अशोक रावकवी rowkavi@gmail.com

मुंबादेवीनं, माझ्या आईनं सोपवलेली सगळी जबाबदारी मी पार पाडली आहे असं मी समजत होतो खरा, पण तिच्या मनात मात्र काही वेगळंच होतं.

Old man died in school bus hit, Old man died in school bus hit Borivali, Borivali latest news,
बोरिवलीमध्ये बसच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू
Daily Horoscope On 30 October
३० ऑक्टोबर पंचांग: दिवाळीआधीच येईल सोनेरी संधी, आर्थिक…
Mahavikas aghadi Seat Sharing Formula
MVA Seat Sharing : मविआचं ठरलं! कोणी मोठा व लहान भाऊ नाही, सर्वांनाच सम-समान जागा
ulta chashma
उलटा चष्मा : ‘देवा’घरचा न्याय…
Babar Azam was advised by Virender Sehwag
Babar Azam : ‘जेव्हा तुमचा खराब काळ चालू असतो, तेव्हा…’, वीरेंद्र सेहवागने बाबर आझमला दिला महत्त्वाचा सल्ला
Viral Video: an old man's Hilarious Ukhana
VIDEO : “…. नाव घेतो हिल पोरी हिला” पंढरपुरच्या आजोबांनी बायकोसाठी घेतला भन्नाट उखाणा, व्हिडीओ होतोय व्हायरल
Who Left BJP Due to Ajit Pawar?
Laxman Dhoble : “अजित पवारांच्या त्रासाला कंटाळून मी भाजपा सोडतो आहे”, माजी मंत्र्यांची घोषणा! आता हाती घेणार तुतारी
madhuri dixit 25th wedding anniversary
भर कार्यक्रमात प्रपोज, रोमँटिक डान्स अन्…; लग्नाला २५ वर्षे पूर्ण होताच माधुरीच्या पतीची खास पोस्ट, डॉ. नेने म्हणाले…

मुंबादेवीच्या देवळाबाहेर दरवाजापाशी बसलेला हा अस्वस्थ आणि पराभूत दिसणारा वृद्ध माणूस आहे तरी कोण? त्याच्या चेहऱ्यावर एकीकडं अनिश्चितता तर दिसते आहे, पण त्याच वेळी बाहेरचा सगळा कोलाहल-गोंगाट यांपासून मुक्तता मिळवायला तो आत जायला इच्छुकही दिसतो आहे.

या मंदिराच्या एका बाजूला तांबट कट्टा आहे. तिथले भांडय़ांचे व्यापारी तांबं, अ‍ॅल्युमिनियम आणि स्टेनलेस स्टीलची भांडी विकण्यात रममाण झालेले आहेत, तर दुसऱ्या बाजूला आहे कॉटन एक्स्चेंज-अनेक गुजराती व्यापाऱ्यांनी मिळवलेल्या समृद्धीचं हे ठिकाण! अमेरिकन यादवी युद्धामुळं जेव्हा इंग्लंडमधल्या कापड गिरण्यांना कापसाच्या पुरवठय़ाचा तुटवडा जाणवू लागला, तेव्हा त्यांनी भारतात कापूस पिकवायला सुरुवात केली आणि नजीकच्या मुंबई बंदरातून त्याची निर्यात होऊ लागली. या निर्यातीवर भरभराटीला आलेल्या व्यापारासाठीच्या व्यवहारांचं हे कॉटन एक्स्चेंज!

आणखी पश्चिमेला गेलं की गिरगाव आणि प्रिन्सेस स्ट्रीट लागतात. खास मुंबईकर मराठी वस्तीच्या या जागा. पाठारे प्रभू आणि ब्राह्मण समाजांनी गजबजलेले वाडे असणारी ही ठिकाणं. १९व्या शतकाच्या प्रारंभी कधीतरी म्हणजे १८५७ चं बंड होण्याच्या नुकतंच आधी कोकणातल्या एका ब्राह्मण विधवेला घरातून निष्कासित करण्यात आलं होतं. ती अखेर इथं आली आणि मुंबादेवीनं तिची काळजी घेतली. तिथं तिनं एकटय़ा राहणाऱ्या माणसांसाठी खानावळी सुरू केल्या आणि तिची भरभराट झाली. मुंबादेवीप्रमाणेच तीही ‘अन्नपूर्णा’ झाली. लवकरच इतर नातेवाईकही तिच्या कामात हातभार लावू लागले आणि ते सगळं कुटुंबच भरभराटीला आलं. मंदिराबाहेर बसलेला हा एकाकी माणूस या विधवा स्त्रीचाच एक वंशज. त्यालादेखील मुंबादेवीनं आपल्या छातीशी धरलं होतं. आताही त्याला जणू मुंबादेवीनं बोलावणंच धाडलेलं आहे.

आजूबाजूला किती सगळा कोलाहल आहे? त्यानं करावं तरी काय? अनेक प्रश्नांचं मोहोळ त्याच्या मनात उठलं आहे. या साऱ्या प्रश्नांना दु:खाची किनारही आहे. सात बेटांनी बनलेल्या मुंबादेवीच्या गळ्यातल्या या हाराला, तिच्या या मुलानं आपल्या समाजसेवेनं दिलेलं देणं मुंबादेवीला आज आठवेल का? या वृद्धानंच तर मुंबादेवीच्या सर्वात दुर्लक्षित आणि जणू अदृश्यच असणाऱ्या मुलांसाठीचं मोठं जाळं उभारण्याचा प्रयत्न केलेला आहे. समिलगी, लेस्बियन, तृतीयपंथी.. समाजाला अगदी नको नको असलेले लोक. गर्दीनं भरलेल्या या मुंबानगरी नावाच्या बेटावर या साऱ्यांना एक माणूस म्हणून थोडीतरी प्रतिष्ठा आणि आत्मसन्मान मिळावा यासाठी त्यानं आजवर लढा दिला होता.

महाराष्ट्रात सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे हजारो भूमिहीन दलित मुंबईमध्ये आले आणि त्यांनी धारावी व कुर्ला इथं आसरा घेतला. घाटकोपर इथल्या असल्फा खेडय़ानजीकच्या टेकडय़ांवर पडीक असणाऱ्या जमिनीत अनेकांनी आपलं बिऱ्हाड थाटलं. पश्चिम किनाऱ्यावर बांद्रा आणि माहीमच्या छोटय़ा किल्ल्यांभोवती ख्रिश्चन समाज स्थिरावला. या परिसरात पोर्तुगिजांनी अफूच्या धंद्यावर श्रीमंत होऊन आपलं बस्तान बसवलेलं होतं. मुस्लीम समाजानं दक्षिण मुंबईतला एक चिंचोळा पट्टा निवडला. तिथं त्यांची चामडं, मसाले आणि ग्रामीण भागासोबतच्या व्यापारामध्ये भरभराट झाली.

पण हे सगळं मी तुम्हाला का सांगतो आहे?

हे विस्तारानं सांगण्याचं कारण म्हणजे मुंबईत आता एक नवीच सामाजिक गोष्ट उदयाला आलेली आहे. आज मुंबई शहर एलजीबीटी समुदायातल्या लोकांना एखाद्या लोहचुंबकासारखं आकर्षून घेत आहे. सर्व सामाजिक-आर्थिक थरातल्या एलजीबीटी समुदायातल्या लोकांची इथं तीन ते चार लाख इतकी मोठी संख्या आहे. बॉलीवूड आणि मराठी नाटय़-संगीत या क्षेत्रांमध्ये समिलगी पुरुषांचं प्रमाण मोठं आहे. इंटिरियर डेकोरेशन आणि डिझाइन किंवा संगीत यांसारख्या क्षेत्रात लेस्बियन स्त्रियांचं प्रमाणही ठळकपणे दिसून येतं. आता हॉटेल्स, बीपीओ आणि मनोरंजन क्षेत्रात हळू हळू तृतीयपंथी व्यक्ती दिसायला लागलेल्या आहेत. मुंबईत पुरुष वेश्यांचा दर आता स्त्री वेश्यांपेक्षा अधिक आहे, ही माहिती वाचून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल.

आमच्या दुसऱ्या आईच्या म्हणजे मुंबई महापालिकेच्या मदतीनं ‘हमसफर ट्रस्ट’नं या बहुसंख्य लोकांना सार्वजनिक रुग्णालयांमध्ये आरोग्यसेवा मिळण्याची व्यवस्था केली. २०१९मध्ये आमच्या ‘हमसफर ट्रस्ट’ला मुंबई महानगरपालिकेसोबत या समुदायासाठी संयुक्तपणे काम करायला सुरुवात करून २५ वर्ष पुरी होतील. विशेष म्हणजे, शिवसेना असो, काँग्रेस असो की भाजप असो, प्रत्येकच राजकीय पक्षानं आम्हाला दर अडचणीत आजवर मदतच केलेली आहे. पण समाजाचं काय? आमच्याबाबतीत बोलायचं झालं, तर समाजातल्या प्रत्येकाला आम्ही अस्तित्वात आहोत, हे ठाऊक तर असतं, पण आम्ही त्याच समाजाचा भाग आहोत याला मान्यता द्यायची मात्र भीती वाटत असते.

मंदिराच्या पायऱ्यांवर बसलेला हा वृद्ध माणूस अस्वस्थ आणि गोंधळलेला दिसतो आहे. वयाच्या ७०व्या वर्षी आपण आता नेमकं काय करू शकतो, हे त्याला समजत नाहीये. त्याचं या जगातलं कार्य संपलं आहे का? आता या वयात तो वृद्ध आणि असाहाय्य झाल्यावर त्याची काळजी कोण घेणार आहे, हे मुंबादेवीला ठाऊक असेल का? आजवर एकटं आणि त्यासोबतच स्वतंत्र असण्याचा त्याला नेहमीच अभिमान वाटत राहिलेला आहे म्हणा. पण कुठलाच माणूस एक बेट नसतो. आपण इतरांवर अवलंबून असतो, आता या वृद्धालाही तीच भीती वाटते आहे. काळोख्या रात्री जेव्हा छातीत धडधडू लागतं आणि उदासी दाटून राहतो, तेव्हा भोवतालच्या या काळोखात आपला हात धरणारं कुणीतरी असेल का, याची त्याला भीती वाटते आहे.

अखेर तो आत अंधारात बुडालेल्या गाभाऱ्याकडे बघण्याचा प्रयत्न करतो. मुंबादेवी त्याला स्वत:कडे बोलवत असलेली दिसते. आपल्या देहाची मोळी उचलून एकेक करत, थकलेली पावलं टाकत तो आत शिरतो. मुंबादेवीला त्याच्याशी बोलायचंच आहे. तिची आज्ञा ऐकण्याशिवाय पर्याय नाही. मात्र जसजसा तो तिच्याजवळ जाऊ लागतो, तसतशी आपली जडावलेली पावलं आता हलकी होत आहेत असं त्याला जाणवू लागतं.. जणू मुंबादेवीनं त्याला पंखच लावले असावेत. ती हसतमुखानं त्याच्याकडं बघते आहे. तो एकेक पाऊल पुढं टाकत येत असतानाही तिची नजर त्याच्यावरच आहे.

‘‘हे मुंबादेवी,’’ तो तिला विचारतो, ‘‘आज तू का बोलावणं धाडलंस याबद्दल मला जरा सांग. माझं काम मी नीट पुरं केलेलं आहे. मी आणि माझे सहकारी कलम ३७७ नावाच्या नागाचे विषारी सुळे आता काढून टाकण्यात यशस्वी झालेलो आहोत. शिवाय भविष्यात आमच्या समुदायाला भेदभाव आणि बदनामी यांसारख्या मोठय़ा प्रश्नांना सामोरं जावं लागेल, अशी धोक्याची सूचनाही मी आधीच त्यांना दिलेली आहेच. गेल्याच आठवडय़ात आम्ही भारतातल्या सर्वात जुन्या स्वयंसेवी संस्थेच्या, म्हणजे भारतीय कुटुंब नियोजन संस्थेच्या कल्पना आपटे यांना भेटलो. पोलिसांनी आमच्या समुदायाला त्रास देऊ नये, यासाठी एकत्र काम करण्याचं त्या बठकीत आम्ही ठरवलं. समाजातला प्रत्येकजण आपल्या आजुबाजूला असणाऱ्या लिंगभावाबद्दलचे गैरसमज काढून टाकेल, यासाठी आम्ही झटणार आहोत.

पण तरीसुद्धा मुंबाआई, तू आनंदी दिसत नाहीयेस. माझं काही चुकलं का? आता या थकलेल्या देहाला थोडी विश्रांती घ्यायची असतानाही तू बोलावणं का पाठवलं आहेस? मुंबादेवीची शांत नजर मात्र माझ्याकडं स्थितप्रज्ञपणे पाहात होती. ‘मी काय केलं पाहिजे’ हे या आईला नीट ठाऊक होतं. अचानक तिचा आवाज माझ्या कानावर पडला.

‘‘अरे मुला, माझ्या सातही बेटांवरचं काम अजून पुरं झालेलं नाही. तुम्ही आता मुंबईत गेली २५ वर्ष काम केल्याबद्दल आनंदोत्सव साजरा करता आहात खरे, पण तुम्ही असं किती लोकांना वाचवलं आहे? अजून कितीतरी जणांच्या आयुष्यात लख्ख प्रकाश पडायचा शिल्लक आहे. माझी ती मुलं कधी सद्गुणी होतील? सरकारनं तुम्हा लोकांना तरुणांसोबत काम करायला सांगितलं आहे, हे खरं असलं तरी तू तुझ्या वयाच्या स्त्री-पुरुषांकडं दुर्लक्षच केलं आहेस. अरे, सगळेचजण त्यांना विसरत असतात. खुद्द तू तरी त्यांची पर्वा केली आहेस का? मी तुझ्या पाठीशी होते म्हणून तू आजवर जिवंत राहिलास. पण बाकीच्यांचं काय? या मुंबईतले १० टक्के लोक वृद्ध आहेत. मुलं किंवा समाज, त्यांची पर्वा कुणीच करत नाही.

