पूर्वी एकत्र कुटुंबांत लहान मुलांचं जेवण ही इतरांसाठी तारेवरची कसरत नसे! आजीआजोबा, लाडाचे काकाआत्या, बाकीची छोटी भावंडं यांच्याकडे बघत खेळाखेळात जेवण होऊन जायचं. ही परिस्थिती अगदी आता मध्यमवयीन असलेल्यांच्या बालपणीही थोड्याफार फरकानं अशीच राहिली. आता मात्र बहुसंख्य घरांत एकच मूल अतिलाडाचं. त्यामुळे त्याचं खाणंपिणं हा सगळ्या घराला नाचवणारा, भरपूर थकवणारा कार्यक्रमच! तुमच्याकडे कसा असतो हा ‘डेली सोप’?…

आज पलकनं खिडकीतून खालच्या बागेकडे बोट दाखवलं आणि ‘तिथे…तिथे’ असं म्हटलं. लगेच तिची आजी आणि शांताबाई तिला कडेवर घेऊन, तिच्या जेवणाची पिशवी खांद्यावर घेऊन लिफ्टकडे धावल्या. दुपारचे दोन वाजले होते, त्यामुळे बाहेर ऊन होतं. त्यापासून संरक्षण म्हणून पलक आणि आजी यांच्या डोक्यावर टोपी होती, तर शांताबाईंच्या डोक्यावर ओढणी. १४ मजले लिफ्टनं उतरून ही वरात बागेत पोहोचली. तिथे पलकनं तिच्या आवडत्या झोक्याकडे बोट दाखवलं. सुदैवानं तो रिकामाच होता. शांताबाईंनी पिशवीतून सॅनिटायझर स्प्रे काढला आणि तो झोका पुसला. झोका, बाक, सीट पुसण्यासाठीचं वेगळं कापड त्या पिशवीच्या एका बाहेरच्या कप्प्यात ठेवलेलं होतं. अशी सगळी तयारी झाल्यावर पलकची त्या झोक्यावर प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आणि तिच्यासमोर मनोरंजनाचा कार्यक्रम सुरू झाला!

Viral Video Of Pet Dog
‘त्यांचाही जीव… त्यांना वाऱ्यावर सोडू नका ‘ घर शिफ्ट करणाऱ्या कुटुंबाने जिंकली नेटकऱ्यांची मने; पाहा Viral Video
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Scientist Rahul Damale selected for Netaji Subhash ICAR International Fellowship
वडील तिसरी उत्तीर्ण तर आई निरक्षर, मुलगा शास्त्रज्ञ झाला, आता परदेशी शिक्षणासाठी निवड
Viral Video Shows Father And Daughter love
‘काय ते छोटे छोटे घास, काय ते तोंड पुसणे…’ एकाच ताटात बाबांबरोबर जेवणारी लेक; पहिला घास लेकीला, तर दुसरा… VIDEO व्हायरल
Mother love shocking video woman Went To Buy Milk for her baby And The Train Started Emotional Video
भुकेल्या बाळाला दूध आणायला उतरली आणि ट्रेन सुटली; पण तेवढ्यात घडला चमत्कार, VIDEO चा शेवट पाहून डोळ्यांत येईल पाणी
kids anger issues
तुमची मुलंही सतत रागावतात, चिडचिड करतात? मग ‘या’ सोप्या उपायांनी मिळवा नियंत्रण
mother shouts at the Pet Dog
आई अशीच ओरडते ना? घरभर केस पडलेले पाहून श्वानाला ओरडली अन्… ; VIDEO पाहून येईल हसू
homosexual, Akola , Marriage for money,
अकोला : पैशांसाठी लग्न, पोलीस पत्नीचा छळ अन् पती निघाला समलैंगिक….

हेही वाचा…स्त्री ‘वि’श्व: मासिक पाळीच्या रजेचे प्रश्न

या ‘मनोरंजना’साठी लागणारा टॅब पिशवीच्या वेगळ्या कप्प्यात तयार होता. उन्हात तो नीट दिसावा म्हणून स्क्रीनचा ब्राइटनेस शांताबाईंनी वाढवला. या सर्व गोष्टींत त्यांचं उत्तम प्रशिक्षण झालेलं होतं. पलकच्या आवडत्या ‘पेपा पिग’ची गोष्ट सुरू करून आणि टॅब समोर धरून शांताबाई पलकच्या झोक्यासमोर उभ्या राहिल्या. अशा रीतीनं सर्व आरास झाल्यावर पलकनं या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली! तिच्या सर्व काही मनासारखं झालं की ती टाळ्या वाजवून ‘‘वा! वा! मस्त!’’ असं म्हणायला शिकली होती. तिच्या दोन वर्षांच्या गोड चेहऱ्यावरचं हसू आणि ‘वा-वा-मस्त!’ हे उद्गार ऐकून शांताबाई कृतकृत्य झाल्या.

तोपर्यंत आजीनं ‘नैवेद्याचं ताट’ वाढून तयार केलं. त्याच कप्प्या-कप्प्यांच्या पिशवीत एक रंगीबेरंगी ताट आणि उकळून गार केलेल्या पाण्याचा ‘सिपर’ होता. ते दोन्ही बाहेर काढल्यावर खाली अजून एक लंचबॉक्स होता. तो एअरटाइट बॉक्स आजीनं उघडला. त्यात मऊ वरण-भात, एक उकडलेलं अंडं, आलू पराठ्याचा एक चतकोर तुकडा, बारीक कापून वाफवलेल्या भाज्या- म्हणजे रंगीत शिमला मिरची, ब्रोकोली आणि अगदी मऊ शिजवलेली मोड आलेली कडधान्यं होती. पिशवीतच एका छोट्या डब्यात श्रीखंड आणि त्याचा रंगीत चमचाही होता.

हेही वाचा…‘ती’च्या भोवती..!: ‘ठरलेल्या’ जगण्याला आव्हान देणारी ‘मित्रा’!

सॅनिटायझरनं हात स्वच्छ करून आजीनं आधी श्रीखंडाचा छोटा रंगीत चमचा पलकसमोर धरला. तिचं बाल-लक्ष पूर्णपणे पेपा पिग, डॅडी पिग आणि पेपाचा भाऊ जॉर्ज यांच्या लीलांकडे होतं. पण दोन वर्षांची ही चिमुरडी खूपच हुशार! ओठांपाशी श्रीखंड येतात तिनं ते जिभेनं चाटून पाहिलं आणि आवडता ‘इलायची फ्लेव्हर’ आहे याची खात्री पटल्यावरच तोंड उघडून संपूर्ण चमच्याला आत येण्याची परवानगी दिली. ‘‘चला, गाडीनं स्टेशन तर सोडलं! आता टप्प्याटप्प्यानं पुढचा प्रवास होत राहणार.’’ असं पुटपुटत आजीनं पराठ्याचा छोटा तुकडा तिच्या उघड्या तोंडात सरकवला. पलकचं तोंड एकदम बंद झालं, पण हललं नाही. ‘आता काय झालं? थुंकून टाकते की काय?’ अशी आजीला काळजी वाटत असतानाच स्क्रीनवरच्या पेपा पिगनं काही तरी गमतीदार गोष्ट केली आणि पलकनं आनंदानं टाळ्या वाजवत तोंडातला घास चावायला सुरुवात केली. तिचा जबडा जसा हलायला लागला तसे आजीच्या हृदयाचे थांबलेले ठोके पुन्हा सुरू झाले! पेपा आणि जॉर्ज यांचे उद्याोग बघत आज पलकनं पराठाच काय, पण वरण-भातसुद्धा संपवला. शांताबाईंची आता चुळबुळ सुरू झाली. त्यांनी आधी एका पायावर आणि नंतर दुसऱ्या पायावर वजन टाकण्याचा नाच सुरू केला. पण ते करताना हातातला टॅब हलणार नाही याची त्या काळजी घेत होत्या. ‘‘झालं बरं का… भात आणि पोळी संपली. आता फक्त भाज्या, फ्रुट्स आणि एक अंडं राहिलंय. आज स्वारी फारच खूश दिसते आहे!’’ आजीच्या या वाक्यावर शांताबाईही मनापासून हसल्या. ‘‘चालायचंच हो आजी! एवढासा जीव तो. आपल्यालाच काळजी करायला पाहिजे.’’

ब्रोकोलीचा तुकडा तोंडात पडताच पलकचा मूड बदलला. तिनं क्रुद्ध नजरेनं आजीकडे पाहिलं आणि जिभेची घसरगुंडी करून तो तुकडा शांतपणे तोंडातून बाहेर पाठवून दिला. तिच्या फ्रॉकवर टप्पा घेऊन तो तुकडा झोक्यातून खालच्या लॉनवर अदृश्य झाला. पण आजीला हे काही नवीन नव्हतं. तिनं पुन्हा श्रीखंडाचा डबा उघडला आणि पलकला चमचाभर श्रीखंड खाऊ घातलं. तोपर्यंत पेपा पिग आणि कुटुंबीयांच्या आयुष्यातला एक प्रसंग संपून एपिसोड संपल्याचं संगीत वाजू लागलं. पलकचा चेहरा पुन्हा वेडावाकडा होऊ लागला. तिच्या डोळ्यांत पाणी भरलं आणि एक-दोन टपोरे थेंब गालांवर उतरलेसुद्धा. त्या चिमण्या जीवाचे हे जीवघेणे हाल बघून या दोन्ही स्त्रियांचं हृदय विदीर्ण झालं! शांताबाईंनी पटकन ट्रेनिंगप्रमाणे पुढचा भाग टॅबवर सुरू केला आणि आजीनं ‘‘नाही गं सोन्या… शांताबाई विसरल्या. आपण रागवू त्यांना! तू बघ हे काय आहे…’’ असं म्हणत अजून एक चमचा श्रीखंडाचा नजराणा पेश करत हाताबाहेर जाणारी परिस्थिती सांभाळून घेतली.

हेही वाचा…स्त्रियांचे न्याय्य प्रतिनिधित्व हवे

एकंदरीत परिस्थितीचा अंदाज घेऊन आजीनं एक गुगली टाकला. वाटीतला भाजीचा एक तुकडा तिनं पलक बघत असताना स्वत:च्या तोंडात टाकला आणि मिटक्या मारत खाण्याचं नाटक केलं. ‘‘वा- वा- मस्त!’’ आजीनं पलकच्या आवाजात नक्कल केली. पलकचे डोळे आता पेपा पिगकडे पूर्ण दुर्लक्ष करून आजीकडे वळले. ‘‘मला दे, मला दे,’’ हे शब्द ऐकण्यासाठी आजीचे कान आतुरले होते. तिनं ताबडतोब पडत्या फळाची आज्ञा स्वीकारत ब्रोकोलीचे उरलेले दोन तुकडे, काकडीची चकती, भोपळी मिरचीचा तुकडा, उकडलेलं अंडं, असं एकेक करून पलकच्या तोंडात उतरवलं. ‘‘देवा नारायणा, गोविंदा… अशीच कृपा असू दे बाबा!’’ म्हणत आजी जरा शेजारच्या बाकावर टेकली. झोक्यात बसलेल्या पलकला वाकून भरवताना तिची कंबर चांगलीच भरून आली होती. पलक आणि आजीचा हा कार्यक्रम चालू असताना शांताबाईही टॅब हातात घेऊन बाकावर बसल्या होत्या. तेवढ्या वेळात त्यांनी ‘पेपा पिग’चा पुढचा एपिसोड बघून संपवला. पलकच्या निमित्तानं आणि पेपा पिगच्या मदतीनं त्यांचंसुद्धा शिक्षण चालू होतं. ‘येस’ आणि ‘नो’ या दोन मूळ शब्दांबरोबर आता त्या ‘माय नेम इज शांता’, ‘पलक इज क्यूट बेबी’, ‘पलक सिट’, ‘पलक लुक- अ बर्ड/ अ कॅट/ आजी/ मम्मा/ आजोबा’, ‘फ्रेंड्स लेट्स प्ले’, अशी अनेक वाक्यं शिकल्या होत्या. पेपाप्रमाणे ‘इंग्रजी लकबीनं’ बोलू लागल्या होत्या! आपल्या लहानपणी अशी सोय असती तर किती वेगळं घडलं असतं, असं त्यांना नेहमी वाटायचं. पण पलक ही त्यांना जीव की प्राण होती आणि पलकसाठी इंग्रजी शिकायचीसुद्धा त्यांची तयारी होती.

एव्हाना पलक थोडी सुस्तावली होती. टम्म भरलेलं पोट आणि ऊन यांचा संयुक्त परिणाम असावा. आजी आणि शांताबाईंनी सगळी आरास आवरली आणि कप्प्यांच्या पिशवीत भरली. फ्रुट्सचा डबा हातात घेऊन लिफ्टचा रस्ता धरला. पण आज सगळ्यांचंच नशीब जोरावर होतं, कारण घरी पोहोचेपर्यंत पलकनं सफरचंदाच्या तीन छोट्या फोडी, एक स्ट्रॉबेरी आणि संत्र्याची एक सोललेली फोड फस्त केली. रिकाम्या पिशवीचं हलकं ओझं घेऊन सगळेजण घरी पोहोचले तेव्हा पलकनं सगळं संपवलं, याचा आनंद शांताबाई आणि आजीच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता.
घरात पाय ठेवतात, तर आजोबांच्या घोरण्याचा खर्ज कानावर पडला. ‘‘आबा झोपला?’’ पलकनं खात्री करून घेतली. ‘‘मला-झोप-ना’’ म्हणून विनंतीसुद्धा केली. आजीनं पटकन तिच्या तोंडावरून पाण्याचा हात फिरवला आणि तिचं आवडीचं मऊ, गुलाबी पांघरूण गुंडाळून तिला आजोबांच्या शेजारी ठेवलं. नात आणि आजोबा सुखानं झोपले. शांताबाई आणि आजी लिव्हिंग रूममधल्या वेगवेगळ्या सोफ्यांवर टेकून आडव्या झाल्या. दुपार शांतवली. डोळे मिटण्याआधी आजीनं रिकाम्या डब्यांचा फोटो काढून फॅमिली ग्रुपवर टाकला.

हेही वाचा…एकमेकींच्या आधाराचा पूल

अर्ध्या-पाऊण तासात आजी, आजोबा, शांताबाई सगळे पुन्हा जागे झाले. पलक मात्र अजून शांत झोपली होती. आजीनं फोन उघडला. तिनं टाकलेल्या रिकाम्या डब्यांच्या फोटोला पलकच्या बाबानं अंगठा पाठवला होता आणि आईनं हार्ट! ‘‘या दोघांचा सगळा जीव घरी अडकलेला असतो. मरो मेला तो जॉब! गुलामगिरीच ती! स्वत:च्या बाळाला असं सोडून जायचं म्हणजे किती जीव जाळायचे उद्योग…’’ आजी म्हणाली.

पाचपर्यंत पलक उठली, रडली, थोडी खेळली आणि पुन्हा टीव्हीपुढे बसली. बडबडगीत चॅनल सुरू करून आजोबा ड्युटीला बसले. सकाळीच आईनं बनवून ठेवलेला पौष्टिक थालीपीठ आणि गोड दह्याचा डबा घेऊन पलकच्या सेवेला हजर झाले. गप्पा, थोडं रागावणं, थोडं समजावणं, असं करत अर्ध्यापेक्षा जास्त थालीपीठ आणि वाटीभर गोड दही पलकच्या पोटात उतरलं. उरलेल्या थालीपिठाचा एक घास करून आजोबांनीच खाऊन टाकला. नातीला कडेवर घेऊन ते खाली बागेत जायला निघाले. चांगले दीड-दोन तास खेळून ते वर आले, तेव्हा आजोबा अगदी थकले होते. पलकचे आई-बाबाही आता घरी पोहोचले होते. आईला बघताच पलक आईकडे झेपावली आणि त्यांच्या गुजगोष्टी चालू झाल्या. ‘‘चल मनू, आपण जेवायचं ना आता?’’ असं तिच्या पाप्या घेत आई म्हणाली आणि आई, पलक, टॅब आणि शांताबाई स्वयंपाकघरात गेल्या. ‘‘अगं, जरा बस तरी! चहा करून ठेवलाय तुझ्यासाठी. सकाळी इतकी लवकर उठून तिचे सगळे डबे बनवतेस आणि वर दिवसभर ऑफिसमध्ये राबतेस. बस थोडी.’’ आजीला सुनेची धावपळ बघून कळवळा आला. ‘‘आई असू दे… आज तिच्या बाबाचा महत्त्वाचा कॉल आहे ना, त्यामुळे मी जेऊ घालते तिला.’’ पुढचा बराच वेळ आई, पलक, शांताबाई आणि टॅब यांचे संगीत खुर्चीचे खेळ चालू राहिले.

हेही वाचा…सांधा बदलताना: वैष्णव जन…

आपण जेवायला जेवढा वेळ लावू तेवढा वेळ आई समोर राहील, याची पलकला खात्री होती. त्यामुळे तिनं १५ मिनिटांचं काम चांगलं तास-दीड तास लांबवलं आणि आईच्या शक्तीचा कडेलोट करूनच मग शेवटचा घास खाल्ला.
आता सगळेच थकले होते. शांताबाई आवरून निघून गेल्या. आपापली ताटं घेऊन सगळे मोठे टीव्हीपुढे बसले. पलक समोरच काही तरी खेळत होती. जेवणं झाल्यावर बाबांनी आणि आजीनं आवरायला घेतलं. तोवर दुधाची बाटली, टॅब आणि पलक यांना घेऊन आई बेडरूमकडे रवाना झाली… अशा रीतीनं एक दिवस पार पडला!

chaturang@expressindia.com

Story img Loader