मृणाल पांडे
स्पष्ट बोलण्यास न कचरणाऱ्या आणि सर्वसमावेशक अशी प्रतिमा जपलेल्या जेसिंडा आर्डन यांनी न्यूझीलँडच्या पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा कार्यकाल सुरू केला आहे. स्त्रियांमध्ये उपजत असलेला सहनशीलता आणि सहिष्णुतेचा गुण सकारात्मकरीत्या वापरत आर्डन करत असलेले राजकारण आपल्याकडील तरुण नेत्यांनी आदर्श घ्यावा असेच आहे. जागतिक पातळीवर अत्यंत संवेदनशील झालेल्या राजकीय परिस्थितीत आर्डन यांच्या शांत आणि योग्य कारणासाठी विरोधकांकडेही मैत्रीचा हात पुढे करण्याच्या राजकारणाविषयी जाणून घ्यायलाच हवेच, याशिवाय एकविसाव्या शतकातील स्त्री राजकारण्यांसाठी तयार के लेला एक मजबूत कृती आराखडा म्हणूनही त्यांच्या राजकीय कारकीर्दीकडे पाहायला हवे.
दिवंगत कार्यकर्त्यां आणि शिक्षणतज्ज्ञ अरुणा असफ अली एकदा मला म्हणाल्या होत्या, की त्यांच्या पिढीत बंधमुक्त आणि स्वच्छंदी अशी प्रतिमा असलेल्या स्त्रियाही खासगीत समाजाच्या रूढ अपेक्षांना अनुसरूनच वागत असत. राजकीय स्वातंत्र्यलढय़ात आपण आपले वडील, भाऊ किं वा पतीला साथ देण्यासाठी उतरलो आहोत, हे सांगण्यात त्या एक प्रकारचा हक्काचा आनंद मानून घेत. पुरुष आणि स्त्रियांना जे महत्त्व दिले जाते, त्यातील तफावतीबद्दल त्यांच्या
कु टुंबातच इतकी उदासीनता होती, की या स्त्रिया स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या राजकारणातही पुरुषांनी रचलेल्या उतरंडींवरूनच चालत राहिल्या, असे अरुणा यांचे मत होते. ही गोष्ट के वळ तत्कालीन भारतीय स्त्रियांबाबतच खरी होती असे नाही, हे आता लक्षात येते.
उदारमतवाद-सर्वसमावेशकतेचे यश..
गेल्या सहस्रकाच्या शेवटापर्यंत जागतिक स्तरावरच लोकशाही राजकारणातील उच्च पदे पुरुषांना घराणेशाहीद्वारे किं वा पक्षाच्या माध्यमातून वारसा हक्काने प्राप्त होत होती. विविध पिढय़ांतील स्त्रियांनी आपली एक स्वतंत्र दृष्टी आणि अजेंडा घेऊन नेतृत्व करावे, हे स्वप्न २०२० मध्ये आकारास येऊ पाहाते आहे. सलग दुसऱ्यांदा बहुमताने निवडून आलेल्या मजूर पक्षाच्या जेसिंडा के ट लॉरेल आर्डन यांची न्यूझीलँडच्या पंतप्रधान म्हणून देदीप्यमान वाटचाल पाहता हे अगदी स्पष्ट दिसून येते.
राजकारणात योग्य वेळी योग्य मार्गदर्शक भेटण्यास फार महत्त्व आहे. ही प्रक्रिया जितकी लवकर सुरू होईल तितके चांगले. आर्डन यांची ही वाटचाल खूप लवकर सुरुवात झाली. ‘इंटरनॅशनल युनियन ऑफ सोशालिस्ट यूथ’च्या अध्यक्ष म्हणून त्या जगभर प्रचंड फिरल्या. ही भ्रमंती करताना, अमेरिका, जॉर्डन, इस्त्रायल, चीन, अल्जेरिया येथील तरुण नेत्यांना भेटताना त्यांनी राजकीय शहाणपण कमावले. आर्डन यांना दोन भक्कम स्त्रियांचे मार्गदर्शन मिळाले. जेसिंडा या मजूर पक्षाच्या दीर्घकाळ सदस्य असलेल्या मेरी आर्डन यांची पुतणी. मेरी यांनीच २००८ मध्ये जेसिंडा यांची मुख्य प्रवाहातील राजकारणाशी ओळख करून दिली. न्यूझीलँडच्या तत्कालीन पंतप्रधान हेलेन क्लार्क यांच्यासाठी संशोधक म्हणून जेसिंडा काम करू लागल्या. आर्डन या क्लार्क यांनाच स्वत:च्या ‘पॉलिटिकल हिरो’ मानतात. स्वत:ची ओळख करून देताना त्या आपण सामाजिक लोकशाहीवादी, पुरोगामी, प्रजासत्ताकवादी आणि स्त्रीवादी असल्याचे सांगतात.
भारतीय राजकारणातील बहुतेक स्त्रियांनी काही अलिखित नियमांचे पालन करतच वाटचाल के ली आहे, मग त्या अगदी रोखठोक बोलणाऱ्या म्हणून का प्रसिद्ध असेनात. इंदिरा गांधी यांच्या डोक्यावरचा पदर आणि लांब बाह्य़ांचे ब्लाऊज, सुषमा स्वराज यांनी भांगात सिंदूर भरून के सांचा अंबाडा बांधणे या गोष्टींचा येथे उल्लेख करावासा वाटतो. निवडणुकीच्या रिंगणात स्त्री राजकारण्यांना नेहमी एकतर चारित्र्यहनन किं वा अति घरेलूपणा चिटकवला जाण्याचा सामना करावा लागतो. अशा संकटांपासून दूर राहाण्यासाठी या दोन नेत्यांना त्यांच्या प्रतिमेची मदत झाली.
करोना संकट स्त्री नेतृत्वाचं फलदायी कर्तृत्व
जेसिंडा आर्डन यांच्या कारकीर्दीने एकविसाव्या शतकातील नवीन राजकारणी स्त्रियांसाठी अधिक भक्कम असा आकृतिबंध वा कृती आराखडा तयार के ला आहे. पुरुष राजकारण्यांना क्वचितच जाणवणाऱ्या, परंतु सर्व तरुण स्त्रियांना कायम भेडसावणाऱ्या अनेक समस्या आर्डन यांनी कणखर राहून परतवल्या. लग्न, जोडीदाराबरोबरचे नाते आणि पालकत्व याचा राजकीय कारकीर्दीशी कसा मेळ घालणार, हा त्यातला महत्त्वाचा प्रश्न. आर्डन यांनी लग्नाशिवाय जोडीदाराबरोबर राहाण्याचा पर्याय निवडला. पंतप्रधानपदाचा कालावधी सुरू असताना गर्भवती असणाऱ्या आणि बाळाला जन्म देणाऱ्या आर्डन या दिवंगत पाकिस्तानी पंतप्रधान बेनझीर भुट्टोंनंतरच्या दुसऱ्याच पंतप्रधान. आर्डन यांच्या राजकीय निर्णयांमध्येही त्यांच्या स्वत:च्या प्रवासाचे प्रतिबिंब दिसते. त्यामुळे लोकांना त्यांच्याबद्दल सहभावना वाटते. इतर स्त्रियांना आपल्याबरोबर घेऊन पुढे जाण्यासाठी याचा त्यांना उपयोग झाला. अर्थात यात त्यांच्या आजूबाजूला काही स्त्रीवादी, लोकशाहीवादी आणि पुरोगामी पुरुषही होते. त्यांचा दणदणीत विजय याचे द्योतक आहे, की २०२० मध्ये त्यांच्या लहानशा देशातील अनेकांची (आणि अगदी भारतीयांचीही) कौटुंबिक पाश्र्वभूमी ही आर्डन यांच्यासारखीच- म्हणजे विविधतापूर्ण आहे. एकमेकांपासून पूर्णत: भिन्न असलेल्या गोष्टींबरोबर जगताना लोकांना त्यात एक निरोगी मेळ निर्माण व्हावासा वाटतो आहे.
आपण आर्डन यांच्याकडे वंशभेदापासून दूर जाऊ पाहणाऱ्या, विकसित जगाच्या प्रतिनिधी म्हणून पाहायला हवे. भारतासारख्या विकसनशील लोकशाहीतही पूर्वापार अगदी डोळे मिटून चालत आलेले जातीय गणित आता मागे पडते आहे. रोजगार, शिक्षण आणि सर्वासाठी आरोग्य सेवा हे जमिनीवरचे मुद्दे नवे नेते आणि नव्या मतदारांनी लावून धरायला हवेत, असा प्रवाह तयार होतो आहे. आर्डन यांच्याकडे पाहाताना आणखी एक गोष्ट प्रकर्षांने जाणवते, ती म्हणजे स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा कितीतरी पटींनी अधिक असलेला सहिष्णुता आणि सर्वाना आपल्याबरोबर सामावून घेण्याचा गुण. पंतप्रधानपदी निवडून आल्यानंतर आर्डन यांनी विरोधी पक्ष असलेल्या ‘ग्रीन पार्टी’समोर मैत्रीचा हा पुढे
केला. आर्डन यांना त्यांच्या संख्याबळाची गरज नव्हती, परंतु पर्यावरण रक्षणासाठीच्या लढाईत त्यांची मदत मोलाची ठरेल, हे त्यांनी ओळखले. लोकशाहीवादी, उदारमतवादी आणि स्त्रीवादी विरोधकांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करणे आणि स्त्रीविरोधी, जातीयवादी आणि सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या विरोधकांपासून दूर राहाण्याची कला आर्डन यांच्याकडून आपल्याकडच्या तरुण नेत्यांना नक्कीच शिकता येईल.
न्यूझीलंडच्या पंतप्रधान हिंदू मंदिरात नतमस्तक, घेतला छोले-पुरीच्या महाप्रसादाचा आस्वाद
विविध वंश, जाती आणि जमातींना देश म्हणून गुण्यागोविंदाने राहाता येईल असा दृष्टिकोन बाळगणाऱ्या राजकारण्यांची (मग ती स्त्री किं वा पुरुष असो) आजच्या लोकशाही राष्ट्रांना गरज आहे. अगदी निवडणुकांच्या काळातही आर्डन या पंतप्रधान म्हणून आपल्या देशाला ‘कोविड-१९’ विरोधातील लढय़ात एकसंध ठेवू शकल्या. आपल्याकडे अगदी अलीकडे (फे ब्रुवारी २०२०) भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी के लेल्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर दिल्लीत दंगल पेटल्यावर के ंद्र सरकारची त्याबाबत थंड प्रतिक्रिया होती, त्याच्या विरुद्ध प्रतिक्रिया आर्डन यांनी न्यूझीलँडमधील ख्राईस्टचर्च येथे झालेल्या मुस्लीमविरोधी हल्ल्यानंतर (मार्च २०१९) दाखवली होती. या हल्ल्यानंतर त्यांनी लगेच घटनास्थळी पोहोचून शांतता राखण्याचे आवाहन के ले होते. घटनेतील दोषी व्यक्तीवरही विनाविलंब खटला चालवून त्यास शिक्षा सुनावली गेली. यातून आर्डन यांनी लोकक्षोभाची झळ तर कमी के लीच, पण देशात एकी बळकट करण्यास त्यांनी हातभार लावला.
खुलेपणाने हिंदुत्वाच्या विरोधात मते मांडणाऱ्यांच्या, अल्पसंख्याकांच्या किं वा अगदी यंदाच्या क्रिके ट स्पर्धामध्ये वाईट खेळी करणाऱ्या खेळाडूंच्या स्त्री-नातेवाईकांना येणाऱ्या बलात्काराच्या धमक्या या फक्त पिढय़ा-पिढय़ांमधील वैचारिक संघर्षांच्या निदर्शक नसतात. त्याला त्याहून खोल अर्थ असतो. सर्वसमावेशक राष्ट्राच्या संकल्पनेस मानणाऱ्या आणि न मानणाऱ्यांमधील हा वाद असतो आणि हे लोक कोणत्याही वयाचे असू शकतात. राजकारणामध्ये या विलगतावादी (आयसोलेशनिस्ट ) मंडळींना उदारमतवादी आणि लिंगनिरपेक्ष राजकीय दृष्टिकोन असलेल्यांविषयी नेहमीच भीती आणि घृणा वाटते.
जेसिंडा पर्यावरण रक्षणाचा आग्रह धरतात. ‘‘मला डोनाल्ड ट्रंप यांच्याशी कोणतीही चर्चा करायची नाही,’’ असे त्या थेट म्हणू शकतात. त्यांचा दणदणीत विजय त्यांना असलेला विस्तृत पाठिंबा दाखवून देतो. या सगळ्यातून प्रोत्साहन घेऊन त्या प्रामाणिकपणे आपली मते मांडत आल्या आहेत, इस्त्रायल-पॅलेस्टाईन प्रश्नापासून चीनमधील ‘वीघर’ (Uyghur) अल्पसंख्याकांपर्यंतच्या विषयांवर बोलताना त्यांनी अल्पसंख्याकांच्या हक्कांना पाठिंबा दर्शवला आहे. म्यानमारमधील रोहिंग्यांच्या प्रश्नी मध्यस्थी आणि मदत करण्यासही त्यांनी तयारी दाखवली आहे.
“भारताला न्यूझीलंडच्या पंतप्रधानांसारख्या नेत्याची गरज,” काँग्रेस नेते जयराम रमेश यांचे विधान!
एकीकडे आपल्याला सहभावना, सर्वसमावेशकता आणि समतोलाचा आग्रह धरणाऱ्या स्त्री राजकारण्यांकडे दुबळ्या आणि मूर्ख किं वा जमिनीपासून तुटलेल्या म्हणून पाहायला शिकवले जाते. असे असतानाही भारतात आपल्याला असे आदर्शवादी नेतृत्व उभे राहाण्याची अपेक्षा आहे. आर्डन यांच्याबद्दलचा एक किस्सा असा, की त्या संयुक्त राष्ट्रांच्या अत्यंत महत्त्वाच्या अशा सर्वसाधारण सभेच्या वेळी आपल्या बाळाला घेऊन गेल्या होत्या, जेणेकरून त्या बाळाला ठरलेल्या वेळी दूध पाजू शकतील. बाळांचा स्तन्यपानाचा हक्क आणि मातेचे मानवी हक्क यांवर टीका करणाऱ्या सगळ्यांचे तोंड बंद करणारी ती कृती होती. स्त्रियांच्या करिअरच्या बाबतीत नकारात्मक समजल्या जाणाऱ्या या गोष्टीला त्यांनी एकदम सकारात्मक वळण दिले आणि त्यासाठी ‘आपदा से अवसर’सारखे कोणतेही घोषवाक्य त्यांना वापरावे लागले नाही.
‘आपदा’ म्हणजे काय, हे शेवटी आपणच ठरवायचे असते.
(लेखिका या ज्येष्ठ पत्रकार आणि ‘प्रसारभारती’च्या माजी अध्यक्ष आहेत. मूळ लेख ‘इंडियन एक्स्प्रेस’ मध्ये प्रसिद्ध झाला आहे.)
भाषांतर – संपदा सोवनी