आरती कदम

परंपरेनं सांगितलेलं, लहानपणापासून वडीलधाऱ्यांनी मनावर बिंबवलेलं आयुष्य जगायचं, की त्या चौकटीपलीकडे पाहात आपल्याला नेमकं काय हवंय, त्या जगण्याचा शोध घ्यायचा?.. या प्रश्नाच्या उत्तरातून आकळलेला स्वत:ला शोधण्याचा प्रयत्न म्हणजे ‘मोना लिसा स्माइल’ हा चित्रपट. वैवाहिक आयुष्य, की स्वत:ला हवं ते घडवू देणारं पुढील शिक्षण, की दोन्हीही, या प्रश्नांच्या हेलकाव्यात नवीन आयुष्य सुरू करण्याच्या उंबरठय़ावर असणाऱ्या तरुणींना नवं भान देणारा हा चित्रपट पाहायलाच हवा असा.

bhagya dile tu mala fame actress surabhi bhave will appear in the new series Tu Hi Re Maza Mitwa of Star Pravah
‘भाग्य दिले तू मला’ फेम अभिनेत्री झळकणार ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत, प्रोमो शेअर करत म्हणाली, “कलाकार म्हणून कायमच…”
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
father daughter relation
“मुलीला तिच्या आयुष्यात वडीलाइतकं कोणीच समजू शकत नाही” पाहा बापलेकीचा हृदयस्पर्शी व्हिडीओ
samantha want to be mother
अभिनेत्री समांथा रूथ प्रभूला व्हायचंय आई, इच्छा व्यक्त करत म्हणाली, “वयाचा विचार…”
parineeti chopra and raghav chadha engrossed in ganga aarti video viral
Video: गंगा आरतीत तल्लीन झाली परिणीती चोप्रा, राघव चड्ढाही होते सोबतीला, पाहा व्हिडीओ
savlyachi janu savali fame megha dhade gift to veena jagtap
Video: ‘सावळ्याची जणू सावली’मधील वीणा जगतापला ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्रीने दिलं सुंदर गिफ्ट, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “माझी मोठी समस्या…”
aai kuthe kay karte fame Radhika Deshpande expresses her point about women bindi on forehead
स्त्रीने टिकली लावण्याविषयी ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने मांडलं परखड मत, म्हणाली, “आपण आपली संस्कृती…”
Book Self discovery in space Science
बुकरायण: अंतराळातला आत्मशोध

‘मोना लिसा’चं स्मितहास्य जगप्रसिद्ध आहे. ती आनंदी दिसते; पण म्हणजे ती खरंच आनंदी आहे का? हा असणं आणि दिसणं यात असणारा फरक म्हणजे ‘मोना लिसा स्माइल’ हा चित्रपट. आयुष्याच्या प्रवासातील यश आणि अपयशाच्या वळणांवर मार्गदर्शन करायला आपले आईवडील असतातच, पण पुढे न मागता मिळतात ते शिक्षक. एखाद्या शिक्षकाचा वेगळा विचार, दृष्टिकोन आणि मुख्य म्हणजे अपेक्षित बदल घडवण्याची चिकाटी एखाद्या विद्यार्थ्यांचं आयुष्य आमूलाग्र बदलून टाकते. प्रत्यक्ष समाजातल्या अशा अनेक घटना आपल्याला माहीत असतातच. याच समाजाचं प्रतिबिंब असणाऱ्या चित्रपटांमध्येही अनेकदा असे शिक्षक, मेन्टॉर, मार्गदर्शक भेटतात, जे आपली छाप त्या व्यक्तीवर आयुष्यभरासाठी उमटवतात. असे अनेक चित्रपट आहेत. मला आठवताहेत ते, सिडनी पॉटिए (Sidney Poitier) यांचा ‘टू सर, विथ लव्ह’ आणि रॉबिन विल्यम्स अभिनित ‘डेड पोएट सोसायटी’. दोघंही ग्रेट अभिनेते. रॉबिन विल्यम्स यांचीच भूमिका असलेला ‘गुड विल हंटिंग’ हा आणखी एक चित्रपट. त्यांचं, (शॉन मॅगवायरच्या भूमिकेत) मेन्टॉरशिप लाभलेला, त्यांच्यामुळे आयुष्य ‘जगायला’ लागलेला विल हंटिंग (मॅट डेमॉन), यांच्यातला वाद-प्रतिवाद सामान्यांच्या आयुष्यावरही प्रभाव टाकणारा. ‘टू सर..’ आणि ‘डेड पोएट..’मधले शिक्षक हे रीतसर कॉलेजमध्ये शिकवणारे प्राध्यापक आहेत. बेभान तरुणांना तारुण्याचा नेमका अर्थ शिकवणारे ‘टू सर..’ मधले प्रोफेसर मार्क ठॅकरी नावडत्याचे आवडते कसे होतात ते मुद्दाम पाहाण्यासारखं. तर ‘डेड पोएट..’मध्ये carpe diem ही लॅटिन संज्ञा- अर्थात शक्य तितका आपल्या आयुष्याचा मनसोक्त आनंद घेता यायला हवा, हे सांगताना हा शिक्षक मुलांना टेबलावर उभं राहायला सांगून तिथून रोजचंच दृश्य किती वेगळं दिसू शकतं, अर्थात थोडा बदल त्याच गोष्टी नव्यानं कसा दाखवतो, याचं भान आणून देतो.‘मोना लिसा स्माइल’मध्येही अशीच एक शिक्षिका (या भूमिकेसाठीज्युलिया रॉबर्टस्ची निवड अचूक) आपल्याला भेटते. ‘फक्त मुलीं’च्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या या तरुणी आणि ‘दिसणं आणि असणं’मधला फरक दाखवणारी त्यांची ही शिक्षिका यांच्यातला वैचारिक संघर्ष पाहायला हवा असाच. 

२००३ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट गोष्ट सांगतो ती १९५४-५५ मधल्या महाविद्यालयीन मुलींची आणि त्यांना चौकटीबाहेर बघायला शिकवणारी त्यांची ‘हिस्ट्री ऑफ आर्ट’ची शिक्षिका कॅथरीनची. कॅथरीन आधुनिक, प्रगतिशील विचारांची आहे, उच्चशिक्षित आहे. परंपरेमध्ये वाहत जगणं ती नाकारते. आपल्या आयुष्याचा ताबा आपल्याकडेच असायला हवा असं तिचं ठाम मत असतं. मुली एकदा तिला विचारतात, ‘तू लग्न का केलं नाहीस?’ तेव्हा ती म्हणते, ‘कारण मी लग्न केलं नाही.’ ती अशी आपल्या विचारांवर ठाम, तर दुसरीकडे तिची पारंपरिक विचारांची विद्यार्थिनी बेट्टी, आई जे सांगेल ते ऐकतच वाढलेली, कुटुंबवत्सल गृहिणीपदातच आयुष्याचं इतिकर्तव्य आहे, असं ठामपणे मानणारी. या दोघींमधला संघर्ष हाच या चित्रपटाचा मध्यवर्ती बिंदू असला, तरी त्यातल्या इतर तरुणींच्या कथाही याच विचारांना पूरक आहेत.

 या सगळय़ाच जणी स्त्री संस्काराचं पारंपरिक शिक्षण देणाऱ्या ‘वेलेस्ली’ कॉलेजच्या विद्यार्थिनी आहेत. आपली परंपरा भविष्यातही सुरू ठेवणाऱ्या मुलांना जन्म देणं हे आपलं कर्तव्य असल्याचं शिक्षण त्यांना मिळत असतं. मुलींना चांगला संसार कसा करायचा, घराची साफसफाई, स्वयंपाकात चमचमीत पदार्थ कसे करायचे, अचानक नवऱ्याच्या बॉसनं स्वत:बरोबर जास्तीचे पाहुणे आणल्यावर शांत राहून परिस्थिती कशी हाताळायची, टेबल कसं मांडायचं, सगळं काही इथे शिकवलं जातं. मात्र, लग्न होईपर्यंतचा काळ कॉलेजमध्ये घालवणं, इतकीच या मुलींची गरज असल्याची जाणीव झालेल्या कॅथरीनला त्याचीच खंत आहे. फक्त चूल आणि मूल यातच आनंद मानणाऱ्या मुलींना, त्या विचारातून बाहेर काढणं किती कठीण आहे याची जाणीव तिला पहिल्याच दिवशी होते.

‘चित्रकलेचा इतिहास’ ती स्लाइडस्च्या माध्यमातून शिकवायला सुरुवात करते. एकेक स्लाइड पुढे जातेय आणि त्याची मुखोद्गत, रट्टा मारलेली माहिती या मुली एकामागोमाग एक देत जातात. आपल्याला सगळं माहिती आहे, या अहंकारात! आणि ‘तुझ्याकडे आम्हाला सांगण्यासाठी आणखी काही आहे, की आम्ही जाऊ?’ असं म्हणत तिची परवानगीही न घेता सगळय़ा वर्गाबाहेर जातात. स्वत:ला सिद्ध करण्याचं आव्हान कॅथरीनसमोर असं पहिल्याच दिवशी उभं राहातं. कला ही समजून घेण्याची, प्रत्येकाच्या व्यक्तिगत अनुभवाची गोष्ट आहे, हे या मुलींना माहितीच नाही. त्यांना फक्त सिलॅबस तोंडपाठ करून परीक्षा द्यायची इतकंच माहिती आहे. अर्थात कॅथरीन त्यांची शिक्षिका आहे. या झापड लावून जगणाऱ्या विचारांना कसं हाताळायचं याची तिला कल्पना आहे. दुसऱ्या दिवशी कॅथरीन  Soutine (शुचीन)च्या ‘कारकॅस’ चित्राची स्लाइड लावते. ते कसलं चित्र आहे? मुलींना प्रश्न पडतो. कारण ते त्यांच्या पुस्तकातलं, अभ्यासक्रमातलं नसतं. ‘‘बोला.. कसं आहे हे चित्र? चित्र चांगलं-वाईट असं नसतं. तुम्हाला काय वाटतं ते पाहून हे महत्त्वाचं. त्यावर बोललं पाहिजे.’’ यावर बेट्टी म्हणते, ‘‘प्रत्येक कलाकृतीचं एक तंत्र असतं. त्याला दर्जा, आकार, रंग, विषयही असतो आणि तू एक खराब झालेल्या मांसाचं चित्र दाखवून त्याला कला म्हणतेस. आम्ही नेमकं काय शिकणार आहोत?’’ कॅथरीन शांतपणे म्हणते, ‘‘पुन्हा त्या चित्राकडे पाहा, त्या चित्रापलीकडे पाहा. तुमच्या मनात नवीन कल्पनेसाठी जागा निर्माण करा. तुम्हाला प्रथमदर्शनी जे दिसतंय त्याच्यापेक्षा वेगळं पाहायचा प्रयत्न करा.’’ मुली विचारात पडतात. इथे कॅथरीनची सरशी झालेली असते.

असाच एक वेगळा विचार ती मुलींना देते व्हॅन गॉगच्या चित्रांतून. त्याचं प्रसिद्ध सूर्यफूल असो, की स्वत:चं पोट्र्रेट. कॅथरीन सांगते, ‘‘व्हॅन गॉग जे समोर दिसतं ते पाहून चित्र काढत नव्हता, तर त्याला ते पाहून जे वाटतं त्याचं चित्र काढत होता. त्याच्या ब्रशच्या एका फटकाऱ्यानं आकाशातले ढग तरंगताहेत असा भास व्हायचा. ही त्याच्या प्रतिभेची किमया. त्याच्या हयातीत एकही चित्र विकलं नाही; पण नंतर त्याच्या चित्राचा आपण बाजार मांडला. १, २, ३ आकडय़ांच्या चौकटी तयार करायच्या आणि गॉग बरहुकूम तसंच्या तसं चित्र काढायचं, कोणत्याही आकारातलं. गॉगच्या चित्राची प्रतिकृती, जणू गॉग आपल्याला चितारता येतो या आविर्भावात. त्याऐवजी एखादी गोष्ट पाहून, ते चांगलं, वाईट न ठरवता, त्याचा पोत, रेषांचे, रंगांचे फटकारे बारकाईनं पाहा, त्यात काय वेगळं आहे ते शोधा. इतरांना काय वाटतं, यापेक्षा तो तुमचा स्वत:चा खास अनुभव असेल.’’           

मुलींच्या मनात ती असं नवीन विचारांचं बीज टाकत जाते. अर्थात चित्रांचा असा अनुभव घेणं ही फक्त एक बाजू झाली. हेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात होणं गरजेचं होतं. आपण स्वतंत्र व्यक्ती आहोत, याचं भान त्यांना आणून देणं हे कॅथरीनपुढचं सर्वात मोठं आव्हान; पण लग्न हीच जीवनाची परिपूर्ती मानणाऱ्या या मुलींना त्यापलीकडे किंवा त्याबरोबरीनं वेगळं आयुष्य आहे, हे सांगण्याचा तिचा प्रयत्न, ‘तुझं लग्न झालेलं नाही. तू आम्हाला हेच शिकवणार,’ या टोमण्यात विरून जातो. बेट्टीचं लग्न होतं. ती जाते. तिची खास मैत्रीण जॉन, तिचंही लग्न ठरलंय. दोघी खूश आहेत. अभ्यासाव्यतिरिक्त कॉलेजमधल्या इतर अ‍ॅक्टिव्हिटीजमध्येही पुढे असणाऱ्या जॉनला तिची फाइल पाहून कॅथरीन विचारते, ‘‘तुला कायद्याची आवड दिसते. मग पुढे शिकणार का?’’ तेव्हा ती निरागसपणे म्हणते, ‘‘पण माझं लग्न होणार आहे.’’ त्यावर कॅथरीन विचारते, ‘‘हो. त्यानंतर?’’ तेव्हा तेवढय़ाच निरागसपणे ती म्हणते, ‘‘त्यानंतर.. माझं लग्न झालेलं असेल.’’ कॅथरीन म्हणते, ‘‘पण तू दोन्ही करू शकतेसच ना?’’ कॅथरीन तिला ‘येल’चा फॉर्मही आणून देते. नंतर एकदा कॉलेजची माहिती द्यायला कॅथरीन तिच्या घरी जाते, तेव्हा तिला कळतं, की जॉनचं लग्न झालेलं आहे. निराश होऊन निघणार तेवढय़ात जॉन तिला म्हणते, ‘‘तूच म्हणाली होतीस, तुमच्या मनातल्या प्रतिमेपलीकडे पाहा; पण तुझ्या मनात पूर्णवेळ गृहिणी असणं, म्हणजे जिनं आपला आत्मा विकला आहे, जिच्याकडे विचारांची ना खोली आहे, ना बुद्धिमत्ता. तू या प्रतिमेपलीकडे का बघत नाहीस? तुझंच म्हणणं होतं ना, मला जे हवं आहे ते मी करू शकते. मी तेच करते आहे, जे मला मनापासून करायचं आहे.’’ आपल्या विचारांच्या विरुद्ध असूनही जॉनच्या निवडीचा कॅथरीन समजूतदार स्वीकार करते.

  दरम्यान, पारंपरिक शिक्षण देणारं ‘वेलेस्ली’ कॉलेजचं व्यवस्थापन कॅथरीनला तिच्या आधुनिक, अभ्यासक्रमापलीकडच्या शिकवणुकीला थांबवायला सांगतं आणि कॉलेजच्या पुढच्या वर्षी इथे कायम राहायचं असेल तर या नियमाचं पालन करण्याची अट घालतं. कॅथरीनला ही अट मान्य होणं शक्य नसतं. ती कॉलेज सोडून निघते; पण बाहेर पडताना तिला सोबत करतात याच तिच्या विद्यार्थिनी, ज्यांना तिनं आपल्याला हवं तसंच जगण्याचा मंत्र दिला आहे. जाण्यापूर्वी त्या तिला अमूल्य भेट देतात. व्हॅन गॉगचं सूर्यफूल हे चित्र आकडय़ांमध्ये रचत तसंच्या तसं काढण्याऐवजी हव्या त्या रंगात, हव्या त्या आकारात प्रत्येकीनं चितारलेला वेगवेगळा पुष्पगुच्छ त्या तिला दाखवतात आणि म्हणतात, ‘‘आम्हाला आठवण्याचा यापेक्षा उत्तम मार्ग कोणता असू शकेल?’’ इथे कॅथरीनचा, तिच्या विचारांचा खऱ्या अर्थानं विजय झालेला असतो. ती निघते दुसऱ्या ठिकाणी; जिथे तिला जुन्या भिंती पाडून नवीन भिंती उभ्या करायच्या असतात..

कॅथरीनच्या विचारांचा सगळय़ांत मोठा विजय असतो तो म्हणजे बेट्टीचं परिवर्तन. आपल्या पारंपरिक विचारांवर सुरुवातीपासूनच ठाम असणारी बेट्टी कॉलेजमध्ये गर्भनिरोधकांचं वाटप करणाऱ्या नर्स अमांडाचं गुपित आपल्या ‘वेलेस्ली कॉलेज न्यूज’ या वृत्तपत्रीय लेखातून ती उघड करते. तिला कॉलेज सोडून जाण्यास भाग पाडते. ‘लग्न न करणं हा चॉइस असूच शकत नाही, कारण कोणतीही बाई घराशिवाय राहणं निवडूच शकत नाही.’ असं तिचं ठाम मत असतं. ती आपल्या एका लेखातून कॅथरीनच्या लग्नविषयक विचारांचे जाहीर वाभाडे काढते.

   कॅथरीन वर्गातच तिला उच्चशिक्षित, पण घरसंसारातच अडकून पडल्यानं प्रतिभा वाया गेलेल्या बुद्धिमान स्त्रियांची उदाहरणं देते आणि उद्याच्या पिढीसमोर आजच्या स्त्रीचं चित्र काय असणार आहे? असा प्रश्न विचारत निरुत्तर करते. अर्थात इथे चित्रपटाच्या पलीकडे जाऊन हा विचार येतो, की स्त्रीवादी चळवळीमुळे किंवा अन्य कारणांमुळे या पिढीतल्या स्त्रियांनी खूप लवकर प्रगती केली. त्या उच्च शिक्षण घेऊ लागल्या, उच्च पदांवर नोकरी करू लागल्या; पण त्या वेळी तुम्ही ‘घर आणि नोकरी’ दोन्ही करू शकता हेच शिकवलं गेल्यानं किंवा तरच आपल्याला नोकरी करता येईल याची खात्री असल्यानं असेल, त्याचा दुहेरी ताण स्त्रियांवर पडत गेला आणि तो अद्याप कायम आहेच. आज बाई बाहेर पडली आहे, परंतु घरच्या जबाबदाऱ्या सांभाळूनच. असो.

बेट्टी लग्न करते. तिचा संसार सुरु होतो; पण हळूहळू तिच्या लक्षात येतं, तिचा नवरा तिच्याशी प्रामाणिक नाही. तो ना तिला प्रेम देतोय, ना शरीरसुख. हतबल झालेली बेट्टी आईकडे येते, तर आई तिला आल्या पावली परत पाठवते. बेट्टी जेव्हा विचारते, ‘‘म्हणजे हे घर माझं नाही?’’ तेव्हा आई स्पष्टपणे सांगते, ‘‘नाही, तुझं घर तुझ्या नवऱ्याचं.’’ वास्तवाची दाहक जाणीव झालेली बेट्टी कॉलेजला जायला लागते आणि घटस्फोटाचा अर्ज दाखल करते. कॅथरीनच्या आधुनिक विचारांचा तिरस्कार करणारी बेट्टी, नंतर आपण कायदा शिकू शकतो, स्वत:च्या पायांवर उभं राहू शकतो, या जाणिवेनं स्वत:साठी वेगळं घरही शोधते. कारण आता तिला मोना लिसासारखं आनंदी दिसायचं नाहीये, तिला आनंदी असायचं आहे.