दररोजच्या जगण्यात आपण आपल्या आयुष्याला आकार देणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत नाही ना हे पाहणं गरजेचं असतं, कारण जीवनप्रवास अधिक सजग, समाधानकारक होण्यासाठी काही घटकांचा मोलाचा वाटा असतो. सबंध व्यक्तिमत्त्वाला आकार देणाऱ्या असंख्य लहानसहान गोष्टींशी सजगतेनं जगण्याचा संबंध आहे. आपल्या आयुष्याची गुणवत्ता सुधारून जीवन जगण्याचे ५ सशक्त मार्ग आहेत. कोणते आहेत ते?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
वैयक्तिक प्रगती साधण्यासाठी आपण सर्वच अथक परिश्रम करत असतो. हे करत असताना आपलं लक्ष प्रामुख्यानं आपली ध्येयं, सवयी आणि त्यानुसार पार पडणारा आपला दिनक्रम यावर केंद्रित असतं. दिवसभर समाजमाध्यमांवर आपण जे काही भारंभार पाहत, ऐकत आणि आत्मसात करत असतो त्याचा या सर्वांवर नक्कीच खोलवर प्रभाव पडत असतो.
हेही वाचा :‘‘शिक्षणाच्या जोडीने शहाणपणही यावं’’
अगदी सकाळच्या आखीवरेखीव दिनचर्येपासून ते यशाच्या नामी युक्त्या, गोष्टी लक्षपूर्वक कशा करायच्या, प्रत्येक क्षण सार्थकी कसा लावायचा याचे सल्ले अशा असंख्य गोष्टींचा आपल्यावर अक्षरश: भडिमार होत असतो. आखीवरेखीव चौकटीबद्ध असं इतरांचं आयुष्य पाहताना आणि अनेक प्रेरक सल्ले ऐकताना कसलाही गाजावाजा न करता आपल्या आयुष्याला खरा आकार देणाऱ्या गोष्टींकडे मात्र आपलं दुर्लक्ष होऊ शकतं. रोजची ठरवलेली कामं आपण किती सक्षमपणे आणि नेटकेपणानं पार पाडतोय यावर आपण आपल्या प्रगतीचं मोजमाप करत असतो. पण खरं तर सजगतेनं जगण्याचं सार आपण किती वेगानं पुढे जातोय किंवा किती यश मिळवतोय हे नाहीये, तर आपल्या निवडी, भावना आणि आपल्या सबंध व्यक्तिमत्त्वालाच आकार देणाऱ्या, असंख्य लहानसहान गोष्टींशी सजगतेनं जगण्याचा संबंध आहे. त्यांच्यामुळे आपल्या आयुष्याची वीण आणखी घट्ट आणि मजबूत होत जाते.
या गोष्टी सहसा ढोबळमानानं सांगता येत नाहीत, तर आपल्या वागण्याच्या, विचार करण्याच्या पद्धतीतून आणि माणूस म्हणून आपण कसे घडतोय यातून त्यांचं अस्तित्व अप्रत्यक्षपणे आपल्याला जाणवतं. त्यांच्याकडे खूपदा आपलं दुर्लक्षच होतं, पण आपल्या जीवनप्रवासावर मात्र त्यांचा खोलवर परिणाम होतच असतो. आपल्या अवतीभवती असलेली माणसं, आपलं पोषण किंवा कुपोषण करणारं अन्न, आपल्याला मार्ग दाखवणाऱ्या किंवा मार्गातला अडथळा बनणाऱ्या भावना, भविष्यात आपल्या जीवनात घडणाऱ्या घटनांबद्दलची खात्री आणि आपल्या ध्येयाला बळकटी देणारा विश्वास हे सगळे घटक आपल्या जीवनानुभवाचे शिल्पकार असतात. मित्र परिवार, अन्न, भावना, आयुष्यातल्या खऱ्या-खोट्या समजुती आणि श्रद्धा या पाच स्तंभांवर आपल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख, आपल्यातले अंगभूत गुण आणि आपल्या आयुष्याची गुणवत्ता यांचा डोलारा सांभाळला जातो.
या सगळ्या घटकांकडे दुर्लक्ष करत तुमच्या आयुष्याची गुणवत्ता सुधारण्याची कल्पना करून पाहा. भले तुमची ध्येयं सर्वोच्च असतील, पण खंबीर आधार देणाऱ्या मित्रांशिवाय, सुयोग्य मन:स्थितीशिवाय, तुम्हाला ध्येयप्राप्तीचा मार्ग दाखवणाऱ्या दूरदृष्टीशिवाय ही ध्येयं साध्य होणं शक्य नाही, उलट ती धुळीला मिळण्याची शक्यता अधिक असते. हे सगळे घटक अगदी सामान्य वाटू शकतात पण जेव्हा त्यांच्याकडे आपण जाणीवपूर्वक आवश्यक तेवढं लक्ष पुरवतो, तेव्हा त्यांच्यात आपल्या आयुष्याचा कायापालट घडवून आणण्याची क्षमता निर्माण होते. हे घटक आपल्या आयुष्याला किती सूक्ष्मतेनं आकार देत असतात आणि आयुष्य प्रदीर्घ आणि अर्थपूर्ण बनवण्यासाठी या घटकांचा जाणीवपूर्वक विकास करणं कसं गरजेचं आहे याबद्दल आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
हेही वाचा :लोककलेच्या गजरात रंगलेला ‘दुर्गा पुरस्कार’
पहिला घटक म्हणजे मैत्री किंवा संगत. एक म्हण आहे, ‘मला तुझ्या मित्रांना भेटव, मग मी सांगतो तू कोण आहेस ते!’ ही म्हण वर वर पाहता सामान्य वाटली तरी खोलवर विचार करता असं लक्षात येईल की, आपल्या मित्रपरिवाराचा आपल्या विचारांवर, वागणुकीवर आणि आपल्या एकूणच स्वास्थ्यावर फार गहिरा प्रभाव असतो. मित्र हे केवळ त्यांच्याबरोबर वेळ घालवण्यापुरते मर्यादित नसतात, तर आपण जपलेल्या मूल्यांचं प्रतिबिंब त्यांच्यात आपल्याला दिसतं, आणि आपल्या कठीण काळात ते खंबीरपणे पाठीशी उभे राहतात. नकारात्मक आणि आहे त्यातच समाधान मानणारी विचारसरणी असलेल्या मित्रांच्या सान्निध्यात राहणाऱ्या, एखाद्या ध्येयासाठी धडपडणाऱ्या मनुष्याचं चित्र डोळ्यापुढे आणून पाहा. त्याची कितीही चांगली आणि उच्च ध्येयं असली, तरी अशा प्रकारची माणसं त्याला खालीच खेचणार आणि त्याच्या प्रगतीच्या आडच येणार. आपल्या आयुष्यातलं स्थित्यंतर हे बऱ्याचदा आपल्या भोवतीची माणसं आणि परिस्थिती बदलल्याने घडतं. तेव्हा स्वत:ला विचारून पाहा, ‘ज्या माणसांच्या सान्निध्यात मी वावरतोय, त्यांच्यामुळे माझी प्रगती व्हायला, माझ्या ध्येयापर्यंत पोहोचायला मदत होतेय, की त्यांच्यामुळे अधोगती होतेय?’
दुसरा घटक म्हणजे आपण ग्रहण करतो ते अन्न. ‘जशा प्रकारचं अन्न आपण ग्रहण करतो तसेच आपण बनतो.’(you are what you eat)शारीरिक आरोग्याच्या बाबतीत कितीही खरं असलं तरी अन्नाचा प्रभाव केवळ आपल्या शरीरावरच पडत नसतो, तर आपल्या ऊर्जा पातळीवर, आपल्या मानसिक स्पष्टतेवर, भावनांवर आणि इतरांशी होणाऱ्या आपल्या संवादावरदेखील आपण ग्रहण करत असलेल्या अन्नाचा तितकाच प्रभाव असतो. आजच्या धावत्या जगात जाता जाता पटकन काही तरी खाणं, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, फास्ट फूड खाण्यावर भर असणं, आणि टीव्ही, मोबाइलवर काही तरी बघता बघता काय खातोय, किती खातोय याकडे लक्ष न देता नुसतं खात राहणं या वरवर सोयीच्या वाटणाऱ्या गोष्टींना आपण सहज बळी पडू शकतो. आत्ता जरी या सवयी निरुपद्रवी वाटल्या तरी कालांतराने केवळ शरीरात फक्त मेदाचे प्रमाण वाढवण्यापुरता त्यांचा दुष्परिणाम मर्यादित राहात नाही. निकृष्ट प्रतीच्या अन्नामुळे आपल्याला लवकर थकवा येणं, चिडचिड होणं, मेंदूला सुस्ती येणं, सजगतेनं जगण्याच्या क्षमतेत अडथळे निर्माण होणं अशा अनेक समस्या निर्माण होतात. याउलट, पौष्टिक अन्न ग्रहण केल्यामुळे लक्ष केंद्रित व्हायला मदत होते, चित्तवृत्ती प्रसन्न राहते आणि सजगतेनं जगण्याचा प्रवास अधिक सुखकर होतो. आपण ग्रहण करत असलेल्या अन्नाशी आपला संबंध कशा प्रकारचा आहे याचा विचार करा आणि स्वत:ला विचारा, ‘‘शारीरिक आणि मानसिक पातळीवर मी काय ग्रहण करतोय आणि त्यामुळे माझ्या ऊर्जेला आणि स्वास्थ्याला चालना मिळतेय की त्याचा ऱ्हास होतोय याकडे माझं लक्ष असतं का?’’
आपल्या आयुष्याला आकार देणारा तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे आपल्या भावभावना. आपलं वागणं भावनेवर अवलंबून असतं. आपल्या निर्णयांवर आणि कृतींवर त्यांचा चांगलाच प्रभाव असतो. सामाजिक दबावामुळे जरी आपण आपल्या भावभावना नियंत्रणात किंवा दाबून ठेवत असू, तरी आपले अनुभव आणि इच्छा यांबद्दल त्या फार मोलाची माहिती देत असतात हेही खरं. उदाहरणार्थ, उत्साहाच्या भावनेमुळे नव्या संधींकडे लक्ष जातं त्याचप्रमाणे दु:खाची भावना एखाद्या न सुटलेल्या आणि लक्ष द्यायची गरज असलेल्या प्रश्नाकडे निर्देश करत असू शकते. आपल्या भावनांशी सूर जुळवून घेतल्याने आपल्यामध्ये प्रतिक्रियेऐवजी प्रतिसाद देण्याची क्षमता निर्माण होते, यामुळे आपल्या भावनिक बुद्धिमत्तेत वाढ होते आणि अधिक अर्थपूर्णतेनं जीवन जगण्याचा मार्ग सुकर होतो. तुमच्यामध्ये तुमच्या भावनांचं प्रतिबिंब दिसतं. तेव्हा स्वत:ला विचारा, ‘‘मी माझ्या भावनांचा किती वेळा आदर करतो, आणि त्यांचा माझ्या निर्णयांवर कसा प्रभाव पडतो?’’
हेही वाचा :सांदीत सापडलेले…!: उपाय
चौथा घटक म्हणजे स्वत:बद्दलच्या समजुती किंवा कल्पना. ज्यामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वाला आणि आपल्या भविष्याला आकार प्राप्त होतो. या समजुती म्हणजे आपल्या गतकाळातील अनुभवांचं आणि आपल्या मते काय घडू शकलं असतं याचं प्रतिबिंब असतं. आपल्या स्वत:बद्दलच्या समजुतींमुळे आपण एकतर मोठी स्वप्नं बघू शकतो किंवा एका विशिष्ट मर्यादेच्या चौकटीत अडकून पडू शकतो.
प्रिया, ही तरुण कलाकार. तिच्या अपारंपरिक आणि चौकटीबाहेरच्या गायनशैलीबद्दल तिच्यावर खूप टीका झाली. सुरुवातीला लोकांच्या तिच्याविषयीच्या नकारात्मक प्रतिक्रिया तिने फारच मनाला लावून घेतल्या आणि तिच्यातल्या उपजत कलागुणांना तिने मर्यादा घातली. पण जेव्हा तिने परंपरेला छेद देणारी गायिका म्हणून स्वत:कडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं, तेव्हा या बदललेल्या दृष्टिकोनामुळे तिला साऱ्यांचं लक्ष वेधून घेणारी, वेगळ्या धाटणीची गायनशैली विकसित करण्याची प्रेरणा मिळाली. आपल्या स्वत:बद्दलच्या समजुती या आपल्याला ध्येयपूर्तीची प्रेरणा द्यायचं काम करत असतात. तुमच्या स्वत:बद्दलच्या समजुती काय आहेत याचा विचार करा आणि स्वत:ला प्रश्न विचारा, माझ्या भविष्याबद्दल माझ्या काय समजुती, काय दृष्टिकोन आहेत, आणि त्यांच्यामुळे मला प्रगतीची प्रेरणा मिळते का? याचा विचार करा.
पाचवा आणि शेवटचा घटक म्हणजे श्रद्धा. एक असा विश्वास ज्यामुळे जीवनाला ध्येय आणि दिशा प्राप्त होते. श्रद्धेचा संबंध बऱ्याचदा धर्माशी जोडला जात असला, तरी ती परंपरेच्या चौकटीच्या बाहेरची गोष्ट आहे. कुठल्या तरी अज्ञात सर्वोच्च शक्तीवरील किंवा माणसातल्या चांगुलपणावरील विश्वासाचं प्रतिनिधित्व श्रद्धा करत असू शकते. श्रद्धेच्या मूलभूत संकल्पनेचा आपल्या निवडींवर, आव्हानांना दिलेल्या प्रतिक्रियेवर, आणि एकूणच जीवनावर फार मोठा प्रभाव असतो. जणू काही आपल्या प्रवासात दिशा दाखवणारे होकायंत्र म्हणजे श्रद्धा!
दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांनी श्रद्धेला आपल्यापुरतं मर्यादित न ठेवता तिचं उदात्त स्वरूप जगासमोर दाखवलं. दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदाविरुद्ध लढताना २७ वर्षं कारावास भोगला. पण यामुळे त्यांची समानतेवर आणि न्यायावर दृढ श्रद्धा निर्माण झाली. निराशेच्या गर्तेत जाण्याऐवजी तुरुंगातील सहबांधवांना प्रेरणा देत आणि शांतीसाठी आग्रही राहात त्यांनी या श्रद्धेचं कृतीत रूपांतर केलं. तुमच्या श्रद्धेशी असलेल्या नात्याचा विचार करताना स्वत:ला आज विचारा, ‘‘अशी कोणती विचारसरणी किंवा हेतू आहे जो मला कोणत्याही आव्हानात्मक स्थितीमधून तारून नेतो? त्याच्याशी मी माझं नातं कशा प्रकारे दृढ करू, जेणेकरून माझ्यामधली श्रद्धेची भावना अधिक बळकट होईल?’’
हेही वाचा :विश्व साहित्याला गवसलेला नवा सूर
मित्र, अन्न, भावना, समजुती आणि श्रद्धा या आपल्या आयुष्याला आकार देणाऱ्या आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाची व्याख्या ठरवणाऱ्या पाच घटकांचा एकमेकांशी आंतरिक संबंध आहे. यातल्या प्रत्येक घटकाची आपल्या अनुभवात आणि निर्णयात अत्यंत महत्त्वाची भूमिका असते. या प्रभावी घटकांचा जाणीवपूर्वक विकास करत आपण आपल्या आयुष्याचा ताबा मिळवू शकतो आणि आपला जीवनप्रवास अधिक सजग आणि समाधानकारक करू शकतो. स्वत:चा शोध घेण्याच्या आणि सजगतेनं जगण्याच्या मार्गावर चालत असताना या सूक्ष्म घटकांचा तुमच्या आयुष्याची दिशा ठरवण्यात किती महत्त्वाचा वाटा आहे हे मात्र आवर्जून लक्षात घ्या. जितके हे घटक विकसित कराल, तितकं प्रकर्षाने तुमच्या लक्षात येईल की या प्रेरक घटकांच्या मदतीने काही तरी ध्येय डोळ्यापुढे ठेवून वाटचाल करणं एवढंच केवळ उद्दिष्ट नसून हा जीवन जगण्याचा एक अत्यंत सशक्त मार्ग आहे.
sanket@sanketpai.com