० आनंद हा मानसिक असतो. तो बाह्य़ गोष्टीत न शोधता आपल्यामध्ये शोधा.
० प्रत्येक व्यक्तीची आनंदाची परिभाषा वेगळी असते. त्याचा आदर करा.
० जीवनात येणाऱ्या लहानसहान गोष्टींतून आनंद शोधण्याचा प्रयत्न करा.
० सतत ताणाखाली राहून मानसिक संतुलन ढळू देऊ नका.
० खेळ, करमणूक, गायन, पर्यटन, नर्तन, वाचन या गोष्टींसाठी थोडा वेळ द्या.
० आपल्या दैनंदिन कामाचे गुलाम बनून जीवनातील आनंद उपभोगण्याची इच्छा संपू देऊ नका.
० आपल्याकडे जे आहे त्यावर संतुष्ट राहा, कारण सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत नसतात.
० आयुष्यात दु:ख, त्रास होतच असतो, त्यांचं प्रमाण कमी कसे करता येईल ते शोधून पाहा. आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहा.
० भविष्यात होणाऱ्या बदलाची काळजी करत न बसता तो बदल स्वीकारण्याची तयारी करा. भविष्याच्या चिंतेने वर्तमान बिघडू देऊ नका.
० आपल्या आवडीच्या कामात व्यग्र राहा.
० आपल्या दु:खाचे भांडवल न करता दुसऱ्याचे दु:ख जाणून घेण्याचा प्रयत्न करा. आपोआप तुमचे दु:ख कमी होईल.
० इतरांशी आपली तुलना किंवा बरोबरी करत नशिबाला दोष न देता स्वत:ला भाग्यशाली समजून जीवनाचा आनंद घ्या.
० कुणाकडूनही फार अपेक्षा ठेवू नका म्हणजे अपेक्षाभंगाचं दु:ख होणार नाही.
० आपल्या चिंता, आपले दु:ख आपल्यापुरते ठेवा, त्याचा बाऊ करू नका.
० प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक प्रसंगात, प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या.
० आपल्यात असलेल्या क्षमता ओळखा. स्वत:वर विश्वास ठेवा. परिणामाची चिंता न करता जे कराल ते कार्यक्षमतेने, मेहनतीने आणि आनंदाने करा.
० ज्या गोष्टी आवडत नाहीत, त्याकडे दुर्लक्ष करा. इतरांच्या आनंदाने आनंदी व्हा.
० आपल्या आयुष्यात होणाऱ्या चांगल्या, वाईट घटनांसाठी दुसऱ्याला जबाबदार धरू नका.
० जीवनात येऊन गेलेल्या आनंदी क्षणाचा बायोस्कोप मनात फिरता ठेवा.
० नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्याबरोबरचे संबंध वाढदिवस, घरगुती समारंभ अशा कार्यक्रमांतून दृढ ठेवा.
० आपली नेहमीची दिनचर्या बाजूला ठेवून कधी कधी नेहमीपेक्षा वेगळे काही तरी करा.
० उदास वाटल्यास आपल्या आवडत्या व्यक्तीशी बोला किंवा शांत ठिकाणी किंवा आपल्या आवडत्या ठिकाणी एक फेरी मारून या. संगीत ऐका, वाचन करा.
० नेहमी उत्स्फूर्त आणि टवटवीत राहा. हसत राहा. आनंदी राहा.
संकलन- उषा वसंत – unangare@gmail.com
आजच्या जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व करून बघावे असे काही बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Secrets to staying happy