सर्वोच्च न्यायालयाने खाप पंचायतींबाबतीत नुकताच एक महत्त्वपूर्ण निकाल देऊन त्यांच्या कारवायांना चाप बसवण्यासाठी काही मार्गदर्शक सूत्र जाहीर केली आहेत. त्यांचे स्वागतच केले पाहिजे. एक तर ही याचिका २०१० पासून प्रलंबित होती, आणि दरम्यानच्या काळात अनेक राज्यांमध्ये तथाकथित इभ्रतीच्या नावाखाली घडलेल्या खुनांच्या किंवा अन्य प्रकारच्या अत्याचारांच्या घटना वाढलेल्या दिसतात. पूर्वी राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (NCRB) अशा स्वरूपाच्या गुन्ह्यंची नोंद ठेवत नव्हती, परंतु महिला संघटनांनी हा मुद्दा लावून धरल्यानंतर २०१४ पासून तथाकथित इभ्रतीच्या नावाने जे खून पाडले गेले आहेत, त्याची वेगळी नोंद ठेवायला सुरुवात केली आहे. २०१४ मध्ये असे २८ गुन्हे अधिकृतरीत्या नोंदवले गेले, तर २०१५ मध्ये त्यांची संख्या १९२ पर्यंत गेली; नंतरची आकडेवारी अद्याप उपलब्ध नाही. पण प्रसार माध्यमातून समोर आलेल्या घटना पाहिल्या तर हा चढता आलेख असावा, याबद्दल शंका नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा