फूड ट्रक हा सांप्रत नवा अवतार खवय्यांच्या जिव्हा तृप्त करतोय आणि कौतुकास्पद म्हणजे तरुण उद्योजक, स्त्रियाही त्यात उतरत आहेत. आंतरराष्ट्रीय प्रकारचे, वैविध्य असणारे जेवण तेही ताजे आणि माफक किमतीत. तव्यावरची चुरचुरीत सुरमई असो, लुसलुशीत बर्गर असो वा खुसखुशीत थालीपीठ.. सारे काही ट्रकवर. ‘फिरत्या चाकावरती करती फूडट्रक भुकेला गार’ हे सिद्ध करणाऱ्या मुंबई ठाणे, पश्चिम उपनगरे, वसई, विरार, नवी मुंबई परिसरात फिरणाऱ्या या ट्रक्सनी व्यवसायाची एक वेगळी दिशा खुली करून दिली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबई स्ट्रीट फूड – अर्थात बोली भाषेत-रस्त्यावरचे खाणे, ही एक संपूर्ण वेगळी संस्कृती आहे. जसे ठरावीक पद्धतीच्या खाण्याचे शौकीन असतात तसेच या स्ट्रीट फूडचेही असतात आणि कितीही नाके मुरडली तरी जेव्हा खिसा ‘हलका’ असतो तेव्हा अनेकांची क्षुधा या रस्त्यावरच्या असंख्य अनामिक गाडी, ठेलेवाल्यांनी शांत केलेली असते. विशेषत: महाविद्यालयात असताना आणि उमेदवारीच्या काळात! एका वडापावावर रंगणाऱ्या चर्चा.. ‘शाम रंगीन’ करणारे पाणीपुरी, भेल, शेव बटाटा पुरी, रगडा पॅटिस आदी चाट पदार्थ, तिथेच दोन सँडवीच सहा जणांत खाण्याची मजा काही न्यारीच. मनाचा एक कोपरा या स्ट्रीट फूडसाठी असतोच असतो. आता सध्या अनेक चेन फूड जॉइंट्स आलेत परवडण्याजोगे, पण स्ट्रीट फूड ते स्ट्रीट फूड!
सध्या या स्ट्रीट फूडच्या माहौलमध्ये एक नवा अवतार प्रगट झालाय. फूड ट्रक.. अर्थात आपल्या ठेलेवाल्यांचं आधुनिक रुपडं! रेस्टॉरंट, हॉटेलमध्ये मिळणाऱ्या पदार्थाचा दर्जा, तीच गुणवत्ता आणि ठेलेवाल्यांची किफायतशीर किंमत.. या दोघांचा क्लासिक मेळ इथे जमतो. म्हणजे अनेकदा कसे असते की, चांगले खायचे असते पण किमतीही जास्त असतात शिवाय घाई असते, वेळ नसतो. अनेक कारणे असतात. अशा वेळी हे ‘फूड ट्रक’ परफेक्ट सोल्युशन ठरतात. परदेशात हे फूड ट्रक अगदी सर्रास आढळून येतात. मुंबईत हे आलेत साधारण पाच-सहा वर्षांपासून आणि मुंबईच्या सर्व भागांत यांचा संचार सुरू आहे. म्हणजे बी.के.सी. सारख्या अप मार्केट ऑफिस कॉम्प्लेक्सपासून ते अगदी नवी मुंबई, पनवेलपर्यंत अनेक प्रकारचे खाणे देणारे ट्रक आढळतील.
असंख्य प्रकारच्या पद्धतीचे, चवींचे पदार्थ या ट्रकवर मिळतात. बर्गर, पिझ्झा, रॅप्स, पीटा, फलाफल, सँडवीच, सलाड, ज्युस यांच्या जोडीला आपले अस्सल महाराष्ट्रीय घावन, मोदक, मालवणी पदार्थ, मासे, उसळ, कोलंबी-भात, सोलकढीसुद्धा. दूरदूर उपनगरांत राहाणाऱ्या अनेक नोकरदारांना, विद्यार्थ्यांना आणि कुटुंबांना माफक किमतीत ताजे, छान, जेवण पुरविले जाते आणि चक्क या व्यवसायात आपली मराठी माणसे आघाडीवर आहेत. (हा आश्चर्याचा धक्का!?) आणि त्यातही महत्त्वाचे म्हणजे अनेक स्त्रिया, अगदी तरुणीसुद्धा या व्यवसायात उतरलेल्या आहेत.
‘बॉम्बे फूड ट्रक कंपनी’ ही या व्यवसायातील तशी जुनी. आशीष संजनानीने हा उद्योग २०१५ मध्ये सुरू केला. युरोप, अमेरिकेत फूड ट्रक बघून त्याने इथेही ते सुरू करायचे ठरवले. घरचा व्यवसाय रेस्टॉरंटचा होताच. त्यात फूड ट्रकची भर पडली. त्यासाठी बी.के.सी. निवडायचे कारण म्हणजे जागेची विपुलता. पार्किंगला अडचण नाही आणि आजुबाजूला असणारी अद्ययावत मल्टिनॅशनल ऑफिसेस. दुपारी येथे सूट-बूटवाल्या एक्झिक्युटिव्हपासून ते तरुण कॉलेज क्राऊडपर्यंत अनेकांची गर्दी असते. शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारचे पदार्थ या ट्रकवर मिळतात. पावभाजी रोल, नाचोज, खिमापाव, चिकन बर्गर एकदम पंचतारांकित मेन्यू पण माफक किमतीत. त्यांच्या ट्रकवर मिळणाऱ्या पदार्थाच्या किमती या साधारणत: १५० ते २०० रुपयांपर्यंत आहेत. ‘बॉम्बे फूड ट्रक कंपनी’ अनेक खाद्य महोत्सवात भाग घेते. सध्या त्यांचे ३ फूड ट्रक्स आहेत आणि आणखी वाढविण्याचा विचार आहे. मे २०१६ च्या ‘फूड ट्रक फेस्टिवल’मध्ये यांच्या ट्रकला जवळपास दहा हजार खवय्यांनी भेट दिली.
या व्यवसायाची अधिक खोलात जाऊन माहिती घेतली असता एक गोष्ट प्रकर्षांने जाणवते ते म्हणजे तरुणांचा असणारा सहभाग. पल्लवी धुपीया हिचा ठाण्याला ‘द हॉपिंग मन्कीज्’ हा फूड ट्रक लागतो. एम.बी.ए. केलेली पल्लवी खाण्यापिण्यावरच्या आवडीने या क्षेत्रात उतरली. १०० टक्के शुद्ध शाकाहारी पदार्थ येथे मिळतात. पिझ्झा, पास्ता, रॅप्स, चायनीज. पल्लवीच्या मते या बिझनेसमध्ये गुंतवणूक रेस्टॉरंटइतकी करावी लागत नाही. साधारणपणे ५ ते ७ लाख रुपयांत तुम्ही ट्रक सुरू करू शकता.
वांद्र्याला कलानगर येथे ‘रोमिंग हंगर’ हा फूड ट्रक चालविणाऱ्या सिंधू दिघे. बँकेमधून उच्चपदावरून निवृत्त झाल्यावर सिंधुताईंनी या व्यवसायात उतरायचे ठरवले. वर्षभर पूर्व पाहणी करून अनेकांना भेटून त्यांनी आपल्या या ट्रकचा शुभारंभ केला. उपजत असलेली स्वयंपाकाची हौस आणि उत्साह आणि हाताची चव यामुळे कलानगर भागात हा हा म्हणता त्यांचे ग्राहक तयार झाले. अस्सल महाराष्ट्रीय नाश्ता, पोळी-भाजी (वाल बिरडेही) कोळंबी, खिचडी, पॅटिस, कोंबडी रस्सा, कटलेट अशा अनेक पदार्थाची चव चाखण्यासाठी इथे खवय्ये गर्दी करतात. गरम जेवण द्यायला इंडस्ट्रियल कॅसरोल आहेत आणि बाकीसाठी तवे. ऑर्डर दिल्यापासून पाचव्या मिनिटाला हजर! सिंधुताई सकाळी लवकर उठून सर्व पदार्थ स्वत: जातीने करतात. ट्रकवर ग्राहकांना अन्न गरम करून दिले जाते. शिळ्याची भानगड नाही. कारण काही उरतच नाही. फक्त आमलेट, अंडाभुर्जी हे आयत्या वेळेस तयार केले जाते. आतापर्यंत सिंधुताई एकटय़ा सगळे सांभाळत होत्या. आता त्यांना मदतनीस मिळाला आहे. पण स्वयंपाक मात्र फक्त त्याच करतात. सिंधुताईंचे अनेक ग्राहक खास मांसाहारी पदार्थ खाण्यासाठी आवर्जून त्यांच्या फूड ट्रकवर हजेरी लावतात. सिंधुताईंना त्यांच्या कुटुंबीयांकडून मोठा पाठिंबा मिळतो. मुख्य म्हणजे येवढय़ा मोठय़ा पदावरून निवृत्त होऊनही सिंधुताईंना हा व्यवसाय करताना कुठलाही संकोच वाटत नाही. सकाळी साडेपाच वाजता सुरू होणारा त्यांचा दिवस दुपारी
३ वाजता संपतो. मिळणाऱ्या भरघोस प्रतिसादानंतर आता त्यांना अजून एक ट्रक सुरू करायचा आहे.
ठाण्याला ‘टमी टिकल’ हा फूड ट्रक चालवणारा निनाद आमरे म्हणाला की, ‘‘लोकांना ताजे जेवण किफायतशीर किमतीत फूड ट्रकमधून मिळू शकते.’’ निनादच्या ट्रकवर रॅप्स, सँडवीच, बर्गर असे एकदम सुटसुटीत आणि तरुणाईला आवडणारे पदार्थ मिळतात. शिवाय ग्राहकांच्या सूचनेप्रमाणे पदार्थ बनवून दिले जातात. उदाहरणच द्यायचे झाले तर सँडवीच हवंय पण तिखा ज्यादा किंवा ज्यादा चटणीवाला. निनादचे शिक्षण मॅकेनिकल विषयातले, पण काहीतरी वेगळे करायचे या उर्मीने तो या व्यवसायात उतरला. फोर्ड टेम्पो ट्रॅव्हलर घेऊन त्याने त्यात शेगडी, बर्नर, ग्रिडल प्लेट बसवून सुरुवात केली. निनादचे ठरलेले ग्राहक आहेत. ‘‘माऊथ पब्लिसिटी या व्यवसायाला फायदेशीर ठरते’’, असे निनाद म्हणाला. निनादचे मुख्य काम सेंट्रल किचनमध्ये होते. ट्रकवर फक्त ते एकत्र केले जाते. पण त्यातही तो अनेक युक्त्या वापरत असतो. त्याचा आपल्या ग्राहकांशी छान संवाद चालतो. कोणाला काय हवे, कसे हवे याची त्याला आता पूर्ण माहिती झालीय.
‘‘फूड ट्रकमध्ये रेस्टॉरंटची चव आणि पदार्थ ठेल्यांच्या किमतीत मिळतात. लोकांना नेहमी चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जाणे परवडतेच असे नाही, पण त्यांना त्या प्रकारचे अन्न हवे असते. जे या ट्रकद्वारा पुरवले जाते. या ट्रकचे ओपन किचन ग्राहकांना आकर्षति करते. त्यामुळे स्वच्छता ठेवणे अगदी गरजेचे असते’’, असे मयुरेश कपोटेने आवर्जून सांगितले. मयुरेश कपोटेचा ‘द चिली ट्रक’ कामोठय़ाला लागतो. शाकाहारी-मांसाहारी दोन्हीही प्रकारचे जेवण तिथे मिळते. ‘‘मांसाहारी पदार्थ देत असल्यामुळे प्रचंड स्वच्छता ठेवावी लागते’’, हे मयुरेशने खास नमूद केले.
