० घरासाठी कर्ज घेऊन घर घेणे ही प्रॉपर्टीत केलेली गुंतवणूकच आहे. यामुळे आपल्याला घर मिळेल व घराची किंमत वाढत जाईल.
० घरकर्ज घेण्यापूर्वी बँक आणि इतर हौसिंग फायनान्स कंपनीच्या अटी तपासून घ्या.
० बँकेतून कर्ज घेताना बँकेने काही नियम केले आहेत. तुम्ही जर त्यांच्या नियमात बसत असलात तर ताबडतोब कर्ज मिळू शकेल, परंतु हे तुम्हाला मिळणाऱ्या वेतनावर अवलंबून असेल.
० घरकर्जाची मागणी करणाऱ्या व्यक्तीचे क्रेडिट रिपोर्ट बँकेकडून तपासले जातात. जर कर्जधारकाचा कर्ज चुकवण्याचा जुना रेकॉर्ड व्यवस्थित नसेल तर कर्ज मिळणे कठीण होते किंवा अधिक व्याजदर लावून कर्ज मिळू शकते.
० कर्जाचा कालावधी जितका जास्त असेल तितके जास्त कर्ज मिळू शकते. कारण जास्त कर्जावर भरावा लागणारा मासिक हप्ता कमी भरावा लागतो. कर्जाचा कालावधी कमी करावयाचा असल्यास आणि बँकेने परवानगी दिल्यास आपले नातेवाईक (आई-वडील, पत्नी, मुले, भावंडे) आणि स्वत:चे उत्पन्न मिळून एकत्र कर्ज कमी कालावधीसाठी मिळू शकते.
० तुम्ही पूर्वी कर्ज घेतले असल्यास त्या कर्जाच्या परताव्याचा पुरावा बँकेला द्यावा लागतो किंवा कर्ज घेतले नसल्यास परंतु तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असल्यास त्याच्या रिपेमेंटची माहिती बँकेला द्यावी लागते.
० तुमचे क्रेडिट कार्ड आणि पूर्वी घेतलेल्या कर्जाच्या रिपेमेंटमध्ये विसंगती आढळल्यास बँक कर्ज नाकारू शकते.
० तुम्ही बँकेचे विश्वसनीय आणि जुने खातेधारक असल्यास, आपले क्रेडिट कार्ड रिपेमेंट रेकॉर्ड समाधानकारक असल्यास तुम्हाला इतरांपेक्षा
लवकर कर्ज मिळू शकते. तुमचे क्रेडिट कार्ड बिल रेकॉर्ड व इतर देण्या-घेण्याचा बँकेद्वारा होणारा व्यवहार योग्य असल्यास तुम्हाला स्वस्त कर्ज मिळू शकेल.
० वेतनधारकाला त्याच्या वेतनाच्या चौपट तर व्यावसायिकांना त्यांच्या वार्षिक उत्पन्नाच्या सातपट कर्ज मिळू शकते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा