‘एलएनटी’चे अध्यक्ष एस.एन. सुब्रह्मण्यन यांनी नुकतेच कर्मचाऱ्यांनी आठवड्याला ९० तास काम करायला हवे, असे विधान केले आणि सर्व माध्यमांवरच नव्हे, तर अगदी खासगीतही यावर चर्चा रंगली. त्या सर्वामध्ये एका गोष्टीवर मात्र अनेकांचे एकमत झाले ते म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात ‘वर्क-लाइफ बॅलन्स’ हवा. का आणि कसा सांभाळावा हा तोल?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मध्यंतरी एका महाविद्यालयातल्या प्राध्यापिकेशी बोलत असताना, तिने एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. त्यांच्या महाविद्यालयामध्ये ठरवलेल्या वेळेत पोहोचायला पंधरा मिनिटे जरी उशीर झाला तरी अर्ध्या दिवसाची सुट्टी कापली जाते. तिच्या मुलांच्या शाळेत ‘पालक-शिक्षक दिवस’ सकाळच्या वेळेत असतो. त्या दिवशी तिला हमखास तिच्या महाविद्यालयात जायला उशीर तर होतोच, शिवाय पोहोचेपर्यंत ताण येतो तो वेगळाच. कामाच्या ठिकाणी वेळेची चौकट एकदम कडक असते. अशा प्रकारचा ताण बहुतेक ठिकाणी कळत-नकळत असतोच. अनेक स्त्रिया घर आणि नोकरीतला तोल सांभाळता येत नसेल तर सरळ नोकरी सोडून देतात किंवा बदलून टाकतात. ज्यांना शक्य नाही त्या मात्र अनेकदा आयुष्य ओढत नेतात.

हेही वाचा – पडसाद : स्वार्थ आणि परमार्थ साधायचा असेल तर…

‘एलएनटी’चे अध्यक्ष एस.एन. सुब्रह्मण्यन यांनी नुकतेच कर्मचाऱ्यांनी आठवड्याला ९० तास काम करायला हवे, असे विधान केले आणि त्यानंतर ‘वर्क लाइफ बॅलन्स’बद्दल सर्वत्र जोरदार चर्चा सुरू झाली. बहुतांश चर्चेत बॅलन्स वा तोल सांभाळला गेलाच पाहिजे, असे ठाम मत व्यक्त झाले आहे. मात्र तो कसा असावा याबाबतीत स्त्री आणि पुरुषांच्या विचारांत तफावत आहे. आजही भारतात घरकाम आणि मुलांचे संगोपन प्रामुख्याने स्त्रीचेच काम आहे, असे समजले जाते. करोना साथीच्या काळात आणि नंतरदेखील अनेक जणांनी घरातून काम केले, तेव्हादेखील स्त्रिया घरातलं सगळं काम सांभाळून कार्यालयीन कामदेखील करत होत्या. या स्त्रीला नुसतंच ‘वर्क फ्रॉम होम’ नाही तर ‘वर्क फॉर होम’देखील करावे लागले. त्यासाठी ‘वर्क लाइफ बॅलन्स’ ही संकल्पना पुन्हा एकदा समजून घ्यायला हवी. साध्या शब्दांत सांगायचे झाले तर ‘वर्क लाइफ बॅलेन्स’ म्हणजे प्रत्येकाकडे काम आणि स्वत:च्या गोष्टींसाठी वेगळा वेळ असणे. मग यात कौटुंबिक वेळ असेल किंवा स्वत:च्या आवडीनिवडी, छंद याकरिता काढलेला वेळ असू शकतो. कामामुळे तुम्हाला मूलभूत गरजा भागवणे शक्य होते. पगारामुळे अन्न, निवारा आणि सुरक्षितता मिळते तसेच कामामुळे लोकांच्यात मिसळण्याची आणि समूहाचा भाग होण्याची संधी मिळते आणि चांगले काम केले तर त्यामुळे स्वाभिमान आणि आत्मविश्वास वाढतो. पण केवळ आणि केवळ काम केल्याने माणसाच्या मनासारखे मोकळेपणाने जगता येत नाही. त्यामुळेच रिकामा वेळ आणि जीवनशैली महत्त्वाची झाली आहे.

माझ्या एका मैत्रिणीने नुकतेच ५०व्या वर्षांत पदार्पण केले. तिचा स्वत:चा व्यवसाय आहे. ती सतत कायम व्यग्र असायची. तिच्या दोन्ही मुलांना तिनेच वाढवले कारण नवरा कायम फिरतीवर असायचा. परवा तिचा फोन आला, ‘भेटूया म्हणून.’ मला जरा आश्चर्यच वाटले, कारण यापूर्वी कधी आम्ही भेटायचे ठरवले की, ही कायम धावत पळत येणार आणि लगेच निघणार, तरीही पुढचे १५ दिवस ‘आपण किती वेळ वाया घालवला’ या अपराधी भावनेत घालवणार. त्यामुळे भेटल्यावर तिला विचारलं तर म्हणाली, ‘‘अगं, थोडे जगायचे ठरवलेले आहे. आपण स्त्रिया अनेक गोष्टी एकदम करण्यात धन्यता मानतो. मी सर्व आघाडय़ा समर्थपणे सांभाळू शकते हे दाखवण्याच्या नादात स्वत:कडे लक्ष द्यायचे राहून गेले हे आता आता लक्षात येतंय. एक मोठा बदल मी केला तो म्हणजे मी घरातल्या सगळय़ांना कामं सांगायला आणि त्यांची मदत घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे माझा रोजचा ताण खूपच कमी झाला. हे मी आधीच का नाही केले असे आता वाटायला लागलेले आहे. सध्या मी गाणं शिकते आहे आणि चक्क सोलो ट्रिपवर चालले आहे.’’ तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह पाहून बरे वाटले.

कामावरच्या ताणामुळे स्वत:कडे आणि तब्येतीकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. फक्त करिअरकडे लक्ष देऊन उतारवयात आपल्याला हवे ते करायचे राहूनच गेले असे म्हणत खंतावणारी पिढी एका बाजूला, तर सोशल मीडियामुळे आपले मनोरंजन होते आहे आणि आपण लोकांशी जोडलेलो आहोत, असे वाटणारी दुसरी पिढी आहे. या सगळय़ांसाठी खरे तर ‘वर्क लाइफ बॅलेन्स’चे महत्त्व पटणे गरजेचे आहे.

परवा माझी मैत्रीण अर्चना भेटली. एकेकाळी चेहऱ्यावर हसू आणि उत्साहाने भरलेली अर्चना निस्तेज आणि उदास वाटली. उसासे टाकत तिने आपल्या नवीन दोस्ताबद्दल सांगितले. मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांच्याशी तिची नुकतीच ओळख झालेली. डॉक्टरांनी तिला वजन कमी करायला सांगितले आहे, पण तिला कामातून वेळच मिळत नाहीये. कामाच्या ताणामुळे हे दोस्त आता कायमच तिच्या सोबत असतात.

हेही वाचा – बारमाही : असले जरी तेच ते…

ही उदाहरणे आपल्या आजूबाजूला नेहमीच दिसणारी. डेडलाइन गाठण्याच्या नादात तब्येत, कुटुंब, आपली आवड, आनंद, छंद या सगळय़ांना फाटा देणारे हळूहळू आपल्या तब्येतीकडे पूर्ण दुर्लक्ष करतात. मग ताण, पोटाच्या तक्रारी, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यासारखे आजार सुरू होतात. ‘फास्ट फॉरवर्ड’च्या जगात लोकांकडे आवश्यक ते करण्यासाठी दिवसातले तास पुरत नाहीत. मग स्वत:ला हवे ते करण्यासाठी वेळ काढणे ही तर अशक्यप्राय गोष्ट झाली आहे. तुमच्या जबाबदाऱ्या आणि ज्या गोष्टीमुळे तुम्हाला ऊर्जा आणि आनंद मिळतो. जसे व्यायाम, छंद यांचा समतोल कसा सांभाळावा याविषयी तुम्हाला स्वत:ला प्रशिक्षित करता येते. यासाठीचा फॉर्म्युला प्रत्येकासाठी वेगवेगळा असतो आणि तो प्रत्येकाचा प्रत्येकालाच शोधावा लागतो. त्यासाठी आपल्या ध्येयावर लक्ष ठेवून कामाच्या वेळा पाळणे, त्याचा प्राधान्यक्रम ठरवणे, अधिक कार्यक्षम होणे तसेच परिणामकारकपणे इतरांकडून काम करवून घेणे यांचा तोल सांभाळावा लागतो.

आपल्यातल्या बहुतेकांना काम महत्त्वाचे आहे, अशी शिकवण मिळत असते आणि आवडत्या गोष्टी या जर कामातून वेळ मिळाला तरच करण्यासाठी असतात, अशी आपली पारंपरिक समजूत असते. पण तुम्ही हे सगळे नियम बदलू शकता. त्यासाठी स्वत:ला काय हवे आहे, हे समजून घेणे महत्त्वाचे असते. कारण आपली आध्यात्मिक, सामाजिक व शारीरिक ध्येये ही आपल्या नोकरी-व्यवसायाइतकीच महत्त्वाची आहेत याची जाणीव झाली तरच वैयक्तिक यश मिळू शकते. कारण ध्येये ही केवळ कार्यालयीन कामापुरतीच मर्यादित नसतात तर स्वत:ला काय आवडतं, हे ठरवणं आणि ते मिळवणं हेही ध्येयच असतं. मात्र त्याचसाठी तुमच्या कार्यालयीन कामांना वेळेचे बंधन घालणे गरजेचे असते. ते त्या वेळेत पूर्ण केले की उरलेला दिवस तुमचाच असतो. त्यात तुम्ही स्वत:च्या आवडीचे काहीही करू शकता.

मला डॉली पार्टन या प्रसिद्ध गायिकेचे एक वाक्य खूप आवडते आणि ते सगळ्यांनाच लागू होते. ‘Never get so busy making a living that you forget to make a life.’

medhat235@gmail.com