सध्या मुंबई ठाणे, पश्चिम उपनगरे, वसई, विरार, नवी मुंबई येथे सर्व मिळून जवळपास वीस एक ट्रक ‘ऑन रोड’ आहेत. त्यांची ‘युनियन ऑफ फूड ट्रक’ ही आहे. या ट्रक्सना कुठल्या कायद्यात बसवायचे हे अजून सरकारी यंत्रणेला ठरवता आलेले नाहीये. त्यामुळे या व्यवसायासाठी महत्त्वाची ठरणारी अग्निशमन दलाची, महानगरपालिकेची आवश्यक प्रमाणपत्रे घेऊन, सर्व प्रकारच्या सुरक्षिततेची ग्वाही देऊन हा व्यवसाय सुरू करता येतो. अर्थात यातही अनेक अडचणी आहेत. पण त्यावरही मात करून अनेकजण या व्यवसायात उतरत आहेत.
फूड ट्रक चालू करायला सर्वात आधी लागणारे साहित्य म्हणजे मोठे वाहन. म्हणजेच व्हॅनसारखे आणि त्याला आतून संपूर्ण बदलून ट्रक तयार होतो आणि हे काम शासनसम्मत व्यक्तीकडूनच करून घ्यावे लागते. पाश्चात्त्य देशातील ट्रक तुलनेने अगडबंब आणि अद्ययावत असतात. आपल्याकडे आढळणारे फूड ट्रक अजून लहान आहेत. फूड ट्रकवर कोणत्या प्रकारचे जेवण, पदार्थ देण्यात येणार आहेत, हे लक्षात घेऊन त्या दृष्टीने ट्रकमध्ये उपकरणे बसवावी लागतात. मरोळ येथे ‘शेफ ऑन बोर्ड’ हा ट्रक चालविणारे अनीस खान म्हणाले की पंचवीस र्वष रेस्टॉरंटमध्ये काढल्यावर त्यांनी हा उद्योग सुरू केला. त्यांच्या ट्रकवर इटालियन, अरेबिक, मेक्सिकन, श्रीलंकन असे एक्झॉटिक जेवण मिळते आणि तेही शुद्ध शाकाहारी. त्यासाठी इलेक्ट्रिक डीप फायर, ग्रीलर, कुकिंग रेज बसवून घ्यावी लागली आहे. पंचतारांकित पद्धतीने पदार्थ अगदी किफायतशीर किमतीमध्ये तेही आपल्यासमोर बनवलेले. अनीसचा ‘कंम्फीर’ हा बटाटय़ाचा पदार्थ भलताच प्रसिद्ध झालाय. यात मोठय़ा बटाटय़ात चिज, सोअर क्रीम आणि हब्र्ज घालून तो बनवला जातो. वेगळं खाणाऱ्याला असे पदार्थ आवडून जातात.
मालाडला ‘वंडिरग टेस्ट बड’ हा ट्रक चालवणारी पूजा अधिया अमेरिकन, इटालियन, मेक्सिकन पदार्थ पुरविते. तिचे जपानीज नुडल्स आजुबाजूच्या रहिवाशांमध्येही प्रसिद्ध आहेत. संध्याकाळी पाचनंतर तिचा ट्रक लागतो. नाचोच, बर्गर खायला सर्वच वयोगटातील खाबूगिरी करणारे येतात. ‘सुपर हिरोज’ हा पवईला फूड ट्रक चालविणारा अजिंक्य परब आपल्या कामावर भलताच खूश आहे. सकाळी तो चित्रनगरीतीत ‘व्हीसिलग वुडस्’ येथे जेवण देतो आणि संध्याकाळी पवईला फूड ट्रक लावतो. त्याच्या फूड ट्रकवर पिझा, बर्गर, रॅप्स खायला गर्दी उसळते. अजिंक्यच्या मते फूड ट्रकमुळे हॉटेल सुरू करताना जो खर्च जागा, भाडे, बिल्स, पगार यांच्यावर होतो, तो वाचतो. गुंतवणूक आणि नुकसानही कमी. शिवाय पदार्थ संपले की आपण जायला मोकळे.
