१९५०च्या दशकात अमेरिकेत हृदयविकाराचं प्रमाण खूप वाढलं होतं. पण, त्याच वेळी तिथल्याच रोझेटो गावातील लोकांचं, त्यांच्या राहणीमानाचं, जीवनाचं बारीक निरीक्षण केलं तेव्हा आढळून आलं की रोझेटो गावातून अगदी क्वचितच एखादा रुग्ण दवाखान्यात येतो. हा रुग्णही पासष्टच्या वरच्या वयाचाच असतो. हृदयविकाराने पीडित तर एकही रुग्ण नसतो. इथले लोक कोणताही रोग होऊन अचानक मृत्यू पावत नाहीत तर फक्त वृद्धापकाळाने त्यांचं निधन होतं.. काय होतं या रोझेटोचं गूढ?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
माल्कम ग्लॅड्वेल या लेखकाचं ‘आऊटलायर्स’ नावाचं जगावेगळ्या यशोगाथा सांगणारं एक प्रसिद्ध पुस्तक आहे. या पुस्तकाच्या ‘द रोझेटो मिस्टरी’ या प्रस्तावनेनं माझं लक्ष वेधून घेतलं. काय आहे ही मिस्टरी (गूढकथा)? ही कथा आहे रोझेटो नावाच्या एका छोटय़ा गावाची. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीची.
बाराशेच्या आसपास वस्ती असलेलं हे गाव इटलीमधील रोम शहराच्या जवळ एका टेकडीवर वसलेलं होतं. इथले सर्व पुरुष खाणकामगार होते आणि स्त्रिया घरकाम, शेती सांभाळायच्या. टेकडीवरच या लोकांची थोडी शेती होती. तिथून दररोज ताजी फळे, भाज्या निघायच्या. द्राक्ष-बागही होती. त्यातून रेड वाइन तयार व्हायची. थोडक्यात म्हणजे अगदी शांत जीवन चाललं होतं. आर्थिक सुबत्ता वगैरे शब्द त्यांच्या शब्दकोषातही नव्हते. परंतु १८८०च्या सुमारास एक चमत्कार घडला. त्या लोकांना असं कळलं की पृथ्वीवर असा एक देश आहे की तिथे गेल्यावर जीवनमान सुधारतं. पण त्या देशात जाण्यासाठी समुद्र पार करावा लागतो. या देशाचं नाव होतं अमेरिका.
रोझेटोतल्या काही लोकांनी ही संधी स्वीकारायचं ठरवलं आणि ते न्यू यॉर्कला आले. नंतर ते न्यू यॉर्कच्या पश्चिमेस असलेल्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील बँगॉर या गावी गेले. कारण बँगॉरजवळ खाणी होत्या. हळूहळू करत १८९४ पर्यंत रोझेटोचे सगळे रहिवासी बँगॉरमध्ये स्थलांतरित झाले. खाणीच्या जवळच त्यांना एक टेकडी दिसली. पैसे साठवून त्यांनी हळूहळू त्या टेकडीवरची जागा घेतली व काही काळाने सर्व टेकडीच त्यांच्या मालकीची झाली. गावाचं नावही त्यांनी रोझेटोच ठेवलं आणि त्यांचं जीवन (इटली ऐवजी अमेरिकेत) पूर्वीप्रमाणेच सुरू झालं. बरेच वर्षे हे सर्व लोक गुण्यागोविंदाने राहत होते आणि जगाला त्याचा पत्ताही नव्हता; परंतु १९५० मध्ये एक घटना घडली आणि रोझेटो या गावाची नोंद सर्व अमेरिकेला (आणि जगालासुद्धा) घ्यावी लागली.
त्याचं असं झालं..
डॉक्टर स्टुअर्ट वूल्फ ओक्लाहोमा विद्यापीठात शिकवत होता. उन्हाळ्याच्या सुट्टीत तो पेनसिल्व्हेनिया येथील त्याच्या शेतावर येऊन राहत असे. हे त्याचं शेत रोझेटो आणि बँगॉरच्या जवळच होतं. एकदा डॉक्टर वूल्फला रोझेटोजवळच्या एका गावात व्याख्यानासाठी बोलावण्यात आलं. व्याख्यानानंतर तिथल्या एका स्थानिक डॉक्टरशी बोलताना डॉक्टर वूल्फला असं समजलं की त्या स्थानिक डॉक्टरकडे त्या प्रदेशातील सर्व वयाचे रुग्ण येतात परंतु रोझेटो गावातून मात्र अगदी क्वचितच एखादा रुग्ण येतो. हा रुग्णही पासष्टच्या वरच्या वयाचाच असतो. हृदय विकाराने पीडित तर एकही रुग्ण नसतो. हे ऐकून डॉक्टर वूल्फला खूपच आश्चर्य वाटलं, याचं कारण म्हणजे १९५०च्या दशकात अमेरिकेत हृदयविकाराचं प्रमाण खूप वाढलं होतं. त्या वेळी कोलेस्टेरॉल कमी करण्याची किंवा आताच्यासारखी हृदयविकाराची औषधे उपलब्ध झाली नव्हती. म्हणून डॉक्टर वूल्फने रोझेटोतल्या लोकांच्या आरोग्यावर संशोधन करायचं ठरवलं. त्यासाठी त्यानं रोझेटो गावाच्या जवळ तंबू ठोकले आणि शास्त्रीय संशोधनाला लागणारी सर्व सामग्री घेऊन संशोधकांची एक टीम आणली आणि रोझेटोतील लोकांची वैद्यकीय चाचणी केली. याशिवाय १९५५ ते १९६५ या काळातले सगळे मृत्यूचे दाखले तपासले. निष्कर्ष आश्चर्यकारक होता. पंचावन्नच्या खालच्या वयाच्या एकाही व्यक्तीमध्ये हृदयविकाराची लक्षणे नव्हती. पासष्टनंतरच्या व्यक्तींमध्येही अमेरिकेतील इतर ठिकाणापेक्षा पस्तीस टक्क्यांनी हृदयविकार कमी होता. मग डॉक्टर वूल्फने रोझेटोतील लोकांचा आहार तपासला. त्यात त्याला काय दिसलं? तर हे लोक प्राण्यापासून तयार होणाऱ्या (घातक) चरबीचा (लार्ड) जेवणात उपयोग करतात. तसंच पिझ्झासाठीसुद्धा जाड बेस वापरतात आणि त्यावर सॉसेज, पेपरोनी, हॅम वगैरेसारखे खूपच चरबीयुक्त पदार्थ वापरतात. म्हणजेच हे लोक इतर अमेरिकन लोकांप्रमाणेच चरबीने भरलेले (आणि हृदयविकाराला पूरक) अन्न खात असत. त्यांच्यामध्ये धूम्रपानाचे प्रमाणही खूप होते आणि काही जण तर अतिस्थूलही होते. असं असूनही या लोकांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण अगदीच नगण्य होतं. हे गूढ काही डॉक्टर वूल्फला उकलेना. परंतु त्याला एक गोष्ट मात्र जाणवली; ती म्हणजे हे लोक इतर कोणतीही मादकद्रव्ये किंवा शीतपेये न घेता फक्त घरी बनवलेलीच रेड वाइन घेत असत. तसंच त्यांच्यामध्ये आत्महत्या नव्हत्या, गुन्हेगारीही नव्हती. हे सर्व पाहून डॉक्टर वूल्फ बुचकळ्यात पडले. त्यांनी खूप विचार केला कारण मेडिकल शास्त्रात या प्रश्नाचं उत्तर त्यांना सापडेना. म्हणून डॉक्टर वूल्फने अजून व्यापक दृष्टीने या प्रश्नाकडे बघायचे ठरवले व जॉन ब्रून या समाजशास्त्रज्ञाची नेमणूक केली. ब्रूनने रोझेटोतल्या लोकांचं, निरीक्षण केलं आणि त्याला आढळून आलं की इथले लोक कोणताही रोग होऊन अचानक मृत्यू पावत नाहीत तर वृद्धापकाळाने त्यांचं निधन होतं. याचं स्पष्टीकरण देताना जॉन ब्रून म्हणतात की, ‘रोझेटोतले सर्व लोक एका कुटुंबाप्रमाणे राहतात. आपले प्रश्न सगळ्यांसमोर मांडून ‘मोकळे’ होतात. श्रीमंत लोक संपत्तीची उधळण किंवा ओंगळवाणे प्रदर्शन करत नाहीत. बहुतेक घरात कमीतकमी तीन पिढय़ा असतात आणि आजी-आजोबांना, आई-वडिलांना आदराने वागविलं जातं. गावातील सर्व जण एकाच वेळी चर्चमध्ये एकत्र जातात आणि एकत्रितपणे शांतीचा अनुभव घेतात. तसंच सर्व जण एकमेकांना सतत मदत करतात. कोणालाही एकटं पडू दिलं जात नाही. या सर्वामुळे त्या गावात एकजुटीचे वातावरण असते आणि हे वातावरण त्यांचे एखाद्या कवचाप्रमाणे आधुनिक जगातल्या ताण-तणावापासून रक्षण करते. म्हणूनच हे रोझेटन्स (रोझेटोतील रहिवासी) हृदयविकारच काय पण इतर कोणत्याही रोगाने पीडित नसून, निसर्गनियमाप्रमाणेच म्हणजे केवळ वृद्धापकाळामुळे निधन पावतात.’ ब्रूनचे हे रोझेटोचे गूढ उकलणारे प्रतिपादन ऐकून डॉक्टर वूल्फ चाटच पडला. तर ही झाली रोझेटोची गूढकथा..
मला ही कथा गूढकथा न वाटता एखाद्या आरशासारखी वाटते. आरसा आपलं प्रतिबिंब दाखवतो ना? अगदी तस्सं. आपल्याकडेही (भारतात) तीस पस्तीस वर्षांपूर्वीपर्यंत त्या वेळच्या रोझेटोसारखं वातावरण असायचं. ‘असायचं’ हा शब्द भूतकाळ दर्शवितो (अर्थात आजही राळेगणसिद्धी, हिवरे बाजार यांसारखी गावं आहेत पण हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी). त्या वेळी घरं छोटी आणि जवळजवळ असायची. त्यामुळे कळत-नकळत एकेकटं राहण्याऐवजी समूहात राहणं घडायचं. एकमेकांचे मित्र, नातेवाईक हेही आपलेच वाटायचे. अडीअडचणीला मदत मागावी लागत नसे.. ती तर होतच असे. शहरातही, वाडय़ामध्ये किंवा चाळीमध्ये अशीच समूह जीवनपद्धती असे. एक उदाहरणच घेऊ या. उन्हाळ्यात पापड एकत्र लाटले जायचे. आजूबाजूच्या बिऱ्हाडामधील बायका आपापले पोळपाट-लाटणं घेऊन यायच्या, एकत्र पीठ मळायच्या आणि एकदिलाने गप्पागोष्टी करत पापड लाटायच्या. लहान मुलं ते पापड उन्हात नेऊन वाळत टाकत. त्यांच्यावरही या ‘समूह’ जीवनपद्धतीचा संस्कार आपोआप होत असे. समूहामध्ये एकप्रकारची सुरक्षितता असते. आरोग्याकरिता आणि आनंदाकरिता ही भावना फार महत्त्वाची असते. वृद्धांचा अनुभव आणि आश्वासकता, तरुणांची धडाडी आणि लहान मुलांचा उत्साह यामुळे समूहातील कोणत्याही घटनेचा, कार्याचा ताण न होता आनंद सोहळा होत असे. म्हणून तीस-चाळीस वर्षांपूर्वीपर्यंत निधन वार्ता ही मुख्यत: आजी-आजोबा, पणजोबा-पणजीची असायची आणि ‘वृद्धापकाळाने देवाज्ञा’ हेच त्याचं मुख्य ‘डायग्नोसिस’ असायचं.
..परंतु आजचं चित्र काय सांगतं?
आजच्या स्पेशलायझेशनच्या संकल्पनेमुळे प्रत्येक गोष्ट विभागून बघायची सहजप्रवृत्ती बनली आहे. त्यामुळे एखाद्याला काही आरोग्यविषयक समस्या असेल तर प्रथम समूहातून व्यक्ती स्वतंत्रपणे बघितली जाते व त्याही पुढे व्यक्तीतून रोग स्वतंत्रपणे बघितला जातो. लेखात वर म्हटल्याप्रमाणे मला मात्र रोझेटो गावाची गोष्ट आरशाप्रमाणे वाटते. कारण ती आपल्याला अंतर्मुख करते. आपल्याला आयुष्याकडे समग्रपणे पाहायला शिकवते. समूहजीवनाचे महत्त्व शिकवते. आजकाल समूहाच्या ऐवजी सोशल मीडियावर अदृश्य ‘ग्रुप्स’ असतात. त्यामध्ये एकत्र येऊन केवळ तात्पुरते मनोरंजन एवढेच उद्दिष्ट असते. हे तर चांगलेच आहे; परंतु प्रत्येक जण आपापल्या सोयीने त्या ‘चावडीवर’ जातो आणि आपले उद्दिष्ट संपले की, ग्रुपशी संपर्क संपतो. पण समूहाचं तसं नसतं. समूह जिवंत असतो. त्याची मानसिकता वेगळी असते. सुख आणि दु:ख दोन्हीही एकत्र शेअर होतात म्हणून तिथे आनंदाचा गुणाकार होतो आणि दु:खाचा भागाकार होतो. ‘प्रायव्हसी’ आणि ‘माय स्पेस’ यांच्या अति हव्यासापायी आपण समूहापासून तुटत तर चाललो नाही ना? आपण ‘स्व-तंत्र’ झालो, श्रीमंतही झालो पण आरोग्यवान आणि सुखी झालो का?
ता.क. : दुर्दैवाने काळाच्या ओघात साधारणत: १९६५ नंतर रोझेटोचं वर वर्णिलेलं चित्र बदलायला लागलं. नवीन पिढीने परंपरा सोडून दिली. (म्हणजे एकमेकांपासून लांब, जीवनात संपत्तीचे अवास्तव महत्त्व, वेगळं राहणं इत्यादी.) एका पिढीतच त्याचे परिणाम दिसायला लागले. १९९२ मध्ये रोझेटो गावाची पुन्हा पाहणी झाली. त्याचे (दु:खद) निष्कर्ष ‘अमेरिकन जर्नल ऑफ पब्लिक हेल्थ’ने प्रसिद्ध केले रोझेटन्स इतर अमेरिकन लोकांप्रमाणेच हृदयविकाराचे शिकार झाले होते. अमेरिकन/पाश्चिमात्य जीवनपद्धती आणि हृदयविकार यांचे नाते अधोरेखित झाले आणि ‘मॉडर्न लाइफस्टाइल’ केवढय़ाला पडते याची आठवण करून दिली!
health.myright@gmail.com
अंजली श्रोत्रिय