‘रिकामटेकडी’ हा पूनम सिंग-बिष्ट यांचा लेख (४ जानेवारी) वाचला. हल्लीची तरुण पिढी ‘वर्कोहोलिक’ आहे आणि त्याचबरोबर ताणतणाव कमी करण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यासाठी ‘अल्कोहोलिक’ही होत चालली आहे याची चिंता वाटते. ‘निवांत’ आणि ‘एकांत’ हे दोन शब्द हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात गायब झाल्याचे जाणवते. कोणाशी साधे बोलायचे असले तरी ‘तुम्हाला दोन मिनिटे वेळ आहे का?’ असा प्रश्न विचारावा लागतो. परदेशी (कॉर्पोरेट) कंपन्यात ‘जीम’ व दोन-तीन बेडची रेस्टरूम व्यवस्था केल्याचे बघितले आहे. तुम्ही जर १० मिनिटे शवासन (सुखासन) केलेत तर पुढचे ३-४ तास तुमच्या कामाचा काळ-काम-वेग (परफॉर्मंन्स)वाढतो असे सिद्ध झाले आहे. आवड आणि निवड ही ‘सवड’ दिल्यावरच सुचतात हे लक्षात घ्यायला हवे. स्वार्थ आणि परमार्थ साधायचा असेल तर १० मिनिटे डोळे मिटून नुसते बसले तरी महत्त्वाच्या गोष्टींची आठवण होते किंवा सुचतात. ५ मिनिटांची तंद्री किवा डुलकी तुम्हाला ताजेतवाने करते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा