पुरुषांची, त्यांच्या तशा स्पर्शांची ती काही सेकंदातली जाणीव कायमची मनात कोरली गेली. सुदैवाने सगळ्याच पुरुषांविषयीच्या घृणेत नाही बदलली, कारण तोपर्यंत आणि त्यानंतरही असले कुठलेच अनुभव आले नाहीत. पण कोणत्याच एकाकी ठिकाणचा, अगदी निसर्गरम्य ठिकाणांच्या एकांतातला आनंद त्यानंतर घेऊ शकले नाही. लगभनानंतर आम्ही दोघेच असताना कुणी दांडगा पुरुष आला तर? या ‘भयभूती’नं चांगल्या अनुभवांना आयुष्यभर नाकारत आले. काही सेकंदांची ती काळी छाया माझ्यातल्या थोड्याबहुत साहसी व्यक्तीला संपवतच गेली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
त्यावेळी मी दुसऱ्या एका वर्तमानपत्रामध्ये काम करत होते. रविवार पुरवणीचं संपादन साहाय्य. पत्रकारितेत येऊन काही वर्षं झालेली. पुरवणीचं काम मिळाल्यानं जरा खूशच होते. बातमीदारीपेक्षा लेखांवर काम करणं आवडीचं. त्या दिवशीही मी येऊ घातलेल्या रविवारच्या पुरवणीचं काम संपवून, पानं प्रिटिंगला पाठवून मस्त आरामात घरी गेले. त्या आधी त्या पुरवणीत प्रसिद्ध होणाऱ्या लेखांची, त्यांच्या दोनचार ओळींच्या माहितीसह जाहिरात तयार करून दिली. ती शनिवारी प्रसिद्ध झाली. दुसरा दिवस रविवारचा. आरामात उठण्याचा, पण जाग आली ती लँडलाइन फोनच्या खणखणण्यानं. सकाळचे सात वाजलेले. आश्चर्य आणि किंचित भयही वाटलं. फोन उचलला. तिकडून एक वाक्य बोललं गेलं, ‘‘तुला कल्पना आहे का? आज रविवारच्या अंकासोबत पुरवणी प्रसिद्धझालेली नाही. व्यवस्थापकांनी त्यातल्या तुझ्या पानावरच्या एका लेखामुळे ती प्रसिद्ध करायची नाही असं ठरवलंय.’’
भीतीचा एक लोळ शरीरभर पसरत गेला… पायाखालची वाळू सरकणे म्हणजे काय हे मी त्याक्षणी अनुभवलं. ‘काय झालं पण नेमकं?’ कसाबसा माझ्या तोंडून प्रश्न बाहेर पडला. ‘‘त्यात एक घटस्फोटावरचा लेख आहे. आणि ज्या बाईंचे ते अनुभव आहेत त्यांच्या नवऱ्याने शनिवारच्या जाहिरातीत तिचं नाव वाचून आक्षेप घेतला आणि हा लेख प्रसिद्ध झाला तर परिणाम वाईट होतील अशी धमकी दिलीय.’’ एवढंच जेमतेम मनापर्यंत पोहोचलं. पुढचं काही ऐकूच आलं नाही. फोन कधीचाच बंद झाला होता आणि मी किती तरी वेळ तशीच उभी होते रिसीव्हर हातात घेऊन. भीतीच्या कल्लोळामुळे मन सुन्न झालं होतं. जरा वेळाने भानावर आले नि आधी आत जाऊन नवऱ्याला उठवलं. त्याला एकदोन वाक्यातच सांगितलं. त्यालाही काय बोलावं कळेना. किती तरी वेळ आम्ही फक्त एकमेकांच्या हातात हात घेऊन बसलो होतो.
दिवस त्याच्या वेगाने पुढे सरकत होता. मनात असंख्य प्रश्नांनी गर्दी केली होती. शरीरात मात्र भीतीचं तांडव सुरू होतं. कसली भीती होती ती? इंग्रजीत ज्याला Fear of failure, Fear of rejection, Fear of expression, Fear of existence म्हणतात ते होतं का? काय काय एकाच वेळी दाटून येत होतं मनात. खरं तर त्यातलं गांभीर्य मनापर्यंत पोहोचत नव्हतं. पण काही तरी अनाकलनीय घडलं आहे आणि आपण त्याला जबाबदार ठरवलो गेलो आहोत, ही जाणीव मनातली भीती अधिकच दाट करत होती. शेवटी दुपारी धीर एकवटून संपादकांना फोन केला. मी ‘हॅलो’ म्हटलं आणि फक्त ऐकत राहिले… शब्दांचे धारदार चपकारे, मनावर घाव करत जाणाऱ्या चाबकाचा एकेक फटका मनावर आघात करत होता. बोलायचं, बाजू मांडायचं काही नव्हतंच. पुन्हा एकदा, बंद झालेलं बोलणं न कळून रिसीव्हर घेऊन किती तरी वेळ मी तशीच उभीच. ती रात्र पूर्णत: जागेपणात संपली… गुलजारांच्या भाषेत, ‘एक पल राऽऽऽतभर नही गुजरा… ’ तो ‘पल’ तिथेच थांबून राहिला होता.
राजीनामा देणं, ऑफिसला जायचंच नाही असं काही सुचलंच नाही. गेले. काम केलं. घरी परतले. सगळं निमूटपणे सुरू होतं. मनापर्यंत काही पोहोचतच नव्हतं, सोबतीला अखंडपणे होती ती फक्त भीती. काय चुकलं नेमकं? वरिष्ठ पातळीवर काय चाललंय ते माझ्यापर्यंत पोहोचत नव्हतं. जाणून घ्यावं असंही वाटत नव्हतं. अनेक प्रश्न मात्र उत्तरांशी झुंजत होते, पण बोलणार कुणाशी? नंतर कळलं, त्या घटनेची कायदेशीर बाजू तपासली गेली. मुद्दा तांत्रिक होता, गंभीर नव्हता त्यामुळे चालू शकतं असं कळवलं गेलं आणि तीच छापून ठेवलेली रविवारची पुरवणी त्याच आठवड्यात प्रसिद्ध करण्यात आली, अगदी तशीच्या तशी. त्या घटनेला आता दोन दशकं उलटून गेलीत. पण, भीतीचा तो काळाकभिन्न अजगर आजही माझ्या शरीरमनाला घट्ट वेटाळून आहे. ती सकाळ तर एखाद्या दु:स्वप्नासारखी मला घाबरवत असते. अनेक रात्री जागवते.
ही घटना ते संपादक विसरले असतील, तो लेख लिहिणारी लेखिकाही विसरली असेल, जिचा तो अनुभव होता तिला तर हे काही कळलंही नसेल बहुधा, पण मी मात्र त्यानंतर, काही काळापर्यंत प्रत्येक पुरवणी भीतीच्या सावटाखाली प्रसिद्ध केली. पुढे मला त्याच व्यवस्थापनात एका नव्याने सुरू करण्यात आलेल्या मासिकाचं कार्यकारी संपादकपद दिलं गेलं. वाटचाल अगदी गतीने सुरू होती…
मला कसली भीती वाटली याचं उत्तर कमी-जास्त प्रमाणात कळू शकत होतं, पण इतकी का वाटावी? याचं उत्तर शोधावंसं वाटलं तेव्हा त्याच प्रश्नाचं बोट धरून थेट बालपणात पोहोचले. मी जरा जास्तच संवेदनक्षम होते, आहेही. प्रचंड हळवी. पण ‘ते’ केव्हा सुरू झालं माहीत नाही, पण घराबाहेर गेलेला माणूस १५ मिनिटं जरी सांगितलेल्या वेळेपेक्षा उशिरा आला की माझी अस्वस्थता सुरू व्हायची. ती व्यक्ती घरात येईपर्यंत घरातल्या घरात येरझाऱ्या सुरू व्हायच्या. जास्तच उशीर झाला तर मग खिडकीशीच अखंडपणे उभं राहाणं सुरू व्हायचं. अनेक प्रश्न विचारून घरातल्या इतरांना भांडावून सोडायचे. ताई तर वैतागायचीच, ‘तू स्वत: टेन्शन घेतेस. नी आम्हालाही देतेस. शांत राहा. येतील सगळे.’ कोणती भीती होती ती? आणि मलाच का वाटायची? इतकी? समुपदेशकांच्या मते, लहानपणी एखाद्या गोष्टीचा, घटनेचा तुमच्यावर तीव्र आघात झालेला असला की तो असा वर्तमानात सामोरा येत राहातो. एकदा का तुम्ही भूतकाळातला तो प्रसंग शोधला आणि त्याचं विश्लेषण केलं, त्याचं ‘क्लोझर’ अनुभवलंत की, तुम्ही त्यातून कायमचे मुक्त होऊ शकता. त्याप्रमाणे खूप खोल खोल जाऊन भूतकाळ धुंडाळला, पण अशी कोणतीच घटना आठवली नाही. आजही आठवत नाही. मग ‘फीअर ऑफ लुझिंग समवन’, असेल का त्यामागे?, माहीत नाही पण अगदी आजही अनेक प्रसंगातून ते तितक्याच तीव्रतेने अनुभवते. मोबाइल फोन नसते तर काय झालं असतं हा प्रश्नच मला भिववतो. या आपल्या माणसांबदद्लच्या भीतीचा आणि त्या पहिल्या नोकरीमधल्या भीतीचा तसा अर्थाअर्थी संबंध नसला तरी भीतीची जातकुळी एकच असावी का, काही तरी गमवायचं भय?
तशी आणखी एका प्रसंगाने बाईपणाची भीती अधिक घट्ट केली. कॉलेजला होते तेव्हा. कॉलेजला पोहोचायला उशीर होत होता म्हणून रेल्वेच्या ‘जेन्ट्स’ डब्यात चढले. प्रचंड गर्दी होती. दाराशीच, पण थोडी आत कशीबशी एका पायावर उभी होते. पुस्तकांनी भरलेली सॅक पाठीचं संरक्षण करीत होती आणि छातीशी होता एक जाडजूड फोल्डर, अगदी घट्ट धरून ठेवलेला. एवढ्यात मला उतरायचं स्टेशन आलं. डब्यातल्यांचा बाहेर उतरण्याचा रेटा आणि बाहेरच्यांचा आत येण्याचा रेटा यात माझ्या शरीराला कुठून कुठून कसले कसले स्पर्श होत गेले. अगदी पाच-सात सेकंदाचा हा खेळ, पण जेव्हा मी प्लॅटफॉर्मवर उतरले तेव्हा अक्षरश: भीतीने थरथरत होते. बसायचंही सुचलं नाही. किळसवाणं वाटत होतं, गलिच्छ वाटत होतं. चीड, संताप, घृणा कसल्या कसल्या भावना एकाच वेळी दाटून आल्या होत्या, अगदी असह्य वाटत होतं. ती गाडी निघून गेली. दुसरी आली. बदाबदा माणसं प्लॅटफॉर्मवर कोसळत होती, प्लॅटफॉर्मवरची कोंबली जात होती, जगरहाटी सुरू असल्यासारखी!
चित्र बदलत नव्हतं. बदललं होतं ते मला… त्या घटनेनं. पुरुषांची, त्यांच्या तशा स्पर्शांची ती काही सेकंदातली जाणीव कायमची मनात कोरली गेली. सुदैवाने सगळ्याच पुरुषांविषयीच्या घृणेत नाही बदलली, कारण तोपर्यंत आणि त्यानंतरही कधीही असले कुठलेच अनुभव आले नाहीत. कॉलेजमध्ये असताना आणि नंतर नोकरी करतानाही चांगले सहकारी मिळाले, त्यातले काही सहकारी-मित्र झाले, तर काही खूप जवळचे मित्रही झाले. पण या घटनेनंतर आजतागायत पुरुषांच्या डब्यात अगदीच कमी वेळा चढले. म्हणजे अगदीच गरज असेल आणि पुरुषांचा डबा अगदी ठार रिकामा असेल तरच किंवा नवऱ्याने आग्रहच केला तर त्याच्या शरीराची ढाल करत चढले, उतरले. पण त्यानंतर कोणत्याच एकाकी ठिकाणचा, अगदी निसर्गरम्य ठिकाणांच्या एकांतातला आनंद घेऊ शकले नाही. सासरी, गोव्याला अनेकदा गेलो आम्ही लग्नानंतर, पण एकांतात आम्ही दोघंच फिरायला गेलो असताना रोमँटिक वगैरे व्हायच्या ऐवजी ‘घरी चल’चाच घोषा असायचा माझा. आम्ही दोघेच असताना कुणी दांडगा पुरुष आला तर? या ‘भयभूती’नं अत्यंत चांगल्या अनुभवांना आयुष्यभर नाकारत आले. काही सेकंदांची ती काळी छाया माझ्यातल्या थोड्याबहुत साहसी व्यक्तीला संपवतच गेली.
भीती इतकी गडद का असते? अर्थात सगळ्यांना ती तेवढ्याच तीव्रतेने प्रत्येक गोष्टीत जाणवतेच असं नाही. वेगवेगळ्या प्रसंगांत ती कमी-जास्त, तत्कालिक असूच शकते. प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात येणाऱ्या अनुभवांतून आणि त्याला तोंड देण्याच्या तुमच्या अंगभूत स्वभावातून भीती कमी-जास्त वाटू शकते. सरसकट एकच एक मापदंड लावताच येणार नाही सगळ्यांसाठी. एखाद्या गोष्टीची एका व्यक्तीला वाटणारी भीती दुसऱ्या व्यक्तीसाठी सहजसाध्य गोष्ट किंवा क्षुल्लक गोष्ट असू शकते. दर आमावास्येला काही तरी वाईट घडणार याची खूणगाठ मनाशी घट्ट बांधून ती रात्रच पुसून टाकायचा आटोकाट प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती जेव्हा आजूबाजूला बघते तेव्हा मलाच आश्चर्य वाटतं. याची कसली भीती? पण अशीही काही माणसं माहीत आहेत, कल्पनेतल्या भीतीत जगणारी. मुलगी परदेशात शिक्षण आणि नंतर नोकरी करायला लागल्यावरही इथे भारतात बसलेल्या तिच्या आईचा प्रत्येक दिवस तिच्या काळजीने इतका व्याकूळ करायचा की, अखेर त्या विचाराने ती भ्रमिष्ट झाली. भीतीचा पगडा पुढे पुढे तर इतका वाढला की अखेर आत्महत्या करून भीतीतूनच ‘मुक्त’ झाली. काय झालं असेल तिचं नेमकं? कुणालाच कळलं नसेल का तिचं इतकं टोकाचं हळवं असणं वा भीतीला इतकं शरण जाणं? तिच्या त्या मुलीलाही नाही? आणि घरातल्या इतर लोकांना? उपचार करावेसेच नाही वाटले तिच्यावर? अलीकडेच आमिर खान आणि आयरा खानची मानसिक आरोग्यावरची मुलाखत पाहिली ‘युट्यूब’वर. त्यांनी हेच आपल्या अनुभवातून सांगितलं की, ‘जवळच्यांची मदत नसेल मिळत तर प्रोफेशनल मदत घेणं टाळू नका. मदत मिळतेच.’ आयुष्यच दावणीला लागणार असेल तर त्यातून बाहेर पडायलाच हवं, हे त्यातलं अंतिम सत्य.
गेले वर्षभर ‘भयभूती’ या सदरातून नामवंत लेखिकांच्या नजरेतून त्यांनी अनुभवलेले भीतीचे वेगवेगळे आयाम वाचक म्हणून तुम्ही वाचले असतीलच. त्यातले काही तुम्हाला जवळचेही वाटले असतील, काही अनुभवांच्या जवळजाणारे प्रसंग तुम्हीही अनुभवले असतीलच. प्रत्येकालाच आयुष्यात भीतीचा सामना करावा लागतोच, त्याची तीव्रता कमी-अधिक असू शकते तसेच ती काल्पनिक किंवा प्रत्यक्षही असू शकते. ‘भयभूती’ या सदराच्या निमित्ताने या भीतीचा धांडोळा घेतला गेला, पण सर्वांत महत्त्वाचं त्या भीतीच्या पलीकडे जाता येतं याचं भान अधोरेखित केलं गेलं. ते मला महत्वाचं वाटत आहे. हाच या सदराचा सांगावा आहे.
मीही दरम्यानच्या काळात, या संदर्भातलं खूप काही वाचलं, ऐकलं, समजून घेतलं त्यामुळे भीती काल्पनिकच असते याचा साक्षात्कार नक्कीच अनुभवला आहे, पण ते कळेपर्यंत जगणं राहूनच गेलं याचं वाईट वाटतं. अलीकडे वाचलेलं, Fear is a reaction. Courage is a decision, हे विन्स्टन चर्चिलचं वाक्य आयुष्याच्या सुुरुवातीच्या काळात वाचलं आणि कळलं असतं तर तेव्हाच मी स्वत:ला बदलू शकले असते का? हा प्रश्न मात्र मला राहून राहून पडतो, आजही…
arati.kadam@expressindia.com
(सदर समाप्त)