फळांचा राजा अशी ओळख असणारे व आपल्या आंबट-गोड चवीने व रसाळ गुणधर्मामुळेच लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वामध्ये लोकप्रिय असणारे फळ म्हणजे आंबा होय. हिंदीमध्ये ‘आम’ इंग्रजीमध्ये ‘मँगो’, संस्कृतमध्ये ‘आम्र’ तर शास्त्रीय भाषेत ‘मॅन्जीफेरा इंडिका’ म्हणून आंबा परिचित आहे. आंबा हा ‘एॅनाकाíडअसी’ कुळातील आहे. तोतापुरी, हापूस, पायरी, उत्तर प्रदेशातील दशेरी, नीलम अशा अनेक वेगवेगळ्या जातींनुसार त्याचा आकार, रंग व चव थोडाफार बदलतो. आंबा हा आहार व औषध अशा दोन्ही दृष्टीने बहुमोल आहे.
आपल्या परिसरात, झाडावरच पिकलेला आंबा आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी हितकारक असतो. आंबा हा नेहमी ताजा खावा व शक्यतो आंबा कापून खाण्यापेक्षा चोखून खावा.  कारण कापून खाल्लेला आंबा हा पचनास जड तर चोखून खाल्लेला आंबा हा पचण्यासाठी सुलभ व हलका असतो. आंबा हा हिरवट पिवळा, गुलाबी पिवळा व हिरवा अशा रंगांमध्ये पाहावयास मिळतो. लखनवी आंबा फक्त पांढऱ्या रंगाचा असतो.
औषधी गुणधर्म –
कैरी व आंबा या दोन्ही अवस्थांमध्ये या फळात औषधी गुणधर्म सापडतात. कैरी ही आम्लधर्मी स्तंभक आहे. तर कैरीची साल ही कषायगुणात्मक व उत्तेजक असते. पिकलेला आंबा हा मधुर, स्निग्ध, सुखदायक, बलदायक पचायला जड, वायुहारक, थंड, शरीराची कांती वाढविणारा, जठराग्नी प्रदीप्त करणारा असतो. यामध्ये कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस, क जीवनसत्त्व, तंतुमय पदार्थ, प्रथिने, आद्र्रता, मेद, पिष्टमय पदार्थ ही घटकद्रव्ये असतात.
     आंबा खाण्यापूर्वी तो थोडा वेळ थंड पाण्यात भिजू द्यावा. त्यामुळे पूर्णपणे स्वच्छ करता येतो व   देठाजवळचा   चिक व्यवस्थित काढून टाकता येतो.
उपयोग-
* आंबामध्ये ‘अ’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्यामुळे रातांधळेपणावर आंबा औषधाप्रमाणे गुणकारी ठरतो. * बुबुळांची शुष्कता, डोळ्यांची आग होणे, खाज येणे हे नेत्रदोष, उन्हाळ्यामध्ये नियमित आंबा सेवन केल्याने टाळता येतात.
* एखाद्या रुग्णाचे वजन कमी असेल व त्यामुळे त्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल तर अशा रुग्णांस पिकलेला आंबा व त्यासोबत दूध सकाळ, दुपार, संध्याकाळ असे रोज तीनदा द्यावे. आंबा चोखून खाऊन त्यावर दूध प्यावे. महिनाभर हा प्रयोग केल्यास रोगप्रतिकारकशक्ती वाढून वजनही योग्य प्रमाणात होते. * जर पाण्यासारखे जुलाब होत असतील तर आंब्याच्या कोयीचे चूर्ण दीड ते दोन ग्रॅम मधाबरोबर किंवा पाण्यातून घ्यावे. * स्त्रियांच्या विकारांमध्ये आंब्याच्या कोयीचे चूर्ण खूप उपयुक्त ठरते.  अतिरक्त स्राव, श्वेतस्राव हे विकार आटोक्यात ठेवता येतात.
* आंबा आतडय़ांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी उपयुक्त ठरतो. आमांशयाच्या रोगांमध्ये आंबा औषध म्हणून कार्य करतो. आंबा खाल्ल्याने मलावस्तंभाचा त्रास होत नाही. पिकलेला आंबा पोट साफ करणारा, चरबी वाढविणारा, शक्तिवर्धक आणि उत्साहवर्धक असतो. * अपचनाच्या तक्रारी तसेच रक्त कमी असल्याने होणाऱ्या विकारामध्ये आंबा सेवन करणे लाभदायक ठरते. * आंब्याची कोवळी पाने रात्रभर पाण्यात ठेवून सकाळी कुस्करून ते पाणी प्यायल्यास  मधुमेह हा आजार आटोक्यात ठेवता येतो.
* आहारामध्ये कच्च्या कैरीचे लोणचे, मुरंबा कायम वापरावा. फक्त लोणच्यामध्ये कमीत कमी तेल, मीठ व मसाला वापरावा. तर मुरंबा बनविण्यासाठी साखरेऐवजी गुळाचा वापर करावा. * आंब्याची साल व्रणरोधक स्तंभक व गर्भाशयाची सूज घालविणारी आहे. आंब्याची कोय ही कृमीनाशक असून गर्भाशयाची सूज कमी करणारी रक्तप्रदर व श्वेतप्रदरावर उपयुक्त आहे.  लघवीतील जंतुसंसर्ग कमी करून मूत्रप्रवृत्ती साफ करणारी आहे.
सावधानता –
मधुमेह असणाऱ्यांनी, अतिलठ्ठ व्यक्तींनी आंबा खाऊ नये किंवा अगदी कमी प्रमाणातच खावा. कारण आंब्यामध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त प्रमाणात असते.  कच्च्या कैऱ्या फार खाऊ नयेत, त्यामुळे घशात खवखव व अपचन, जुलाब, पोटदुखी या तक्रारी उद्भवतात. आंबा हा नसíगक पद्धतीने पिकविलेलाच खावा. रासायनिक पद्धतीने पिकविलेला आंबा हा आरोग्यास घातक असतो.
डॉ. शारदा महांडुळे sharda.mahandule@gmail.com

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
kitchen Jugad Tired of removing coconut
नारळाच्या शेंड्या काढून वैतागलात? ‘हा’ सोपा जुगाड एकदा वापरा अन् झटक्यात होईल काम
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”
Marathi Actor Siddharth Chandekar Special Post share for amey wagh on his birthday
“जीभेवर व्हेज, मनात नॉनव्हेज…”, सिद्धार्थ चांदेकरने अमेय वाघला वाढदिवसाच्या दिल्या हटके शुभेच्छा; म्हणाला…
Passenger service from Dadar to Ratnagiri stopped Mumbai news
दादरवरून थेट रत्नागिरी जाणारी पॅसेंजर सेवा बंद; प्रवाशांचे हाल
konkan hapus mango season likely to deley due to prolonged monsoon
लोकशिवार: लांबलेल्या पावसाने ‘आंबा’ही लांबवला