बागेतील रोपांना द्रावणयुक्त खतेही देणे महत्त्वाचे व गरजेचे असते. कारण ती ताबडतोब लागू होतात. ही खते फक्त द्रव नसून ते झाडांसाठी संजीवनी देणारे आहेत म्हणून त्यास संजीवके असे म्हणतात. घरच्या घरी व साध्या सोप्या पद्धतीने तयार करता येणारी संजीवके.
गोमूत्र : देशी, गावरान गायीचे शेण हे जसे उपयुक्त आहे तसेच गोमूत्र हे बागेसाठी सर्वोत्तम आहे. गोमूत्र मानवी आरोग्यास जसे लाभदायक आहे. तसेच ते बागेच्या एकूणच शेतीच्या भूआरोग्यासही उपयुक्त आहे. वातावरणात पसरलेले गोमूत्र हे मनुष्याची श्वसनक्षमता वाढवण्यास मदत करते. गोमूत्राची तीव्रता, त्याची प्रत प्रत्येक प्रदेशानुसार बदलत राहते. साधारणत: २०० ते २५० मिली गोमूत्रात पाच लिटर पाणी टाकून ते झाडांना आठवडय़ातून एकदा याप्रमाणे झाडांच्या आवश्यकतेनुसार द्यावे. गोमूत्रात खारटपणा तीव्र असल्यामुळे मातीत मिसळल्याने गांडुळांसाठी ही माती चविष्ट बनते.. तसेच ते बुरशीनाशक असल्यामुळे रोपांना मूळ कुजक्या रोगांपासून संरक्षण करता येते. बाल्यावस्थेतील रोपे, फांद्या नव्याने लागवड करताना त्यास या द्रावणात भिजवून घेतल्यास त्याचे संरक्षण करता येते. गोमूत्र हे जसे संजीवक आहे तसे ते फवारणीसाठीसुद्धा योग्य आहे. गोमूत्र हे दीर्घकाळ संग्रहित करता येते. ते जितके जुने तेवढे त्याचे गुणधर्म वाढीस लागतात.
शेणाची स्लरी : बरेचदा ठिकठिकाणी बायोगॅसचे सयंत्र बसवले जातात. यातून बाहेर पडणारी स्लरी वा द्रावण बागेसाठी उपयुक्त असते. त्यात अधिकचे पाणी मिसळून ते बागेस पुरवले जाते. पण छोटय़ा प्रमाणातही असे द्रावण आपण घरच्या घरी बनवू शकतो व ते बागेस देऊ शकतो. शक्यतो देशी गायीचे ताजे शेण वापरावे. एक किलो ताज्या शेणात २० लिटर पाणी तयार करता येते. साध्या पाण्यात शेण चुरून टाकावे. हे द्रावण कुंडीतील बारीक छिद्र बुजवण्याचे अर्थात भरून काढण्याचे काम करते. त्यामुळे कुंडीस पाणी दिल्याबरोबर वाहून जाण्यास अटकाव होतो. शेणातील सूक्ष्म फायबर म्हणजेच तंतुमय पदार्थ ओलावा टिकवून धरण्याचे काम ही स्लरी करते. अशा द्रावणासाठी ताजेच शेण वापरावे. त्यात जिवाणूंची संख्या अधिक असल्यामुळे माती सुदृढ होण्यास मदत होते. या द्रावणामुळे गांडुळांची संख्या वाढते तसेच ते सशक्त होतात. २ ते ३ दिवस पुरवून पुरवून वापरता येते. त्यानंतर त्यास दरुगध येतो. शहरात भटकणाऱ्या गायीचे शेण वापरू नये, त्या बरेचदा शिजवलेले अन्न खातात. त्यामुळे त्यांच्या शेणास कुबट वास येतो. असे शेण वापरण्याचे टाळावे. देशी गायीच्या शेणाची स्लरी ही कुंडीतील जैवभार कुजवण्यासही मदत करतात. हा सराव पंधरा दिवसांतून एकदा किंवा गरज भासल्यास करावा.

संदीप चव्हाण
sandeepkchavan79@gmail.com

Sharad Pawar
“राज्यात दहशतीचं वातावरण, कृपा करा अन्…”, शरद पवारांकडून मस्साजोगच्या ग्रामस्थांना धीर; म्हणाले, “आता आपण सगळ्यांनी…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
loksatta readers feedback
लोकमानस: मारकडवाडीतील दडपशाही असमर्थनीय
amdar niwas Nagpur , Amol Mitkari Grievance ,
आमदार निवासातील गरम पाण्याचे गिझर बंद; आमदार म्हणतात, “अंघोळ करायची कशी?”
Ravi Rana amravati unhappy, Ravi Rana latest news,
Ravi Rana : रवी राणांची नाराजी कायम; अधिवेशनात उपस्थित न राहता गोसेवेत व्यस्त
Tula Shikvin Changalach Dhada promo
भुवनेश्वरीचा प्लॅन यशस्वी! सासूला खडेबोल सुनावून अक्षरा घर सोडून जाणार…; मास्तरीण बाईंना अधिपती म्हणाला…
loksatta readers feedback
लोकमानस: तात्कालिक स्वार्थाचा विचार हेच कारण
geyser blast reason how to avoid geyser explosion stop doing these mistakes to prevent the blast bride death due to geyser blast
गिझरचा स्फोट होऊन नववधूचा मृत्यू! असा भयंकर अपघात टाळण्यासाठी ‘या’ सामान्य चुका टाळा
Story img Loader