अमर हबीब habib.amar@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आंतरधर्मीय वा आंतरजातीय विवाह केला म्हणजे स्त्रीच्या स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावतात असे ठामपणे म्हणता येत नाही. कारण आपण ज्या व्यवस्थेत जगतो ती व्यवस्था स्त्रीचे स्वातंत्र्य नाकारणारी आहे. हा मुद्दा केवळ पुरुषी मानसिकतेचा नसून व्यवस्थेच्या रचनेचा आहे. जोपर्यंत सर्जकांना लुटणारी व्यवस्था कायम राहील तोपर्यंत स्त्रीचे शोषण होत राहील मग ती जाती-धर्मात लग्न करणारी असो किंवा नसो.

आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाहांना आम्ही ‘मानवी विवाह’ म्हणतो. ज्या विवाहात जात किंवा धर्माची कसोटी न लावता जोडपे ठरते असे विवाह मानवी विवाह. ते प्रेमविवाह असू शकतात किंवा ठरवून केलेलेही असू शकतात. अशा विवाहांबद्दल अजूनही बरेच समज-गैरसमज आहेत. कोणी ते किती टिकतात यावर प्रश्न उपस्थित करतात. काहींना अशा विवाहांनी संस्कृती कशी बरबाद होते, याची चिंता असते. अशा विवाहितांमध्ये स्त्रीच्या स्वातंत्र्याचे स्थान काय? असा प्रश्न क्वचितच उपस्थित केला जातो. मला तो महत्त्वाचा वाटतो.

मी मुस्लीम कुटुंबात जन्माला आलो. मला जाती कळायला बराच काळ लागला पण धर्माचे वेगळेपण लहानपणीच कळले. आपण नमाज पडतो. ते पूजा करतात. हिंदू स्त्रिया कुंकू लावतात, मुसलमान स्त्रिया लावत नाहीत. हा फरक उमगायला फार मोठे व्हावे लागले नव्हते. हा फरक कळला तरी आमच्यात द्वेष रुजला नव्हता, गल्लीतले संवंगडी आणि शाळेतील वर्गमित्र जिवाभावाचे होते. मोहल्यातील सगळ्या कुटुंबांशी एकमेकांचे संबंध चांगले होते.

आमच्या मोहल्ल्यात संघाची शाखा सुरू झाली आणि आम्हाला त्यात येण्यास मनाई करण्यात आली तेव्हा मात्र हा भेद गडद झाला. तिकडे हिंदू मुलांची शाखा भरायची. उरलेले मुसलमान मित्र मिळून आम्ही एकत्र खेळायचो. माझ्या सुदैवाने माझी आई माणुसकीलाच धर्म मानायची. म्हणून माझ्या मनात कटुता पेरली गेली नव्हती. पुढे राष्ट्र सेवादलाची शाखा सुरू झाली. त्यात सर्व जाती-धर्मातील मुला-मुलींना प्रवेश असायचा. मी त्यात जाऊ लागलो. याच काळात पहिल्यांदा जाती-धर्माचे भेद निर्थक आहेत, आपण माणूस आहोत आणि माणूस म्हणून जगण्यातच सार्थकता आहे, असे जाणवले. कदाचित एक कार्यकर्ता म्हणून मला आलेले ते पहिले सामाजिक भान असावे.

मी मुलगी असतो तर माणूस असल्याचे भान आलेच असते पण ते पहिल्यांदा जाती-धर्माच्या संदर्भात आले असते का? कदाचित नाही. पहिले भान स्त्री-पुरुष भेदांच्या संदर्भात आले असते. मी पुरुष असल्यामुळे माझे पहिले भान स्त्री-पुरुष संदर्भात न येता जाती-धर्माच्या संदर्भात आले असावे. हा सूक्ष्म बारकावा त्यावेळी लक्षात आला नव्हता.

जाती-धर्माच्या िभती तोडायच्या असतील तर आपण काय करू शकतो? असा विचार करू लागलो तेव्हा लक्षात आले की, जात जन्माच्या अपघाताने मिळते. धर्मही अलीकडच्या काळात बहुअंशी तसाच मिळतो. आई-बाप ज्या धर्माचे असतात, मुलेही त्याच धर्माची मानली जातात. जन्म, विवाह आणि मृत्यू या तीन ठिकाणी जात-धर्माचे संस्कार निर्णायक ठरतात, जन्म आपल्या हातात नव्हता. पण लग्न आणि मृत्यूबाबत आपण निर्णय करू शकतो. कोण्या एका क्षणी ‘आपण आपले लग्न आंतरधर्मीय करायचे’ असे मनात ठरले. या संकल्पाचे बीज नेमके कधी पेरले गेले हे मला सांगता येणार नाही.

माझ्या अंबाजोगाई गावात या संकल्पाला बळ देणारी उदाहरणे होती. ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी आणि स्वामी रामानंद तीर्थ यांचे सहकारी बाबासाहेब परांजपे आणि सिंधुताई यांचा त्या काळात आंतरजातीय विवाह झालेला होता. सिंधुताई आम्हाला शिकवायला होत्या.

डॉ. द्वारकादास लोहिया आणि शैला भाभी यांच्यासोबत माझे बालपण गेले. त्यांचाही विवाह आंतरजातीय होता. या माणसांचा सहवास मिळाला. त्यामुळे विचारांची बैठक पक्की होत गेली. हळूहळू मी पुस्तके वाचू लागलो, व्याख्याने ऐकू लागलो आणि ज्यांनी ‘मानवी विवाहां’चे समर्थन केले असे महात्मे मला आवडू लागले. महात्मा जोतिबा फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठा आधार दिला.

आमचा आंतरधर्मीय विवाह झाला. ती मुसलमान व्हावी अशी माझ्या कुटुंबीयांची इच्छा होती, मला ते अनावश्यक वाटत होते. आम्ही ते टाळले. कटुता टाळण्यासाठी वेगळे राहू लागलो. वेगळे राहायला लागताच स्त्री स्वातंत्र्याबाबत माझी परीक्षा सुरू झाली. ती नोकरी करायची. मी कार्यकर्ता होतो. मी फिरायचो. तिला घरीच राहावे लागायचे. मी घरी असताना तिच्या कामात जेमतेम मदत करायचो. पण मला सतत तिच्यावर अन्याय होत असल्याची बोच असायची. लेकरं झाली आणि ती अडकत गेली. एकूण गोळाबेरीज केली तर मी या परीक्षेत चांगले गुण घेऊ शकलो, असे मला ठामपणे म्हणता येणार नाही.

जाती-धर्मात लग्न केले असते तर फरक पडला असता का? अर्थात पडलाच असता. मानवी विवाह करणारे जोडपे गुलामीच्या संस्कारांचा एक परीघ ओलांडून आलेले असतात. त्यांनी जीवनाचा एक महत्त्वाचा निर्णय धाडसाने केलेला असतो. स्वातंत्र्याची एक अनुभूती त्यांच्या गाठीशी असते. असा निर्णय करणाऱ्यांच्या नजरेने दिसणारे जग, असा निर्णय न करणाऱ्यांच्या नजरेने दिसणाऱ्या जगापेक्षा काहीसे वेगळे असते, यात शंका नाही. पण त्या जोडप्यालाही याच जगात राहावे लागते. व्यवस्थेच्या जोखडात जुंपून घ्यावेच लागते. व्यवस्थेचे सगळे ताण झेलत जगावे लागते. त्यामुळे तडजोडी कराव्या लागतात. हे ताण पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना जास्त सहन करावे लागतात. आपल्या समाजात मुलगा नांदायला जात नाही. मुलीलाच नांदायला जावे लागते. नव्या घरातील नव्या लोकांशी तिला जुळवून घ्यावे लागते. अलीकडे ही अडचण काहीशी कमी झाली आहे. जोडपी स्वतंत्र राहू लागली आहेत. अशा स्थितीत नातेवाईकांची भरपाई शेजारीपाजारी करतात. कोणी तोंडावर बोलते कोणी पाठीमागे एवढाच फरक. पहिल्या गर्भारपणाच्या काळात आणि बाळंतपणात बाईला सोबत लागते. पहिलाच अनुभव असल्यामुळे मार्गदर्शनाची गरज असते. त्यामुळेच मुलींना पहिल्या बाळंतपणासाठी माहेरी पाठविण्याचा रिवाज पडला. अशा वेळेस त्या मुलीला माहेराशी किंवा सासरच्या मंडळीशी तडजोड करावी लागते. बऱ्याच मुली लग्नानंतर याच कारणाने सासरशी तडजोड करतात. धर्मातर करणे, नवऱ्याचे आडनाव लावणे, मुलांना नवऱ्याची जात लावणे हे सगळे मुकाटय़ाने स्वीकारावे लागते. हळूहळू या समस्येवरही उपाय निघत आहेत. आंतरधर्मीय विवाह झाला म्हणून तुम्हाला जगण्याचे साधन मिळेल अशी व्यवस्था नाही. जगण्यासाठी तुम्हाला धडपड करावीच लागते. काम मिळवणे आणि ते टिकवणे यासाठी नाना तडजोडी कराव्या लागतात. त्यात सर्वाधिक सहन करावे लागते ते स्त्रीलाच. नवऱ्याला नोकरी असेल तर बायकोला सरबराई करावी लागते आणि बाईला असेल तर तिला नोकरीच्या सोबत घरचीही कामे करावी लागतात. दोघांना असली तरी या व्यवस्थेत अधिक ताण बाईवरच पडतो. नवरा मदत करणारा असला तर ताण काहीसा हलका होतो एवढेच. आंतरधर्मीय वा आंतरजातीय विवाह केला म्हणजे स्त्रीच्या स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावतात असे ठामपणे म्हणता येत नाही. कारण आपण ज्या व्यवस्थेत जगतो ती व्यवस्था स्त्रीचे स्वातंत्र्य नाकारणारी आहे. हा मुद्दा केवळ पुरुषी मानसिकतेचा नसून व्यवस्थेच्या रचनेचा आहे. जोपर्यंत सर्जकाना लुटणारी व्यवस्था कायम राहील तोपर्यंत स्त्रीचे शोषण होत राहील. ती जाती-धर्मात लग्न करणारी असो किंवा नसो.

