‘ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा’ या संत चोखामेळा यांच्या अभंगातील दोन ओळी. काही गोष्टी वरून चांगल्या दिसत नाहीत, पण त्यांचं अंतरंग सुंदर, देखणं, गोड असतं. चोखामेळांच्या वरील ओळींना दुजोरा देणारी ही गोष्ट.
सातवीच्या स्कॉलरशिप परीक्षेत यंदा भरघोस यश मिळालं होतं. सुमित्राबाईंनी अभ्यास करून घेतला होता म्हणून अर्थातच त्या खूश होत्या. मुलांना त्यांनी आपल्या घरी भेळ खायला बोलावलं. चटपटीत भेळ मुलांना आवडली. नंतर बाईंनी छानसं आंबट गोड सरबत दिलं. मुलं खूप आनंदात होती. गप्पागोष्टींत रंगली होती. बाई म्हणाल्या, ‘‘मुलांनो, तुम्हाला सगळं आवडलेलं दिसतंय, पण बाळांनो, भेळीसाठी माझ्याकडे एकसारख्या डिशेस नव्हत्या. सरबत द्यायला पेलेसुद्धा सगळे वेगवेगळे. मला वाईट वाटतंय.’’ एक चुणचुणीत मुलगी म्हणाली, ‘‘बाई, भेळ इतकी मस्त होती की आमचं कोणाचंही लक्ष डिशकडे गेलंच नाही. भेळीसारखंच सरबत पण छान चविष्ट असणार हाच विचार सर्वानी केला असेल, म्हणून भराभर पेले आम्ही उचलले. ते बाहेरून कसे आहेत इकडे पाहिलंय कोणी? आणि बाई, तुम्ही शिकवलेला श्लोक पण खूप आवडला.’’ मिनिटभर विचार केल्यावर बाईंच्या लक्षात आलं, हिने मनातील गोष्ट सोप्या शब्दात सांगितली. अंतरंग मोहून टाकणारं असेल तर बाह्य़रंगाकडे दुर्लक्ष होतं. अंतरंग लोकांना मोहवून टाकणारं असावं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा