आजच्या जगण्याचा मंत्र आहे, तंत्रज्ञान शिका, मजेत जगा. त्यातलंच एक अतिमहत्त्वाचं ठरत चाललेलं इंटरनेट. अबालवृद्धांपासून सगळ्यांनाच छोटय़ा-मोठय़ा कामासाठी इंटरनेट गरजेचा वाटायला लागला आहे.
इंटरनेट- गुगल कसा सुरू करावा?
१. इंटरनेट वापरण्याकरिता संगणक सुरू केल्यानंतर संगणकाच्या डाव्या कोपऱ्यात असलेल्या स्टार्ट या हिरव्या बटणावर कॉम्प्युटरचा माऊस घेऊन जा आणि माऊसचा उजवा भाग हलकेच दाबा वा क्लिक करा. (आकृती १)
२. ऑल प्रोग्राम्स किंवा प्रोग्राम्समध्ये जाऊन गुगल क्रोम, मोझिला, इंटरनेट यांपकी एखाद्या नावावर (ब्राउजर) क्लिक करा.
३. इंटरनेटचे पान (विंडो) उघडल्यावर वरील बाजूस असलेल्या निळ्या पट्टीच्या खाली दिसणाऱ्या मोकळ्या जागी http://www.google.com असं टाइप करा.
(आकृती २)
४. आता तुमच्यासमोर गुगलचं पान (पेज) सुरू होईल.
५. गुगल असं रंगीत अक्षरांत लिहिलेल्या नावाच्या खाली
असलेल्या जागी आपल्याला हवा तो शब्द लिहून माहिती शोधता येते.
(आकृती ३)आज इतकंच.
पुढच्या भागात माहिती घेऊ- गुगल कसं वापराल?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा