गेल्या वर्षभरात‘देहभान’ या सदरात अनेक ‘बोल्ड’ विषय हाताळले गेले. हे शक्य झालं, ते या विषयांतल्या तज्ज्ञांच्या मदतीमुळे आणि अगदी पहिल्या लेखापासून वाचकांनी भरभरून ई-मेल व पत्रांद्वारे आपले अनुभव, समस्या कळवून नवीन विषय सुचण्यास केलेल्या साहाय्यामुळेच. हा विषय ‘अळीमिळीगुपचिळी’ न राहाता, खुलेपणानं त्याबद्दलची सखोल माहिती घेतली पाहिजे, हेच या सदरानं या वर्षभरात अधोरेखित केलं.
निरामय लैंगिकता हे मध्यवर्ती सूत्र ठेवत गेले वर्षभर सुरू असलेल्या ‘देहभान’ सदराला राज्यभरातून वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे या समारोपाच्या लेखाची सुरुवात समस्त वाचकांचे मनापासून आभार मानून करावीशी वाटतेय.
आभार मानण्यामागे केवळ औपचारिकता नाहीये.. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं, तर हे सदर सुरू करण्यापूर्वी नाही म्हटलं तरी मनावर दडपण होतं. याचं मुख्य कारण म्हणजे लैंगिकता या विषयाची असलेली सखोल व्याप्ती. एकीकडे या विषयाची व्याप्ती मोठी आहे, तर दुसरीकडे लैंगिकतेकडे बघण्याचा समाज म्हणून आपला दृष्टिकोन अजूनही संकुचित आहे. त्यामुळेच हा विषय उलगडताना लैंगिकतेबरोबर येणारा अवघडलेपणा दूर करत तो निकोप पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न होता. ‘अळीमिळीगुपचिळी’वर बोलताना!’ या पहिल्या लेखात मांडलेल्या सदराच्या वार्षिक रूपरेषेलाच वाचकांचा इमेलरूपी उत्तम प्रतिसाद मिळाला. या लेखात केलेल्या आवाहनानुसार काही तज्ज्ञांनीही संपर्क साधला.
लग्नानंतर अनेक वर्ष शरीरसंबंध न जमण्याची समस्या असणाऱ्या जोडप्यांचं प्रमाण मोठं आहे. यालाच ‘विवाहाची अपूर्तता’ (Unconsummated Marriage) म्हणतात. या समस्येचं भारतासह आशियाई देशांमध्ये असलेलं लक्षणीय प्रमाण, त्यामागील कारणं आणि उपचारांची माहिती ‘वैवाहिक अपूर्तता’ लेखाद्वारे देण्यात आली.
अगदी दहा-बारा वर्षांपूर्वीपर्यंत फेब्रुवारीची सुरुवात ‘व्हॅलेंटाइन डे’च्या उलटसुलट चर्चानी व्हायची. पण गेल्या काही वर्षांत या गुलाबी दिवसाची हवा अचानक गुलझालीय. ‘व्हॅलेंटाइन डे’चं प्रस्थ कमी होण्यामागे काही प्रमाणात करोना आणि बाजारपेठेतल्या चढउतारांचा वाटा असला, तरी त्याचं मूळ प्रेम, एकनिष्ठता, शरीरसंबंध आणि एकूणच स्त्री-पुरुष संबंधांकडे बघण्याच्या तरुणाईच्या बदललेल्या दृष्टिकोनात आहे का, याचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न ‘हरवलेला व्हॅलेंटाइन डे’ या लेखात केला.
‘लैंगिक अनुरूपता महत्त्वाचीच’ या लेखात लग्नाचा निर्णय घेताना जोडप्यांनी बाकी गोष्टींप्रमाणेच आपण लैंगिकदृष्टय़ा एकमेकांना पूरक आहेत का, मुळात दोघांचे सहजीवना- संदर्भातले, कामजीवनासंदर्भातले नेमके विचार काय आहेत, एकमेकांकडून असलेल्या अपेक्षा, फँटसी काय आहेत, अशा महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.
