राघवेंद्र मण्णूर
अनपेक्षितपणे झालेल्या ओळखीचं हळूहळू मैत्रीत रूपांतर होतं. त्यानंतर आयुष्यभरासाठी हे ऋणानुबंध जोडले जातात. एकमेकांच्या सोबतीमुळे गुणांमध्ये वृद्धी, मनमोकळ्या गप्पा, एकत्र सिनेमा पाहणं, फिरायला जाणं, भेटीगाठी, विरह…अशा सर्व अवस्थांमधून गेलेलं तरीही शारीरिक आकर्षणापलीकडे असलेल्या नवलाईच्या नात्यातला ‘मैत्रभाव’ आयुष्यभर जपता येतो?

पन्नास-साठच्या दशकात मुला-मुलींच्या शाळा वेगवेगळ्या असायच्या. त्यामुळे आजच्यासारखं मुलं-मुली एकमेकांशी फारसं बोलतच नसत. मैत्री तर खूपच लांबची गोष्ट. किंबहुना मुलींवर पालकांची करडी नजर असे. त्याही काळात तिची आणि माझी ओळख झाली.

Solutions to achieve educational goals by inculcating interest in learning
सांदीत सापडलेले…!: उपाय
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
loksatta chaturang article
जिंकावे नि जगावेही : जगण्याचे सशक्त मार्ग
Tara Bhawalkar, Tara Bhawalkar latest news,
‘‘शिक्षणाच्या जोडीने शहाणपणही यावं’’
Loksatta chaturanga Parent Nature Confused Psychologist
सांधा बदलताना : संसार शांतीचा झरा…
sandha badaltana manprasthashram
सांधा बदलताना : मन:प्रस्थाश्रम
Loksatta chaturang Along with sensible profound partner family
इतिश्री: समंजस, प्रगल्भ सोबत
people with personality disorder
स्वभाव, विभाव : खुदी से इश्क किया रे…

तळेगांव-पुणे रेल्वेने शाळेत जाता-येताना आमची भेट झाली. हळूहळू ही ओळख वाढत गेली. ती देहूरोड स्थानकावर आमच्या डब्यात चढायची. आम्ही दुसऱ्या वर्गाने प्रवास करायचो. फारशी गर्दी नसल्याने प्रथम नजरानजर, मग एकमेकांना ‘हॅलो’ करत ओळख झाली. त्यानंतर नाव, गाव, शाळा, आदी विचारपूस केल्यामुळे ती वाढत गेली. तिचे नाव विजया अय्यर असल्याचं तिने आपणहून मला सांगितलं. एकमेकांना अगदी अपरिचित असूनही काळाच्या ओघात एकमेकांचे मित्र कसे झालो कळलंच नाही.

हेही वाचा :‘‘शिक्षणाच्या जोडीने शहाणपणही यावं’’

ते वर्ष होतं १९५३ – १९५४ आणि आम्हा दोघांचे वय १२-१३ च्या आसपासचं. विजया एकदम बिनधास्त. मी मात्र कायम अंतर्मुख. ती अल्लड आणि विनोदीही होती. माझा स्वभाव अगदी त्याविरुद्ध. पण तिच्या सहवासात मी नेहमी आनंदी असायचो. तिचं व्यक्तिमत्त्व अत्यंत आकर्षक व प्रेरणादायी असल्यानं मला तिच्या सहवासात हुरूप यायचा. तिला मी कधीच दुर्मुखलेलं बघितल्याचं आठवत नाही. किंबहुना, ती जेव्हा स्मित हास्य करे, ते समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावर प्रतिबिंबित होत असे, हीच तिची खासियत होती.

त्या काळी आम्ही दुसऱ्या वर्गाच्या डब्यात मोजकेच पण नियमित प्रवासी असायचो. ती देहूरोडला डब्यात शिरल्यावर क्षणार्धात डब्यातील वातावरण प्रसन्न होई. तिची शाळा वेगळी होती, सेंट्रल स्कूल. तिथे ‘सर्जनशील विचार कौशल्य’ आणि ‘प्रभावी संभाषण कौशल्य’ शिकवत असल्यानं तिचं वागणं-बोलणं समोरच्याला आकर्षित करण्यासारखंच होतं. ‘ A good friend helps shape your character’ या उक्तीप्रमाणे तिच्या सहवासात माझ्यातही हळूहळू सकारात्मक बदल होत गेला. तिचं घराणं दाक्षिणात्य होतं. तिची आई भरतनाट्यम् नर्तिका आणि मावशी व्हायोलिन वादक असल्याने हे दोन्ही गुण तिच्यातही उतरले होते. वयाच्या १४व्या वर्षी तिने ‘अरंगेत्रम’ पूर्ण केलं. या कार्यक्रमाला तिने मला आवर्जून आमंत्रित केलं आणि माझा अभिप्रायही विचारला होता. मी तो ‘अति उत्तम’ असा दिल्यावर ती खूप आनंदली. तिचे वडील लष्करी अधिकारी होते.

त्यानंतर अधूनमधून खडकी स्थानकासमोरच्या ‘माया टॉकिज’मध्ये आम्ही दोघंच आमच्या घरच्यांच्या परवानगीने सिनेमा बघायला जात असू. कधी चिंचवडला ‘टूरिंग थिएटर’ आलं की तिथेही जात असू. तिथे ‘देवबाप्पा’ व ‘शेजारी’ हे मराठी सिनेमे बघितल्याचं आठवतं. कुठे ‘रॉयल सर्कस’ आली की ती बघायला जात असू. तिच्या शाळेत काही खास कार्यक्रम असला की, मी तिच्याबरोबर जात असे. पावसाळ्यात आम्ही खंडाळा घाटात मौजमजा करण्यासाठी जात असू. जसे आपले दात जिभेला चावत नाहीत तशी आमची मैत्री एकमेकांना न दुखवता जपली जात होती. आमची ‘बाल मैत्री’ मजेत सुरू असतानाच अचानक ती काही दिवस येईनाशी झाली. त्या काळी फोन नव्हते. घरचा पत्ता माहीत नव्हता. साधारण आठ-एक दिवसांनी देहूरोड स्थानकात दोन पुरुष आणि एक मुलगी चढली. त्यांनी त्या मुलीला एका रिकाम्या जागेवर झोपवलं. सहज कुतूहल म्हणून मी डोकावून पाहिलं तर ती विजयाच होती. तिच्याबरोबर तिचे बाबा आणि भाऊ होते. तिच्या आजाराचं निदान होत नसल्यानं ते दोघे तिला पुण्याच्या ‘ससून रुग्णालया’त घेऊन जात होते. त्या काळी आजच्यासारखी खासगी रुग्णालये नव्हती. ससून रुग्णालय प्रसिद्ध होतं. तिथे रुग्ण म्हणून गेलेली व्यक्ती बरी होऊनच बाहेर येई. एक दिवस शाळा सुटल्यावर मी तिला बघायला रुग्णालयामध्ये गेलो. तेथील स्वच्छता व टापटीप बघून मी खूप प्रभावित झालो. आता तिच्यात बरीच सुधारणा झालेली दिसली. तिला अजून नीट बोलता येत नसल्यानं तिने मला बघून स्मित केलं व माझा हात हातात घेतला. तिच्या नजरेत मला समाधान व आनंद दिसला. साधारण महिन्याभरानंतर ती घरी परतली. चार दिवसांत ती पुन्हा शाळेसाठी प्रवास करू लागली.

हेही वाचा :लोककलेच्या गजरात रंगलेला ‘दुर्गा पुरस्कार’

महिनाभर शाळा बुडाल्याने ती प्रवासातही अभ्यास करत होती. त्यामुळे आमचा संवाद कमी होऊ लागला. तिचं बघून मीही प्रवासात अभ्यास करू लागलो. अन् काय चमत्कार! माझी पण अभ्यासात प्रगती झाली आणि माझे आई-वडीलही माझं प्रगती पुस्तक बघून खूश झालेले दिसले. यानंतर मात्र ती राहात असे त्या संरक्षण वसाहतीतील सांस्कृतिक कार्यक्रमाला मी जाऊ लागलो आणि तीही आमच्या घरी येऊ लागली.

दोन वर्षांनी माझे वडील सरकारी सेवेतून निवृत्त झाल्यामुळे आम्ही पुण्यात स्थलांतरित झालो. सगळंच अचानक घडल्यामुळे, माझ्या या मैत्रिणीचा साधा निरोपही घेता आला नाही. पुण्यात आमचे घर शनिवारवाड्यासमोर कसबा पेठेत होते. तिथूनच आम्ही भाऊ-भाऊ शिवाजीनगरमधील शाळेत नव्या पुलावरून पायी चालत जायचो. एक दिवस अचानकच ती समोरून येताना दिसली. जवळ आल्यावर आम्ही एकमेकांना ओळखलं आणि दोघांनाही खूप आश्चर्य वाटलं. एवढ्या दिवसांच्या विरहाच्या दु:खाला तिने चक्क मला आलिंगन देऊनच वाट करून दिली. मी अवाक झालो. अर्थात मलाही ते जाणवत होतं. तिच्या व्यक्तिमत्त्वात वयानुसार फरक पडला होता. माझ्यात कितपत फरक पडला ते माहीत नाही. मग आम्ही पुलाच्या कठड्यावरच बसलो. ती पूर्वीसारखीच मोकळेपणानं बोलत होती. मात्र माझी तारांबळ उडत होती.

आम्ही पुण्यात का आलो याचं कारण तिला सांगून एकमेकांना घरचा पत्ता दिला. पण दोघांच्याही घरातील देहूरोड ते पुणे या अंतरामुळे भेटी दुर्मीळ होत गेल्या. जेव्हा केव्हा तीव्र आठवण यायची तेव्हा मात्र शिवाजीनगरहून देहूरोडला आम्ही भेटायचो, मनसोक्त गप्पा व्हायच्या. घरी माहीत असल्यानं त्यांची तक्रार नसायची.

सुरुवातीपासूनच मी तिच्याशी ‘मित्र’ म्हणून व ती माझ्याशी ‘मैत्रीण’ म्हणून वागायची. मुलगा-मुलगी नात्यातील मैत्रीचा विचार करायला महात्मा गांधी यांची शिकवण उपयोगी पडली. त्यामुळे आमच्यात एक आगळावेगळा मैत्रभाव निर्माण झाला. प्रेमाच्या पलीकडची मैत्री होती ती. वयात आल्यावरदेखील आम्हाला एकमेकांविषयी शारीरिक आकर्षण कधी वाटलं नाही. ‘हम से आया ना गया तुम से बुलाया ना गया, फासला प्यार में दोनों से मिटाया ना गया’, अशी आमची गत होती. माझ्यात एकही खास गुण नसल्यानं तिने माझ्यात नेमकं काय बघितलं, हे मी तिला विचारलं तर तिने मला फक्त हसून उत्तर देण्याचं टाळलं.

हेही वाचा :सांदीत सापडलेले…!: उपाय

लवकरच आम्ही मॅट्रिक (तत्कालीन अकरावी) झालो. मी ‘फर्ग्युसन’ आणि तिने ‘वाडिया’ महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. आता तर भेटणं फारच दुर्मीळ होत गेलं. एके दिवशी तिनं मला संपर्कासाठी फोन नंबर पोस्ट कार्डवर लिहून पाठवला. त्यामुळे तिची आठवण आली की, मी इथून तिथून मिळेल तिथून फोन करायचो. दोघांनाही कधी वेळ मिळाला, तर आम्ही पुण्याच्या ‘बंडगार्डन’वर आणि ‘जंगली महाराज’ रस्त्यावर फेरफटका मारल्यावर ‘संभाजी पार्क’मध्ये तिथली भेळ खात गप्पा मारत बसायचो.

कालांतराने ती एच. आर. पदवीधर आणि मी इंजिनीअर होऊन आपापल्या मार्गाला लागलो. तिला पुण्यातच एका नामांकित कंपनीत नोकरी मिळाली आणि मला मुंबईला नोकरी मिळाली. त्यामुळे एकमेकांना प्रत्यक्ष भेटणं कमी होऊन फक्त फोनवरच संभाषण होऊ लागलं. ती एच.आर. पदवीधर असल्याने आंतरवैयक्तिक कौशल्यांचा प्रशिक्षण वर्ग भरवायची. या कौशल्यामुळे कंपनीतील व्यवस्थापन आणि कर्मचारी संबंधाविषयी समस्या ती सहजपणे हाताळायची. त्यामुळे वरिष्ठ तिच्यावर जबाबदारी सोपवून निर्धास्त असत.

एके दिवशी तिनं मला फोनवर सांगितलं की, तिचा आजार बळावतो आहे. तिला आता दुसऱ्या चांगल्या रुग्णालयात नेणार आहेत. पण तिच्या आजाराचं नेमकं निदान अद्याप होत नव्हतं. दुसऱ्या दिवशी लगेचच मी तिला बघायला गेलो तर त्या अवस्थेतही ती हसत खिदळत होती. तिने कधीच स्वत:च्या आजाराबद्दल तक्रार केली नाही. (जवळजवळ २० वर्षांनी याच प्रसंगावर आधारित राजेश खन्नाचा आनंद चित्रपट प्रदर्शित झाला. तो सिनेमा बघताना तिचाच चेहरा डोळ्यासमोर येत होता.) काही दिवसांनी तब्येतीत सुधारणा झाल्यावर तिला घरी पाठवण्यात आलं.

निसर्गनियमानुसार, दिवस सरत होते. आम्ही दोघेही आपापल्या क्षेत्रात दंग झालो. तरीही सवड काढून एकमेकांना भेटत होतो. दोन भेटींच्या मधल्या काळात जे काही घडलं असेल ते आम्ही एकमेकांना सांगत असू. दोघेही मोठे झाल्यावर प्रेम म्हणजे काय, हे आम्ही जाणून होतो. तरीही आम्ही कधीच ते व्यक्त केलं नाही. कारण आमची मैत्री त्यापलीकडची होती. सामाजिक नियमानुसार, मग दोघांचीही लग्ने झाली. मग आम्ही चौघेजण भेटत असू. दोघांच्याही जोडीदारांना त्या काळी हे आमच्यातील मैत्रीचं नातं नवलाईचं वाटलं, पण त्यांनी ते आनंदानं स्वीकारलं. दोनच वर्षांनी तिच्या नवऱ्याला अमेरिकेत नोकरी मिळाल्याने दोघेही तिकडे स्थलांतरित झाले. अमेरिकेत गेल्यावर विजयावर वैद्याकीय उपचार झाल्यानंतर ती पूर्णपणे बरी झाली. तिनं ते त्वरित कळवलं.

हेही वाचा :विश्व साहित्याला गवसलेला नवा सूर

भारतात आली की आमच्याच घरी राहून तिने आमची मैत्री कायम जपली. विजया जरी दाक्षिणात्य असली, तरी तिला एक मराठी गाणं फार आवडतं असे. ते म्हणजे – ‘‘त्या तिथे पलिकडे माझिया प्रियेचे झोपडे…’’ आणि झालेही तसेच. नुकतीच तिला देवाज्ञा झाली अन् आमची मैत्रीण एकदम नजरेपलीकडे जाऊन दिसेनाशीच झाली.
raghman011 @gmail.com

Story img Loader