तरुणांनो आज आपण जरा युवाविश्वात डोकावू यात. उद्याच्या भारताचे प्रतिनिधी म्हणून युवकांकडे पाहिलं जातं. आजच्या स्पर्धेच्या युगात तग धरताना तरुण पिढीला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं आहे. त्यातूनच मग नैराश्य, अगतिकता, वैफल्य, हताशा निर्माण होतात. काही तरुण-तरुणी तर आत्महत्या करण्याच्या निर्णयाप्रत येतात. सभोवताली सगळे असले, तरी त्यांना मदतीची गरज भासतेच. देशाचे उज्ज्वल भवितव्य घडवण्याची क्षमता असणाऱ्या, पण नैराश्याने ग्रासलेल्या या तरुण-तरुणींना सावरणाऱ्या आणि योग्य मार्गावर आणणाऱ्या सेवाभावी संस्थांची माहिती आपण करून घेऊ या.
आत्महत्येचे विचार मनात येणाऱ्या तरुण-तरुणींना त्या विचारांपासून परावृत्त करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर झटणारी ‘समरिटनस्’ ही सेवाभावी संस्था आहे. या संस्थेच्या शाखा मुंबईतही आहेत. आयुष्यात रस न राहिलेले, हताश, निराश, असहाय्य तरुण-तरुणी आत्महत्या करण्याच्या निर्णयाप्रत आलेले असतात. त्यांना जगण्याची उमेद देऊन भावनिक आधार देण्यासाठी या संस्थेच्या हेल्पलाइन आहेत.
दूरध्वनी करणाऱ्या तरुण-तरुणींची माहिती गोपनीय राखली जाते. प्रशिक्षित स्वयंसेवक व समुपदेशक ही विनामूल्य हेल्पलाइन चालवतात. या हेल्पलाइनचे क्रमांक आहेत ०२२-६५६५३२६७, ०२२-६४६४३२६७. सोमवार ते शनिवार दुपारी ३ ते रात्री ९ वाजेपर्यंत या क्रमांकावर समुपदेशक उपलब्ध असतात. त्यांचा इमेल आयडी आहे samaritans.helpline@gmail.com

‘समरिटनस् मुंबई’च्या दुसऱ्या केंद्राचे दू.क्र. ६४६४३२६७, ६५६५३२६७, ६५६५३२४७.
मुंबईतील प्रसिद्ध ‘के.ई.एम. हॉस्पिटल’च्या मानसोपचार विभागाचा दू. क्र. आहे- २४१३१२१२.
युवकांच्या मानसिक आरोग्यासंदर्भात कार्यरत असलेली एक संस्था आहे, त्याची वेबसाईट आहे. ‘युथ की आवाज’. youthkiawaz.com त्यांचा इमेल आयडी आहे icall@tiss.edu.
शुभांगी पुणतांबेकर
puntambekar.shubhangi@gmail.com

How to get rid of mobile addiction from kids parents did this trick viral video
मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Cyber ​​thieves rob senior citizen who advertised for remarriage Pune news
Pune Cyber Crime: पुनर्विवाहासाठी जाहिरात देणाऱ्या ज्येष्ठाला सायबर चोरट्यांचा गंडा
Paaru
Video : अनुष्का आदित्यच्या घरातील व्यक्तीचा अपघात घडवून आणणार? पारूला सत्य समजणार का? पाहा प्रोमो
Boys dance on nach re mora ambyahya vanat song at school get together function funny video goes viral
“नाच रे मोरा आंब्याच्या वनात” गेट दुगेदरला शाळेतल्या जुन्या मित्रांनी केला भन्नाट डान्स; VIDEO पाहून पोट धरुन हसाल
academic degree on experience
विश्लेषण : अनुभवाच्या आधारे पदवी कशी मिळणार?
Ministry of Statistics report reveals 25 6 percent youth deprived of education employment and skills
आजचे तरुण ‘बिन’कामाचे आणि ‘ढ’?
loksatta readers response loksatta news
लोकमानस : सत्यकथनासाठी निवृत्तीचा मुहूर्त
Story img Loader