मधुचंद्राचा काळ संपून प्रत्यक्ष संसार सुरू झाल्यावर शरीरसंबंधांच्या प्रमाणात चढ-उतार येतात का, वाढत्या वयानुरूपकामेच्छा कमी होते का, त्यात स्त्री-पुरुष भेद असतो का, याचा ऊहापोह ‘कामेच्छेचा लंबक’ या लेखाद्वारे करण्यात आला. त्यानंतरच्या दोन लेखांमध्ये शीघ्रपतन आणि लिंगाच्याताठरतेतील दोष (Erectile Dysfunction) या सर्वच वयोगटातील पुरुषांना भेडसावणाऱ्या समस्यांचा वेध घेण्यात आला. वेगवेगळ्या संशोधनांनुसार समाजातल्या तब्बल एक तृतीयांश पुरुषांना शीघ्रपतनाच्यासमस्येनंग्रासलेलं असू शकतं. शीघ्रपतन ही ठळक लैंगिक समस्या असली, तरी तिचा उल्लेख लैंगिक आजार म्हणून केल्याचा कुठल्याही पुस्तकात आढळत नाही. याचं मुख्य कारण म्हणजे अकाली वीर्यपतनामागेबहुतांश वेळा शारीरिक कारणांपेक्षा मानसिक कारणं असतात. शीघ्रपतनाची लक्षणं आणि त्यावरील उपचारांचा मागोवा ‘पतन-दमनाच्या पलीकडे’ या लेखात घेण्यात आला. तर ‘आदीम जागेचं दुखणं’ या लेखात शीघ्रपतनाइतकाच पुरुषांत- विशेषत: चाळिशीपुढच्या पुरुषांना प्रकर्षांनं भेडसावणाऱ्या लैंगिकता ठरते बद्दलच्या समस्येचा सविस्तर वेध घेण्यात आला.
गर्भारपण हा जोडप्यांच्या आयुष्यातला खास टप्पा असला, तरी या काळात शरीरसंबंध ठेवलेले चालतात, की नाही याविषयी अनेक समज-गैरसमज आहेत. काही पथ्य पाळली तर या नाजूक काळातही स्त्री-पुरुष शरीरसुखाचा निरामय आनंद घेऊ शकतात, याचा उलगडा ‘गर्भारपणातील कामसुख’ या लेखात करण्यात आला. तर ‘कामजीवन -आईबाबा झाल्यानंतरचं!’ या लेखात प्रसूतीनंतर कामजीवनाची पूर्ववत घडी बसायला नेमका किती कालावधी आवश्यक असतो, ते करताना कोणती खबरदारी घ्यावी, सुरुवातीला समागमापेक्षा प्रणयावर ( foreplay) भर का द्यावा, असे महत्त्वाचे पैलू उलगडण्यात आले.
व्यसन- मग ते सिगारेट-दारूचं असो की गांजा-अफूचं; ते वैवाहिक जीवनावर आणि कामजीवनावरही विपरीत परिणाम केल्याशिवाय राहात नाही. त्यामुळेच वेगवेगळय़ा व्यसनांचा कामेच्छेवर आणि लैंगिक क्षमतेवरही कसा दूरगामी परिणाम होतो याचा आढावा ‘संसाराचा ताल बिघडवणारे नाद’ या लेखात घेतला. तो घेताना व्यसनांवर यशस्वीपणे मात करत संसाराची विस्कटलेली घडी सावरलेल्या काहींच्या प्रत्यक्ष अनुभवांचाही समावेश लेखात करण्यात आला.
जागतिक आरोग्य संघटनेनं काम-व्यसनाधीनता-अर्थात ‘सेक्सअॅ डिक्शन’ला मानसिक आरोग्य विकृती म्हणून घोषित केलं आहे. सतत मनात येणारे लैंगिक विचार किंवा प्रेरणा आणि ती लैंगिक वर्तनात बदलणं ही काम-व्यसनाधीनता. या समस्येची व्याप्ती आणि उपचारांचा वेध ‘काम-व्यसनाधीनतेचा कडेलोट!’ या लेखात घेण्यात आला.
वैवाहिक सहजीवनातकामविषयक संवाद अत्यंत महत्त्वाचा ठरतो. मात्र याची कित्येक जोडप्यांना माहितीच नसते. माहिती असली तरी बऱ्याचदा संकोच आडवा येतो आणि ‘फोरप्ले’ला पुरेसा वेळ न देताच संभोग झटपट उरकण्याकडे कल राहतो. अशा जोडप्यांमध्ये- विशेषत: स्त्रियांमध्ये लैंगिक असमाधानाची भावना वाढू शकते. त्यामुळेच कामसंवादजोपासण्याविषयीचे विचार ‘संवाद.. कामसंवाद’ या लेखाद्वारे मांडण्यात आले.
बाळासाठी इच्छुक असलेल्या अनेक जोडप्यांना मूल न होण्यामागे केवळ शारीरिक कारणंच नसतात. वरवर गर्भधारणेशी संबंधित न वाटणाऱ्या जीवनशैलीतल्या अनेक गोष्टी जननक्षमतेवर थेट परिणाम करतात. त्यामुळे निरोगी आरोग्य प्राप्त करण्याच्या प्रयत्नांमध्ये जननक्षमता वृद्धिंगत होईल अशी सकारात्मक जीवनशैली अवलंबण्यावर कसा भर द्यायला हवा, याचं विवेचन ‘जीवनशैलीचं नातं जननक्षमतेशी’ या लेखात करण्यात आलं.
लग्नाला ठरावीक वर्ष झाल्यावर बाकी गोष्टींप्रमाणेच कामजीवनातही एक प्रकारचा तोचतोचपणा येण्याची शक्यता असते. त्यामुळेच शरीरसंबंधांत नावीन्य आणण्यासाठी किंवा पती-पत्नी काही कारणानं दूर असतील तर लैंगिक स्व-सुखासाठी सेक्सटॉइजचा वापर करावा का, या विषयाचा आढावा ‘सेक्सटॉइज: एक पर्याय’ या लेखात घेण्यात आला.
वैवाहिक कामजीवनातील समस्या, लैंगिकअनुभूतीतील (orgasm) अडथळे, तसंचवेगवेगळय़ा कारणांनी एकटं-एकाकी राहणाऱ्या स्त्री-पुरुषांचं प्रमाण वाढत असताना लैंगिक स्व-सुखाला अर्थात ‘सेल्फप्लेजर’ला चिकटलेलाअपराधगंड काढला तर जगणं खरंच आनंददायी होऊ शकेल का, या दुर्लक्षित विषयाचा वेध ‘स्व-सुखामागीलअपराधगंड’ या लेखात घेण्यात आला.
आपल्या जननेंद्रियांचा आकार, त्यांची लांबी-रुंदी योग्य नाहीये आणि त्यामुळे आपण आपल्या जोडीदाराला लैंगिक सुख देऊ शकत नाही, असा न्यूनगंड अनेक पुरुषांच्या आणि स्त्रियांच्याही मनात असतो. हे गैरसमज रुजण्याची कारणं नेमकी काय आहेत आणि कुमारवयापासून मनात ठाण मांडून बसलेल्या या न्यूनगंडांवर मात कशी करायची, याचं विश्लेषण ‘आकाराचा न्यूनगंड’ या लेखाद्वारे करण्यात आले.
बाललैंगिकअत्याचारांचंवाढतं प्रमाण-व्याप्ती बघता परिचितांमुळे किंवा त्रयस्थ व्यक्तींमुळे लहानपणी गुदरलेल्यालैंगिक अत्याचाराच्या गडद छाया प्रौढ वयातही राहतात का आणि त्याचा थेट परिणाम वैवाहिक कामजीवनावर होतो का याचा वेध ‘करपलेलं बालपण, होरपळणारं सहजीवन’ या लेखाद्वारे घेण्यात आला. तर ‘ताण अन् काम’ या लेखात वेगवेगळय़ा दैनंदिन ताणांचा थेट परिणाम वैवाहिक कामजीवनावर कसा होतो आणि त्याचं योग्य नियोजन करत ते पूर्वपदावर कसं आणायचं, हे मांडण्याचा प्रयत्न केला.
मासिक पाळीविषयी न बोलण्याचं अलिखित धोरण असल्यानं पाळीच्या समस्यांमुळे स्त्रियांच्या कामेच्छेततसंच जोडप्यांच्या कामजीवनात कसे अडथळे निर्माण होतात, याचा उलगडा ‘कामजीवनातली‘अडचण’ या लेखाद्वारे करण्यात आला.
चाळिशीच्या आसपास झडप घालणाऱ्या‘मिडलाइफक्रायसिस’मुळे पती-पत्नीचं नातं कोमेजून जाऊ नये, सहजीवनातलाचार्म हरवू नये यासाठी जोडप्यांनी नेमकं काय करायला हवं, रोलप्ले, फँटसी यासारख्या गोष्टींमुळे कामजीवनात नवीन सूर गवसू शकतो का, या सहसा चर्चिल्या न जाणाऱ्या विषयांवर ‘श्रृंगार फुलवणारं‘नाटक’ ’ या लेखाद्वारे भाष्य करण्यात आलं.
‘मोल्ड फॉर इचअदर!’ या लेखाद्वारेविवाहबाह्य संबंधांच्या वेगवेगळय़ा पैलूंचा विचार करण्यात आला. आपल्या पतीचं किंवा पत्नीचं ‘अफेअर’ आहे हे माहिती असूनही मुलांसाठी लग्न न मोडणाऱ्याकाहींचं अनुभवकथन, ‘ओपन मॅरेज’ म्हणजे नेमकं काय आणि केलेल्या चुकांना विसरत नव्यानं सहजीवन फुलवण्यासंदर्भातल्यावेगवेगळय़ा विषयांचा वेध या लेखात घेण्यात आला.
लैंगिक आजारांच्या बाबतीत आपली मजल ‘एचआयव्ही’बद्दल माहिती असण्यापलीकडे जात नाही. पण ‘एचआयव्ही’इतकेच गंभीर किंवा योग्य औषधोपचारांनी बरे होणारे इतर अनेक ‘सेक्शुअलीट्रान्समिटेडडिसीजेस’ (एसटीडी) आहेत. त्यांची माहिती लैंगिकदृष्टय़ा सक्रिय असलेल्या प्रत्येक जोडप्याला असणं आवश्यक आहे. या महत्त्वाच्या विषयाचा वेध ‘क्षण एक मोहाचा..’ या लेखाद्वारे घेण्यात आला.
ज्येष्ठांच्या सहजीवनाकडे आणि कामेच्छेकडेही निकोप दृष्टिकोनातून बघण्याची आवश्यकता का आहे, हे ‘सेक्सचे गोल्डन इयर्स’ या लेखाद्वारे उलगडण्यात आलं. तर संततीनियमनाचे वेगवेगळे पर्याय, त्याविषयीचे गैरसमज, संततीनियमनाचागांभीर्यानं विचार करण्याची आवश्यकता, असे वेगवेगळे मुद्दे ‘नियमनाचे पर्याय!’ या लेखाद्वारे मांडण्यात आले.
या सदराच्या निमित्तानंलैंगिकतेच्या विषयात मोलाचं काम करणाऱ्यावेगवेगळय़ा शहरांतले-तालुक्यांतले डॉक्टर, मनोविश्लेषक, समुपदेशक, वकील, सामाजिक कार्यकर्ते यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. आपल्या अनुभवांनी संपन्न केलेल्या या सगळय़ा विषयांतल्या तज्ज्ञांना मन:पूर्वक धन्यवाद! ‘देहभान’ सदरातले अनेक विषय हे दुर्लक्षित किंवा ‘बोल्ड’ या प्रकारात मोडणारे होते. पण मला मोकळेपणानं लिहिण्याची मुभा दिल्याबद्दल ‘लोकसत्ता’चे संपादक आणि ‘चतुरंग’च्या टीमचे मनापासून आभार!
‘देहभान’ सुरू होऊन दोन-तीन महिने लोटले होते. एका रविवारी माझ्या मुलाच्या शाळेतल्या एका ताईंचाफोन आला. त्यांनी या सदरात प्रसिद्ध होणाऱ्या लेखांची कात्रणं एकत्रित करण्यासाठी पुढाकार घेतला होता. प्रकाशित झालेल्या प्रत्येक लेखाचं फायिलग करून त्यांनी ही फाइल इतर शिक्षकांना पाहण्यासाठी म्हणून शिक्षक खोलीत ठेवली. लैंगिकतेचा विषय ‘अळीमिळी’चा न राखता त्यावर मोकळेपणानं चर्चा करण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचललं होतं. यातूनच पुढे पालक-शिक्षकांसाठी मुलांच्या लैंगिकताशिक्षणासंदर्भातलं एक छोटेखानी सत्र शाळेत पार पडलं. निरोगी समाज घडवण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकजण आपापल्या परीनं काही तरी करू शकतो, त्याची पुन:प्रचीतीच या कृतीनं मला आली. मला आलेल्या वाचकपत्रांमुळे लोक निदान बोलायला लागले आहेत याचा सुखद आनंदही आहेच. असेच लैंगिकतेवरमोकळेपणानं व्यक्त होऊ या, निकोप कामसंवाद वाढवू या!
niranjanmedhekar1@gmail.com
(सदर समाप्त)