‘म्हणजे कसं?’ मातोश्रींना खटकलंच. ‘उगीच फालतू चौकशा करू नकोस. विचारपूसही अगदी वरवरची कर. फार बोलतेस तू.’
‘हो का? येणारच नाही बाहेर. मग झालं?’. शब्द दुरावा निर्माण करतात. पण नीट वागल्याने त्यांचीच प्रतिमा चांगली राहणार असते ना, मग नको सांगायला? ‘जरा नीट वाग.’
मूल पाच-सहा वर्षांचं होईपर्यंत फारसं कळतं नसतं. कसंही वागलं तरी कौतुकच होतं, चिमुरडय़ाच्याही लक्षात येतात आपले लाड. पुढची पाच वष्रे दंगाधोपा, मस्ती करीत भराभर सरकतात. चालायचंच, अशीच त्रास देतात सगळी. बाल्य पुसट होत जातं. ‘समजतं, की नाही समजत’ असा संभ्रमाचा युवाकाळ. ‘मला घरातले कोणी रागवत नाही, हवे ते मिळवायचं कसं ते मला नक्की समजलं.’ इतकी जाण आलेली असते. हेकटपणा शिगेला जातो, खोडय़ांची जात बदलते. घरातले म्हणतात, ‘आत्ताशी कुठे समजायला लागलं, वागेल नीट, म्हणून सोडून दिलं जातं. हा हा म्हणता, तारुण्याची धुंदी चढू पाहते. गद्धेपंचविशीत जोरात धावते गाडी, वेडीवाकडी, भरधाव कुठेही कशीही. स्वभावाचे एकेक पलू घट्ट झालेले जाणवतात. घरातल्यांना खटकलं, तरी कोणी स्पष्टपणे वाच्यता करायला धजतच नाही. सक्तीचं लादणं होतं. आईबाबा आपापसात हळूच म्हणतात, ‘‘किती विचित्र वागतो/वागते. कसं सांगायचं? आधी नाही सांगितलं काही, आता उशीर झाला? कसा बदलणार आता स्वभाव? जरा नीट वागेल तर शपथ.’
काहीतरी नक्कीच चुकले एव्हढे खरं. अशी चूक होऊ नये, मुलांवर वाईट वेळ यायला नको म्हणून आईवडील, जवळचे, घरातले सारखे सांगत असतात, ‘जरा नीट वाग’. लहानपणापासून सांगत राहिलं म्हणजे मुलांना त्यात काही तथ्य आहे याची जाण येते. कधीतरी त्यानुसार केलेला प्रयोग शिक्षक बनतो. एखाद्या गोष्टीत निर्णय घेताना आईवडिलांना विश्वासात घेतलं जातं. त्यांच्या मतांचा आदर केला जातो. जबाबदार व्यक्तिमत्त्व असेच घडत जाते. माणूस घडविण्याच्या प्रक्रियेमधील महत्त्वाची पायरी असते, ‘जरा नीट वाग’.
नीट आठवा हे दृश्य. रस्त्यांनी जाता-येता सगळ्यांनी टिपलेले. गळणारा नळ, त्यातून सतत टीप टीप पडणारे पाण्याचे थेंब, खाली एक दगड. एकाच जागी थेंब पडल्याने दगडाला पडत जातो खड्डा. थेंबाऐवजी जर एकदम बादलीभर पाणी दगडावर ओतले तर, लगेच वाहून जाणार, दगड राहणार कोरडा. पाणी पडलं, वाहून गेलं, त्यात काय? अर्थ काय घ्यायचा यातून? एखादी चांगली गोष्ट नियमितपणे सातत्याने केली, बोलली, सांगितली, करवून घेतली, म्हणजे लक्षात राहते. थेंबथेंब पडणाऱ्या पाण्याने दगडाला खड्डा पडला. आपण तर माणूस, हाडामासांचा, भावभावनांचा. मग आपल्यावर परिणाम झाल्याशिवाय थोडेच राहणार? मग नित्यनेमाने केलेल्या संस्कारांची रुजवात होणारच. कोवळ्या वयात मन संस्कारक्षम असताना िशपण केली गेली तर स्वीकार होतो मूल्यांचा आतपर्यंत. घट्ट रुतून बसतात खोलवर. चुकूनमाकून काही वेगळं घडलं तर पटकन मशागत करता येते अशा मनाची. पण, एकदम मोठा झाल्यावर दिलेलं लेक्चर म्हणजे बादलीभर पाणी. पडलं, गेलं वाहून. म्हणून, नको का सावरायला स्वत:ला, आपल्या मुलांना, फक्त आपल्याच नाही तर आजूबाजूच्या सगळ्यांना.
