‘लोकसत्ता दुर्गा जीवनगौरव पुरस्कार २०२४’च्या मानकरी डॉ. तारा भवाळकर यांचे सविस्तर भाषण २ नोव्हेंबरच्या अंकात वाचले. खरोखरच प्रत्येकाला मनामध्ये डोकावून पाहायला लावणारे, विचार करायला लावणारे त्यांचे भाषण होते. कठीण, संस्कृतप्रचुर शब्द त्यांनी भाषणात टाळले. अभिजात मराठी नावाचा दर्जा आपल्याला मिळाला म्हणजे नेमकं काय झालं, हा जसा प्रश्न त्यांना पडला तसा सामान्य वाचकांना- लेखकांनाही पडला असावा असो… शिक्षित व सुशिक्षित या शब्दात फरक आहे. सुशिक्षित म्हटलं की शिक्षणाच्या जोडीने शहाणपण, व्यवहारज्ञान असावं अशी अपेक्षा करतो. रस्त्यावरची भाजीवाली ही पदवीधर शिक्षित ग्राहकापेक्षा पटकन व्यवहार-हिशोब करते. उपजत बुद्धी असणं यालाही महत्त्व आहे. साक्षरता, शहाणपण आणि शिक्षण यांच्यामध्ये फरक असतो. हल्ली शाळेतील शिक्षित शिक्षकांचे ‘प्रताप’ आपण वृत्तपत्रात वाचतोच. अगदी पूर्वी लिहिता-वाचता येत नव्हतं तेव्हा ‘अनुभव’ महत्त्वाचा होता, तो शहाणपण शिकवत असे. मी ‘चतुरंग’चा जुना वाचक आहे. हल्लीच्या पुरवणीत वाचकांसाठी तऱ्हतऱ्हेचे विषय- सदरे देऊन लिहिण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं.
पडसाद : मनात डोकावून पाहायला लावणारे भाषण
‘लोकसत्ता दुर्गा जीवनगौरव पुरस्कार २०२४’च्या मानकरी डॉ. तारा भवाळकर यांचे सविस्तर भाषण २ नोव्हेंबरच्या अंकात वाचले. खरोखरच प्रत्येकाला मनामध्ये डोकावून पाहायला लावणारे, विचार करायला लावणारे त्यांचे भाषण होते.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 16-11-2024 at 01:16 IST
© The Indian Express (P) Ltd
© The Indian Express (P) Ltd
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta readers feedback and response on chaturang articles css