‘स्त्रियांचे न्याय्य प्रतिनिधित्व हवे!’ हा खासदार सुप्रिया सुळे यांचा लेख (२२ जून) वाचला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहताना असे दिसून येते, की जेथे एका पक्षाने स्त्री उमेदवार दिला, तेथे दुसऱ्या पक्षाने पुरुष उमेदवार दिला आणि पुरुष उमेदवार विजयी झाला. एक उल्लेखनीय उदाहरण असेही दिसले, की तृणमूल काँग्रेस पक्षाने दिलेल्या १२ स्त्री उमेदवारांपैकी ११ उमेदवार निवडून आल्या. स्त्री उमेदवार जास्तीत जास्त संख्येने निवडून याव्यात असे वाटत असेल, तर राजकीय पक्षांनी स्त्री उमेदवाराविरुद्ध स्त्री उमेदवारच द्यावा. त्यामुळे विजयी होणाऱ्या स्त्री उमेदवारांची संख्या निश्चितच वाढेल. या लेखात स्त्रियांचे राजकीय प्रतिनिधित्व वाढण्यासाठी स्त्री सक्षमीकरणाचा मांडलेला मुद्दा योग्यच आहे, परंतु उमेदवारी देताना अमक्या नेत्याची पत्नी, मुलगी, बहीण किंवा अन्य कोणी नात्यातील व्यक्तीलाच उमेदवारी न देता, परिवाराच्या परिघाच्या बाहेर असलेल्या सक्षम स्त्री उमेदवाराला प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळायला हवी. ही मानसिकता राजकीय पक्षांनी दाखवण्याची आवश्यकता आहे. आपल्या देशात स्त्री-भ्रूणहत्या तसेच बालिका विवाहाचे प्रमाण अधिक आहे, स्त्री शिक्षणाचे प्रमाण अल्प आहे आणि त्यामुळे ‘ बेटी बचाओ, बेटी पढाओ’सारख्या योजनांना प्रोत्साहन द्यावे लागते. अशा ठिकाणी स्त्रियांना राजकारणात न्याय्य प्रतिनिधित्व मिळविण्यासाठी सध्या प्रतिनिधित्व करत असलेल्या राजकारणातील सक्रिय स्त्रियांनीच प्रयत्न करणे आवश्यक आहे.- सावळाराम मोरे

घरकामगार स्त्रियांना पुरेशा सुट्ट्या देण्याचे धोरण

My friend Half a century of friendship
माझी मैत्रीण : मैत्रीचं अर्धशतक!
embracing fear, How Fear Shapes Progress, How Fear Guides Us, How Fear Guides Us to Safety, fear as a teacher, fear, chaturang article,
‘भय’भूती : डर परम गुरु!
chaturang article, modern child rearing, Daily Struggles of Feeding child, child feeding, child rearing, marathi article
सांदीत सापडलेले.. : पूर्णब्रह्म!
chaturanga anti aging marathi news
कारी बदरी जवानी की छटती नहीं…
Loksatta chaturang Women World Issues of Menstrual Leave
स्त्री ‘वि’श्व: मासिक पाळीच्या रजेचे प्रश्न
Loksatta chaturang Vijay Tendulkar mitrachi goshta Writer poet Alok Menon lesbian
‘ती’च्या भोवती..!: ‘ठरलेल्या’ जगण्याला आव्हान देणारी ‘मित्रा’!
Social Process, post-violence,
‘समाजप्रक्रिया’ हिंसेनंतरची आणि पूर्वीचीही
loksatta chaturang letter dialogue live concept point of view
जिंकावे नि जगावेही : मीच लिहिले पत्र मला!

‘हवा सन्मान, हवेत अधिकार’ हा किरण मोघे यांचा लेख (८ जून) वाचला. करोनाकाळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय बंद पडले. साहजिकच याचा परिणाम घरकामगारांच्या कामावर झाला असणार. माझ्या घरी काम करणाऱ्या बाईला मी करोनाकाळात दीड महिना पूर्ण पगार दिला होता. तिच्या महिन्याच्या चार सुट्ट्या ठरवलेल्या आहेत. मे महिन्यात लग्नसराईमुळे एक-दोन सुट्ट्या जास्त होतात. कधी घरच्या कोणाच्या आजारपणाच्या कारणाने जास्त सुट्ट्या झाल्या तरी मी पैसे कापत नाही. माझ्या घरी असणाऱ्या पोळ्या करणाऱ्या बाईंनी सुनेच्या बाळंतपणासाठी तेरा सुट्ट्या घेतल्या होत्या, पण मी त्यांना पगार पूर्ण दिला. दिवाळीला फराळ, बोनस, संक्रांतीला हळदीकुंकू, तिळगुळ, वाण इत्यादी दिलं जातं. घरकामाची सेवा घेणाऱ्या इतरही स्त्रिया अशा प्रकारे काही ना काही करत असाव्यात. घरकामगार स्त्रियांना आपली तब्येत सांभाळणे, कुटुंब नियोजन, यांबाबत समुपदेशन व्हायला हवे असे वाटते.- वृषाली देशपांडे