काहीजणांना ‘जरा नीट वाग’ची कॅसेट नको असते. इकडून आदळली, तिकडून गेली बाहेर, विरलीसुद्धा हवेत. एकदा सुरेखा अशीच चिडली आईवर, ‘सारखं काय नीट वाग, नीट वाग. मी वाईट वागते का? किती बडबड सारखी. मला कळतं आता. मोठी झालेय आता मी.’ तरी आई जातेच मध्ये मध्ये. आईच ती. शांतपणे समजावणीच्या सुरात, वेगळ्या धाटणीने म्हणायचे तेच िबबवत राहते. सुरेखाला जाणवते आईची काळजी. तिच्याकडून स्वत:चे वागणे तपासले जाते. मुलांना नुसता जन्म देऊन भागत नाही. योग्य आकार द्यायचा असतो जीवनाला.
सळसळत्या तारुण्यात डोस पचत नाहीत. थोडं अनुभवाचं पारडं जड झाल्यावर आठवतात आईवडिलांचे शब्द. ‘‘ऐकायला हवं होतं मी बाबांचं. नीट सांभाळून घे म्हणाले होते.’’
‘जपून गं पोरी, काळजी लागून राहते जिवाला. नीट रहा,’ आईचा ओथंबलेला स्वर, काठोकाठ भरलेले डोळे. आठवलं तरी, कासावीस होतो जीव. एकटेपण खायला उठते. दडपणाखाली जगायला सुरुवात होते. क्वचित आईजवळ मोकळं झाल्यावर बरं वाटतं. तरुणाई पटकन जायला धजावत नाही, कारण त्यांनी ऐकलेलं नसतं. कसं घेतलं जाईल ही साशंकता अडवते. अशा वेळी धाव घ्यावी घरी. इथे घरही उबदार विश्वासाचे हवे. आई-वडिलांची वागणूक पाहून मुलं वागतात. चूक सांगितली, तर तिचा पोत, परिणाम, याचा सारासारविचार होईल, आधार मिळेल, अशी खात्री लागते मुलांना. विचारावं आईबाबांना,
‘‘काय करू आता?’’
सांगतील, ‘‘आता तरी नीट वाग जरा.’’
कोण कसं वागतं? याची नोंद आजूबाजूचे घेत असतात. टिंगलटवाळी करून धम्माल करण्यात मज्जा चाखायला मिळते टग्यांना. वागण्याचा पाठपुरावा करणारे जवळचे हितचिंतक, नातेवाईक, मित्रमत्रिणी असतात. सांगत राहतात सारखे, ‘नीट वाग जरा. नसेना का व्याख्या ‘नीट’ या शब्दाची, पण शब्दांची पुनरावृती सावरून घेते. प्रत्येकाची परिस्थिती, वेळ, विचार, संस्कार, क्षमता यातून तयार होते नीट वागण्याची चौकट.’ दर वेळी चौकट तोडून धावायचं नसतं. चौकाटीबद्ध असलं तरीही सुखाचं, संस्कारित आयुष्य इथेच घडतं. चौकटीत घडी विस्काटायची शक्यता कमी असते. ‘नीट वागणं’ एखादा नियम किंवा सिद्धांत नाही की अगदी त्यानुसारचं व्हायला हवं सारं काही. हे एक वर्तनाचे मोजमाप आहे. हेच बघा,
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा