आपण रोज वापरत असलेले तंत्रज्ञान आपल्या रोजच्या आयुष्यात बा सुखसोयी निश्चितच निर्माण करते. पण आतल्या शांती, समाधान, आनंद याकरता एखादे तंत्रज्ञान आहे का? हो, पतंजली मुनींनी मनाच्या आरोग्याकरता योगशास्त्र केव्हाच सगळ्यांना उपलब्ध करून दिलेले आहे, आणि तेही खऱ्या अर्थाने मोफत! तसंच सूर्यप्रकाश मोफत, पौर्णिमेचं शीतल चांदणं मोफत, आजूबाजूच्या निसर्गाचं सौंदर्य मोफत, तसाच आनंदही मोफत आहे.. तणावपूर्ण तंत्रज्ञानावर उतारा आहे तो योगशास्त्राचा.
एके काळी दोन अनोळखी माणसं एकमेकांना भेटली की हवा-पाण्याच्या किंवा पीक-पाण्याच्या चौकशा एकमेकांकडे होत असत. कारण शेतातलं पीक आणि पावसाचं पाणी ही माणसाची प्राथमिक गरज असायची. आता दोन माणसं एकमेकांना भेटली की ‘तुझं मोबाइलचं मॉडेल कुठलं किंवा नेटवर्क थ्रीजी का फोरजी?’ अशासारख्या प्रश्नाने सुरुवात होते. सध्या टेक्नॉलॉजी म्हणजेच तंत्रज्ञान हा जास्तीत जास्त वापरला जाणारा शब्द झालाय आणि ‘इंटरनेट आणि स्मार्टफोन वापरता येणे’ म्हणजे साक्षरता अशी व्याख्या झाली आहे. जे या बाबतीत खूप प्रवीण असतात आणि प्रत्येक गोष्ट ही तंत्रज्ञानाच्या वापरातूनच व्हायला हवी असा आग्रह धरतात अशांना टेक्नोसॅव्ही म्हणतात. साधा २ गुणिले २ असा हिशेब करायचा असेल तरीही कुठल्या तरी मोबाइल अॅपचा शोध घेतला जातो.
तसं बघितलं तर तंत्रज्ञान ही कल्पना अजिबात नवी नाही. अगदी अश्मयुगातील मानवही त्याचं रोजचं जगणं सुस करण्याकरिता हत्यारं, अवजारं किंवा ज्याला आपण आज टूल्स म्हणतो ती बनवतच होता. जसजसा मानव बुद्धीचा वापर करून प्रगत होत गेला तसतशी नवीन, कल्पक आणि अधिक कार्यक्षम साधनं तो बनवत गेला. या प्रवासात प्रथम जीवनावश्यक गरजांकडे त्याने लक्ष दिले व शेती, पाणी, घर, वस्त्र इत्यादींच्या गरजा पुरविणारे तंत्रज्ञान निर्माण झाले. माणसाच्या रोजच्या जीवनातले शारीरिक कष्ट कमी झाले. माणूस ‘केवळ जगणे’ यापलीकडे बघू शकू लागला. इतर प्राण्यांपेक्षा प्रकर्षांने वेगळा जाणवू लागला. इतका, की पूर्वी निसर्गाचा भाग म्हणून जगणाऱ्या माणसाच्या जीवनाचा तंत्रज्ञान हा एक अविभाज्य भाग झाला. इतकी त्याची सवय झाली. माणसाच्या रोजच्या जीवनातले शारीरिक कष्ट अजून कमी झाले. (त्याचे काही परिणाम आज आपण पाहतोच आहोत.) शारीरिक पातळीवरच्या गरजा भागल्यामुळे आता माणसाला मनाच्या गरजा भागविण्याची संधी प्राप्त झाली. शरीराला काही नैसर्गिक मर्यादा आहेत. पूर्वी त्याचं जीवन पंचक्रोशीच्या सीमेपाशी संपत होतं. पण मनाचं तसं नाही. त्याला दूरच्या ठिकाणी जाण्याची, पाहण्याची, ऐकण्याची इच्छा झाली. रस्ते, वाहतुकीची साधनं निर्माण झाली. मोटार, रेल्वे यांनी लांबची गावं (वेळेच्या हिशेबात) जवळ आली. दळणवळण वाढलं तशी सांस्कृतिक देवाणघेवाण वाढली, अनुभवांच्या, विचारांच्या कक्षा वाढत गेल्या. मेकॅनिकल टेक्नॉलॉजीचा वेग कमी पडू लागला. टेक्नॉलॉजीने आता इलेक्ट्रॉनिक अवतार घेतला. फोन, रेडिओ, टीव्ही, सॅटेलाईट, मोबाइल, संगणक, इंटरनेट, लॅपटॉप, स्मार्टफोन..मनाची भूकच भागेना असं होऊ लागलं.
खरं म्हणजे तंत्रज्ञान हे प्रथमपासूनच ‘साधन’ होते. ते कधीही ‘साध्य’ नव्हते व नसायला हवे. पण ते आज आपण विसरलो आहोत की काय अशी शंका येते. तंत्रज्ञान वापरण्याचा मंत्र आहे ‘गरजेपुरतेच आणि गरजेएवढेच’ (अस्र्स्र्१स्र्१्रं३ी ळीूँल्ल’ॠ८). इलेक्ट्रिसिटीचं (वीज) उदाहरण घ्या. किती पॉवरफुल आणि किती हरकामी आणि २४ तास कामाला हजर. पण म्हणून आपण घरातले दिवे किंवा पंखे २४ तास चालू ठेवत नाही. दिव्याचं काम अंधारात प्रकाश देणे आहे. सकाळी सूर्यप्रकाश आला की दिवे बंद करतो. तसंच मोटार किंवा स्कूटरचं; काम झालं की इंजिन बंद करून गॅरेजमध्ये त्याची रवानगी. पण इलेक्ट्रॉनिक आणि इंटरनेट तंत्रज्ञानाचा मात्र अतिरेक होताना दिसतोय. कोणतीही गोष्ट सहज किंवा स्वस्त मिळाली की त्याची आपल्याला किंमत वाटत नाही. बघा ना, हवेतला प्राणवायू मोफत आहे (अजून तरी). तो खरं तर जाणीवपूर्वक वापरायला हवा. असं असूनसुद्धा आपण किती वेळा दीर्घश्वसन (प्राणायाम) करतो आणि आपलं आरोग्य राखायला मदत करतो?
आपल्याला माहीत आहे की मनाची आणि विचारांची स्वाभाविक ओढ बाहेर धावण्याची आहे. हे ओळखल्यामुळे इंटरनेट तंत्रज्ञान मनाची शिकार सहज करते. सध्या वर्तमानपत्रात सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे आणि बऱ्याच वेळा चुकीच्या वापरामुळे निर्माण झालेल्या शारीरिक आणि मानसिक व्याधी/रोग यांच्याबद्दल खूप वाचायला आणि ऐकायला मिळतं. कारण तंत्रज्ञान हे साधन म्हणून न वापरता ते साध्य म्हणून वापरलं जातंय. माझ्या ओळखीचे एक गृहस्थ आहेत. ते मोठय़ा आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये सरव्यवस्थापक म्हणून काम करतात. ते अजूनही आठ वर्षांपूर्वी घेतलेला मोबाइल फोन वापरतात. कित्येक लोक त्यांची चेष्टाही करतात. घरातलेही सर्वजण, विशेषत: त्यांची मुले, अत्याधुनिक फोन घ्या म्हणून मागे लागतात. पण ते म्हणतात, ‘माझ्या दृष्टीने हाच अत्याधुनिक फोन आहे. कारण माझं आजचं काम तो करतो. कॉल करणे/घेणे आणि मेसेजेस पाठवणे/घेणे हे माझं साध्य आहे आणि ते काम माझा हा मोबाइल चोख करतो’. आता बोला! साधन वापरणारा हा त्या साधनापेक्षा जास्त स्मार्ट असावा लागतो. नाही तर फिरवून आणायला निघालेल्या, पाळलेल्या कुत्र्याने मालकालाच फरफटत ओढत नेल्यासारखे होते.
तीन वर्षांच्या मुलाच्या हातात अभिमानाने आणि कौतुकाने स्मार्टफोन देणाऱ्या पालकांच्या हे लक्षात येत नसावं, की पुढच्या आयुष्यात त्या मुलाला शारीरिक, मानसिक किंवा बौद्धिक अपंगत्व येऊ शकेल. इंग्रजीत एक म्हण आहे, ‘दोज् हू लिव्ह बाय द स्वोर्ड, श्ॉल पेरिश बाय द स्वोर्ड’; म्हणजे जो तलवारीवर जगतो त्याचा तलवारीनेच घात होतो. तंत्रज्ञान हेही एक प्रकारची तलवार आहे. जरुरीपुरतीच ती बाहेर काढायची आणि काम झाल्यानंतर ती म्यानात ठेवायची. घरातल्या लहान मुलांना आपण नेहमी समजावत असतो, ‘आगीला हात लावू नकोस’, ‘चाकू-सुरीशी खेळू नकोस’, ‘विजेच्या बटनांशी चाळा करू नकोस’. यामागचा उद्देश चांगलाच असतो. म्हणजे, ज्यांना आग, सुरीची धार, इलेक्ट्रिक करंट या गोष्टींची नीट माहिती नाही, अशा लहान मुलांना कोणतीही (शारीरिक) इजा होऊ नये हाच उद्देश असतो. मोबाइल, स्मार्टफोन किंवा इंटरनेट ही तलवारीपेक्षाही धारदार वस्तू आहे. तिच्यापासून होणारी इजा काही प्रमाणात शरीरावर होत असते, पण जास्त प्रमाणात मनावर आणि बुद्धीवर होत असते. ती वरवर पाहता दिसत नाही म्हणून तिची धार आपल्याला कळत नाही.
जी गोष्ट फोनची तशीच काहीशी टीव्ही आणि संगणकाची. आपण डोळ्यांनी जे पाहतो, कानांनी जे ऐकतो तो त्या इंद्रियांचा आहार असतो. त्याचा मनावर, बुद्धीवर परिणाम होत असतो. या आहाराच्या नियंत्रणाबद्दल किंवा पौष्टिकतेबद्दल आपण फारसा विचार करताना दिसत नाही. टीव्हीवर दिसणाऱ्या मालिकांमधून स्वार्थी, मत्सरी, लोभी माणसांचा सतत वावर हा मनावर परिणाम करणारा असतो. गुगलमधून टनावारी ‘इन्फर्मेशन’चा आहार घेऊनही बुद्धीचे किती पोषण होते कुणास ठाऊक. आमच्या ओळखीचे एक एम. बी.ए.ला चांगल्या इन्स्टिटय़ूटमध्ये, परदेशी अनेक वर्षे राहून आलेले, प्रोफेसर सांगत होते की बी.ई. ला पहिल्या वर्गात पास होऊनही विद्यार्थ्यांना पुस्तकाबाहेरचा एखादा प्रश्न टाकला तर त्यावर स्वतंत्रपणे विचार करणे अवघड जाते. कारण बरेचसे प्रकल्प ‘कॉपी-पेस्ट टेक्नोलॉजी’ वापरून केलेले असतात.
आता प्रश्न पडतो की तंत्रज्ञान वापरायचे की नाही? हो, नक्कीच वापरायचे, वापरायलाच हवे. सामाजिक पातळीवर भारतासारख्या देशात तर तंत्रज्ञान अनिवार्य आहे. सरकारी कार्यक्रम/सेवा, बँका, रेल्वे, बस सेवा, शिक्षण, आरोग्य इत्यादी अनेक ठिकाणी तंत्रज्ञान मोलाचे काम करत आहे, विशेषत: वैद्यकीय क्षेत्रात. याचा सर्वजण लाभ घेत आहेतच. परंतु वैयक्तिक पातळीवर मात्र बऱ्याच वेळा गरजेपेक्षा जास्त तंत्रज्ञान हीच साध्य वस्तू झाली आहे. आणि ते आपल्या शरीराला, मनाला, बुद्धीला, आरोग्याला आणि (पर्यायाने) आनंदाला घातक ठरू शकते. आपल्याला माहिती असलेल्या अनेक थोर माणसांनी १०० वर्षांपूर्वी आजचे कोणतेही तंत्रज्ञान उपलब्ध नसताना जी अफाट कामे केली त्यात स्वामी विवेकानंद, महात्मा फुले, महर्षी कर्वे अशी काही नावं सहज आठवतात. यावरून एक ध्यानात येऊ शकते की मीडियापेक्षा ‘मेसेज’ महत्त्वाचा होता.
आपण रोज वापरत असलेले तंत्रज्ञान आपल्या रोजच्या आयुष्यात बाह्य सुखसोयी निश्चितच निर्माण करते. मग कोणाच्याही मनात एक प्रश्न सहजच येईल की माझ्या आतल्या शांती, समाधान, आनंद याकरता एखादे तंत्रज्ञान आहे का? आणि ती खरोखर अस्तित्वात असेल तर ती मला कुठे आणि कशी मिळू शकेल आणि ती कशी वापरायची हे कोण सांगू शकेल? एक खुशखबर आहे. पतंजली मुनींनी मनाच्या आरोग्याकरता योगशास्त्र केव्हाच सगळ्यांना उपलब्ध करून दिलेले आहे, आणि तेही खऱ्या अर्थाने मोफत! (बाजारात कोणतीही गोष्ट खऱ्या अर्थाने मोफत नसतानाही आपण त्यावर विश्वास ठेवतोच की!) पण याचा उपयोग करून घ्यायचा की नाही ते आपण ठरवायचं. शांती-समाधानाचे तंत्रज्ञान म्हणाल तर भगवद्गीतेतही आहे. प्रत्येक अध्यायाच्या अखेरीस ‘इति श्रीमत् भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे..’ असे म्हटलेले आहे. स्वामी चिन्मयानंदांच्या मते ही ब्रह्मविद्या म्हणजेच विज्ञान आणि हे योगशास्त्र म्हणजे ‘टेक्नॉलॉजी ऑफ स्ट्रेस फ्री लाइफस्टाइल’. पुन्हा हे सगळं मोफत. जसा सूर्यप्रकाश मोफत, पौर्णिमेचं शीतल चांदणं मोफत, आजूबाजूच्या निसर्गाचं सौंदर्य मोफत, तसाच आनंदही मोफत आहे. इंग्रजीत म्हणतात, ‘द बेस्ट थिंग्स इन लाईफ आर फ्री!’ जीवनातल्या अमूल्य गोष्टी विनामूल्य असतात. तेव्हा आपण टेक्नोसॅव्ही आहोतच; त्याचबरोबर आनंदसॅव्हीही होऊ या.
health.myright@gmail.com