डॉ. अंजली जोशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मनापासून केलेलं फुलासारखं प्रेम मध्येच कोमेजावं आणि प्रिय व्यक्तीपासून दूर जावं लागावं, हा आजच्या पिढीतल्याही अनेकांसाठी फार हळवा टप्पा असतो. कुणाशी तरी बोलावंसं वाटत असतं, पण घरी आई-बाबांशी असं काही बोलणं शक्य नसतं, असंच पुष्कळ जण सांगतात. कारण आई-बाबा समजूनच घेऊ शकणार नाहीत, असं त्यांचं म्हणणं असतं. ते कित्येकांच्या बाबतीत खरंही ठरतं. आपल्या मुला-मुलीच्या ‘रिलेशनशिप’चा आणि ‘ब्रेक-अप’चाही स्वीकार करणारे, कोणताही दोषारोप न करता त्यांना या हळव्या काळात बळ देणारे आई-वडील नाहीतच का?..

काय अडकलंय आहे हे हातांमध्ये? गोल कडय़ासारखं! मी काढण्याचा प्रयत्न करतोय.. पण जाम निघत नाही. मी निरखून पाहतोय. अरे! या बेडय़ा कशा आल्या माझ्या हातांत? आणि माझ्याभोवती पोलीस का उभे आहेत? ‘ऐश्वर्यानं तक्रार केलीय म्हणून विराजला अटक होतेय..’ कुणी तरी मोठय़ा आवाजात म्हणतंय. पोलीस मला जोरात ओढताहेत. थांबा! थांबा! मी बोलण्याचा प्रयत्न करतोय; पण माझी दातखीळ बसलीय. ते मला ओढतच आहेत आणि मी धप्पकन खाली पडतोय..

मी दचकून जागा झालो. डोळे टक्क उघडले. प्रचंड घाम आला होता. उठून घटाघटा पाणी प्यायलो. घडय़ाळात रात्रीचे ३ वाजले होते. झोप पूर्ण उडून गेली होती. हे आता रोजचंच झालंय. ऐश्वर्याशी माझं ब्रेक-अप झाल्यापासून कुठली ना कुठली भयंकर स्वप्नं पडून मध्यरात्री जाग येते आणि मग झोप लागतच नाही. आता उजाडेपर्यंतचा वेळ सरता सरणार नाही. कॉलेजला गेल्यावर लेक्चरमध्येही लक्ष लागत नाही. कितीही ठरवलं तरी दिवसभर तिचेच विचार मनात घोंघावत राहतात आणि रात्री अशी स्वप्नं!

‘ऐश्वर्या आता माझी ‘एक्स’ आहे,’ मी स्वत:ला परत परत पटवून देत राहिलो. पण हृदय ते मानायला तयार नव्हतं. इंजिनीअिरगच्या दुसऱ्या वर्षांत असताना ऐश्वर्या पहिल्यांदा भेटली. ती आर्किटेक्चर करत होती. मनाचा असा बहर मी तोपर्यंत अनुभवला नव्हता. कॅफेत कधी एकत्र बसायला लागलो, भटकायला लागलो, सिनेमा पाहायला लागलो, ते कळलंच नाही. किती सुंदर दिवस होते! आणि आता? पाण्यातून बाहेर काढलेल्या माशासारखा तडफडतोय मी.

या विचारांतच सकाळ झाली. बाहेरच्या खोलीतून परिचित आवाज ऐकू यायला लागले. आई उठली असणार. कॉलेजमध्ये जायचा उत्साह नव्हता, पण आज टय़ुटोरिअल आहे. त्यामुळे नाइलाजाने उठलो. बाबांची आंघोळ चालू होती. आईनं चहाबरोबर ऑम्लेट समोर ठेवलं. ऐश्वर्याला भुर्जी-पाव किती आवडतो! ‘एम अँड एम’मधला तिचा आवडता भुर्जी-पाव खायला आम्ही किती वेळा गेलोय.. त्या आठवणींनी पोटात ढवळायला लागलं. ‘‘मला नको. खायची इच्छा नाही.’’ मी आईला म्हटलं.

‘‘विराज, काय झालंय काय तुला हल्ली? खाण्यात लक्षं नसतं. चेहरा किती सुकलाय.. डोळे सुजल्यासारखे दिसताहेत.’’ ती म्हणाली.

 ‘‘असाइनमेंट्स पूर्ण करायच्या आहेत. म्हणून जागावं लागतं.’’ सॅक घेऊन घराबाहेर पडता पडता मी म्हटलं. तिच्याशी या विषयावर चर्चा करण्याची माझी इच्छा नव्हती. मी ऐश्वर्याबरोबर रिलेशनशिपमध्ये होतो, ते आईबाबांना सांगितलं नव्हतं; पण त्यांना कुणकुण लागली असावी. मुलांवर पाळत ठेवण्यासाठीच आईवडील ‘फेसबुक’ आणि ‘इन्स्टा’ जॉइन करतात की काय कोण जाणे!

 ‘‘कोण रे ही सर्व फोटोंत दिसतेय?’’ आईनं विचारलंच एकदा.

 ‘‘मैत्रीण.’’ मी मोघम उत्तर दिलं. तरीही आईनं आणि नंतर बाबांनीही आडून आडून तिची माहिती विचारली.

 ‘‘इतक्या चौकशा कशाला? नुसते मित्रमैत्रिणी आहोत आम्ही.’’ मी चिडून म्हटलं.

‘‘अरे, मुली आता पूर्वीसारख्या साध्या राहिलेल्या नाहीत. चांगल्या बनेल असतात. त्या सावज हेरतच असतात. चांगला मुलगा दिसला, की लगेच गळय़ात पडतात. तू आपला भोळा सांब! कधी  ‘बनवला’ जाशील तेही कळणार नाही,’’ असं म्हणत आईनं ओळखीतल्या, नात्यातल्या मुलांचा मुलींनी स्वत:ची चैन भागवण्यासाठी कसा वापर करून घेतला याच्या कहाण्या सांगितल्या.

 ‘‘सावध रहा रे बाबा!’’ आई म्हणाली.

 मी काहीच बोललो नाही. सावध राहायचं म्हणजे नक्की काय करायचं? ठरवून, उमजून केलं तर ते प्रेम कसलं? तो तर व्यवहार झाला. खरं प्रेम आतून उत्स्फूर्तपणे येतं. सर्वस्व ओतून, जीव तोडून तुम्ही कधी प्रेम केलं आहे का? ती उत्कटता, ती बेचैनी, ते साफल्य तुम्ही अनुभवलं आहे का? तुमच्या प्रेमात कर्तव्यभावनेचा भाग जास्त असतो. टोकदार, ठसठसणाऱ्या प्रेमाची धुंदी तुम्हाला कळणारच नाही!

त्यांना मी ती नुसती ‘मैत्रीण आहे’ हे सांगितलं, तर इतकं ऐकायला लागलं. ‘आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत’ हे सांगितलं असतं तर अशी किती लेक्चर्स पडली असती याची गणतीच नको. प्रेमात पडणंच जिथे आईबाबांना समजून घेता येत नाही, तिथे प्रेमभंगाच्या वेदना काय कळणार? मी कुठल्या अवस्थेतून जातोय ते समजून घेण्यापेक्षा त्यांच्या अशा प्रश्नांचा मला नक्की सामना करावा लागेल- ‘संबंध कुठपर्यंत पुढे गेले होते?’, ‘कुणाकुणाला माहीत आहे?’, ‘बघ, आम्ही सांगत नव्हतो का आधीच?’..

..सगळे विचार ऐश्वर्यापाशी येऊन थांबतात. ते घालवले पाहिजेत. टय़ुटोरिअल चालू होईल आता. तीन महिन्यांपूर्वी ऐश्वर्याचा ‘तो’ मेसेज आला तेव्हाही टय़ुटोरिअलच चालू होतं. ‘अजून पुढे जाण्यात अर्थ नाही. इथेच थांबू या.’ मेसेजचा अर्थबोध व्हायला मला काही वेळ लागला. अलीकडे आमच्यात जरा खटके उडत होते.

‘‘विराज, प्रत्येक गोष्ट शेअर करण्याचा तू आग्रह धरतोस. मी रोज काय करतेय, कुठे जातेय, याचं स्पष्टीकरण तुला हवं असतं. माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचा हिशोब मी का द्यावा? त्याचं मला दडपण येतं,’’ असं ती म्हणायची. 

 ‘‘मी नाही का माझ्या सर्व गोष्टी तुझ्याशी शेअर करत?’’ मी ऐश्वर्याला म्हटलं. ‘‘तुला स्पेसची गरज नसेल; पण मला आहे. माझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण जाणून घेण्याचा तुला अधिकार नाही. मला गुदमरायला होतं. मला मोकळा श्वास घ्यायचाय.’’ पण या मुद्दय़ावरून ऐश्वर्या संबंध संपवूनच टाकेल, अशी कल्पना मी केली नव्हती. माझा फोनही तिनं उचलला नाही. फक्त मेसेज पाठवला, की मी फोन घेणार नाही आणि भेटणारही नाही. मला वाटलं की प्रयत्न केले तर कदाचित ती निर्णय बदलेल. मी वेडापिसा होऊन तिला फोन करत राहिलो, मेसेज करत राहिलो. तिनं मला सगळीकडे ब्लॉक करून टाकलं. तिच्या कॉलेजवर जाऊन धडकलो. ‘‘विराज, भेटायचं नाही असं बजावूनही तू इथे आलास. तू काहीही केलंस तरी मी माझा निर्णय बदलणार नाही.’’ ऐश्वर्या निर्वाणीच्या सुरात म्हणाली.

 ‘‘हा निर्णय आपल्या दोघांचा आहे ना? मला निर्णयाची संधीच न देता तू तो एकतर्फीपणे कसा काय घेऊ शकतेस?’’ माझा पारा चढला. शब्दानं शब्द वाढत गेला. मी तिच्याकडे प्रेमाची भीक मागत राहिलो आणि ती अधिकाधिक कठोर होत गेली.

‘‘विराज, तू इथे तमाशा करणार असशील, तर मी आताच्या आता पोलिसांत जाऊन तक्रार करीन.’’ तिनं धमकावलं. हृदयाला झालेली भळभळती जखम घेऊन मी थेट अनिषच्या खोलीवर जाऊन थडकलो. तो पेइंग-गेस्ट म्हणून राहात होता. इतकं पराभूत, अपमानित मला तोपर्यंत कधीच वाटलं नव्हतं. मुलींना रडून तरी मोकळं होता येतं, पण मुलांना तसंही करता येत नाही का? मी अनिषकडे काय खाल्लं, किती पीत होतो, किती सिगारेटी ओढत होतो, काय बडबडत होतो, हे नीटसं आठवत नाही. घरी जायला निघालो तेव्हा अनिष म्हणाला, ‘‘मूव्ह ऑन विराज! ब्रेक-अप आजकाल खूप कॉमन गोष्ट आहे. हळूहळू सावरशील. उद्यापासून नवीन आयुष्य चालू कर.’’

लेक्चर संपल्याच्या घंटेचा आवाज झाला. टय़ुटोरिअलनंतर लेक्चर कधी सुरू झालं तेही मला कळलं नव्हतं. हे कितवं लेक्चर? मी यांत्रिकपणे सगळं करतोय, पण आत काही पोहोचतच नाही. अनिष कसा एवढा प्रॅक्टिकल आहे? त्याचे तीन-चार ब्रेक-अप सहज झाले असतील! पण तो शोक नाही करत बसत. मी कुठल्या मुशीतून घडलोय? माझ्या भावनांचा अजून निचराच होत नाही. झालेल्या घटनांवर पडदा टाकणं जमत नाही. दु:ख इतकं खोल झिरपतंय, की ते कणाकणानं आत ठिबकत राहतंय. ठिबकणाऱ्या प्रत्येक कणाबरोबर जखम सोलवटून निघते. वेदनेचा ठणका सुरू होतो. क्षणाक्षणाला लगटलेल्या स्मृती पाठलाग करत धावत येतात. टेड-टॉक्स, इन्स्पिरेशनल व्हिडीओज, ब्रेक-अपचे फोरम्स यांचा आधार घेत मी त्यांना कसंबसं थोपवून धरतोय; पण काही तरी निमित्त होतं आणि परत गुरफटायला होतं.

परवा सोशल मीडियावर ऐश्वर्याचे फोटो दिसले. ब्रेक-अपचा मागमूसही चेहऱ्यावर नाही. नवीन मित्रमैत्रिणीसुद्धा झालेले दिसताहेत! इतक्या सहज कशी विसरली ही? की माझ्याशी प्रेमाचं नाटक करत होती? की ही दुसऱ्या कुणात गुंतलीय? म्हणजे इतके महिने जे होतं ते सर्व खोटं होतं? की ते खरं होतं, पण क्षणभंगुर होतं? नेमकं काय खरं आणि काय खोटं आहे? हृदय ओतून प्रेम केलं, त्याचं हे फळ? मला ऐश्वर्याचा राग का येत नाही? अजूनही मनाचा एक हळवा कोपरा ऐश्वर्यानं का व्यापला आहे? ब्रेक-अप मधून बाहेर पडता येत नाही हे कुणाला धड सांगताही येत नाही. सगळे हसतील मला. पुरुष कसा कणखर असला पाहिजे! कणखर नसल्याबद्दल स्वत:चा प्रचंड राग येतो. माझ्यामुळे म्हणे ऐश्वर्याचा श्वास गुदमरत होता! खरंच मी असा आहे? प्लेसमेंटसाठी कंपन्या येताहेत; पण मी तयारी करू शकत नाही. आपण काहीही यशस्वीपणे पार पाडू शकू, याबद्दलचा आत्मविश्वास ढासळलाय माझा.

 घरी आलो तर आई वाट पाहत होती. ‘‘विराज, सकाळी काही न खाताच गेला होतास. तुझ्या आवडीची कटलेट्स केली आहेत.’’ ती आर्जवानं म्हणाली.  इतक्या महिन्यांत तिच्याकडे माझं लक्ष गेलं नव्हतं; पण आता मी निरखून पाहिलं. तिच्या डोळय़ांखाली काळी वर्तुळं दिसत होती. चेहरा ओढलेला दिसत होता. म्हणजे हीसुद्धा जागते की काय माझ्याबरोबर? बाबाही अध्येमध्ये बोलायला येतात, पण आईबाबांच्या समोर स्फोट होईल या भीतीनं मी स्वत:ला खोलीत बंद करून घेतो. 

माझ्या पोटात तुटलं. आईबाबांना माझं काही तरी बिनसलंय हे कळतंय, पण काय ते कळत नाहीये. मला त्यांच्याशी बोलायचंय, पण बोलता येत नाहीये. मी एका काठावर उभा आहे आणि ते दुसऱ्या! मधलं अंतर कसं पार करायचं हे उमगत नाही. वाटतंय, सगळय़ा भावना कोरडय़ा होईपर्यंत धाय मोकलून रडावं! विचारावं, मला समजून घेऊ शकाल का? माझ्या वागण्याचा कुठलाही निवाडा न करता, माझ्या काय चुका झाल्या याचा पाढा न उगाळता, ‘तरी आम्ही सांगत होतो,’ असं पालुपद न लावता आणि मी परत प्रेमात पडू नये म्हणून डोळय़ांत तेल घालून पहारा न देता, निव्वळ मुलगा म्हणून माझा बिनशर्त स्वीकार कराल का?..