नीलिमा किराणे

मुलं स्थिरस्थावर होण्याच्या, त्यांचं करिअर घडण्याच्या काळात त्यांना मोठ्यांचा आधार हवा असतो. या काळात त्यांच्यावरही ताण येत असतो. त्यामुळे त्यांचं क्षितिज विस्तारताना त्यांच्या मनात काय चाललंय हे समजून घ्यायला काय हरकत आहे? अशा वेळी त्यांना ‘जज्’ करणं, त्यांच्या कृतींवर लेबल लावण्यापेक्षा पालकांनी मुलांना अडवणाऱ्या शिस्त, अपेक्षा, पारंपरिकता या मनातल्या जुन्या चौकटी बदलायला हव्यात, त्यासाठी काय करायला हवं?

concept of house husband
स्त्री ‘वि’श्व: ‘हाऊस हसबंड’ असणं!
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
achieving life goals steps to be successful in life
सांधा बदलताना: तो प्रवास सुंदर होता
chaturang nature disorder harmful to society Personality American Psychological Association
स्वभाव-विभाव: समाजासाठी विघातक विकार
vandana gupte article Freedom only for freedoms sake
‘ती’च्या भोवती…! स्वातंत्र्य केवळ स्वातंत्र्यासाठीच!
family, old women, attention to old women,
मनातलं कागदावर: दुधातील साखर…
chaturang transgender Berlin No Border Festival Gender discrimination Ideology
स्वीकार केव्हा होईल?
children, studies, loksatta news,
सांदीत सापडलेले…! : मदत?

दिनेशकाका ठरलेल्या वेळेच्या आधीच आल्यामुळं स्वप्ना आणि साहिल-सलीलची धांदल उडाली. ते बाबांचे बालमित्र. गावाकडून इथे शहरात आल्यावर मित्राकडे चक्कर असायचीच त्यांची.

‘‘या भाऊजी, हे येतीलच एवढ्यात’’, स्वप्नानं स्वागत केलं.

‘‘येऊ दे निवांत. आज डॉ. साहिलशी गप्पांचा योग दिसतोय. बाबा येईपर्यंत मला झेलाल ना पोरांनो?’’ काका हसत म्हणाले.

‘‘अवर प्लेजर काका. किती वर्षांनी निवांत भेटतोय आपण.’’ साहिल म्हणाला.

साहिल परदेशात पीएच.डी. करून आल्याला तीन महिने होऊन गेले होते. नोकरी/फेलोशिप शोधणं चालू होतं. सलीलने बाबांच्या आग्रहामुळे इंजिनीअरिंगचं एक वर्ष करून ‘आवडत नाही’ म्हणून सोडून दिलं होतं. हॉटेल मॅनेजमेंटला प्रवेश घेतला होता शिवाय स्पॅनिश शिकत होता. थोडक्यात, दोघेही करिअरच्या वाटा चाचपडत होते.

देशी-विदेशी शिक्षण, खाद्यापदार्थ, करिअरचे पर्याय, स्पर्धा, देशातल्या बोचणाऱ्या गोष्टी, विविध विषयांवर रंगलेल्या तिघांच्या गप्पा पाहून स्वप्नाला नवलच वाटलं. शेखर आल्यावर मात्र मुलांचे चेहरे बदललेले दिनेशच्या नजरेतून सुटले नाहीत. चहा झाल्या झाल्या काहीतरी निमित्त सांगून मुलं घराबाहेर सटकली.

आणखी वाचा-हात जेव्हा डोळे होतात…

‘‘छान गप्पा चाललेल्या तुमच्या, आमच्याशी इतकं बोलत नाहीत मुलं.’’ स्वप्ना बोलून गेली.

‘‘माझं तोंड दिसल्याबरोबर बाहेर पडले. मी सोडून सर्वांशी गोड बोलतात. बाप म्हणजे फक्त एटीएम मशीन.’’ शेखर कडवटपणे म्हणाला.

‘‘अहो, सारखं असलंच बोलल्यावर मुलं कशाला समोर थांबतील? हल्ली माझ्याशीसुद्धा पूर्वीसारखं बोलत नाहीत ती.’’ स्वप्नानं मुलांची बाजू सावरली.