एका बाजूला जातीयवाद धर्मवाद वाढतो आहे. जाती-धर्माच्या संघटना आक्रमक होत आहेत. आमच्या काळात एवढा जातीयवाद नव्हता. धर्मा धर्मात इतकी तेढ नव्हती असे सांगणारे रोज भेटतात. दुसऱ्या बाजूला मानवी विवाहांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ४० वर्षांपूर्वी मी जेव्हा आंतरधर्मीय विवाह केला तेव्हा माझ्या अंबाजोगाईसारख्या तालुक्याच्या गावात बोटावर मोजण्याएवढेच आंतरजातीय विवाह झाले होते. पण आज अशा विवाहितांची संख्या शेकडय़ांत नव्हे हजारांत मोजावी लागते. एका बाजूला जाती-धर्माची बंधने तोडणारी नवी पिढी पुढे येत आहे. दुसऱ्या बाजूला जातीय आणि धर्मवादी कधी नाही एवढे आक्रमक झाले आहेत. हा तिढा कसा सोडवायचा?

विज्ञानातील जाणकार सांगतात की, या पृथ्वीतलावर डायनासोर होते. ते अक्राळ-विक्राळ होते. अजस्र होते. जसजसा त्यांचा आकार वाढला तसतशी त्यांची भूक वाढली. त्यांना पुरेसे खायला मिळाले नाही तेव्हा ते जोरजोरात ओरडायचे. त्यांच्या आवाजाने आसमंत हादरून जायचा. छोटय़ा प्राण्यांना वाटायचे की आता जग नष्ट होऊन जाईल. पण तसे घडले नाही. डायनासोर आपल्या आकाराने आणि भुकेने नष्ट झाले. सशासारखे छोटे प्राणी तगले. डायनासोरच्या ठिकाणी जाती-धर्माना ठेवून पाहा. याही डायनासोरांचा आकार वाढला. भूक वाढली. त्यांना पुरेसे खायला मिळेना. ते कासावीस झाले आहेत म्हणून आक्रमक झाले आहेत. आज ना उद्या त्यांचा अंत निश्चित आहे.

जाती-धर्माची बेडी तोडू पाहणाऱ्या अनेक जोडप्यांना आज या डायनासोरांचा सामना करावा लागतो. काहीशी भीतीही वाटते. पण प्रत्येक काळात पारतंत्र्याची बेडी तोडणाऱ्यांनी अशा प्रतिकूलतेला तोंड दिले आहे. आज या प्रतिकूलतेवर मात करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. पारतंत्र्याची एक बेडी तुटली म्हणजे पूर्ण स्वातंत्र्य मिळत नाही. ती अखंड चालणारी प्रक्रिया आहे. स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा मुद्दा अजूनही मुक्तीची वाट पाहात आहे. तो सर्जकांचे शोषण करणाऱ्या व्यवस्थेशी निगडित आहे. त्याचा आपल्याला विचार करावा लागेल.

chaturang@expressindia.com