आपल्यासाठी माता-पिता देवासमान असतात. माता ही घरातलं घरपण असते आणि पिता हे घराचे छत्र असते, पण माझ्या नशिबी हे सुखच नाही. मी १२ वर्षांची असताना वडील हयात असूनही वडिलांची साथ सुटली. मला तर असे वाटू लागले की, जणू माझ्या पायाखालून जमीनच सरकली. आई बिचारी खचूनच गेली. अशा परिस्थितीत समाज नाना शब्दाने दुखावत असतो हे अनुभवले, पण त्यातला एकही मदत करत नाही.
.. त्याप्रसंगी माझी आई मला आणि माझ्या भावाला घेऊन रात्रीच्या वेळी मामाच्या घरी आली. त्यावेळी तिची अवस्था पाहून माझ्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. डॉक्टरांशी सल्लामसलत केली, तिच्या डोक्याला खूप मार लागला होता, सूज आली होती. औषधोपचार करण्यासाठी खर्च खूप येत होता. मामाची परिस्थिती तो खर्च पेलवणारी नव्हती. अशावेळी माझ्या आईने मागे-पुढे विचार न करता कर्ज काढण्यास सांगितले. ती वेळ विचार करण्याची नव्हती. कारण माझी आई त्या क्षणी मृत्यूशी झुंज देत होती, हॉस्पिटलमधील उपचाराने उभी राहिली.
काही दिवस गेले आणि माझी आई स्वत:च्या पायावर उभी राहिली. कंपनीत जाऊन मुलांच्या पोटासाठी पैसे कमाऊ लागली, पण दुर्दैव असं असतं की, दु:ख आणि व्याकुळतेने झुंजणाऱ्या स्त्रीला समाज स्वीकारत नाही. घराभोवती जमलेल्या बायका टोचणारे शब्द बोलत असतात, रस्त्यावरून जाणारी माणसे वाईट नजरेने पाहत असतात. अशा सर्व गोष्टींना माझी आई कंटाळून गेली. काही कालावधीनंतर धुणे-भांडय़ांची कामे करू लागली. मला ७ वी व माझ्या भावाला ४ थीत शाळेत घातले. पैशांची कमी पडू नये म्हणून भरपूर घरी कामे करू लागली. तिने जिद्द केली. आपल्या मुलांना कशाचीच कमी पडू द्यायची नाही. त्यांना भरपूर शिकवायचं. सुजाण नागरिक बनवायचं आणि अन्यायाला ठोकर मारून पुढे जायचं, जे मागं गेलं ते वळून पाहायचं नाही, पुढे होणार आहे ते जीवन जगायचं. माझी आई एक डोळ्यात मला आणि दुसऱ्या डोळ्यात माझ्या भावाला पाहते. अशा तिच्या धैर्यामुळे ती परिस्थितीला तोंड देत आहे. तुटपुंज्या पैशावर घर चालवताना तिला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, पण ती माघार कधी घेत नाही. चांगल्या माणसांनी व चांगल्या संस्थांनी तिला मनोधैर्य दिले.
मी (आई) जे भोगते आहे ते कोणीही, कोणत्याही दुसऱ्या स्त्रीने-भोगू नये’ असं जेव्हा माझी आई मला सांगते तेव्हा माझी मान गर्वाने उंचावते.
आई घराचे घरपण
आपल्यासाठी माता-पिता देवासमान असतात. माता ही घरातलं घरपण असते आणि पिता हे घराचे छत्र असते, पण माझ्या नशिबी हे सुखच नाही. मी १२ वर्षांची असताना वडील हयात असूनही वडिलांची साथ सुटली. मला तर असे वाटू लागले की, जणू माझ्या पायाखालून जमीनच सरकली.
आणखी वाचा
First published on: 11-05-2013 at 01:03 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: My mother is best