्यात कटुताच निर्माण करतात. आलोकच्या आयुष्यातही या थपडेची प्रतिक्रिया म्हणून वडिलांबरोबर कायम शीतयुद्धच लढले गेले. मनाच्या ‘टाइम मशीन’मधून जाऊन त्याला तो भूतकाळातला सल बदलता येईल का?

बॉसच्या केबिनमधून चिडून बाहेर पडल्यावर ताडताड चालत आलोक कॅन्टीनला आला. बॉसवर संतापून करणार काय? अगतिक वाटत होतं त्याला. कोपऱ्यातल्या टेबलाकडे त्याची नजर गेली, तर एच.आर. मॅनेजर वैदेही तिथंच बसली होती. तिनं त्याला बोलावलं. वैदेही हसरी, मोकळ्या स्वभावाची. तिच्याकडे येणाऱ्या तक्रारींवर तिने काढलेल्या हटके उपायांची कंपनीत चर्चा असायची.

Wife murders husband with help of lover in dapoli crime news
प्रियकराच्या मदतीनेच पतीला संपवले; रत्नागिरी जिल्हात खळबळ
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
Walmik Karad Mother Parubai Karad
Walmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर आईची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “आता मी मेल्यावर पाणी पाजायला…”
Passenger bitten security force jawan, Vasai,
वसई : प्रवाशाने घेतला सुरक्षा बलाच्या जवानाचा चावा
Young man murdered over dispute over money
हातउसने दिलेल्या पैशांच्या वादातून तरुणाचा खून, राजेंद्रनगर ‘एसआरए’ वसाहतीतील घटना
Vaibhavi Deshmukh News
Santosh Deshmukh Daughter : संतोष देशमुख यांच्या मुलीला अश्रू अनावर, “पप्पा, जिथे असाल तिथे हसत राहा! आम्हाला माफ करा…”
रोलरखाली चिरडून मजुराचा मृत्यू

अलोक हसून तिथे पोहोचला, पण त्याचं काहीतरी बिनसलेलं वैदेहीला लगेच जाणवलं असावं. ‘‘ सब ठीक?’’ तिनं विचारलंच.

‘‘ पारेखसाहेबांना भेटून आलोय.’’ सांगू की नको या विचारात आलोक मोघमपणे म्हणाला.

‘‘ म्हणजे ‘वरिष्ठां’ना. मग पुढे?’’ वैदेही हसत म्हणाली. ‘वरिष्ठ’ हे पारेखांचं टोपणनाव.

आणखी वाचा-‘आईची जात, ती मुलांची का नाही?’

‘‘ कालपासून माझी टीम एका गुंतागुंतीच्या समस्येवर सतत काम करत होती. त्याचं संपूर्ण सोल्युशन मी स्वत: तपासलेलं होतं, पण वेळ कमी होता म्हणून फक्त एकच छोटी प्रक्रिया एकाला करायला सांगितली. आणि नेमकी त्यातच गडबड झाली. सोडवली समस्या मीच, पण डेडलाइन थोडक्यात हुकली. इतक्या कमी वेळात मी एकटा कुठेकुठे पाहणार? पण केलेल्या कामाचं कौतुक शून्य, वर दोन नव्या सहकाऱ्यांसमोर, ‘तुझ्याकडून जबाबदारीने काम करण्याची अपेक्षा आहे आलोक.’ अशी ‘वरिष्ठां’ची बोलणी खाल्ली.’’ त्यानं सांगून टाकलं.

‘‘तुझ्यासारख्या अनुभवी माणसाचा आणि तोही इतरांसमोर त्यांनी अपमान करायला नको होता. तुझी तगमग मी समजू शकते.’’ वैदेही म्हणाली. आपल्या भावना वैदेहीनं नेमक्या समजून घेतल्याचं आलोकला बरं वाटलं. इतका वेळ आवरून धरलेला संताप, अगतिकता उसळून आली. त्याला शांत करत वैदेही म्हणाली, ‘‘एवढं मनाला लावून घेऊ नकोस. सरांची बोलायची पद्धत अशीच आहे रे. एरवी माणूस प्रेमळ आहे, पण एखादी समस्या आली की संपलं. ‘वरिष्ठ’ असूनही पॅनिक होऊन बोलत सुटतात.’’ यावर आलोकनं फक्त खांदे उडवले.

‘‘तुझं सरांशी काही वैयक्तिक भांडण झालंय का? कारण मागे एकदा त्यांनी राघवला झापलं, तेव्हा तुझा काही संबंध नसतानाही तू भडकला होतास. बॉस कधीतरी काहीतरी म्हणणारच. पण तुला एवढा राग, एवढी घालमेल का होते? स्वभावदोष म्हणून सोडून द्यायचं.’’

‘‘ त्या स्वभावदोषाबद्दलच तर माझी तक्रार आहे. अशा हेटाळणीच्या स्वरात बोलणारी लोकं पाहिल्यावर माझं डोकंच फिरतं. बहुतेक मला माझ्या बाबांची आठवण येते. ते असेच दुसऱ्याला मोडीत काढतात. आमचं पटतच नाही. सगळं छान चालू असेल तरी आमच्यात कधी भडका उडेल ते सांगता येत नाही.’’

आणखी वाचा-ईतिश्री : थोडीसी बेवफाई?

‘‘ म्हणजे थोडक्यात तू ‘वरिष्ठ’ किंवा कोणावरही भडकला असलास, तरी मनातल्या मनात तुझ्या बाबांशीच भांडत असतोस.’’ वैदेही म्हणाली.

‘‘ अं … हो बहुतेक.’’ आलोक विचारात पडला.

‘‘लहानपणापासून तुमचे संबंध ताणलेलेच आहेत का?’’

‘‘नाही, लहानपणी आमची दोस्ती होती. अबोल होते, पण ते मला फिरायला, सायकल चालवायला, गणपती पाहायला न्यायचे. मला वाटतं, माझी दहावीची परीक्षा संपली ना, त्या दिवसापासून हे सुरू झालं.’’ आलोक आठवत म्हणाला. ‘‘दहावीचा शेवटचा पेपर संपल्यावर हॉटेलात जेवून तिथूनच सिनेमाला जायचं असं माझं आणि शेजारच्या प्रणवचं ठरलं होतं. तसं मी आईला सांगितलंही होतं. पण गर्दीमुळे आम्हाला उशिराच्या शोची तिकिटं मिळाली. आमच्या घरी फोन नव्हता आणि मोबाईल इतके सार्वत्रिक झाले नव्हते तेव्हा. शेजारच्या काळेकाकांकडे फोन होता, पण परीक्षेतून सुटल्यामुळे आम्ही उधळलो होतो. त्या मस्तीच्या मूडमध्ये, ‘यायला उशीर होणार आहे,’ हे घरी कळवायचं सुचलंच नाही. मधल्या वेळात इकडेतिकडे भटकून, सिनेमा संपल्यावर रात्री एक वाजता हसत-खिदळत आम्ही घरी पोचलो, तर दोघांच्याही घरचे हवालदिल होऊन आम्हाला शोधत होते.

आम्हाला पाहिल्याबरोबर प्रणवच्या बाबांनी त्याला घट्ट मिठी मारली. माझ्या बाबांनी मात्र जवळ येताक्षणी माझ्या सणसणीत थोबाडीत ठेवून दिली. डोळ्यांसमोर काजवे चमकले. मला काही कळलंच नाही. फक्त बाबांचा आरडाओरडा ऐकू आला. एरवी मुखदुर्बळ, भडकल्यावर मात्र काहीही बोलत सुटतात, ‘‘आम्ही सगळे वेड लागल्यासारखे तुम्हाला शोधतोय आणि तुम्ही निर्लज्जपणे खिदळत रात्री एक वाजता घरी येता? कळवायची काही पद्धत असते की नाही? मूर्ख, बेजबाबदार.’’ दिवसभराच्या धमाल उत्साहानंतर असा आहेर आणि अनपेक्षित जाहीर थोबाडीत मारल्याने प्रचंड अपमान. इज्जतच गेली माझी. पण उलटून बोलण्याची हिंमत नव्हती. बधिर झालो होतो. मात्र मी डोळ्यात पाणी येऊ दिलं नाही. प्रणवच्या बाबांनी त्याला मारलेल्या मिठीकडे मी सुन्नपणे पाहत होतो. माझ्या बाबांबद्दल मला एकदम तिरस्कारच वाटला. त्यानंतर मग खुन्नसचा सिलसिला सुरू राहिला. भांडायची हिंमत नव्हती, मग मी असहकार पुकारायचो, मख्खपणे वागायचं आणि त्यांनी मला मूर्खात काढायचं. ‘एवढा घोडा झालाय तरी जबाबदारी कळत नाही.’ म्हणायचं. मी एखादी गोष्ट नीट, चांगली केली असेल, तरीही कधी कौतुक केलं नाही त्यांनी. मोठेपणी कमवायला लागल्यावर मी विरोध करायला लागलो. तरीही ते अधूनमधून माझी इज्जत काढतातच, खूप छोट्या-मोठ्या गोष्टीत आमचं अजूनही शीतयुद्ध सुरू असतंच.’’

आणखी वाचा-‘ती’ च्या भोवती : विस्तारलेल्या आईपणाचा प्रत्यय!

‘‘आणि म्हणूनच आजच्यासारखा प्रसंग घडला की, समोर बाबा नसले, तरी ते शीतयुद्ध तुझ्या मनात सुरू होतं. दहावीनंतरच्या त्या प्रसंगातल्या भावना जाग्या होतात, बाहेर पडतात. बाबांच्या तर कुठल्याही शब्दांमधून तुला एकच वाक्य ऐकू येतं, ‘तू एवढा कसा बेजबाबदार, बेअक्कल?’ आणि त्यांना ऐकू येत असणार, ‘‘तुम्ही काहीही करा, मी असाच वागणार, मला काही फरक पडत नाही.’ बरोबर?’’ वैदेहीनं विचारलं.

‘‘हो, अगदी असंच होतं.’’

‘‘तेव्हाच्या खुन्नसवाल्या भावना साचवत जायची तुम्हाला दोघांनाही आता सवय झालीय, त्यांचा मोठ्ठा वृक्ष झालाय, एवढ्या पारंब्या फुटल्यात, की तोडणं अशक्य. अशा वेळी ना आलोक, तो विषवृक्ष जिथून रुजला, त्या अनुभवाच्या मुळापाशी जाऊन तोडावा लागतो.’’ बोलता बोलता वैदेहीला अचानक काहीतरी सुचलं. ती म्हणाली,

‘‘आलोक, कल्पना कर, माझ्याकडे टाइम मशीन आहे. आजचा आलोक, जो एका छोट्या मुलाचा बाप आहे, जबाबदारीचं पद सांभाळतोय, जुन्या गोष्टी पुसून (अनलर्न करून) नव्याने विचार करण्याचं स्किल तो जे शिकलाय, त्याला मी टाइम मशीनमधून भूतकाळातल्या ‘त्या’ प्रसंगाच्या थोडं आधी घेऊन गेलेय.

‘‘बघ, रात्रीचा एक वाजलाय तरी आलोक आणि प्रणव घरी आलेले नाहीत. दोघांचे बाबा आणि काही जण त्यांच्या मित्रांच्या घराघरांत जाऊन शोधतायत, त्यांच्या मित्रांना फोन करतायत, पोलिसांना फोन झालाय.. ऐक ते काय बोलतायत…’’ वैदेहीच्या कल्पनेची मजा वाटून आलोकही खेळात सामील झाला. शोधणाऱ्या दोन-तीन लोकांच्या भूमिकेत शिरून वैदेही बोलायला लागली. ‘‘मुलांचा पेपर संपूनही १२ तास होऊन गेलेत, काही निरोप नाही, काळ्यांकडे फोनही नाही आला त्यांचा. आलोक असा निष्काळजीपणे कधी वागत नाही. पेपर वाईट गेला असेल का? घाबरून जिवाचं काही…’’

‘‘छे छे, भलतंच. दोघं सोबत आहेत ना एकमेकांच्या.’’

‘‘हरवल्याची तक्रार पोलीस चोवीस तासांनी घेतात…चौकीत अपघाताची काही नोंद नाही.’’

‘‘मैत्रीण, ब्रेकअप काही नाही ना दोघांपैकी कुणाचं? एखादं व्यसन, पोरांची मारामारी?’’

‘‘अरे, ती बघा मुलं येतायत. प्रणव आणि आलोकच आहेत, केवढ्यानं खिदळतायत…’’

‘‘आणि आपण मूर्खासारखे जेवणखाण सोडून चार तास झाले त्यांना शोधतोय, नाही नाही त्या शंका येतायत मनात….बेअक्कल, निष्काळजी पोरं…’’

वैदेही थांबली. घडून गेलेला प्रसंग आलोक नव्याने पहात होता.

आणखी वाचा-सांधा बदलताना : पालकत्वाच्या मर्यादा

‘‘इथून स्पष्टच दिसतंय मला. बाबा केवढ्या तणावातून गेले असतील वैदेही तेव्हा. किती पॅनिक झाले असतील ते आज बाप झाल्यावर मी समजू शकतो. शिवाय उपाशी, त्यांना भूक सहन होत नाही, त्यामुळे पण खवळले असतील. मुलाला एखादी थप्पड लगावणं आमच्या घरात सहज होतं. म्हणजे, प्रणवला मिळालेली ‘झप्पी’ आणि मला मिळालेली थप्पड यांची तुलना करत बसलो का मी इतकी वर्षं?’’

‘‘शक्य आहे. ती राहिलेली मिठी बाबांनी तुला आज दिली तर? तुमच्यातलं दुष्टचक्र थांबेल?’’

‘‘अवघड आहे. असा मोकळेपणा माझ्यात आणि माझ्या मुलात आहे, पण बाबांशी…’’

‘‘ मग त्यांनी सॉरी म्हटलं तर तुझ्या मनातला तिढा सुटेल का?’’

‘‘ सॉरी कुठलं, भावना व्यक्त करणंच बाबांच्या स्वभावात नाही, त्यांना जमतच नाही ते. पण आता आठवतंय, त्यानंतर ते खूप वेळा त्यांच्या रांगड्या पद्धतीने माझ्याशी बोलायचा प्रयत्न करायचे. कधी नव्हे ते सलग दोनतीनदा माझ्यासाठी आइसक्रीमसुद्धा आणलेलं. ओह… म्हणजे ते त्यांचं ‘सॉरी’ होतं. छोटा आलोक मात्र प्रणवच्या बाबांची ‘मिठी’ पाहून आणि जाहीर अपमानामुळे बिथरलेला. त्याला काहीच रुचत नव्हतं, नुसती असहाय्य चिडचिड.’’

‘‘मोठ्या आलोकलाही बाबांचा तिरस्कार का वाटतो? एका प्रसंगाने संपण्याइतकं तुमच्यातलं प्रेम हलकं आहे?’’

‘‘तिरस्कार नाही. मला त्यांच्याबद्दल आदर वाटतो, आधारही वाटतो. त्यांचं प्रेमही कळतं मला. पण त्या प्रसंगाला धरून ठेवून आम्ही दोघंही इतकी वर्षं आपापले इगो कुरवाळत राहिलो बहुतेक. तेवढ्या बाबतीत आलोक लहानच राहिला.’’

‘‘मग सोप्पं आहे. एवढा एक प्रसंग ‘झॅप’ करून पुसून टाकायचा. त्याला चिकटलेल्या प्रसंगांची साखळीही नाहीशी होईल. किमान ढिली होईल ना?’’

‘‘तेव्हापासून बाबांच्या ‘प्यारकी झप्पी’ची वाट पहात मी रुसून बसलोय गं वैदेही. पण ते गावाकडचे, त्यांची मुलांवरच्या प्रेमाची कल्पना वेगळी आहे, त्यात शिस्त आहे, पण प्रेमाची मिठी नाहीच आहे. छोट्या आलोकच्या दोस्तीची तेही इतकी वर्षं वाट पहात असतील नाही का वैदेही? चल, अच्छा, मी आता घरीच जातो. नंतर रात्रभर जागून काम करेन घरून.’’ अलोक ‘सेंटी’ होऊन उठलाच एकदम. ‘‘ठरलंच का? डायरेक्ट झप्पी?’’ वैदेहीनं हसत विचारलं.

‘‘एवढी हिंमत नाही अजून, पण त्यांचा हात हातात घेऊ शकेन. प्रेमाने बोलू शकेन. मागचं सारं विसरून. ‘टाइम मशीन’च्या टाइमली राइडबद्दल थँक्स वैदेही.’’ तिच्याशी शेकहँड करून आलोक निघालाच.

neelima.kirane1@gmail.com

Story img Loader