सध्याचे जग, जो दिखता है वो बिकता है.. याचे आहे आणि यामध्ये महत्त्वाची ठरते ती फूड फोटोग्राफी. चिकन दो प्याजा आहे तर.. कांदा आणि चिकन हे दोन्ही मुख्य पदार्थ एकमेकांच्या संगतीने फोटोत आले पाहिजेत. लालभडक रश्शामधील पारदर्शक कांदा प्रत्यक्ष खाताना कसा लागेल याची उत्सुकता बघणाऱ्याला वाटलीच पाहिजे. त्यासाठी जगभर  असंख्य प्रयोग केले जात आहेत. आपल्याकडे बटाटय़ाच्या भाजीवर कोथिंबीर किंवा पराठय़ावर लोणी असो वा पाश्चिमात्य देशामधील केकचे आयसिंग असो, पदार्थाचे देखणेपण अत्यंत कळीचे ठरत आलेले आहे आणि त्यामुळे फूड फोटोग्राफीला अनन्यसाधारण महत्त्व आलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ग्लासात ओतले जाणारे फेनधवल शुभ्र दाट दूध, खरपूस भाजलेल्या तांबूस तपकिरी टोस्टचा कुरकुरीतपणा नजरेला जाणवणारा.. लुसलुशीत मसालेदार कबाब.. गुप्प फुगलेल्या टमटमीत पुऱ्या, वाफाळणारा, घमघमणारा रस्सा, लालचुटूक रसाळ स्ट्रॉबेरी, रसरशीत तजेलदार फळे, तकाकणारी आणि वाफा टाकणारी तंदुरी, पिस्त्याच्या पखरणीने नटलेली रबडी, स्वच्छ पारदर्शक बर्फावर अलगद पडणारे सोनेरी पेय, पांढरे शुभ्र सॅडवीच, खुसखुशीत मसालेदार समोसे, मोठाल्या वाडग्यात टपटपत पडणाऱ्या लाह्य़ा आणि त्यावरचा सोनेरी मध.. आपण असे नेहमी आजूबाजूला पाहात आणि अनुभवत असतो.. कधी रेस्टॉरंटमध्ये मेन्यूकार्ड वाचताना, कधी मासिकाच्या गुळगुळीत पानावर तर कधी पदार्थाच्या वेष्टनावर आणि अनेकदा टीव्हीवर जाहिरातीमध्ये.. हे पूर्णब्रह्म आपल्यासमोर येते आणि नकळत तो पदार्थ उचलला जातो..विकत घेतला जातो. साधे नेहमीचे उदाहरण.. आपले मसाले किंवा डाळी.. सुपर मार्केटमध्ये शेल्फवर हारीने रचलेल्या वस्तूंना पाहात अंदाज घेत जाताना एखाद्या पाकिटाकडे हात जातो.. त्यावरचे चित्र/फोटो पाहून.. मस्त तकतकीत डाळ, वर लालभडक मिरच्यांची फोडणी आणि कोथिंबिरीचा साजशृंगार.. साधी तुरीची डाळ एकदम शाही वाटते आणि आपण विकत घेतोच घेतो..

सध्याचे जग हे असेच आहे, जो दिखता है वो बिकता है..  आणि यामध्ये महत्त्वाची ठरते ती फूड फोटोग्राफी. जेवणाचे अन्नपदार्थाचे छायाचित्रण.. जेवण किंवा अन्न हे प्रथम नजरेला सुखावणारे हवे. त्यासाठी जगभर असंख्य प्रयोग केले जातात. आपल्याकडे बटाटय़ाच्या भाजीवर कोथिंबीर किंवा पराठय़ावर लोणी असो वा पाश्चिमात्य देशामधील केकचे आयसिंग असो पदार्थाचे देखणेपण अत्यंत कळीचे ठरत आलेले आहे आणि त्यामुळे फूड फोटोग्राफीला अनन्यसाधारण महत्त्व आलंय.

‘गुड इनफ टू इट’ या फर्मच्या जिग्नेश झवेरीच्या मते चव जेवढी महत्त्वाची असते तेवढेच त्याचे प्रेझेंटेशनही.. प्रत्येक ग्राहकाला तुम्ही चव दाखवू शकणार नाही आणि त्यामुळे तुमच्या उत्पादनाला अत्यंत दिलखेचक रूपात पेश करणे आवश्यक असते. गेली वीस वर्षे जिग्नेश या क्षेत्रात आहे. आणि अनेक बडय़ा ब्रँडसाठी त्याने शूट केलेले आहे. त्याच्या मते सध्या अगदी साधा स्नॅक्स कॉर्नरवाला असो वा पंचतारांकित उच्चभ्रू रेस्टॉरंटवाला आपले पदार्थ एकदम मस्त दिसावेत हा त्यांचा आग्रह असतो.. फक्त हॉटेल नव्हे तर चहा, मसाले, बिर्याणी, सूप पावडर, दूध पावडर, एनर्जी िड्रक्स, बिस्किटे असंख्य उत्पादने फोटोग्राफीवर विशेष लक्ष देऊ लागली आहेत. कारण ग्राहकाची बदलत जाणारी मानसिकता.. जिग्नेशने लिप्टन, क्नोर, मकेन, ओरियो, कॅडबरी अशा अनेक ब्रॅण्डसाठी फोटोग्राफी केलीय.

अर्थात हे वाचताना जेवढे सोपे वाटते तितके नसते. ठेवला पदार्थ टेबलावर आणि काढले फोटो असे होत नाही. तर उत्पादन काय आहे, कंपनीचा ग्राहकवर्ग कोणता आहे आणि सर्वात महत्त्वाचे उत्पादनाची किंमत या सर्व गोष्टी लक्षात घेणे अत्यंत आवश्यक ठरते. साधे उदाहरण घेऊ, चहाचे बाजारात खूप ब्रॅण्ड आहेत.. आपले वेगळेपण कसे दाखवायचे तर शूटिंगमध्येच काही वैशिष्टय़ आणावे लागते. म्हणजे नेपथ्य, चहादाणी, कप्स, मग्ज्, टेबल, टेबल क्लॉथ हे सर्व अत्यंत बारकाईने पाहणे आवश्यक असते. समजा, उत्पादन ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी असेल तर रचना तशी करावी लागते आणि याकरिता फोटोग्राफरला अत्यंत सर्तक राहावे लागते. फोटो काढताना तो असा खेचावा लागतो की मस्त मसालेदार चहाचा दरवळणारा फक्त फोटो पाहून ग्राहक विक्रेत्यांपर्यंत पोहचायला हवा.

सबा गझियानी हे या क्षेत्रातील एक वजनदार नाव. १९८४ पासून सबा या क्षेत्रात आहे. स्वत: शेफ असलेल्या सबाला फोटोग्राफीत आवड निर्माण झाली आणि पाककौशल्याने चवदार पदार्थ निर्माण करता करता ती त्यांना फ्रेममध्ये बंदिस्त करू लागली. सबाच्या मते या फोटोग्राफीत तुमचे मॉडेल असते अन्न.. जे बोलू शकत नाही.. त्यामुळे कुठल्याही सूचना देणे शक्य नसते. ‘फूड फोटोग्राफिक्स’ या सबाच्या कंपनीने आतापर्यंत अनेक असंख्य राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्लायंटस् हाताळलेले आहेत. गंमत म्हणजे यात ‘स्वाती स्नॅक्स’सारख्या शुद्ध शाकाहारी ठिकाणापासून पार झोराबियन चिकनपर्यंत असंख्य आहेत. स्वाती स्नॅक्सची पानकी, मका हांडवो, ढोकळा, पात्रा प्रसिद्ध आहेत. सबाच्या मते शाकाहारी पदार्थाच्या शूटमध्ये अधिक कौशल्य लागते. ढोकळा आणि अळुवडी दोघेही रंगाने आणि पोताने पूर्णपणे भिन्न.. अशा वेळी त्या त्या पदार्थाचं वैशिष्ट पाहावं लागतं. ढोकळ्याचा गुबगुबीतपणा आणि पिवळा जर्द रंग दिसणे अथवा हिरव्यागार अळुवडीचा कुरकुरीतपणा जाणवणे तेसुद्धा फोटोत कळीचे ठरते आणि इथे सबाचे कौशल्य पणाला लागले. जे तिने यशस्वी रीतीने पूर्ण केले. मेनूकार्डवरील फोटो काढताना फार काळजी घ्यावी लागते. पनीर मखनीमधील मलईदार ग्रेव्ही असो व चिकन काली मिरीमधील मिरीची पेरणी.. तो पदार्थ न चाखता नुसता त्याचा फोटो बघून ग्राहकाला तो घ्यावासा वाटणे यात खरे कौशल्य आहे.

या अशा परिणामाकरिता सतत मेहनत करावी लागते. प्रत्येक वस्तू निवडून रचावी लागते. आणि इथे फोटोग्राफरसमवेत फूड स्टाइलिस्ट महत्त्वाचा ठरतो. म्हणजे पदार्थाचा मेकअपमन. पायल गुप्ता ही एक नामवंत फूड स्टाईलिस्ट. स्वत: शेफ असलेल्या पायलने फूड स्टाईिलग हा पूर्णवेळ व्यवसाय निवडला आहे. तिच्या मते हे एक प्रकारचे मॅनेजमेंटच आहे. समजा गाजर हलवा आहे तर तो कशात ठेवावा. साध्या काचेच्या बशीत, वाडग्यात की चांदीच्या भांडय़ात? आजूबाजूच्या वस्तू आधुनिक हव्यात की पुरातन? हलव्याची मूद पाडावी की नुसता ठेवावा? त्याचा रंग कितपत लाल असावा? वर पिस्ते, काजू घालावेत की केशराच्या काडय़ा की चांदीचा वर्ख? हे सर्व फूड स्टाईलिस्ट ठरवतो. क्लायंटबरोबर चर्चा करून त्याच्या मागण्या समजून घेऊन फोटोग्राफर आणि फूड स्टाईलिस्ट त्या पदार्थाला एक व्यक्तिमत्त्व देतात. केनस्टार फ्रायरच्या शूटला पायलच्या कामावर खूश झालेल्या शाहरूख खानने पायलला शाबासकी दिलेली होती. पतंजली, अमूल, मदर डेअरी, पारले असे असंख्य मातब्बर क्लायंट पायलने हाताळले आहेत.

पदार्थाचे छायाचित्र काढले जाते तेव्हा तो पदार्थ एक ओळख ठरतो. उदाहरण द्यायचे तर मॅकीनचे फ्रेंच फ्रायस्, क्नोरचे सूप किंवा संजीव कपूरचे मसाले.. एकही शब्द न वापरता फक्त छायाचित्रातून ग्राहकाला आकर्षित करण्याचे काम फोटोग्राफर करतो, असे भारत भारंगी या फूड फोटोग्राफरचे मत आहे. जवळपास १५ वर्षे या क्षेत्रात असलेल्या भारंगी यांनी ताज हॉटेलस्, संजीव कपूर यासारख्या अनेक ब्रॅण्डसाठी काम केले आहे. त्यांच्या मते फूड फोटोग्राफर फक्त उत्तम फोटो काढणारा असण्याइतकाच जेवणा-खाण्यावर प्रेम करणारा असावा लागतो. म्हणजे कोलंबी फ्राय आणि िझगा मसाला किंवा दाल तडका आणि दाल फ्राय यामधला फरक जेव्हा फोटोग्राफरला कळतो तेव्हाच तो त्या पदार्थाला फोटोतून जिवंत करू शकतो. आपण काढलेला फोटो पाहून संभाव्य ग्राहक निर्णय घेणार हे विसरता येणार नाही हे भारतभाईंनी आवर्जून नमूद केले.  आणि याला उज्ज्वला खापरे यांनी पूर्ण दुजोरा दिला. त्या नीलेश लिमये यांच्यासाठी काम करतात.

शेफ आपल्या कौशल्याने जे अद्भुत पदार्थ निर्माण करतो त्याला १०० टक्के दृश्य रूपात हुबेहुब उतरवण्याचे शिवधनुष्य फूड फोटोग्राफरला पेलावे लागते. मग तो पदार्थ शाकाहारी असो की मांसाहारी, मसाले असोत की कॉफी पावडर, तंदुरी रोटी असो की ब्रेड. तो बघितल्यावर जेव्हा हवाहवासा वाटतो तेव्हा फूड फोटोग्राफर यशस्वी झाला असे म्हणू शकतो. अर्थात हे सोपे नाही. उदाहरण द्यायचेच तर सूपचे. सूप म्हटले तर ते वाफाळणारे हवे. वातानुकूलित स्टुडियोत सूप थिजून जाते. किंवा ग्रेव्हीवरचे तेल/तूप गोठते, भाज्या मलूल पडतात, चीज घट्ट होते. हे पदार्थ परत गरम केले तर त्यांचा रंग पालटू शकतो.. बरं तसेच वाफळते आणले, तर फोटो धुरकट येतो. अशा वेळी वाफा आणण्यासाठी ड्राय आइस वापरावा लागतो. मलईदार आइस्क्रीमचा मुलायमपणा जाणवून देण्यासाठी उकडलेला बटाटा वापरतात. सोनेरी व्हिस्कीचा दाटपणा जाणावा याकरिता चक्क प्लॉस्टिकचा वापर केला जातो. येथे पदार्थ आहे त्याच्यापेक्षा अधिक चांगला दिसणे हे मुख्य असते.

समजा, चिकन दो प्याजा आहे तर.. कांदा आणि चिकन हे दोन्ही मुख्य पदार्थ एकमेकांच्या संगतीने फोटोत आले पाहिजेत. लालभडक रश्शामधील पारदर्शक कांदा प्रत्यक्ष खाताना कसा लागेल याची उत्सुकता बघणाऱ्याला वाटलीच पाहिजे. बर्गरमधील पॅटीचा कुरकुरीतपणा जाणवण्यासाठी तिचे वरील आवरण अधिक गडद करावे लागते. लालचुटुक गाजर आणि हिरवीगार मेथी प्रत्यक्ष फोटोमध्ये तशी उठावदार दिसेलच असे नाही मग त्यांना वेगळे रंग लावावे लागतात. आणि एवढय़ा मेहनतीने तयार केलेला पदार्थ फूड स्टाईलिस्टला तसाच तालेवार पद्धतीने रचावा लागतो. तो नुसताच टेबलावर भांडय़ात किंवा डिशमध्ये वाढून चालत नाही तर सोबतचे काटे, चमचे, बशा, लोणची, रोटय़ा एवढेच काय पण टेबलक्लॉथ आणि त्यावरील नक्षी या सर्वाचा विचार करावा लागतो. वेगवेगळ्या कोनातून पदार्थाला पाहून तशी प्रकाशयोजना ठरवावी लागते. आणि मगच फायनल शूट होते. आणि तो पदार्थ मग कधी पाकिटावर, कधी जाहिरातींमधून, कधी टीव्हीवर तर कधी मेनूकार्डवर अवतरतो.

लगेच खावीशी वाटावी अशी कुरकुरीत पाणीपुरी, नजर खिळवणारी पांढरीशुभ्र इडली, मसालेदार तंदुरी कोंबडी, लालभडक टोमॅटो सूप, दाट मिल्क शेक, चॉकलेटस्, बिस्किटे, कितीतरी अगणित पदार्थ आहेत. काही द्रव्य, काही घन, काही शाकाहारी, काही मांसाहारी, काही कच्चे तर काही शिजवलेले, बघणाऱ्याच्या नजरेचा ठाव घेऊन त्याला नजरबंद करण्याची क्षमता असणारे आणि या पदार्थाना तो जादूई स्पर्श देणारे हे आधुनिक जादूगार, फूड फोटोग्राफर. त्याच्या कॅमेऱ्यामधून टिपलेले पदार्थ आपल्याशी बोलतात आणि आपलेसे करतात.

shubhaprabhusatam@gmail.com