पनवेलला ‘रुचिरा घरोघरी’ हा फूड ट्रक मयूरा रानडे चालविते. लुसलुशीत घावन, पोहे, पुरण पोळ्या, मटकी उसळपासून अगदी फणस आणि केळफुलाच्या भाजीपर्यंत अस्सल महाराष्ट्रीय जेवण ती पुरविते. सकाळी साडेसात वाजल्यापासून दुपापर्यंत तसेच संध्याकाळीसुद्धा. अनेक नोकरदार विद्यार्थी आणि अनेक कुटुंबं मयूराचे नियमित ग्राहक आहेत.
‘‘फूड ट्रक व्यवसायामध्ये महत्त्वाचे आहे ती स्वच्छता. फूड ट्रक साफ हवाच पण आजूबाजूलाही स्वच्छता ठेवावी लागते. त्यामुळे कचऱ्याची सोय व्यवस्थित लावणे अपरिहार्य ठरते. अनेकजण पार्सल नेतात. पण बरेचदा तेथे बसून गप्पा मारत खाणेही चालते. अशा वेळी प्रशासनाकडून बंदी येते.’’ खारघरला ‘खानाबदोश’ हा फूड ट्रक चालवणाऱ्या देव तिवारीने सांगितले. त्याचे म्हणणे, ‘‘आजही आम्ही ना धड हॉटेलच्या वर्गात ना ठेल्याच्या. त्यामुळे अनेकदा त्रासही सहन करावा लागतो.’’ देवचा ट्रक फक्त शाकाहारी पंजाबी पद्धतीचे जेवण देतो. बाकी सगळे सेंट्रल किचनमध्ये होत असले तरी पुऱ्या, परोठे मात्र गरम-गरमच करावे लागते.
थोडक्यात सांगायचे म्हणजेच फूड ट्रक हा सांप्रत नवा अवतार खवय्यांच्या जिव्हा तृप्त करतोय आणि कौतुकास्पद म्हणजे तरुण उद्योजक त्यात उतरत आहेत. आंतरराष्ट्रीय प्रकारचे, वैविध्य असणारे जेवण तेही ताजे आणि माफक किमतीत. या बहुतांशी फूड ट्रकमध्ये जेवण हे सेंट्रल किचनमध्ये तयार केले जाते आणि ट्रकमध्ये गरम होते. सँडवीच, बर्गर, रॅप्समध्ये सारण भरून ते ग्रील केले जातात. त्याच अनुषंगाने यंत्रणा आणि साधने ट्रकमध्ये असतात. मग ती तव्यावरची चुरचुरीत सुरमई असो, लुसलुशीत बर्गर असो वा खुसखुशीत थालीपीठ..
सुटाबुटामधल्या एक्झिक्युटिवपासून सॅक लटकवून जाणाऱ्या महाविद्यालयीन तरुणांपर्यंत आणि चौकोनी कुटुंबातल्या नोकरदारापासून ते आजी आजोबांपर्यंत.. हे फूड ट्रक्स अनेकांचे जठराग्नी शांत करत आहेत. व्यवसायाची एक वेगळी दिशा या उद्योगाने खुली करून दिली आहे. स्वच्छ ताजे रुचकर जेवण.. आणि तेही किफायतीशीर किमतीत! त्यामुळे खाद्याचा नवा मंत्र देणाऱ्या फूड ट्रक्सवरील पदार्थाचाही आस्वादही घ्यायलाच हवा.
शुभा प्रभू-साटम shubhaprabhusatam@gmail.com