‘‘त्यामुळं स्वत:चं गुणगान करून घेऊन पुढं तू आराम करशील असं तुला वाटतंय? छे छे बिल्कुल नाही. चल ऊठ आणि आपल्या वयाच्या समुदायातल्या मित्रांसाठी पुन्हा एकदा कामाला लाग. त्या साऱ्यांना तुझ्या मदतीची गरज आहे. तू अशा लोकांसाठी ‘मुंबई सीनएजर्स’ नावाचा गट स्थापन केला आहेस, हे मला ठाऊक आहे रे. पण त्या गटाचीही नीट काळजी घेण्याची गरज आहे. एखादा माणूस जितका वृद्ध होत जातो, तितका तितका तो असाहाय्य बनत जातो ना. उदासीनता, तरुणांनी वाईट प्रकारे वागवणं, शारीरिक दुर्बलता, घटणारं उत्पन्न आणि वाढणाऱ्या चिंता या साऱ्या गोष्टी आज ना उद्या घडणारच असतात. या साऱ्या गोष्टींना तुला स्वत:ला तर सामोरं जावं लागणारच आहे, पण तुझ्या अनुभवाचा वापर करून इतरांना याचा कसा त्रास होणार नाही, हेसुद्धा तू पाहिलंच पाहिजेस.

तिचं बोलणं संपल्यावर मी एक दीर्घ नि:श्वास सोडला. तिचं हे म्हणणं मला ऐकून घ्यायचं नव्हतं म्हणून नव्हे, तर हे सारं काम करण्यासाठी लागणारी ऊर्जाच माझ्या शरीरात नाही, अशी भावना माझ्या मनात दाटून आलेली होती. पण काहीही सबब असली तरी, मुंबादेवी कठोरपणे आणि अथकपणे तिच्या मुलांना काम करायला लावते, हेही मला ठाऊक होतं. ती कधीच ‘नाही’ हे उत्तर ऐकून घेत नाही; पण मलासुद्धा तिला काहीतरी सांगायचं आहेच. अखेर मी म्हणालो ‘‘हे दुष्ट देवी, तू माझ्यावर लादलेलं हे नवं काम मला करायचंच नसेल तर?’’ त्यावर देवी उत्तरली, ‘‘ठीक आहे, मग जोवर दुसरं कुणी हे काम करायला पुढं येत नाही, तोवर तू ते कर.’’

तिचे हे उद्गार ऐकूत तो वृद्ध माणूस सांधेदुखीनं ग्रासलेले आपले गुडघे धरत कष्टपूर्वक उठला. आपलं शरीर शिणलं आहे आणि डोकं गरगरतं आहे, हे त्याला जाणवत होतं, पण मुंबाआईनं अजून त्याला विश्रांती घेण्याची परवानगी दिलेली नव्हती. अखेर निघताना नेहमीप्रमाणं त्यानं सोबत आणलेली फुलं तिच्या चरणांपाशी ठेवली आणि दरवेळीसारखेच दानपेटीत १० रुपये वाहून तो बाहेर पडला.

इतका वेळ दुर्बळ दिसणाऱ्या माणसाच्या चालीत अचानक उत्साह कसा आला, हे पाहून मंदिरातला पुजारी आश्चर्यचकित झाला. घाईघाईनं बाहेर पडणाऱ्या या वृद्ध माणसाला त्यानं प्रसाद घेण्यासाठी हाक मारली खरी, पण तोवर तो वृद्ध गर्दीत पार मिसळून गेल्याचं त्याच्या लक्षात आलं.

‘देवी स्वत:च या वृद्धाला घरी आपला कृपाप्रसाद पोचवेल’ असं पुजाऱ्याच्या लक्षात आलं. त्यानं देवीकडं पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर जणू एक खटय़ाळ हसू विलसत होतं. होय, खरंच! जणू ‘ती लवकरच आपल्या या लाडक्या मुलाच्या घराला भेट देणार होती आणि तिथं स्वहस्ते त्याला प्रसाद देणार होती’ असंच ते हसू सांगत होतं.

chaturang@expressindia.com

अनुवाद : सुश्रुत कुलकर्णी