डॉ. भूषण शुक्ल
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मोबाइलच्या मुक्त वापरामुळे नको त्या गोष्टी समोर आल्या तरी त्याचं काय करायचं हे मोठ्यांना माहीत झालं आहे, परंतु अगदी लहान मुलांच्या नजरेस अशी गोष्ट पडली आणि त्याचा त्यांच्या मनावर वेगळाच परिणाम झाला तर? अक्षयच्या बाबतीत हेच घडलं. अशा वेळी समुपदेशकाची मदत होतेच, पण घरातील मोठ्या मंडळींनी कोणतं अवधान राखायला हवं?
घरी येताना सोनाली आज अक्षयचा आवडता ‘स्पायडरमॅन’ घेऊन आली. रोज संध्याकाळी आई घरी यायच्या वेळी अक्षय दिवाणखान्यातच वाट बघत बसतो आणि बेल वाजली की स्वत: पुढे होऊन दार उघडतो. आईची बॅग ताब्यात घेऊन त्यात त्याच्यासाठी आज काय आणलंय ते शोधतो. त्याच्यासाठी काहीतरी छोटीशी भेट असतेच, एखादं चॉकलेट, चित्र किंवा एखादं छोटंसं खेळणं, वगैरे. ते सापडलं की आईच्या गळ्यात हात टाकून, प्रेमानं पापा घेऊन ‘आय लव यू, आई’ म्हणणं आणि खेळायला पळणं हे अक्षयचं रोजचं ठरलेलं वागणं.
आज स्पायडरमॅन बघून आपल्याला स्पेशल थँक्यू मिळणार याची सोनालीला खात्री होती. त्यामुळे बेल वाजवतानाच तिच्या चेहऱ्यावर हसू होतं. पण दार उघडलं ते आजोबांनी.
‘‘अक्षय कुठे गेला?’’ सोनालीचा पहिला प्रश्न.
‘‘तो रूममध्ये बसलाय दुपारपासून. ‘मी अभ्यास करतो आहे. मला कोणी डिस्टर्ब करू नका,’ असं म्हणतोय.’’ आजोबा म्हणाले.
सोनाली दबक्या पावलाने बेडरूमजवळ गेली. तिने दार उघडण्याचा प्रयत्न केला तर लक्षात आलं की दाराला आतून कडी लावलेली आहे. मग मात्र सोनाली चमकली. अक्षय कधीही आतून कडी लावत नाही. तो इतका घाबरट आहे की, अंघोळीला जाताना आणि टॉयलेट वापरतानाही दार थोडं उघडं ठेवतो.
‘‘अक्षय, दार उघड पटकन. अक्षय, दार उघड. मी आले आहे.’’ तिच्या आवाजाला काळजीची धार होती. आजोबाही तिथे आले. तेवढ्यात दार उघडण्याचा आवाज आला आणि दार थोडंसं उघडून अक्षय म्हणाला, ‘‘आई फक्त तू आत ये.’’
सोनाली आत गेली. अक्षय व्यवस्थित आहे याची खात्री पटल्यावर म्हणाली, ‘‘काय झालं अक्षय?’’
तिच्या डोळ्याला डोळा न भिडवता फरशीवर पसरलेल्या ड्रॉइंगच्या आणि शाळेच्या वह्या दाखवत तो म्हणाला, ‘‘परीक्षा आहे. मला सर्व विषयांत ‘ए’ ग्रेड पाहिजे म्हणून अभ्यास करत होतो.’’ अजूनही तो नजर चुकवत होता, पण सोनालीने फार प्रश्न न विचारता ‘स्पायडरमॅन’ समोर धरला.
‘‘बघ आज तुला भेटायला ‘स्पायडरमॅन’ आलेला आहे.’’ अक्षयचे डोळे क्षणभर चमकले पण लगेच शांत झाले. ‘‘थँक्यू आई’’ म्हणत त्याने तो ‘स्पायडरमॅन’ घेतला आणि अभ्यासाला बसला. ‘आज काहीतरी बिनसलेलं दिसतंय.’ असं मनातच म्हणत ती कपडे बदलायला बाथरूममध्ये गेली.
ती बाथरूमच्या बाहेर आली तर अक्षय तिच्याकडे एकटक बघत म्हणाला, ‘‘तो टी-शर्ट नको घालू. तो टी-शर्ट आधी बदल.’’
त्याच्या आवाजामध्ये एक प्रकारची भीती होती. त्याने पटकन आईचं कपाट उघडलं आणि दुसरा एक टी-शर्ट तिच्या हातात दिला. ‘‘हा घाल. हा ताबडतोब घाल.’’
‘‘का? अरे, अक्षय काय झालं? घातलेल्या टी-शर्टला काय प्रॉब्लेम आहे.’’
‘‘नाही तू तो आधी बदल.’’ आईच्या समोर टी-शर्ट टाकून तो पटकन पळाला आणि बेडमध्ये तोंड लपवून बसला. सोनाली त्याच्याशी बोलायला जवळ जाणार तेवढ्यात, ‘‘आधी तू टी-शर्ट बदल मगच माझ्याशी बोल,’’ असं तो जोरजोरात ओरडायला लागला.
आता संध्याकाळच्या वेळी कुठे याच्याशी वाद घाला. म्हणून सोनाली त्याने दिलेला टी-शर्ट घेऊन बाथरूममध्ये गेली. तो तिचा एक जुना टी-शर्ट होता. त्याच्या दोन्ही बाह्या पूर्ण मनगटापर्यंत येत होत्या आणि तो थोडा लांबसुद्धा होता.
‘‘हा तर किती जुना झालाय. मला मुळीच आवडत नाही हा आता’’, असं म्हणून ती परत वळली तर अक्षय परत जोरजोरात रडत, ‘‘नाही. नाही. तू हाच घाल. बदलू नको.’’, असं म्हणत धिंगाणा घालू लागला.
सोनालीला त्याचं काय चाललंय ते कळेना. तरीही कटकट नको म्हणून तिने तोच टी-शर्ट ठेवला आणि स्वयंपाकघरात कामाला लागली.
दुसऱ्या दिवशी सकाळी अक्षय पटपट आवरून शाळेत गेला. आई, बाबा आणि आजी आपापल्या नोकरीला गेले आणि आजोबा त्यांच्या नुकत्याच नोकरीतून निवृत्त झालेल्या जीवनाचा आनंद घेण्यासाठी मित्रमंडळींबरोबर गप्पा आणि चहा घेण्यासाठी खाली उतरले. दुपारी आजोबांचा दिवस निवांत सुरू असतानाच एक वाजता बाबा अक्षयला घेऊन घरी आला. आजोबा आश्चर्यचकित झाले. ‘‘अरे प्रथम, काय झालं? अक्षयची तब्येत बरी नाही का? शाळेतून घेऊन आलास?’’
‘‘तुम्ही जरा रूममध्ये थांबा. मी दोन मिनिटांत येऊन तुमच्याशी सविस्तर बोलतो.’’
तो अक्षयला त्याच्या रूममध्ये घेऊन गेला. त्याचे कपडे बदलले आणि शाळेच्या बॅगमधून टिफीन काढून जेवायला वाढलं. अक्षयही नजर चुकवत जेवत होता. तो जेवायला गेल्यावर प्रथम म्हणाला, ‘‘बाबा, आपल्याला दोघांना जरा बोलायला पाहिजे. मी तुमच्या रूममध्ये येतो.’’
‘‘काय झालं सांग तरी.’’
‘‘ सांगतो ना. सगळं सांगतो. चला रूममध्ये.’’ आजोबा घाईघाईने खोलीत गेले. त्यांच्या मागून प्रथम तिथे आला. आणि त्याने दार बंद केलं. ‘‘दार का बंद करतोस? काय मला मारणार आहेस की काय?’’ आजोबा हसत हसत म्हणाले.
‘‘सांगतो, म्हणजे तुम्हाला कळेल मी दार का बंद केलं ते.’’
दोन तासांपूर्वी अक्षयच्या शाळेतून फोन आला की लगेच शाळेत या. सोनालीच्या कंपनीमध्ये आज ऑडिट आहे. त्यामुळे मीच अर्ध्या दिवसाची सुट्टी घेऊन शाळेत गेलो. शिक्षकांनी मला थेट मुख्याध्यापिकांकडे भेटायला नेलं.
‘‘त्यांचा चेहरा कमालीचा गंभीर होता. मी जाताच त्यांनी मला सांगितलं, की आज शाळेत आल्या आल्या अक्षय थेट समुपदेशकांकडे गेला आणि त्यांना सांगितलं की, मला ‘बॅड टच’ दिसला आहे.’’
‘‘तुम्हाला तर माहिती आहे. दोन महिन्यांपूर्वी शाळेच्या शिक्षकांनी अक्षयच्या वर्गातल्या सर्व मुलांसाठी ‘बॅड टच वर्कशॉप’ घेतलं होतं. लहान मुलांना आता शाळेमध्ये नियमितपणे या गोष्टी सांगतात. म्हणजे कुठल्या व्यक्तीने काही ‘कमी-जास्त’ करायचा प्रयत्न केल्यास मुलं ताबडतोब स्वत:ची काळजी घेऊ शकतात. त्याबद्दल आपणही घरी बोललोच होतो.’’
‘‘बोललो होतो ना. मी तर म्हणतो की ही फार चांगली गोष्ट आहे. आता या गोष्टींबद्दल शाळेतच शिकवलं जात आहे, कारण मुलं खूप वेळ बाहेर असतात. परक्या माणसांबरोबर असतात. तेव्हा काळजी घेतलेली बरी.’’
प्रथमचा चेहरा अगदी गंभीर होता. ‘‘बाबा अक्षयने समुपदेशकांना सांगितलं की, तो जेव्हा दुपारी तुमचा फोन घेऊन खेळत होता. तेव्हा एक नोटिफिकेशन आलं. त्याने ते उघडलं, तर तो एक व्हिडीओ होता. तो व्हिडीओ त्याने बघितला…’’
‘‘हो, दुपारी तो माझा फोन नेहमी घेऊन बसतो. मी लॉक लावलंय, पण त्याला माझा कोड माहिती आहे. तो काही व्हिडीओज् थोडा वेळ बघतो आणि मग फोन देऊन आपल्या कामाला जातो.’’
‘‘ बाबा, त्याने व्हिडीओ बघितला तो अश्लील होता. त्याच्यात त्याने काय काय बघितलं ते त्याने शाळेच्या समुपदेशकांना आणि त्यांनी मला सांगितलं. शाळेच्या मुख्याध्यापिका माझ्याकडे अशा नजरेनं बघत होत्या की, आता जमीन दुभंगून मला गिळंकृत करेल तर बरं होईल, असं मला वाटू लागलं.
आता मान खाली घालण्याची पाळी आजोबांची. ‘‘अरे देवा, हा आमचा रिटायरमेंटवाला ग्रुप असणार मोबाईलवरचा. ‘रिटायर्ड बट नॉट टायर्ड’ हा माझा एक ग्रुप आहे. त्याच्यात आम्ही काहीतरी नवीन, मजेदार शेअर करत असतो. एक-दोघे काय वाटेल ते व्हिडीओ पाठवतात. मी तर ते उघडतसुद्धा नाही. पण काहीतरी गडबड झालेली दिसते. आता काय करायचं?’’
‘‘मलाही माहिती नाही आता काय करायचं ते. सोनाली आणि आई आली की आपण काहीतरी ठरवूया.’’
‘‘म्हणजे तू ते दोन्ही बायांना पण सांगणार आहेस?’’
‘‘बाबा, तुम्ही काल बघितलं ना? अक्षय सोनालीला पूर्ण बाह्यांचा टी-शर्ट घालून बस असा आग्रह धरत होता आणि रात्री झोपतानासुद्धा तो सोनालीच्या जवळ झोपला आणि मला खाली झोपायला लावलं. तुम्ही दोघं एकमेकांशी बोलूसुद्धा नका, असा हट्ट धरून बसला होता. त्याने जे काय पाहिलं आहे त्याचा त्याच्या मनावर चांगलाच परिणाम झालेला दिसतोय. हे खूपच गंभीर आहे. मला एकट्याला तर हे मुळीच जमणार नाही. त्या दोघी कामावरून येतील तेव्हा आपण पुढे काय करायचं ते ठरवूयात.’’
‘‘ठीक आहे. तुला काय योग्य वाटतं ते कर,’’ असं म्हणून आजोबा चपला घालून खाली निघून गेले.
थोड्याच वेळात सोनाली आणि प्रथमची आई आपापल्या कामावरून परत आल्या. प्रथमच्या चेहऱ्यावरूनच काहीतरी गंभीर घडलं आहे याचा त्यांना अंदाज आला. आजोबा अजून घरी परत आले नव्हते. ते लवकर परत येतील याची प्रथमला खात्री नव्हती म्हणून त्याने सोनालीला आणि आईला समोर बसवून सगळं काही सविस्तर सांगितलं. त्या दोघींचे चेहरे पडले.
‘‘ यांना किती वेळा विनवलं की ते ग्रुप सोडा. हे काहीतरी विचित्र उद्याोग आपल्या घरात कशाला पाहिजेत? या वयामध्ये या गोष्टी का करायच्या?’’
सोनाली रागाने प्रथमकडे बघत होती. ‘‘मला माहिती होतं हे कधी न कधी होणार म्हणून. मी बाबांना किती वेळा म्हटलं, की तुम्ही फोन अक्षयला देत जाऊ नका. आम्ही दोघेही आमचा फोन त्याला कधीही घेऊ देत नाही. फोन ही कामाची वस्तू आहे. पाच वर्षांच्या मुलाच्या हातात देण्यासारखी नाही. इंटरनेटवर, यूट्यूबवर तो काय वाटेल ते बघू शकतो. मग नसते उद्याोग होतात. आमच्या फोनला कोड लॉक लावलेले आहे आणि तो कोड आम्ही त्याला कळू देत नाही.’’
आजी म्हणाली, ‘‘मी तर साधा बटणाचा फोन वापरते. हे तुमचे नवीन फोन मला तर समजतच नाहीत. पण आता यांना कोण सांगणार?’’
‘‘मी स्वत: बाबांशी बोललो आहे. उद्या परत बोलणार आहे. त्यांनी त्यांच्या फोनवर काय बघायचं, हा त्यांचा प्रश्न आहे. पण ते उद्याोग अक्षयसमोर मुळीच नकोत. हे मी त्यांना उद्या स्पष्ट सांगणार आहे.’’
‘‘असं तू बोललास तर त्यांना अपमान वाटेल.’’
‘‘हो कदाचित वाटेलसुद्धा. पण अपमान वाटून घेण्यापेक्षा अपमान होईल असं न वागण्याची जबाबदारी त्यांची आहे असं तुला नाही का वाटत? त्यांच्या मित्रांच्या ग्रुपवर काय चालतं? याच्यात आपण कोणी डोकं घालत नाही. पण निदान ते खासगी राहील आणि पाच वर्षांच्या मुलासमोर येणार नाही. एवढी काळजी घेणं ही त्यांची जबाबदारी नाही का?’’
‘‘आता पुढचे काही दिवस अक्षयला शाळेमध्ये रोज समुपदेशनाच्या सत्रासाठी जावं लागणार आहे. समुपदेशक सांगत होत्या, की त्याला जी भीती वाटते आहे ती या वयात अत्यंत चुकीच्या गोष्टी बघितल्यामुळे आहे. त्याच्या मनात एकंदरीतच स्त्री आणि पुरुष शरीराबद्दल आणि संबंधांबद्दल काहीतरी गोंधळ निर्माण झालाय. त्यामुळे तो असा विचित्र वागायला लागला आहे. ते समुपदेशकांच्या मदतीने निश्चित कमी होईल. मात्र हे पुन्हा होणार नाही याची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागणार आहे.’’
‘‘तू यांच्याशी थेट बोलू नकोस. मी आज रात्री त्यांना जरा समजून सांगते की, डोक्यात राग घालून घ्यायची ही वेळ नाही. अक्षयसाठी जे योग्य आहे ते आपल्याला निश्चित केलं पाहिजे. त्या फोनचे सेटिंग्स कसे बदलायचे, कोड कसा बदलायचा आणि हे व्हिडीओ स्वत:हून डाऊनलोड होणार नाही आणि ते फोन मध्येही राहणार नाही, हे कसं करायचं हे तू त्यांना समजावून सांग. हवं तर एका कागदावर लिहून दे. एकदा झालं की बस झालं. असली घटना आपल्या घरात पुन्हा मुळीच घडता कामा नये.’’ आजीने सांगितलं.
‘‘आई, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. तुम्हीच त्यांना समजून सांगा. मी किंवा प्रथम बोललो तर ते वेगळाच अर्थ लावतील. अक्षयला सांभाळावं लागतंय तेवढं पुरेसं आहे. अजून बाबांची त्याच्यात भर नको पडायला.’’
आजी उठली आणि म्हणाली, ‘‘मी खाली जाते. मला माहिती आहे ते बागेमध्ये चकरा मारत असतील. त्यांच्याशी जरा बोलते आणि त्यांना वर घेऊन येते. आपल्या घरातल्या सर्व गोष्टी आपल्यालाच सांभाळायला पाहिजेत.’’
chaturang@expressindia.com