‘‘कशी रे ही आजकालची मुलं? उठणं, झोपणं, जेवणं… ना कशाला वेळकाळ, ना कुठली शिस्त. खोलीभर पसारा. घरात असलेच तर दोघंही तंगड्या वर करून मोबाइल पाहात पडलेले असतात. काही बोललं की घुम्यासारखी बसतात. नाक्यावर नाही तर मित्रांकडे सटकतात. घर आहे की हॉटेल? तू कसं मॅनेज केलं होतंस तुझ्या आशीषला? की तुमच्याकडेही असंच चालायचं?’’ शेखरनं विचारलं.

‘‘आपल्याच मुलांना ‘मॅनेज’ कशासाठी करायचं रे? पोरं आपल्याच नादात असतात, मूडी वागतात, कधी तेवर दाखवतात, पण आपण या वयात होतो त्यापेक्षा ही पिढी हुशार, समजूतदार आहे.’’ दिनेश म्हणाला.

‘‘कुठली समजूतदार? थोरल्यानं ‘माझ्या योग्य ऑफर नाही.’ म्हणत दोन नोकऱ्या नाकारल्या. धाकट्याला इंजिनीअरिंग सोडून आचारी बनायचंय. सगळी थेरं बापाच्या जिवावर.’’

‘‘अहो, मुलं वाया गेलीयत का आपली? आपल्याला ज्या विषयाचं नावसुद्धा माहीत नव्हतं त्यात डॉक्टरेट केलीय साहिलनं. तुमचे सुरुवातीचे पैसे सोडले, तर पुढचं शिक्षण स्कॉलरशिप आणि तिथे जॉब करून त्याचं त्यानं भागवलंय. मग ताबडतोब कमवायची सक्ती कशाला? सलीलचं केटरिंग तुम्हाला आवडत नाही ठिके, पण सारखं आचारी काय म्हणता त्याला?’’ स्वप्ना चिडलीच.

‘‘तूही मुलांनाच सामील. यांना आमच्यासारख्या जबाबदाऱ्या नाहीत म्हणून निवांत कारभार चाललाय. आम्ही…’’ आता मात्र दिनेशला राहवलं नाही.

‘‘शेखर, आपलं जुनं झालं आता. आपण खूप कष्ट केले, कुणाला कमी पडू दिलं नाही. त्यामुळेच तर मुलांना आपल्यासारखं जबाबदाऱ्यांचं ओझं नाही यात वाईट काय आहे? आता ३० वर्षं मागं जाऊन तुलना कशासाठी?’’ तरीही शेखरच्या कपाळावर आठी होतीच.

‘‘सलीलनं इंजिनीअरिंग सोडल्याचा राग आहे भाऊजी.’’ स्वप्ना म्हणाली.

आणखी वाचा-मनातलं कागदावर: दुधातील साखर…

‘‘हं. तुला माझ्या एका मित्राची आठवण सांगतो. तो आता प्रथितयश आहे, पण आपल्यापेक्षाही गरिबीतून कष्टांनी वर आलेला.’’ एकदा म्हणाला, ‘‘मी इंजिनीअर झाल्याबरोबर मिळाली ती नोकरी धरली. त्याशिवाय घर चालणारच नव्हतं. काम मनापासून केलं, आज सर्वार्थानं यशस्वी आहे. तरीही, माझं काम मला आवडत होतं का? माझी पॅशन काय होती / आहे? ते आजही नाही सांगू शकत. माझ्या मुलांच्या शिक्षणाच्या निमित्ताने अॅप्टिट्यूड टेस्ट, करिअरचे विविध पर्याय, संधी पाहिल्यावर वाटलं, आपण फक्त कष्ट करत राहिलो. आपली आवड, पॅशन शोधावी असा विचारसुद्धा मनात आला नाही, मात्र आता माझ्या मुलाला त्याची पॅशन, निदान आवडीचं काम सापडेपर्यंत मी शक्य तेवढा सपोर्ट करणार. माझा मुलगा जबाबदार आहे, मानी आहे. माझ्या जिवावर फार काळ राहायला त्याला आवडणार नाही आणि मीही ‘मागेल ते’ पुरवून त्याला आळशी, परावलंबी करणार नाही पण काही काळ मुशाफिरी करावीशी वाटली तर तेवढी सवड नक्की देईन. मी केलं ते सक्ती असल्यासारखं होतं. त्याला ‘चॉइस’ करू दे. मुलांचं क्षितिज विस्तारतंय, आपल्या मनातल्या जुन्या चौकटी लवचीक हव्यात. अडवणाऱ्या नकोत.’ पटतंय का शेखर?’’

‘‘तुझ्या मित्राचं ठीक आहे, पण परवडत नसणाऱ्यांनी काय करायचं?’’

‘‘आपण केला तसा संघर्ष आता त्यांनी करायचा. आपण अशांना मदत करू शकतो. पण एक पायरी वर आल्यावर, आपल्या मुलांचे कष्ट आणि अॅचिव्हमेंट आपल्या पोटापाण्याच्या कष्टांपेक्षा वेगळे असणारच ना? प्रत्येकाचे चॉइस सारखे कसे असणार?’’

‘‘हे पटतंय मला, पण मुलं माझ्याशी मोकळेपणाने बोलतही नाहीत. आशीष बोलतो का तुझ्याशी?’’ शेखर पटवून घेत म्हणाला.

‘‘संवादाची पण सवय असावी लागते रे. तुला आपल्या चाळीतले लोक आठवतात? लहान पोरांशी कसे वागायचे? पोरांचा उपयोग बारीकसारीक कामं करण्यासाठी, मोठ्यांनी टवाळी आणि टपल्या मारण्यासाठीच असतो, असं मला त्यानंतरही खूप वर्षं खरोखर वाटायचं.’’ आठवणीनं शेखरच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.

‘‘मुलांवर प्रेम म्हणजे त्यांना खाऊ, खेळणी आणणं एवढी माझ्यात आशीष झाल्यावर सुधारणा झाली पण मुलांच्या भावनांचा विचार कल्पनेतही नव्हता. एकदा त्याने माझं ऐकलं नाही म्हणून मी त्याला एक टपली मारली. तो एवढासा चिमुरडा रागानं म्हणाला, ‘‘मी छोटा आहे म्हणून तू मला मारतोयस ना? मोठा झाल्यावर मी पण तुला मारीन.’’ त्याच्या आविर्भावावर मी थट्टेनं हसलो, पण साक्षी म्हणाली, ‘‘हसू नकोस. त्याचं काही चुकल्याबद्दल तू मारलंस ते त्याला कळलेलंच नाहीये, उलट ‘आपल्याकडे शक्ती असल्यावर दुसऱ्याला मारायचं असतं’, असा संदेश त्यानं घेतलाय ते ऐकू आलं का तुला? तुझ्या टपलीनं त्याला अपमान वाटलाय. त्याला नीट समजावून सांग.’’ साक्षीनं उलगडून दाखवेपर्यंत मी कधी असा विचारही केला नव्हता. प्रेम म्हणजे आदर आणि विश्वास हे मला कळायला लागल्यावर आशीषशी हळूहळू दोस्ती झाली.’’

आणखी वाचा-‘भय’भूती: भित्यंतराचे कल्लोळ

‘‘साहिल-सलीलही दोस्ती असल्यासारखे बोलले तुमच्याशी.’’ स्वप्ना म्हणाली.

‘‘ते तर मोठेच आहेत आता. या वयात करिअर अस्पष्ट असतं तेव्हा खूप ताण असतो मुलांवर. मी करिअरबद्दल त्यांच्या मनात काय चाललंय ते समजून घ्यायचा प्रयत्न केला. ऐकून घेतलं, सल्ले दिले नाहीत. त्यामुळे त्यांना विश्वास वाटला, ती मोकळी झाली. मुलांना अशा वेळी मोठ्यांचा आधार हवा असतो. त्यांना जज् केलेलं, लेबलं लावलेली आवडत नाहीत. आत्मसन्मान दुखावतो. मग मुलं घर टाळतात. मित्र जवळचे वाटतात.’’

‘‘एवढे घोडे झाले तरी यांच्याच ताणाची कौतुकं करायची का? शिस्त आणि जबाबदारीबद्दल कोण बोलणार?’’

‘‘अशा पद्धतीने तोडून बोलल्यानंतर मुलं जबाबदारीनं, शिस्तशीर वागायला लागलीत का? की त्यांना अपमान वाटतोय? दुखावतायत?’’ शेखर आणि स्वप्ना गप्पच झाले.

‘‘या वयात आत्मसन्मान सर्वांत महत्त्वाचा असतो रे. मुलं चुकतात, पण सारख्या चुका दाखवल्यावर त्यांचा आत्मविश्वासही हलतो. मुलं मोबाइलवर आहेत म्हणून निवांत आहेत असं का वाटलं तुला? दरवेळी ती खेळत नसतात. साहिल मोबाइलवर नोकरी शोधत असू शकतो, अर्ज टाकत असू शकतो, सलील स्पॅनिशचे लेसन्स घेत असू शकतो.’’

दिनेशच्या सांगण्यातलं तथ्य कळत असूनही शेखरला मान्य करता येत नव्हतं. दिनेश म्हणाला, ‘‘आशीषचं बंगळूरुमधून मास्टर्स झालं, त्यानंतर तिथेच राहून तो नोकरीसाठी प्रयत्न करत होता. मी आणि साक्षी इकडे अस्वस्थ असायचो. ‘काय झालं जॉबचं?’ हा किंवा असाच आमचा फोनवरचा पहिला प्रश्न असायचा. एकदा आशीष म्हणाला, ‘बाबा, इथे मी एकटा आहे. काम नसल्याने रिकामा बसलोय. अस्वस्थ वाटल्यावर एनर्जी, आधार हवासा वाटतो म्हणून घरी फोन करतो, पण तुम्ही, ‘मिळाला का जॉब?’ एवढंच विचारता. माझी भीती उलट वाढतेच. एक सांगा, ‘माझ्यासारखं शिक्षण, पात्रता आणि कुठेही जायची तयारी असणाऱ्यासाठी, एवढ्या मोठ्या देशात फक्त ‘एक’ जॉब नसेल का? जरा शांतीत घ्या ना.’ मी भानावर आलो. आम्हाला काळजी आशीषची होती, पण त्याच्या गरजेचा, मानसिकतेचा विचार करायचा सोडून आम्ही आमच्या मनातल्या काळजीचाच बाऊ करत होतो. ‘श्रद्धा आणि सबुरी’चा अर्थ तेव्हा समजला मला.’’

‘‘थोडक्यात, आपल्या शिस्तीच्या अपेक्षांना महत्त्व नाही. पालकच चुकीचे असंच तू इकडून-तिकडून सांगतोयस.’’ शेखर चिडचिडला.

‘‘चूक-बरोबरचा मुद्दाच नाही. पालकांनी सतत आपल्याच पारंपरिक भूमिकेत राहू नये, अधूनमधून मुलांच्या जागीही जाऊन बघावं असं सांगतोय मी. उठण्या-झोपण्याच्या वेळा, घर आवरणं ही शिस्त आवश्यक आहेच, पण आपलं मुलांशी नातं दुरावण्याइतक्या या गोष्टी महत्त्वाच्या आहेत का? आपलं मूल उद्धट, खोटारडं, बिथरलेलं, बिघडलेलं म्हणावं असं आहे का? तर वागायची पद्धत बदलावी लागेल. पण तुझी मुलं प्रामाणिक, कष्टाळू आहेत. तरीही अशी का वागतायत? हा प्रश्न आहे. ती करिअरच्या एका टप्प्यावर अडकलीत. या फेजमध्ये रोजच्या शिस्तीकडे त्यांचं लक्ष नाहीय, भविष्याच्या दडपणाशी डील करणं हे आज त्यांच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे.’’ शेखर शांतपणे ऐकत होता.

‘‘तुझ्या स्वत:च्या अनुभवाशी जोडून बघ शेखर. तू वहिनींना नेहमी घरात मदत करतोस. पण मनावर ऑफिसमधला ताण जास्त असताना, रिकामा दिसलास म्हणून वहिनींनी भाजी आणायला सांगितली तरी नको वाटतं, राग येतो की नाही? मुलांचंही सध्या असंच काहीतरी होतंय हे समजून घे. तुझ्या शिस्तीच्या, अपेक्षांच्या चौकटी लवचीक करायला काय हरकत आहे? मुलांवर विश्वास ठेवून बघायला काय हरकत आहे?’’

शेखर विचारात पडलेला पाहून स्वप्ना हसत म्हणाली, ‘‘पटलं असलं तरी बोलून मान्य करणार नाहीत ते. कुठून सुरुवात करावी असा विचार करताय ना? मी सांगते. तुम्ही ज्याला ‘आचारी’ म्हणता, त्याला त्याची स्पेशल डिश ‘शाही कोफ्ता’ बनवायची फर्माईश करा. तिथून सुरुवात होईल तुमच्या मोठ्या झालेल्या मुलांशी दोस्तीला.’’

‘‘करेक्ट. मीपण येतो जेवायला.’’ दिनेशने अनुमोदन दिलं.

neelima.kirane1@gmail.com

© 2024 All Rights Reserved. Pow