फक्त पाच मिनिटांत कल्कीने स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन घडवण्याची जबाबदारी असणाऱ्या पण अत्यंत ओंगळपणे हाताळल्या जाणाऱ्या माध्यमांवर टीका करण्यासाठी बाईचा चेहरा, बाईचा आवाज, बाईनेच लिहिलेले शब्द आणि बाईशी संबंधित अनेक प्रातिनिधिक वस्तूंची प्रभावी योजना केली आहे. कल्की कोएचलीनच्या अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘प्रिंटिंग मशीन’ या व्हिडीओविषयी खास लेख..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

चर्र्र टक टक टाकाटाका टक..  तसे अर्थहीन वाटणारे हे शब्द, मात्र कल्कीच्या तोंडून तिचीच कविता ऐकताना हेच शब्द अर्थरूपाने साकार होत समोरच्यावर प्रभाव टाकतात. कल्की कोएचलीनने माध्यमांच्या बेजबाबदारपणाला मारलेली थोबाडीत म्हणजे ‘प्रिंटिंग मशीन’ हा व्हिडीओ.
रोजच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग म्हणजे वाचली जाणारी वर्तमानपत्रे व सतत ब्रेकिंग न्यूजचा भडिमार करणारी इलेक्ट्रॉनिक माध्यमे. याच माध्यमांद्वारे आपल्यापर्यंत स्त्रियांवर होणाऱ्या विविध अत्याचारांची माहिती पोहोचते. मात्र या बातम्यांना किती विविध कंगोरे असतात आणि समाज म्हणून आपली भूमिका कशी दुटप्पी असते हे अधोरेखित करण्यात कल्की या व्हिडीओच्या माध्यमातून यशस्वी झाली आहे. तिने लिहिलेली आणि सादरही केलेली ही कविता, पाच मिनिटांतच व्यापक आढावा घेते. या व्हिडीओची सुरुवात, मध्य, तसेच शेवट हे सगळेच बिंदू अतिशय प्रभावी आहेत. विषयावरून जराही न भरकटता विविध दृष्टिकोन अधोरेखित करण्यात आले आहेत. अर्थाने ओतप्रोत भरलेल्या अशा कलाकृती फार कमी जणांना जमतात. फक्त पाच मिनिटांत कल्कीने स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन घडवण्याची जबाबदारी असणाऱ्या पण अत्यंत ओंगळपणे हाताळल्या जाणाऱ्या माध्यमांवर टीका करण्यासाठी बाईचा चेहरा, बाईचा आवाज, बाईनेच लिहिलेले शब्द आणि बाईशी संबंधित अनेक प्रातिनिधिक वस्तू, प्रसाधनं, रंगांची प्रभावी योजना केली आहे.

अलीकडेच, जानेवारीमध्ये प्रकाशित झालेला ‘यूटय़ूब’वरचा हा व्हिडीओ एवढा परिणामकारक का आहे? त्याचा नेमका कसा अर्थ लागतो? त्याचं महत्त्व काय? याचा आढावा घ्यायचा, असं आम्ही दोघींनी ठरवलं. कलाकृतीमधील ताकद अद्भुतच असते. ती अगदी सर्वाच्या हृदयाला स्पर्श करते आणि एक वेगळाच मार्ग दाखवते. कोणाला त्यातून- ‘मला अगदी हेच म्हणायचं आहे’ असं वाटतं, तर कोणाला त्यातून नवा विचार सुचतो, कोणाला वाटतं की हे दृक्श्राव्य माध्यम एवढं प्रभावीपणे वापरणं केवढं आव्हानात्मक आहे तर कोणी त्यात वापरलेल्या साध्या, मानवी ताल-लयीने भारावून जातं तर त्यातली आशयघन माहिती मोठाच परिणाम काहींवर करते. आम्हा दोघींना असं वाटलं की, आपल्याला या व्हिडीओतलं काय नेमकं आवडलं ते सर्वाना सांगावं. ते शब्दबद्ध करावं.

‘हेडलाइन’ने सुरुवात होणारी ही कविता माध्यमांसोबतच समाजाचे ही विडंबन करते. सतत मेसेजेस, लेख, बातम्या, टॉक्स, सिनेमे, सीरियल्स यांचा भडिमार झेलत असणाऱ्या सामान्य माणसाला इतक्या साध्या व्हिडीओतून मांडलेला विषय कसा अंगावर काटा आणतो आणि मनात प्रश्नही निर्माण करतो हे विशेष लक्षात घेण्याजोगं आहे. सुरुवातीचा इ’४२ँ हा शब्द म्हणजे जणू     लाजणं आणि मुली यांचं कसं घट्ट नातं आहे! बायकांना खास आवडतो असा समज असणारा गुलाबी रंग पाश्र्वभूमीला असा काही दिसतो की, फक्त स्त्रियांसाठी केलेल्या एखाद्या उत्पादनाची जाहिरातच वाटावी. ज्याशिवाय स्त्रियांचं आयुष्य अपूर्ण आहे असं भासवून दिलं जातं, वर्षांनुर्वष आपल्या डोळ्यांवर, मेंदूवर ज्या विचारांनी पकड घेतली आहे तो हा गुळगुळीत, गोंडस, गुलाबी रंग. पाठोपाठ ४ल्ल वाढवून झालेला ४ल्लुँ’४२ँ आणि शेवटी लागणारा डॉट ईडी यांनी त्याला वेगळाच वास येऊ  लागतो. ईडी म्हणजे टेक्स्ट एडिटर किंवा प्रिंट एडिशन. आधीच कल्कीने केलेलं काही तरी नक्कीच वेगळं असणार अशा धारणेने आपण बघत असताना हे सगळं मोठं उपरोधक रूपक वाटू लागतं. त्यात ४ल्लुँ’४२ँ.ी िया शब्दावर काट मारली जाते. उलटपालट विचार करायला लावून शब्द खोडून टाकला जातो. खरंच स्त्रीची प्रतिमा माध्यमांनी स्त्रीलाच विसरायला लावली आहे!

काळ्या पाश्र्वभूमीच्या एका पॉझ आणि टायटल, क्रेडिटनंतर सुरू होतो काळ्या शाईचा पांढऱ्या कागदावरचा प्रवास. त्यात फक्त एकच जास्तीचा रंग असतो- स्किन कलर! हजारो प्रकारचे त्वचेचे रंग अस्तित्वात असताना गोरा रंगच स्किन कलर बरं का! अंगाच्याच रंगाच्या कापडांनी झाकलेलं शरीर जणू नग्नच वाटावं. संपूर्ण पाच मिनिटांत, गुंडाळलेलं कापड नुसतं ओढलं तर सुटेल आणि स्त्रीचं शरीर तोंडाला पाणी सुटलेल्या जिभांना दिसेल असा आभास निर्माण होतो. छाया-प्रकाश असा काही खास वापरला आहे की, स्त्री शरीराचे सर्व कंगोरे, उंचवटे ठळक दिसावेत. बॅकग्राऊंडचे बदलणारे काळे पांढरे रंग विरोधाभास मजबूत करतात. पुरुषी नजरांना आवडणारी, पोटाखाली गुदगुल्या करणारी, मांडय़ा वपर्यंत दाखवणारी माध्यमातील बाई, तोकडय़ा कपडय़ाआडून अजून काय दिसू शकेल असा विचार करायला लावणारी तिची वस्त्र; मध्येच मेक-अप केलेला आणि मध्येच न केलेला, चेहेऱ्यावरचे डाग दाखवणारा खरा चेहरा. डोळ्यातला हायलाईट म्हणजेही एक ठिपक्यांची चौकोनी खिडकी आहे. टाइप करण्याचा आवाज जेवढा एकसुरी आणि भावनारहित आहे, तेवढाच रुक्षपणा प्रत्येक शब्दाच्या उच्चारात आहे. जणू शब्दांना भावनाच नसतात. जणू स्त्रियांनाही नसतात.

बातम्यांचे मथळे झळकल्यानंतर स्वाभाविकपणे येणाऱ्या पुरुषप्रधान वक्तव्यांचाही यात समावेश आहे. बलात्कार, फसवणूक यांना बळी पडलेल्या स्त्रियांबद्दल केवळ सहानुभूती तात्पुरती दाखवली जाते, त्या सहानुभूतीच्या पाठोपाठ स्त्रीलाच दोषी ठरवणारी विधाने कानावर पडतात. कपडे असे का घातले? रात्रीच घराबाहेर कशाला पडायचं? हे प्रश्न स्त्रीला दुय्यम ठरवणारे तसेच पुरुषसत्ताक व्यवस्थेचे प्रतिनिधित्व करणारे असतात. हे कल्की शब्दातून सांगत नाही, तर आवाजातील चढ-उतारातून ते अतिशय सुंदररीत्या मांडते. संगीत, शब्द आणि आवाजातील चढ-उतार याद्वारे काळजाला थेट हात घालण्यात कल्की यशस्वी झाली आहे.

रोजच्या जीवनाचा भाग असलेली प्रिंटिंग मशीन ज्याप्रमाणे संवेदनशून्य असते त्याचप्रमाणे माध्यमातून येणाऱ्या बातम्या अनेकदा संवेदनाहीन होऊन जातात. समाज या बातम्यांकडे तितक्याच संवेदनशून्यपणे बघतो. ‘रोजचेच मढे त्याला कोण रडे’ याच नियमाने स्त्री अत्याचाराकडे पाहिले जाते. समाजाबरोबरच प्रशासकीय यंत्रणेचाही हाच दृष्टिकोन असतो हे कल्की यशस्वीरीत्या दाखवते. माध्यमांतून येऊन धडकलेल्या बातम्यांमुळे प्रशासकीय यंत्रणा जरी हलल्यासारखी वाटली तरी त्यावर होणारे राजकारण हे जातीपासून रंगावरही उतरते आणि पुन्हा एकदा पुरुषसत्ताकतेकडेच येऊन थांबते. अशा प्रकारे स्त्रिया बळी जात असतानाच याच माध्यमातून स्त्रीला अधिकाधिकरीत्या वस्तू म्हणून सर्वासमोर मांडले जाते. सौंदर्यप्रसाधन त्याबरोबरच विविध मासिकांत झळकणाऱ्या स्त्रियांचे वस्तुकरण झाल्याचे आपल्या लक्षात येते. स्त्रीने अधिकाधिक नाजूक-साजूक, हलके-फुलके असावे. खरे तर तिने पुरुषांचे मनोरंजनच केले पाहिजे असे चित्र इतर माध्यमातून रंगवले जाते.

नंतरच्या भागात स्त्रीच्या अंगावर स्लाइडस, पोस्टर्स यांमुळे पडलेला अर्धवट उजेड; त्यात जबरदस्तीने उभी असलेली बाई. सगळंच अधिकच अस्वस्थता वाढवतं. का आपण माध्यमांवर एवढा विश्वास ठेवतो? त्यांच्या सांगण्यावरून स्वत:ची मतं तयार करतो? का बाई खवळून उठत नाही आणि पुरुषप्रधानतेनी तयार केलेली वीण झुगारून देत नाही? स्वत:चा रंग, रूप, फिके-गडद अंगावरचे डाग, जाड-बारीक-  बुटका-उंच कसाही शरीराचा आकार, हवं तसं राहाणं, हवे तसे कपडे घालणं, हव्या त्या वेळी बाहेर जाणं, हवं ते करणं, मोकळेपणाने वावरणं, स्वत:ची मर्जी शोधून काढणं, मर्जीप्रमाणे वागणं- का नाही करू शकत बाया? सर्व ठिकाणी माध्यमांची बाईवर नजर आहेच. खऱ्या परिस्थितीत आणि माध्यमांनी दाखवलेल्या परिस्थितीत एवढी दरी तरी का आहे? ती आपण का स्वीकारायची? असे असंख्य प्रश्न कल्की या एका कलाकृतीतून फार प्रभावीपणे विचारते.
अशा प्रकारे स्त्रियांचे चित्रीकरण होत असताना, समाज म्हणून तसेच आपली व्यक्ती म्हणूनही ठाम भूमिका असायला हवी, मात्र ते होताना दिसत नाही. समाजमाध्यमांसारखे प्रभावी माध्यम आपल्या हातात असतानाही सामान्य माणूस इतर माध्यमांप्रमाणेच वागतो आणि तीच संवेदनशून्यता दाखवत आपल्या हातातला मोबाइल जणू प्रिंटिंग मशीनमध्ये परिवर्तित होतो. याबरोबरच समाजाची असलेली दुटप्पी भूमिका कल्की अत्यंत समर्पकपणे चितारते. बातम्या वाचून कासावीस होणारे, तोच विषय जेव्हा घरात येतो तेव्हा मात्र भूमिका सहज बदलून टाकतात. स्त्रियांचे लग्न आणि बाहेरील अशा घटना यांचा काहीच संबंध नसतो. घरातले पुरुष हे वाईट वागूच शकत नाहीत. या व अशा अनेक बाबींची सबब पुढे करत परत स्त्रियांना घराच्या चौकटीत बंद करू पाहतात आणि स्त्रियांनी व्यक्तच होऊ  नये अशी व्यवस्था तयार करतात. ‘पर्सनल इज पॉलिटिकल’ हे स्त्रीवादी नेहमीच मांडत आल्या आहेत. मात्र याच्या अगदी विरुद्ध मत पुरुषसत्ताक व्यवस्था मांडते आणि तेच मत समाजमाध्यमातून फिरताना दिसते. प्रत्येक वेळेला स्त्रीच्या शुद्धतेवर प्रश्नचिन्ह तयार करायचे आणि तिच्या अस्तित्वावरच घाला घालायचा. या सगळ्यात बातम्या रद्दीत जमा होत जातात, बदल मात्र फारसा काही होत नाही.
एवढी चांगली कलाकृती कल्कीचे लेखिका, अभिनेत्री, दृक्श्राव्य माध्यमाची खंदी अभ्यासक, स्त्रियांच्या खऱ्या प्रश्नांची ओळख असणारी व्यक्ती, सौंदर्याचा गाभा समजलेली प्रयोगशील कलाकार असे अनेक पैलू उलगडते. मागे ८ मार्चला एक अतिशय प्रभावी नाटक तिनेच लिहून सादर केलं होतं,

तेव्हाही तिच्या विचारांची खोली मनात घर करून राहिली होती. ‘प्रिंटिंग मशीन’ या नवीन कलाकृतीमुळे नव्या विषयांना नव्या माध्यमातून कसं नावीन्यपूर्ण आणि परिणामकारक पद्धतीने हाताळता येऊ  शकतं याचं सुरेख उदाहरण कल्कीने आपल्यासमोर उभं केलं आहे. त्याची कदर करणं रसिकांच्या हातात आहे. हा सगळा प्रवास कल्की इतका सुंदर मांडते की, तिची ‘प्रिंटिंग मशीन’ काळजाकडून मेंदूकडे आणि मेंदूकडून पुन्हा काळजाकडे प्रवास करत राहाते आणि आपल्याही काळजात होत राहातं.. चर्र्र चर्र्र चर्र्र..
या व्हिडीओची लिंक-

– प्रियदर्शिनी हिंगे /आभा भागवत
(प्रियदर्शिनी हिंगे या स्त्री प्रश्न व नातेसंबंधांवर काम करणाऱ्या अभ्यासक असून आभा भागवत चित्रकार आहेत.)