तरुणांनो आज आपण जरा युवाविश्वात डोकावू यात. उद्याच्या भारताचे प्रतिनिधी म्हणून युवकांकडे पाहिलं जातं. आजच्या स्पर्धेच्या युगात तग धरताना तरुण पिढीला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं आहे. त्यातूनच मग नैराश्य, अगतिकता, वैफल्य, हताशा निर्माण होतात. काही तरुण-तरुणी तर आत्महत्या करण्याच्या निर्णयाप्रत येतात. सभोवताली सगळे असले, तरी त्यांना मदतीची गरज भासतेच. देशाचे उज्ज्वल भवितव्य घडवण्याची क्षमता असणाऱ्या, पण नैराश्याने ग्रासलेल्या या तरुण-तरुणींना सावरणाऱ्या आणि योग्य मार्गावर आणणाऱ्या सेवाभावी संस्थांची माहिती आपण करून घेऊ या.
आत्महत्येचे विचार मनात येणाऱ्या तरुण-तरुणींना त्या विचारांपासून परावृत्त करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर झटणारी ‘समरिटनस्’ ही सेवाभावी संस्था आहे. या संस्थेच्या शाखा मुंबईतही आहेत. आयुष्यात रस न राहिलेले, हताश, निराश, असहाय्य तरुण-तरुणी आत्महत्या करण्याच्या निर्णयाप्रत आलेले असतात. त्यांना जगण्याची उमेद देऊन भावनिक आधार देण्यासाठी या संस्थेच्या हेल्पलाइन आहेत.
दूरध्वनी करणाऱ्या तरुण-तरुणींची माहिती गोपनीय राखली जाते. प्रशिक्षित स्वयंसेवक व समुपदेशक ही विनामूल्य हेल्पलाइन चालवतात. या हेल्पलाइनचे क्रमांक आहेत ०२२-६५६५३२६७, ०२२-६४६४३२६७. सोमवार ते शनिवार दुपारी ३ ते रात्री ९ वाजेपर्यंत या क्रमांकावर समुपदेशक उपलब्ध असतात. त्यांचा इमेल आयडी आहे samaritans.helpline@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा